परदेशी शिष्यवृत्तीसाठी ५ जुलैपर्यंत अर्ज मुदत – Foreign Scholarship

Foreign Education Scholarships for the year 2023-24

The State Government’s Department of Social Justice and Special Assistance has extended the deadline for applications for foreign education scholarships for the year 2023-24. Accordingly, students can apply till 5th July 2023. Social Welfare Commissioner Dr. Prashant Naranvare gave this information. Under the scheme, Master’s degree and Ph.D. Scholarships are awarded to 75 students belonging to Scheduled Castes who are admitted to an educational institution in the top 300 institutions of the QS World Ranking for the course. Read the complete details given below here and keep visit us.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

परदेशी शिष्यवृत्तीसाठी ५ जुलैपर्यंत अर्ज मुदत

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागातर्फे २०२३-२४ या वर्षीच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत अर्ज करता येईल. समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी ही माहिती दिली. योजनेंतर्गत  पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी क्यूएस जागतिक क्रमवारीतील पहिल्या तीनशे संस्थांतील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.

योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च दिला जाईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे, पीएच.डी.साठी ४० वर्षे कमाल वयोमर्यादा आहे. भारतीय आयुविज्ञान परिषदेच्या संकेतस्तळावरील एमडी, एमएस अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील.२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्जांसाठी २० जून ही अंतिम मुदत होती.

मात्र अर्जासाठी मुदतवाढ देण्याच्या मागणीनुसार मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. http://www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या दुव्यावरून अर्ज डाऊनलोड करून तो ५ जुलैपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह  समाज कल्याण आयुक्तालय ३, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- ४११००१ या पत्त्यावर सादर करणे आवश्यक आहे.

Foreign Scholarship apply link

Complete Notification


Foreign Scholarships Examination -Selection List

Foreign Scholarship Exam Selection List: The way for students to study abroad has been cleared. Department of Social Welfare has finally Released Selection List of Chhatrapati Shahu Maharaj Abroad Scholarship. The Department of Social Welfare has announced scholarships for 75 students of the state to study abroad for Post Graduate Diploma, Ph.D. This scholarship provides free education to the students.

समाजकल्याण विभागाने अखेर छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीची निवड यादी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा परदेशात शिक्षणासाठीचा जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उशिरा का होईना निवड यादी जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेत नियोजित पदव्युत्तर पदविका, पीएच.डी.च्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता येणार आहे.

  • ‘तत्काळ निवड यादी प्रसिद्धी करावी’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर समाजकल्याण विभागाने तातडीने हालचाल करत निवडयादी जाहीर केली आहे. विभागाकडून अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती दिली जाते.
  • यंदा या शिष्यवृत्तीची निवडयादी ३० ते ३५ दिवस उशिराने जाहीर झाली आहे. अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमाला पोचण्यास उशीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होणारच आहे.
  • आता विद्यार्थ्यांना व्हिसा, विमानप्रवासाचे तिकीट बुक करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच किमान निवडयादी लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. समाजकल्याण विभागाने पदव्युत्तर पदविका, पीएच.डी.चे परदेशात शिक्षणासाठी राज्यातील ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. या शिष्यवृत्तीतून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोफत व्यवस्था केली जाते.

Scholarships are offered by the Department of Higher and Technical Education to students in the open category who wish to go abroad for higher education. The department has given an extension to apply for this scholarship. Students will now be able to apply for the scholarship till 22nd July 2022. Applicants need to apply http: // www. dtemaharashtra.gov.in. Read More details as given below.

DTE Maharashtra Scholarship

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी आता २२ जुलैपर्यंत http://www.dtemaharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे (Department of Higher and Technical Education) दर वर्षी खुल्या गटातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. परदेशातील विद्यापीठ, महाविद्यालयांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क, निर्वाह भत्ता आणि आरोग्य विमा असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. राज्यातील खुल्या प्रवर्गातील २० गुणवंत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी आठ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. आता त्याला मुदतवाढ देण्यात आली असून, २२ जुलैपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात. या मुदतीपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेल्या अर्जाची छायांकित प्रत आवश्यक कागदपत्रांसह सहसंचालकांकडे सादर करणे अनिवार्य असणार आहे.

संबंधित शिष्यवृत्ती ही ‘द टाइम्स हायर एज्युकेशन’ किंवा ‘क्यू एस रँकिंग’मध्ये समाविष्ट असलेली महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळू शकणार आहे. इतर कोणत्याही संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू होणार नाही, असेही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

शिष्यवृत्तीची माहिती

  • १. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाच अर्ज करता येणार.
  • २. पदवी, पदव्युत्तर, पीएचडी शिक्षणासाठी अर्ज करता येणे शक्य.
  • ३. विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या आत हवे.
  • ४. ‘द टाइम्स हायर एज्युकेशन’ किंवा ‘क्यू एस रँकिंग’मध्ये समाविष्ट महाविद्यालये व विद्यापीठांमध्येच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.
  • ५. राज्यातील एकूण २० विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती.

