अन्न व औषध प्रशासन अंतर्गत गट-ब /गट-क भरती परीक्षेची रिस्पॉन्स शीट उपलब्ध – FDA Maharashtra Answer Key
FDA Maharashtra Response Sheet
FDA Maharashtra Response Sheet Download | FDA Maharashtra Answer Key – Food and Drug Administration Group-B (Non-Gazetted)/Group-C Examination-2024 will be held at various examination centers in the state in connection with filling up various posts of Group- and (Non-Gazetted) / Group-C cadre under Food and Drug Administration. It took place on December 30 and 31, 2024. The answer sheet will be released in accordance with the answers submitted by the candidates during the examination. The logins of the candidates will be made available on their id on January 3, 2025.
If the candidates have suggestions/objections regarding the answer sheet, they can be sent online. January 3, 2025 to December 3, 2025. It can be recorded as of January 7, 2025. Documents will be required to be attached to the page of objection.
- अन्न व औषध प्रशासन अंतर्गत गट-व (अराजपत्रित) /गट-क संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने/ सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन गट-ब (अराजपत्रित)/गट-क परीक्षा-२०२४ राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर दि. ३० व ३१ डिसेंबर, २०२४ रोजी पार पडल्या आहेत. सदर परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तरांच्या अनुषंगाने उत्तरतालिका (Response Sheet) दि. ०३ जानेवारी, २०२५ रोजी उमेदवारांच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
- सदर उत्तरतालिकेबाबत उमेदवारांच्या सुचना/आक्षेप असल्यास त्या ऑनलाईन पध्दतीने दि. ०३ जानेवारी, २०२५ ते दि. ०७ जानेवारी, २०२५ या कालावधीत नोंदविता येतील. आक्षेपाच्या पृष्ठ्यर्थ त्याबाबतचे कागदपत्रे जोडणे आवश्यक असेल.
- सदर सुचना/आक्षेप नोंदविण्यासाठी प्रति प्रश्न शुल्क रक्कम रु. १००/- प्रति आक्षेप ऑनलाईन पध्दतीने भरणा करणे आवश्यक असेल. उपरोक्त प्रमाणे दि. ०३ जानेवारी, २०२५ ते दि. ०७ जानेवारी, २०२५ या कालावधीत फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वतःच्या लॉगीन आयडीवरुन नोंदविलेले सुचना/आक्षेप विचारात घेतले जातील व त्यानंतरचे सुचना/आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच सुचना/आक्षेप संदर्भात कोणताही पत्रव्यवहार आयुक्त कार्यालयास लेखी अथवा ई-मेल द्वारे स्विकारला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
FDA Maharashtra Response Sheet