Exam of MPSC will be done on as per schedule
Exam of MPSC will be done on as per schedule
नियोजित वेळापत्रकानुसारच होणार एमपीएससीची पूर्वपरीक्षा
MPSC Pre Exam 2020 : The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced that the pre- exams 2020 will be conducted according to the planned schedule. The state government has advised against taking any test from March 16 to 31, in view of the increasing prevalence of the corona virus. However, as there is no examination of the MPSC during this period, the pre-examination on April 5 will be conducted according to the scheduled schedule. The Commission has informed the Commission through a letter. Read the details carefully…
MPSC Engineering Services Bharti 2020
मुंबई – राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही नियोजित वेळापत्रकारनुसारच घेतली जाईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहीर केले आहे. राज्य सरकारने कोरोना व्हायरसचा वाढता संसर्गा पाहता १६ ते ३१ मार्च या कालावधीत कुठल्याही परीक्षा न घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण एमपीएससीची या कालावधीत कुठलीही परीक्षा नसल्याने ५ एप्रिल रोजी होणारी पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकारनुसारच पार पडणार आहे. याबाबतची माहिती आयोगाने एका पत्रकाद्वारे दिली आहे.
आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, १५ मार्च रोजी राज्य शासनाने काढलेल्या शासकीय आदेशाद्वारे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने एमपीएससीच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण, या कालावधीत एमपीएससीकडून कुठल्याही परीक्षांचे नियोजन नसल्याने पुढील परीक्षा नियोजित कार्यक्रमानुसार होतील.
दरम्यान, आयोगाने म्हटले की, नियोजित कार्यक्रमानुसारच ५ एप्रिल रोजी होणारी पूर्वपरीक्षा होईल. यासाठीची सर्व पूर्वतयारी झाली असून ही परीक्षा योग्य ती दक्षता घेऊन पार पाडली जाईल. त्यामुळे या परीक्षेची तयारी उमेदवारांनी सुरु ठेवावी असे आवाहनही आयोगाकडून करण्यात आले आहे.
सौर्स : डेलीहंट