अन्न औषध प्रशासनाला लवकरच मनुष्यबळ उपलब्ध, फिरत्या प्रयोगशाळांचाही उपक्रम – FDA Maharashtra Bharti 2024

FDA Maharashtra Recruitment 2024 Details and Apply Link

FDA Maharashtra Bharti 2024 – Sanjay Nargude, commissioner of the Food and Drug Administration Department, said 11 posts are vacant in Nashik district. The preliminary examination has been conducted through competitive examination to fill these posts. Further processing is still incomplete. On the other hand, mobile laboratories will be set up in the state due to the wait for the report of the test coming to the laboratory. While planning is underway at the senior level, funds are awaited. Nargude said there will be a provision for this in the budget to be released soon and after that further work will start. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

अन्न औषध प्रशासनाला लवकरच मनुष्यबळ उपलब्ध, फिरत्या प्रयोगशाळांचाही उपक्रम

सण, उत्सव तसेच धार्मिक कार्यक्रमावेळी होणारे अन्नदान यासह अन्य काही वेळा होणाऱ्या अन्न पदार्थांच्या विक्रीवेळी खाद्य पदार्थाची गुणवत्ता तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची धावपळ होते. अपुरे मनुष्यबळ तसेच साधनांची कमतरता यामुळे कामात अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध प्रशासन विभागाला लवकरच मनुष्यबळ, साधनांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. लवकरच जाहीर होणाऱ्या अंदाजपत्रकात साधनांसाठी निधी मंजूर होणार आहे. मनुष्यबळासाठी भरती प्रक्रिया राबवण्यास सुरूवातही झाली आहे.

  • अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने सातत्याने वेगवेगळ्या मोहिमा राबवत प्रतिबंधित खाद्यपदार्थ, अन्न पदार्थांमधील भेसळ, राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधित सुपारी यांच्यावर कारवाईसाठी काम करण्यात येत आहे. बऱ्याचदा कारवाईत जप्त केलेल्या खाद्यपदार्थांमधील भेसळ ओळखण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवावे लागतात. प्रयोगशाळा मुंबई आणि पुणे या ठिकाणी असल्याने नमुने तपासणीसाठी पाठवल्यानंतर अहवाल मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते. दुसरीकडे, अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम एकाचवेळी असतात. अशावेळी सर्व कार्यक्रमांमधील अन्न पदार्थांची तपासणी करणे अपुऱ्या मनुष्यबळामुळे कठीण होते. वेगवेगळ्या मिठाई दुकानांत, दुग्धालयात पनीर, दुधासह अन्य काही खाद्य पदार्थांची तपासणी करतांनाही मनुष्यबळाची अडचण येते. नाशिक जिल्ह्यात अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या अधिक भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी नाशिक विभागातील सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यावेळी फिरती प्रयोगशाळा, अपुऱ्या मनुष्यबळाच्या अडचणी लवकरच सोडवल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
  • याविषयी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त संजय नारगुडे यांनी नाशिक जिल्ह्यात ११ पदे रिक्त असल्याचे सांगितले. ही पदे भरण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्राथमिक परीक्षा झाली आहे. अद्याप पुढील प्रक्रिया अपूर्ण आहे. दुसरीकडे, प्रयोगशाळेत येणाऱ्या तपासणीच्या अहवालासाठी कराव्या लागणाऱ्या प्रतिक्षेमुळे राज्यात फिरत्या प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी वरिष्ठ पातळीवर नियोजन सुरू असले तरी निधीची प्रतिक्षा आहे. लवकरच जाहीर होणाऱ्या अंदाजपत्रकात यासाठी तरतूद होणार असून यानंतर पुढील कामास सुरूवात होईल, असे नारगुडे यांनी नमूद केले.

Latest updates regarding the Drug Instructor Posts is here. The advertisement of ‘MPSC’ preliminary examination came. It was expected to include the post of Drug Instructor. However, it does not include these posts. After November 2021, the advertisement for the posts of 87 Drug Inspectors in Food and Drug Administration Department was released. Candidates pursuing degree in pharmaceutical engineering could apply for this. There was a lot of opposition to this as it imposed an oppressive experience requirement in this recruitment. Candidates protested to cancel this condition. Therefore, MPSC suspended the recruitment. Eventually a new service act was promulgated abolishing the experience condition. Due to the delay in its implementation process, recruitment has stalled. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

