महाज्योतीचे मोफत सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण; दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन MahaJyoti

MahaJyoti Free Military Pre-Recruitment Training 2023 https://mahajyoti.org.in

Mahajyoti’s Free Military Pre-Recruitment Training

Mahatma Jyotiba Phule Research and Training (Mahajyoti) Institute, Other Backward Classes and Bahujan Welfare Department will provide free military recruitment pre-examination training to one and a half thousand youths of the Maharashtra state. The sanctioned number of students for this training is kept at 1500. The duration of training will be 6 months. During this period, on the condition of 75% attendance is must, the trainee will be given a stipend of Rs. 10,000/- per month. A one-time contingency fund of 12,000/- rupees has been provided. This training will be conducted at Pune District of Maharashtra. The deadline for accepting online applications for this has been fixed on 28th May 2023.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

This training will be for other backward classes, freed castes, nomadic tribes and special backward class students. In this, the selected students will be given free offline, non-residential training for the preparation of military recruitment. Students who have passed 12th and completed medical qualification will get an opportunity for this. Eligible students are requested to apply on Mahajyoti’s website http://mahajyoti.org.in/ to avail this. A screening test will be conducted for final selection. However, Rajesh Khawle, Managing Director of Mahajyoti has appealed to the eligible students to take advantage of this and contact the institute at 0712-2870120/21.

Mahajyoti's Free Military Pre-Recruitment Training

महाज्योतीचे मोफत सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण; दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण (महाज्योती) संस्था,  इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राज्यातील दीड हजार युवकांना मोफत मिलिटरी भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी मंजूर विद्यार्थी संख्या 1500 ठेवण्यात आली आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असणार आहे. या कालावधीत 75 टक्के उपस्थितीच्या अटीवर प्रशिक्षणार्थ्यास दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. आकस्मिक निधी एकवेळ 12 हजार रुपयाची तरतुद करण्यात आलेली आहे. सदर प्रशिक्षण पुणे येथे घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 28 मे ठेवण्यात आलेली आहे.

हे प्रशिक्षण इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन, अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी 12 वी उत्तीर्ण व वैद्यकीय अर्हता पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या http://mahajyoti.org.in/ या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अंतिम निवडीसाठी चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा तसेच संस्थेच्या 0712-2870120/21 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.

Mahajyoti’s Free Military Training Important Link

Complete Advertisement

Online Registration Link


MahaJyoti will give free tab and internet to students

Mahatma Jotiba Phule Research and Training Institute Mahajyoti will provide free tab and internet to the students. Beneficiary student should be a resident of Maharashtra State, Other Backward Classes and Exempt Castes, Nomadic Tribes or Special Backward Classes, Non Crimillionaire income group. Eligibility – Students who are giving 10th exam in the year 2023 are eligible to apply, they should attach 10th admit card and 9th mark sheet while applying, student should be taking admission in science stream.

महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व इंटरनेट देण्यात येणार आहे.

  1. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गच्या शैक्षणिक, आर्थिक सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना शासन निर्णय ८ ऑगस्ट २०१९ रोजी केली. या अंतर्गत दुर्लक्षित प्रवर्गासाठी उद्देशित कार्यक्षेत्र व विशेष घटक स्थापिले आहेत.
  2. महाज्योती मार्फत महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास – प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण, युपीएससी, एमपीएससी आदी स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते. उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी या करिता कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. तसेच विविध संशोधन कार्याला प्रोत्साहन मिळावे याकरिता पीएचडी व एम.फिल करणाऱ्या उमेदवारांना अधिछात्रवृत्ती प्रदान करण्यात येते. या अंतर्गत मोफत टॅब व इंटरनेट – सुविधा देण्यात येत असून यामध्ये लाभार्थी विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, इतर मागासवर्गीय व विमुक्त जाती भटक्या जमाती किव्हा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा, नॉन क्रिमिलींयर उत्पन्न गटाततील असावा.
  3. Eligibility – जे विद्यार्थी सन २०२३ मध्ये १० वी ची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून, त्यांनी अर्ज करताना दहावीची प्रवेश पत्र व ९ ची गुण पत्रिका जोडावी, विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा.

