Engineering – इंजिनीअरिंगचे शिक्षण आता मराठी माध्यमातून
Engineering Education In Marathi Now
Akhil Bharatiya Tantrashikshan Parishad has decided to impart engineering education in eight Indian languages from the academic year 2020-21. These include Marathi, Hindi, Bengali, Telugu, Tamil, Gujarati, Kannada and Malayalam.
इंजिनीअरिंगचे शिक्षण आता मराठी माध्यमातून
इंजिनीअरिंगचे शिक्षण आता मराठी माध्यमातून !! अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून आठ भारतीय भाषांमध्ये इंजिनीअरिंग शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील दोन कॉलेजांनी यासाठी तयारी दर्शविली आहे.
त्यामध्ये मराठी, हिंदी, बंगाली, तेलगु, तमिळ, गुजराती, कानडी आणि मल्याळम या भाषांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी इंग्रजीच्या भीतीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, असे परिषदेचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
आता इंजिनीअरिंग मराठी माध्यमातून करणेही शक्य होणार आहे. पुण्यातील दोन कॉलेजांनी यासाठी तयारी दर्शविली असून, तसा प्रस्ताव अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे पाठवण्यात आला आहे.
ही सुविधा पारंपरिक इंजिनीअरिंगच्या शाखांपुरती मर्यादित असणार आहे. यामध्ये मॅकेनिकल, सिव्हील, इलेक्ट्रिकल आदी शाखांचा समावेश असणार आहे. यासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याची तयारीही परिषदेने सुरू केली आहे. ‘स्वयम’ या ऑनलाइन व्यासपीठावर अभ्यासक्रमाचे मराठीतून व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
Nice