Jobs in Ericsson – ही मल्टिनॅशनल कंपनी देशात करणार तब्बल 2000 पदांसाठी बंपर भरती
Ericsson Company Jobs
Jobs in Ericsson Company : 5G is also going to create a lot of job opportunities in the employment sector. Ericsson will expand production capacity and operations to meet the technological requirements for the rapid expansion of 5G networks in the country. Due to this, 2000 new jobs will be created. Read More details are given below.
देशभरातील प्रमुख शहरांमध्ये काही महिन्यांपूर्वी 5G नेटवर्क सेवा सुरू झाली आहे. या सुविधेचा टप्प्याटप्प्याने विस्तार केला जात आहे. 5G मुळे रोजगार क्षेत्रातदेखील मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर एरिक्सन या तंत्रज्ञान क्षेत्रातील स्वीडिश कंपनीने सोमवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. देशातील 5G नेटवर्कचा वेगाने विस्तार व्हावा, यासाठी आवश्यक तांत्रिक गरजा पूर्ण करण्याकरिता एरिक्सन उत्पादन क्षमता आणि ऑपरेशन्स वाढवणार आहे. यामुळे नव्याने 2000 नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे. `टेकगिग डॉट कॉम`ने या विषयी माहिती दिली आहे.
ही मल्टिनॅशनल कंपनी देशात करणार तब्बल 2000 पदांसाठी बंपर भरती
Career in Ericsson
- देशातील 5G नेटवर्कच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजनांची पूर्तता करण्यासाठी पुण्यातील भागीदार जबिल या कंपनीच्या मदतीने उत्पादन क्षमता आणि ऑपरेशन्स वाढवण्यात येत असल्याचं एरिक्सन कंपनीने सोमवारी जाहीर केलं.
- कंपनी उच्च तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासोबत सुमारे 2000 लोकांना रोजगार देईल, असं देखील कंपनीने स्पष्ट केलं आहे.
- एरिक्सन ही 1994 मध्ये भारतात उत्पादन सुरू करणारी पहिली दूरसंचार यंत्रणा विक्रेता कंपनी असून ती जबिलच्या सहयोगातून विविध उपकरणं तयार करते. यात 4G आणि 5G रेडिओ, रॅन कम्प्युट आणि मायक्रोवेव्ह उत्पादनांचा समावेश आहे.
- एरिक्सन इंडिया आता देशात एक तंत्रज्ञान केंद्रदेखील स्थापन करणार आहे. हे केंद्र उच्च गुणवत्तेची मानके,चाचणी/एकीकरण, प्रारंभिक टप्प्यातील उत्पादनांच्या पुरवठ्याची तयारी, कार्यक्षम 5G चा विकास, ऑपरेशनल सपोर्ट, नवीन उत्पादनं आणणं आणि उत्पादन अभियांत्रिकीवर लक्ष केंद्रीत करणार आहे.
Ericsson Recruitment 2022
- भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओने देशात 5G नेटवर्क यंत्रणा उभारण्यासाठी आणि तिचा विस्तार करण्यासाठी एरिक्सन कंपनीला त्यांचे भागीदार म्हणून निवडले आहे. भारतातील 5G सब्सक्रिप्शन वेगाने वाढणार असून 2028 च्या अखेरीपर्यंत ते 690 दशलक्षपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, असं एरिक्सन मोबिलिटीच्या गेल्या महिन्यातील अहवालात म्हटलं आहे.
- “देशात 5G नेटवर्क सुविधा सुरू झाली आहे. आम्ही भारतीय टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्सना नेटवर्क यंत्रणा वेगाने उभारता यावी यासाठी पुण्यात टप्प्याटप्प्याने आमच्या 5G टेलिकॉम उपकरणांचे उत्पादन वाढवत आहोत,“ अशी माहिती एरिक्सनचे दक्षिणपूर्व आशिया, ओशियाना आणि भारताचे मार्केट एरिया प्रमुख नुन्झिओ मिर्टिलो यांनी दिली. “भारतासह उपखंडातील हे उत्पादन जागतिक उत्पादनाचा एक भाग आहे,“ असं मिर्टिलो यांनी सांगितले.
- आम्हाला 50 पेक्षा जास्त देशांमध्ये 5G नेटवर्क उभारण्याचा अनुभव आहे. आमच्या भागीदारांना 5G नेटवर्क अखंडपणे उपलब्ध करून देण्यासाठी ही आम्हाला उत्तम संधी आहे, “असं मिर्टिलो यांनी सांगितले.
- एरिक्सनने 5G नेटवर्कला सपोर्ट करणारे AIR 3219 आणि AIR 3268 हे अल्ट्रा लाइटवेट मॅसिव्ह MIMO अँटेना इंटिग्रेटेड रेडिओ तयार केले आहे. देशातील 5G उत्पादनांना सपोर्ट करण्यासाठी स्थानिक पातळीवर मुलभूत सुविधा पुरवणाऱ्या पार्टनर्ससोबत आम्ही काम करू, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. जुलैमध्ये झालेल्या स्पेक्ट्रम लिलावानंतर देशात 5G नेटवर्कचे व्यावसायिक लाँच सुरू आहेत.