Required documents for Mahajyoti free tab and internet

  1. अर्ज करण्यासाठी ९ वी ची गुणपत्रिका,
  2. १० वी परीक्षेचे ओळखपत्र,
  3. आधार कार्ड,
  4. रहिवासी दाखला,
  5. जातीचे प्रमाणपत्र, वै
  6. द्य नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
  7. या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सूचनानुसार अपलोड करणे आवश्यक आहे.

How to Apply for Mahajyoti free tab and internet

  • त्‍यासाठी महाज्योती संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा अर्जासोबत नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावेत.

MahaJyoti Free Training For JEE NEET

Mahajyoti is inviting applications for tabling and coaching students preparing for JEE/NEET/MHT-CET 2025. Students who are now giving their 10th exam or who have given their 10th exam this year and are going to take admission in 11th science stream in the coming academic session will have this opportunity. Mahajyoti will provide 18 months of free training to them to prepare for the JEE, NEET exams to be held in 2025. The last date for submission of application is 31st March 2023.

जेईई, नीट परीक्षा देऊन भविष्याची स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘महाज्योती’नं मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. जे विद्यार्थी आता दहावीची परीक्षा देत आहेत किंवा ज्यांनी यावर्षी दहावीची परीक्षा दिली असून येत्या शैक्षणिक सत्रात 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना ही संधी असणार आहे. 2025 मध्ये होणाऱ्या जेईई, नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांना महाज्योती 18 महिन्यांचे मोफत प्रशिक्षण देणार आहे.

ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थी दहावीमध्ये 60 ते 70 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होतात. त्यानंरत 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतात आणि जेईई नीट स्पर्धा परीक्षेला सामोरे जातात. बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने ते लाखो रुपये खर्चून शिकवणी वर्ग लावू शकत नाही. अशा विद्यार्थ्यांना महाज्योतीने 18 महिने मोफत प्रशिक्षण दिले जाते.

कोणते विद्यार्थी पात्र ?

महाज्योतीच्या या योजनेचा लाभ घेण्याकरिता सर्व ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी पात्र आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थी नियमित 11 वी व 12 वी शिकत असतानाच ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचा फायदा वर्ग 12 वीच्या परीक्षेतसुद्धा मिळणार आहे.

कागदपत्रे काय लागतात?

यासाठी विद्यार्थ्यांची नववी पासची गुणपत्रिका, दहावीचे हॉल तिकीट, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र, आधार कार्ड याच्या प्रती या संकेतस्थळावर नोंदणी करताना अपलोड करावयाच्या आहेत. नोंदणी केलेल्या अर्जाची प्रिंट किंवा स्क्रीनशॉट जपून ठेवावा. दहावीचा निकाल लागल्यावर 11वी विज्ञानला प्रवेश घेतल्याचे महाविद्यालयाचे बोनाफाईड व नीट सीईटी परीक्षेची तयारी करीत असल्याचे हमीपत्र याच संकेतस्थळावर अपलोड करावे लागेल.

घरबसल्या करा ऑनलाइन अर्ज

या मोफत प्रशिक्षणाकरिता ऑनलाइन अर्ज करण्याचीही सुविधा असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. त्यांनी घर बसल्याच महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन 31 मार्चच्यापूर्वी नोंदणी करावी.

प्रशिक्षणासाठी टॅबही मोफत

या प्रशिक्षणासाठी यशस्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या वतीने एक आठ इंची ब्रँडेड कंपनीचा टॅब मोफत दिला जातो. तसेच प्रशिक्षणादरम्यान सुमारे दोन वर्षे दररोजचा सहा जीबी इंटरनेट डाटाही मोफत दिला जाणार आहे. ही सर्व माहित प्रा. दिवाकर गमे, माजी संचालक महाज्योती यांनी दिली आहे.

REGISTRATION LINK


MahaJyoti Free Training for Police Bharti 2023

नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी योजना https://mahajyoti.org.in : Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (Mahajyoti), Nagpur conducts pre-recruitment training for students belonging to other backward classes, nomadic tribes and special backward classes. The registration process of students for this training has been started and the last date for applying is 25th January 2023. Mahajyoti has appealed to take advantage of pre-recruitment training for Police force. Through Mahajyoti, training will be provided at two places in Nagpur and Aurangabad District of Maharashtra. Interested candidates should apply online through the instruction given below on official website www.mahajyoti.org.in. Read the complete etails given below and keep visit us for the further updates.

