गट क्र. ५ दौंड सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी २३ जुलै रोजी लेखी परीक्षा SRPF Daund Exam Date
Daund SRPF GR 5 Bharti Results, Merit List Declared
SRPF Group 5 Daund conducted the examine of 1 thousand 944 candidates of Armed Police Constable Recruitment 2021 physical test have qualified for the written test and the written test of the eligible candidates will be conducted on 23 July 2023 at 11 am at Mary Memorial School Daund and Vandaniya Rashtriya Sant Tukdoji Maharaj Vidyalaya Daund, by Vinita Sahu given this information.
गट क्र. ५ दौंड सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी २३ जुलै रोजी लेखी परीक्षा
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ दौंड यांच्यामार्फत सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ शारीरिक चाचणीमधील १ हजार ९४४ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले असून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता मेरी मेमोरीयल स्कूल दौंड व वंदनीय राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज विद्यालय दौंड येथे घेण्यात येणार असल्याची माहिती दौंड राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ च्या समादेशक विनीता साहू यांनी दिली आहे.
- लेखी परिक्षेसाठी पात्र उमेदवारांनी २३ जुलै रोजी सकाळी ८ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. उशीरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेला येताना उमेदवारांनी महाआयटी यांनी ई-मेलद्वारे दिलेले शारिरीक चाचणी व लेखी परीक्षेचे ओळखपत्र डाऊनलोड करुन त्याची रंगीत प्रिंट आणि आवेदन अर्जावरील दोन रंगीत पासपोर्ट साईज फोटो आणणे आवश्यक आहे. तसेच मैदानी चाचणीसाठी पुरविण्यात आलेले ओळखपत्र घेऊन येणे अनिवार्य आहे.
- परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी मोबाईल फोन, डिजीटल घड्याळ, इलेक्ट्रॉनिक वस्तु किंवा इतर तत्सम वस्तू तसेच शक्यतो कोणत्याही प्रकारच्या बॅग आणू नयेत. बॅग व त्यातील वस्तू गहाळ अथवा चोरीस गेल्यास त्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, काळा पेन तसेच पॅड बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी पुरविण्यात येणार आहे.लेखी परीक्षेत उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये, अशी बाब निदर्शनास आल्यास तात्काळ भरती प्रमुखांशी संपर्क साधावा.
- पोलीस भरतीमध्ये कोणत्याही अमिषाला अथवा भूलथापांना बळी पडू नये. लाच देणे अथवा घेणे कायद्याने गुन्हा असून असे आढळून आल्यास लाचलुचपत विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा. परीक्षेबाबतच्या अधिक माहितीसाठी राज्य राखीव पोलीस बल गट क्र.५, दौंड यांच्या ०२११७- २६२३४७ किंवा ७२७६७६८३४७ या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा https://www.mahapolic.gov.in / https://www.maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही कळविण्यात आले आहे.
SRPF पोलीस भरती लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
Daund SRPF GR 5 Bharti Results
दौंड पोलिस भरती लेखी परीक्षेकरिता उमेदवार यादी जाहीर
List of Candidates Released for SRPF Daund Group 5 Police Recruitment Written Exam now. The list of candidates selected for the written test under police bharti process in State Reserve Police Force Group No.5 in Daund city has been published on official website and same are given below:
दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाचमधील पोलिस भरती प्रक्रिया अंतर्गत लेखी परीक्षेकरिता निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे.
गटाच्या समादेशक विनिता साहू यांनी या बाबत माहिती दिली. सशस्त्र पोलिस शिपाई पदांच्या ७१ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून मैदानी चाचणीत प्राप्त गुणांच्या आधारे १ :१० या प्रमाणात लेखी परीक्षेकरिता उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.अशा उमेदवारांची यादी गटाच्या maharashtrasrpf. gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना या यादीबाबत काही हरकती किंवा आक्षेप असल्यास त्यांनी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्यापूर्वी समादेशक कार्यालय येथे समक्ष किंवा गटाच्या[email protected] या ईमेल आयडीवर सविस्तर कारणासह नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
1 | 18-Jan-2023 | Police recruitment 2021 Physical test Marks Date 18.01.2023 | |
2 | 19-Jan-2023 | Police recruitment 2021 Physical test Marks Date 19.01.2023 | |
3 | 19-Jan-2023 | Instruction for candidate | |
4 | 20-Jan-2023 | Police recruitment 2021 Physical test Marks Date 20.01.2023 | |
5 | 21-Jan-2023 | Police recruitment 2021 Physical test Marks Date 21.01.2023 | |
6 | 23-Jan-2023 | Police recruitment 2021 Physical test Marks Date 23.01.2023 | |
7 | 27-Jan-2023 | List of Candidates Qualified for Written Examination (Armed Police Constable Recruitment 2021) |
Daund SRPF GR 5 Police Driver Bharti result 2022 –Daund SRPF GR 5 Police Department has recently released the results for Police Constable (Driver) Posts. Applicants may attend the physical test may check their results from the given link.
राज्य राखीव पोलीस बाल गट क्र 05 दौंड पोलीस भरती चालक पदाकरिता 05, 6, 8, 9, 10, 14, 15, 16, 17 जानेवारी 2023 तारखेला physical test झाली त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
Comments are closed.