DBATU विद्यापीठाकडून कला, वाणिज्य अभ्यासक्रमांचा निकाल शनिवारी होणार जाहीर – DBATU University Results
DBATU University Results
DBATU University Results 2024 – The results of class 12 and undergraduate courses have been declared till date in the examination conducted in March-April 2024. The results of arts (BA) and commerce (B.Com) courses will be declared on 1st June 2024 this information given by Babasaheb Ambedkar Marathwada University.
The Entrance Test (CET) will be held in the month of June. In the academic year 2024-2025, admission to all postgraduate courses in the main campus of the university as well as dharashiv sub-area will be conducted through the pre-admission examination this year.
DBATU has extended the deadline for post-graduate admissions till May 30: A total of 2,564 students have registered online for postgraduate courses in the university in 10 days, said Unique Director Dr. Praveen Yannawar reports. The admission committee has decided to extend the deadline for online registration of postgraduate courses till May 30. The admission process for 55 postgraduate courses in the main campus and Dharashiv sub-campus of the university is underway. Online registration is going on through the Central Government’s Samarth portal from May 15 to 25.
Following Results of First Year (Semester-I) declared:
M.Tech
M.Pharm
M.Arch
B.Arch
Students can check their result in their respective login…(Click here)
DBATU विद्यापीठाकडून कला, वाणिज्य अभ्यासक्रमांचा निकाल शनिवारी घोषित
मार्च-एप्रिल २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत १२वी, पदवी अभ्यासक्रमांचे निकाल आजपर्यंत जाहीर करण्यात आले आहेत. तर कला (बीए) व वाणिज्य (बी. कॉम) अभ्यासक्रमांचा निकाल १ जून रोजी घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून देण्यात आली.
जून महिन्यात प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे. २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाचा मुख्य परिसर तसेच धाराशिव उप परिसरातील सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश यावर्षी प्रवेशपूर्व परीक्षेद्वारे घेण्यात येणार आहेत. या संदर्भात कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश प्रक्रिया समितीची शुक्रवारी दुपारी बैठक घेण्यात आली. प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, समिती अध्यक्ष कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ. आय. आर. मंझा यांच्यासह सर्व समिती सदस्य उपस्थित होते.
DBATU पदव्युत्तर प्रवेशासाठी ३० मेपर्यंत मुदतवाढ – विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एकूण २ हजार ५६४ विद्यार्थ्यांनी दहा दिवसांत ऑनलाईन नोंदणी केली आहे, अशी माहिती ‘युनिक’चे संचालक डॉ. प्रवीण यन्नावार यांनी दिली. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन नोंदणीसाठी ३० मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रवेश समितीने घेतला आहे. विद्यापीठाचा मुख्य परिसर व धाराशिव उपपरिसरातील ५५ पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. १५ ते २५ मे दरम्यान केंद्र शासनाच्या समर्थ पोर्टलद्वारे ‘ऑनलाईन’ नोंदणी सुरू आहे.