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, पोलीस-सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षणासाठी असा करा अर्ज… राज्य सरकारत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध योजना, शिष्यवृत्ती आणि पोलीस-सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेत नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खालील दिलेल्या पद्धतीने योजनेचा लाभ घेता येईल.

महाज्योती मार्फत पोलीस- सैन्यदल भरतीसाठी प्रशिक्षण

  1. महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस– सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात येते.
  2. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली असून अर्ज करण्यासाठी अंतिम दि. 25 जानेवारी 2023 आहे.
  3. पोलीस-सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन महाज्योतीतर्फे करण्यात आले आहे. महाज्योतीमार्फत प्रशिक्षण नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी देण्यात येणार आहे.

MahaJyoti Training Program 2023 Eligibility

चार महिन्यांचे प्रशिक्षण, सहा हजार रुपये विद्यावेतनही…

  1. प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्याचा असून प्रशिक्षण हे अनिवासी स्वरुपाचे आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमाह 6 हजार रुपये इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे.
  2. तसेच प्रशिक्षणा दरम्यान पुस्तके, गणवेश व बूट देखील देण्यात येणार आहेत.
  3. प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा.
  4. उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा.

How to Apply For MahaJyoti Free Training

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी असा करा अर्ज

  1. नागपूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय तसेच शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना सन 2022-23 वर्षात महाडीबीटी या पोर्टलवरील भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनेचे अर्ज भरण्याकरीता 21 सप्टेंबर 2022 पासून महाडीबीटी पोर्टल कार्यान्वीत करण्यात आलेले आहे.
  2. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन भरून घ्यावे तसेच महाविद्यालयाने नोंदणीकृत झालेले अनुसुचित जाती, इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गाचे अर्ज तपासणी करून समाज कल्याण कार्यालयाकडे मंजुरीकरीता सादर करावे.
  3. अनुसुचित जाती, इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गातील एकही पात्र लाभार्थी शिष्यवृत्तीपासून वंचीत राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
  4. इच्छुक उमेदवाराने महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरील नोटीस बोर्डमधील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण या टॅबवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती – भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पोलीस सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याचे आवाहन महाज्योतीमार्फत करण्यात येत आहे.
  5. अधिक माहितीसाठी येथे साधा संपर्क…अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी दूरध्वनी क्र. 2221041 [email protected] किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, श्रध्दानंद पेठ, शासकीय औद्योगिक संस्थेसमोर, नागपूर येथे संपर्क साधावा.

How to Apply Mahajyoti Training

Online Registration Link for Pre- Recruitment training

MahaJyoti Online Registration Link

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज प्रक्रिया सुरू

Online Registration Link


Registration for online preparation for Police Recruitment Pre-Exam

Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (Mahajyoti)  are invited from aspiring students who have passed 12th standard in the non-crimilayer group of other backward classes, deprived castes and nomadic tribes, special backward classes, for the free online training of  upcoming Police Recruitment Examination. The last date to apply is April 30, 2022.

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), संस्थेचे कार्यालय नागपूर येथे कार्यरत असून राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीच्या | अनुषंगाने होणाच्या परीक्षांच्या निःशुल्क ऑनलाईन प्रशिक्षणासाठी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या समाज घटकातील नॉनक्रिमीलेअर गटातील १२ वी उत्तीर्ण असणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ३० एप्रिल, २०२२ आहे. ऑनलाईन अर्ज किंवा मेलचा विचार केला जाणार नाही..

अधिक माहिती साठी येते क्लिक करा 


Free Police Pre-Recruitment Training Programme under Maha Jyoti

महा ज्योती अंतर्गत मोफत पोलीस पूर्व भरती प्रशिक्षण कार्यक्रम

पोलीस भरती कागदपत्रे 2023

पोलीस भरती अपेक्षित प्रश्नसंच (मोफत टेस्ट सिरीज)

पोलीस भरती 2023 लेखी परीक्षा महत्वाच्या ट्रिक्स 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    MahaJyoti Pre recruitment Training Program 2023 https://mahajyoti.org.in

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!