शिक्षक व्हायचंय? तर करा आजपासून ऑनलाइन अर्ज – D.Ed. Admission 2024-2025
D.Ed. Admission 2024-2025 @ www.maa.ac.in
D.Ed. Admission 2024-2025 Online Apply – D. Ed. Course admission schedule announced; Deadline to the 18th. The schedule for D.L.Ed first year and D.Ed. admissions has been published on the website of the State Council of Educational Research and Training (SCERT). Candidates interested in becoming teachers in schools will be allowed to do so on Monday. From June 3, applications for admission to D.Ed courses can be made online. Candidates Read the complete details given below on this page regarding the D.Ed. Admission 2024-2025 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
शिक्षक व्हायचंय? तर करा आजपासून ऑनलाइन अर्ज
डी. एड. अभ्यासक्रम प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; १८ तारखेपर्यंतची मुदत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) संकेतस्थळावर डीएलएड प्रथम वर्ष आणि डीएड प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना सोमवार, दि. ३ जूनपासून डीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
- राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे, तसेच सोमवार, दि. ३ जूनपासून कनिष्ठ महाविद्यालयांत गुणपत्रिका वितरणास सुरुवात होणार आहे. त्यानंतर बारावी उत्तीर्ण विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात.
- शिक्षक म्हणून करिअर करण्यासाठी बारावीनंतर डीएड अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दि. ३ ते १८ जून रोजी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
- अर्जांची डीआयईटी स्तरावर ऑनलाइन पडताळणी दि. ३ ते १९ जून या कालावधीत केली जाईल आणि त्यानंतर संकेतस्थळावर दि. २६ जून रोजी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.
- प्रवेश अर्ज कसा करावा? वेळापत्रक सर्व आदींबाबतची माहिती https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे…
पहिल्या फेरीची यादी २७ जूनला
- ■ डीएड प्रवेशाची पहिल्या फेरीची यादी २७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना दि. २७ जून ते १ जुलै या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी २ जुलैपासून विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे विकल्प भरता येणार असून, पूर्वी भरलेले विकल्प बदलता येणार आहेत. दि. ४ जुलै रोजी प्रवेशाची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दुसऱ्या फेरीद्वारे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दि. ४ जुलै ते ८ जुलै या कालावधीत महाविद्यालयांत प्रवेश घेता येतील. प्रवेशाची तिसरी फेरी दि. ११ जुलै रोजी सुरु होणार असून, दि. १५ जुलैपर्यंत प्रवेश घेता येतील.
- ■ शासकीय व व्यावसायिक कोट्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार डीएलएड अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा, असे आवाहन एससीईआरटीचे संचालक, तसेच राज्यस्तरीय डीएलएड प्रवेश निवड, निर्णय व प्रवेश संनियंत्रण समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी केले आहे.
D.Ed. Admission 2024-2025 – For D.Ed. The online admission process will begin from June 3. Details will be published on the website. Students should fill the online application form as per the instructions therein. Eligible candidates from Arts, Commerce, Science and MCVC streams should have passed class 12 with at least 49.5 per cent marks in open category and 44.5 per cent marks in other cadres. It is mandatory to fill the application form in the online process to get admission from the management quota. In the last academic session, 17 teacher schools had registered in Jalgaon district. A capacity of 900 was available. Of these, 533 seats were contested. Schools are enrolled for the new semester.
डीएडसाठी ३ जूनपासून प्रवेश प्रक्रिया! ३ जून २०२४ पासून उमेदवारांना अर्ज भरता येणार
डी.एड.साठी दि. ३ जूनपासून ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. त्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामधील सूचनांनुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरावेत, अशी माहिती जळगाव डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी दिली. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी डी.एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून, दि. ३ जून २०२४ पासून उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी १७ विद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली होती. त्यातील तीन विद्यालयांमध्ये प्रवेश फेरीअखेर एकही जागा रिक्त शिल्लक नव्हती. मंजूर सर्व जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते.
प्रवेशासाठी इच्छूक असलेले कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी शाखेतील पात्र उमेदवार हे इयत्ता १२ वी खुल्या संवर्गात किमान ४९.५ टक्के व अन्य संवर्गात किमान ४४.५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे. गेल्या शैक्षणिक सत्रात जळगाव जिल्ह्यात १७ अध्यापक विद्यालयांनी नोंदणी केली होती. ९०० प्रवेश क्षमता उपलब्ध होती. त्यापैकी ५३३ जागांवर प्रवेश झाले होते. नवीन सत्रासाठी विद्यालयांची नोंदणी सुरू आहे. यामध्ये गेल्या वर्षाप्रमाणे विद्यालयांची संख्या कायम राहू शकते किंवा कमी होऊ शकते.
जुलैत वर्ष होणार सुरू… – सध्याच्या घोषित वेळापत्रकानुसार २०२४-२५ या शैक्षणिक सत्राच्या प्रथम वर्षाची सुरुवात १५ जुलैपासून होणार आहे.
या ठिकाणी भरा अर्ज… – विद्यार्थ्यांनी www.maa.ac.in या संकेतस्थळावर अर्ज भरायचे आहेत. प्रवेश नियमावली, अध्यापक विद्यालयांची यादी, वेळापत्रक व प्रवेशाबाबतच्या सूचना संकेतस्थळावरील इम्पोर्टंट इन्फॉर्मेशन या टॅबमध्ये उपलब्ध असणार आहे. अर्ज भरताना स्वत:चा ई-मेल आयडी व मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे.
D.Ed. Admission 2024-2025 असे आहे वेळापत्रक (शासकीय कोटा)…
- – उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरणे – दि. ३ जून ते दि. १८ जून
- – अर्जांची ऑनलाइन पडताळणी – दि. ३ जून ते दि. १९ जून
- – गुणवत्ता यादीवरील हरकतींचे निरसन – दि. २४ जून
- – पूर्ण भरलेल्या अर्जांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध – दि. २६ जून
- – प्रथम फेरी प्रवेशाची यादी – दि. २७ जून
- – प्रथम फेरीतील उमेदवारांना प्रवेश – दि. २७ जून ते १ जुलै
D.Ed. Admission 2024-2025