असा करा अर्ज

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या http://www.dtemaharashtra.gov.in या वेबसाइटवर संपर्क करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. २२ जुलैपर्यंत अर्ज भरून त्याची छायांकित प्रत सर्व आवश्यक कागदपत्रांसह विभागाच्या सहसंचालकांना सादर करणे बंधनकारक असणार आहे.


Scholarships are offered by the Department of Higher and Technical Education to students in the open category who wish to go abroad for higher education. The department has given an extension to apply for this scholarship. Students will now be able to apply for the scholarship till 9th Nov 2021.

उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत परदेशी शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना मंगळवार, ९ नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहे.

परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्याची अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असते. गुणवत्ता असूनही अनेकदा आर्थिक परिस्थितीअभावी विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ पैशांमुळे अर्धवट राहू नये व त्यांना चांगल्या संधी मिळाव्यात, तसेच गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची संधी मिळावी यासाठी साठी उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत २०१८ पासून ही शिष्यवृत्ती दिली जाते.

या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत एक नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. परंतु, ही मुदत आता वाढविण्यात आली असून, विद्यार्थ्यांना ९ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या अर्जाची प्रिंट काढावी लागणार आहे. ही प्रिंट आवश्यक ती कागदपत्रे व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह संबंधित विद्यार्थ्याला उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या विभागीय कार्यालयामध्ये जमा करावी लागणार आहे. यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या जमा झालेल्या सर्व अर्जांची तपासणी करून हे अर्ज तंत्रशिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात संबंधित विभागीय कार्यालयांना ११ नोव्हेबंरपर्यंत जमा करावे लागणार आहेत.


Scholarships are offered by the Department of Higher and Technical Education to students in the open category who wish to go abroad for higher education. The department has given an extension to apply for this scholarship. Students will now be able to apply for the scholarship till November 1, 2021.

उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी विभागाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना १ नोव्हेंबर २०२१ पर्यंत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहेत.

खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. यापूर्वी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी १८ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामध्ये आता वाढ करण्यात आली असून, १ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज पडताळणी आणि स्वीकृती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना १ नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजेपर्यंत सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, पुणे यांच्या कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या पार्श्वभूमीवर २०१८ पासून उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ होत असून, आता मुदतवाढ मिळाल्याने आणखी काही विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकणार आहेत.


The Department of Higher and Technical Education has invited applications under the scholarship scheme for higher education abroad for meritorious boys and girls in the open category. For the year 2021-22, students will be able to apply online till October 18. The office of the Joint Director will have till October 20 to complete the required documents along with the copy of the application.

उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज मागविले आहेत. २०२१-२२ या वर्षासाठी विद्यार्थ्यांना १८ ऑक्‍टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. सहसंचालक कार्यालयास अर्जाच्‍या प्रतीसह आवश्‍यक कागदपत्रांच्‍या पूर्ततेसाठी २० ऑक्‍टोबरपर्यंत मुदत असेल.

पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी, टाइम्‍स हायर एज्‍युकेशन (THE) किंवा क्‍यूएस (QS) क्रमवारीत दोनशेच्‍या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला असेल, अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकते. ही योजना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोरोना महामारीच्‍या पार्श्वभूमीवर वित्तीय तुटवड्यामुळे राबविली नव्हती. काही सुधारणांसह शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात परदेशातील विद्यापीठात प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्यांनाही अर्ज करण्याची संधी असेल. मात्र, अशा विद्यार्थ्यांपैकी ज्यांची निवड होईल, त्यांना प्रथम वर्ष वगळता पुढील अभ्यासक्रमाच्या मान्य कालावधीसाठी शिष्यवृत्ती देय राहील, असे स्‍पष्ट केले आहे.
योजनेच्या सविस्तर अटी व शर्ती, पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, मिळणारे लाभ, शिष्यवृत्तीच्या लाभासाठी निवड कार्यपद्धती आदी माहिती www.foreignscholarship2021.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. योजनेचा जास्‍तीत जास्‍त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले आहे.

