Deloitte Indian Jobs-ही मोठी IT कंपनी भारतात करणार बंपर पदभरती
Deloitte Indian Career See Details here
Deloitte Indian Career
Deloitte Indian Jobs: If you are thinking of changing job then this is a golden opportunity for you. Deloitte Indian Company is currently looking for Java Developers and Development & Operations (DevOps) Lead Engineers. Deloitte India has decided to hire new Java Developers and Development & Operations (DevOps) Lead Engineers in its Delhi office. Read More details are given below.
महागाई आणि अमेरिकेतील मंदी यांसारख्या समस्यांचा भारतीय आयटी क्षेत्रावर काही परिणाम होत नसल्याचं दिसत आहे. भारतातील अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचारी भरती सुरू केलेली आहे. काही दिवसांपूर्वीच टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टीसीएस या आयटी कंपनीनं तंत्रज्ञांची नियुक्ती सुरू केली आहे. त्यापाठोपाठ आता डेलॉइट इंडियानं कर्मचारी भरती करण्याची घोषणा केली आहे. कंपनी सध्या जावा डेव्हलपर्स आणि डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन्स (डेव्हऑप्स) लीड इंजिनीअर्सच्या शोधात आहे. ‘टेकगिग’नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
जावा डेव्हलपर पदावर काम करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना पुढील भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडव्या लागतील:
- 1. डब्ल्यूएचओ गाइडलाइन्सनुसार सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून दिल्लीमध्ये काम करण्यासाठी चार ते सहा वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
- 2. एंटरप्राईज लेव्हलवर असलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयासाठी तयार करण्यात आलेल्या अॅपचा वापर देशातील एक लाख जणांनी केला आहे. त्यामुळे कंपनी तांत्रिकदृष्ट्या मजबूत व्यक्तींच्या शोधत आहे, ज्या या वेब अॅप्लिकेशन्सच्या देखभाल आणि वाढीसाठी डिलिव्हरेबल्सची जबाबदारी घेऊ शकतात.
- 3. जावा-आधारित वेब अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्समध्ये किमान तीन वर्षे कामाच अनुभव गरजेचा आहे.
- 4. जावा 1.8, स्प्रिंग-बूट, अँग्युलर जेएस या तंत्रज्ञानाचा अनुभव आवश्यक.
- 5. PostgreSQL किंवा इतर RDBMS डेटाबेसमधील अनुभव आवश्यक.
- 6. मागणी आणि प्राधान्याच्या आधारावर टीमसोबत काम करण्याची क्षमता आवश्यक.
- 7. गरजा आणि फील्ड इश्यूज समजून घेण्यासाठी, कामाच्या प्रगतीबाबत संवाद साधण्यासाठी चांगली संभाषण कौशल्ये आवश्यक.
डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन्स (डेव्हऑप्स) लीड इंजिनीअरच्या पदावर काम करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना पुढील भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडव्या लागतील:
- 1. अहवालांसाठी आवश्यक स्पष्टीकरण देण्याची क्षमता पाहिजे.
- 2. टेक्निकल सोल्युशन डिझाइनच्या दृष्टिने सर्व गरजा एकत्रित करून ती सोल्युशन्स तयार करण्याचं अंदाजपत्रक तयार करणं.
- 3. टेक्निकल डिझाइनच्या दृष्टिकोनातून फंक्शनल स्पेक्सच्या डेव्हलपमेंटमध्ये योगदान देणं.
- 4. टेक्निकल सोल्युशन डिझाइनवर आधारित रिपोर्ट्स आणि व्हिज्युअलायझेशन्स विकसित करणं.
- 5. रिक्वायरमेंट डेफिनेशन्स किंवा तांत्रिक डिझाइन प्रश्नांच्या सपोर्टसाठी प्रोटोटाइपिंग आणि पीओसी करणं.
- 6. युनिट चाचण्या, डिफेक्ट रिझोल्युशन आणि हायपर केअर कार्यान्वित करणं.
Deloitte Indian Career