मराठा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती
Scholarship for Maratha students
Scholarship For Maratha Students : It has been decided to give subsistence allowance of Rs.60,000 per annum to the students of Maratha community as per the criteria of Social Justice Department as per SC/ST/OBC category students.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या अंतर्गत वसतिगृह, शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या एनसीईआरटीमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेले व शिष्यवृत्ती न मिळालेल्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना सारथीमार्फत दरमहा ८०० प्रमाणे वार्षिक नऊ हजार ६०० रुपये लाभ देणारी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सुरू झाली आहे.
त्याचप्रमाणे देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण योजना सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत देशातील २०० नामांकित राज्याबाहेरील विद्यापीठ किंवा संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख मर्यादेत आहे, अशा विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्यासाठी ५० हजार रुपये देण्यात येणार असून, शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी शुल्क प्रतिपूर्ती आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह व भोजन शुल्क रक्कम देण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शिष्यवृत्तीप्रमाणे पदव्युत्तर पदवीसाठी दर वर्षी ३० लाख रुपये मर्यादेत आणि पीएचडीसाठी ४० लाख रुपयांच्या मर्यादेत परदेशी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सारथी’ संस्थेने सर्व जिल्ह्यांमध्ये १०० मुलांचे वसतीगृह सुरू होईल यांचे कालबद्ध नियोजन करावे; तसेच याबाबत विभागीय स्तरावर आढावा घेऊन या कामाला गती द्यावी. वसतिगृहासाठी आवश्यक नियमावली तयार करावी. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सारथी, महाज्योती, संबंधित जिल्हाधिकारी यांनी एकत्रित बैठक घेऊन अंतिम नियमावली सादर करावी.
Accordingly, the Maratha community will be given the benefit of reservation (EWS) for the economically weaker sections. Therefore, the Maratha community, which is currently deprived of the reservation of Socially and Economically Backward Classes (SEBC), is likely to get relief. (EWS scholarship for Maratha students)
मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, मराठा समाजाला EWS चा लाभ, शिक्षण-नोकरीत फायदा
आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजासाठी महाविकासआघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गाच्या (SEBC) आरक्षणपासून वंचित असलेल्या मराठा समाजाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (EWS scholarship for Maratha students)
मात्र, एसईबीसी आरक्षणासाठी आग्रही असलेल्या मराठा आंदोलक हा पर्याय कितपत स्वीकारणार, हे पाहावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एसईबीसी प्रवर्ग EWS आरक्षणाच्या लाभांसाठी पात्र नाही. हा निर्णय घेऊन राज्य सरकारने मराठा आरक्षणावर गेम केली आहे. आमचा समाज SEBC असताना आम्हाला ओबीसीतून आरक्षण जाहीर करण्याऐवजी सरकारने EWS आरक्षण देऊन आपली सोय पाहिली आहे, अशी टीका मराठा नेते राजेंद्र कोंढरे यांनी केली.
सोर्स: टीव्ही 9 मराठी