विभागातील विद्यार्थ्यांना अडचणींसाठी सहाय्यता

नाशिक विभागातील विद्यार्थ्यांना अर्ज भरताना काही अडचणी असल्यास त्यांना मदत उपलब्‍ध होणार आहे. तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, नाशिक येथील समन्वयक जयंत गजानन जोशी यांना ७८७५२७६१३६ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

या शिक्षणक्रमांसाठी मिळेल शिष्यवृत्ती

विविध सहा शाखांत पदव्‍युत्तर पदविका/ पदव्‍युत्तर पदवी आणि डॉक्‍टरेट शिक्षणक्रमासाठी प्रत्‍येकी एक, अशा एकूण दोन जागा उपलब्‍ध असतील. कला, वाणिज्‍य, विज्ञान, व्‍यवस्‍थापन, विधी आणि औषध निर्माणशास्‍त्र अशा या सहा शाखा आहेत, तर अभियांत्रिकी/वस्‍तुकला शास्‍त्र या शाखेसाठी प्रत्‍येकी चार याप्रमाणे आठ जागांसाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.


foreign scholarships

The state government is positive to increase the number of beneficiaries of Rajarshi Shahu Maharaj Pardesh Scholarship Scheme from 75 to 200. Another 50 seats will be added from this year and advertisement will be published in the same academic year,

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेतील लाभार्थी संख्या 75 वरून वाढवून 200 पर्यंत करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून, आणखी 50 जागांची वाढ याच वर्षीपासून करण्यात येईल तसेच याच शैक्षणिक वर्षात त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

कला शाखेतील फाईन आर्ट्स, फिल्म मेकिंग, ऍनिमेशन, डिझाईन आदी विषयात परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या विषयात शिक्षण देणारी महाविद्यालय जागतिक क्यू एस रँकिंग च्या 300 मध्ये येत नसल्यामुळे लाभ मिळत नव्हता. त्यामुळे क्यू एस रँकिंग सोबतच क्यूएस पब्लिकेशनकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सब्जेक्ट रँकिंगचा पर्याय ग्राह्य धरण्यात यावा, कला शाखेतील विद्यार्थ्यांनाही या योजनेतून लाभ देता यावा, या अनुषंगाने निकषात बदल करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी दिले आहेत.

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेची अर्ज करण्यापासूनची सर्व निवडप्रक्रिया ऑनलाईन करण्यात यावी, तसेच यासाठी आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ व प्रशासकीय खर्चाची तरतूद करून देण्यात येईल. यादृष्टीने कार्यवाही करण्याचेही निर्देश श्री. धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.


foreign scholarships date extended

The deadline for students to be selected for the academic year 2021-22 under the Rajarshi Shahu Maharaj Pardesh Scholarship Scheme has been extended till June 30, said Dhananjay Munde, Minister of State for Social Justice and Special Assistance

 राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मुदतीत 30 जून पर्यंत वाढ करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. .

 या योजनेंतर्गत परदेशी नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना 18 जून 2021 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती, परंतु बहुतांश विद्यार्थ्यांना परदेशातील संबंधित विद्यापीठांकडून कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विहित मुदतीत ऑफर लेटर प्राप्त न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी मुंडेंकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.

त्यानुसार धनंजय मुंडे यांनी विभागाला निर्देश देत ही मुदत 30 जून 2021 पर्यंत वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने अनुसूचित जातीतील इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 परदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा. सदर परिपुर्ण अर्ज [email protected] या ईमेलवर पाढवून त्याची हार्ड्कॉपी विहीत मुदतीत व आवश्यक ते कागदपत्रासह , समाज कल्याण आयुक्तालय 3, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- ४११००१ या पत्यावर सादर करावा. असे आवाहन समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.



 शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर! सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंतचे शैक्षणिक कॅलेंडर जाहीर

 दर वर्षी फेब्रुवारीत होणारी पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा यंदा दोन महिने लांबणीवर टाकण्यात आली आहे. चालू शैक्षणिक वर्षात ही परीक्षा एप्रिलच्या अंतिम आठवड्यात घेण्याचे निश्‍चित झाले असून, राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबत नुकताच निर्णय जारी केला.

 कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिष्यवृत्तीची परीक्षा वेळेत घेणे शक्‍य होणार नाही. या परीक्षेबाबत दर वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अधिसूचना जाहीर होते. दरम्यान, ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ उपक्रमांतर्गत नोव्हेंबरपर्यंतचे शैक्षणिक कॅलेंडर उपलब्ध झाले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (विद्या प्राधिकरण) पहिली ते दहावीचे विद्यार्थी व शिक्षकांसाठी सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांची शैक्षणिक दिनदर्शिका (कॅलेंडर) उपलब्ध करून दिली आहे.

 आरोग्य व दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्‍न असणाऱ्या असंख्य बालकांना परिस्थितीमुळे शिक्षण सोडण्याची वेळ येऊ नये व शिक्षणाशी, शिक्षकांशी त्यांचा संबंध तुटू नये यासाठी ‘शाळा बंद; पण शिक्षण सुरू’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांचे व आता सप्टेंबर ते नोव्हेंबर अशा तीन महिन्यांचे शैक्षणिक कॅलेंडर जाहीर करण्यात आले आहे .

सोर्स: सकाळ


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Foreign Education Scholarships for the year 2023-24

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!