  • औषध निरीक्षक पदाची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जाहिरातही काढण्यात आली. त्यामुळे औषध निर्माणशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या अनेक उमेदवारांनी खासगी नोकरी सोडून ‘एमपीएससी’ परीक्षेची तयारी केली. मात्र, अनुभवाच्या सेवाअटींमुळे वादात सापडलेली ही भरती दोन वर्षांआधी स्थगित करण्यात आली. सध्या लाखो उमेदवार या पदभरतीची प्रतीक्षा करत असून दीड वर्षांपासून नव्याने जाहिरातच आलेली नाही.
  • ‘एमपीएससी’च्या पूर्वपरीक्षेची जाहिरात आली. त्यात औषध निरीक्षक पदाचा समावेश असेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यात या पदांचा समावेश नाही. नोव्हेंबर २०२१ नंतर अन्न व औषध प्रशासन विभागातील ८७ औषध निरीक्षकांच्या पदांची जाहिरात निघाली होती. औषध निर्माणशास्त्राची पदवी घेणारे उमेदवार यासाठी अर्ज करू शकत होते. या पदभरतीमध्ये अनुभवाची जाचक अट टाकल्याने याला प्रचंड विरोध झाला. ही अट रद्द करावी म्हणून उमेदवारांनी आंदोलन केले. त्यामुळे ‘एमपीएससी’ने पदभरतीला स्थगिती दिली. अखेरीस अनुभवाची अट रद्द करत नवीन सेवा अधिनियम जाहीर करण्यात आले. त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया लांबल्यामुळे भरती रखडली आहे.
  • औषध निर्माणशास्त्राची पदवी घेणारे विद्यार्थी अनेकदा खासगी संस्थेत नोकरी करतात. मात्र, ‘एमपीएससी’कडून ही भरती होणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आपली नोकरी सोडून परीक्षेची तयारी सुरू केली. परंतु, वादात सापडलेली पदभरती पुन्हा घेण्यासाठी आयोगाकडून विलंब होत आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी ‘एमपीएससी’च्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

FDA Maharashtra Bharti 2023 for new updates : As per the latest updates of Food & Drug Administration Maharashtra department is that 50% posts are vacant from last few months. The posts which have been vacant for the past several years will now be filled by FDA Maharashtra. Read the More details given below and keep visit us for the further updates.

मुंबई : राज्यात अन्न आणि औषधी प्रशासन विभागातील ५० टक्के पदे रिक्त असूनही या विभागात प्रतिनियुक्तीवर अधिकारी घेण्याची वेळ आली आहे. या विभागातील पदभरतीसाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये काढण्यात आलेल्या जाहिरातीला दिलेली स्थगिती एका नियम बदलाच्या फेऱ्यात १४ महिन्यांपासून अडकली आहे.

  • एमपीएससीने या जाहिरातीत टाकलेली एक अट काढून टाकण्याची मागणी उमेदवारांनी केली होती. ती अट काढून नव्याने जाहिरात प्रसिद्ध करायला मागील १४ महिन्यांत अन्न व औषधी प्रशासनाला वेळ मिळालेला नधी. 
  • राज्य शासनाने मोठय़ा प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू करण्याचे ठरविल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेले अनेक वर्षे रिक्त असलेली पदे आता भरली जातील, असा विश्वास प्रशासनाला वाटत असून सध्या सुमारे ५० टक्के पदे रिक्त आहेत. ही भरती होईपर्यंत प्रतिनियुक्तीवर अधिकारी घेण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव प्रशासनाने राज्य शासनाला पाठविला आहे.

अन्न व औषध प्रशासनातील 50 टक्के पदे रिक्त

  • राज्यातील दहा लाख आठ हजार ५०३ अन्न व्यावसायिक तसेच एक लाख १७ हजार ६८५ औषध विक्रेत्यांची तपासणी करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या पदांपैकी फक्त ५० टक्के पदे भरली गेलेली आहेत.
  • २०१३ आणि २०२१ मध्ये राज्य लोकसेवा आयोगामार्फत ही पदे भरण्यात आली.
  • अन्न व औषध प्रशासनात सहआयुक्तांची प्रत्येकी आठ पदे असून त्यापैकी अन्न विभागात पाच तर औषध विभागात फक्त एक पद भरण्यात आलेले आहे.
  • अन्न विभागात प्रभावी काम करण्यासाठी सहायक आयुक्त तसेच अन्न निरीक्षक महत्त्वाचे आहेत.
  • मात्र सहायक आयुक्त आणि निरीक्षक यांची अनुक्रमे ९० व ३५० पदे मंजूर असतानाही त्यापैकी अनुक्रमे ६५ व १७७ पदे भरली गेली आहेत.
  • औषध विभागातही सहायक आयुक्त तसेच निरीक्षकांची अनुक्रमे ६७ व २०० पदे मंजूर असून त्यापैकी अनुक्रमे ४३ व ८३ पदेच भरली गेली आहेत.

अन्न व औषधांचे नमुने तपासण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयोगशाळेतही तेवढीच पदे रिक्त आहेत.

FDA Maharashtra Bharti 2022

प्रशासनातील सर्व रिक्त पदे वेळोवेळी राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणे आवश्यक होते; पण ती भरली गेलेली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ही सर्व पदे भरली जावीत यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मात्र तोपर्यंत शासनाने प्रतिनियुक्तीवर अधिकारी द्यावेत, असा प्रस्ताव आपण पाठविला आहे. औषध विभागासाठी डॉक्टर किंवा फार्मसीचे तर अन्न विभागासाठी बीएस्सी (शेती), बी.टेक. (फूड) असे शिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर घेता येईल. त्यांना आम्ही आवश्यक ते प्रशिक्षण देऊ. –
अभिमन्यू काळे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    FDA Maharashtra Recruitment 2023 Details and Apply Link

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!