ICSI CS Results: सीएस प्रोफेशनल, एक्झिक्युटिव्हचे निकाल जाहीर; येथे चेक करा

ICSI CS Exam Results

ICSI CS Exam Results :  Institute of Company Secretaries of India (ICSI) released the CS Professional & Executive result 2022 for the June session.  ICSI CS Professional, Executive result 2022 is available on their official website portal, i.e., icsi.edu. Those candidates who have appeared in the ICSI CS June exams can able to check the result through online mode with the help of a registration number and roll number. Applicants check their results from the given link.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

ICSI CS Result 2022: सीएस प्रोफेशनल, एक्झिक्युटिव्हचे डिजिटल स्कोअर कार्ड ICSI CS प्रोफेशनल द्वारे जारी केले जाईल. या वर्षी झालेल्या कंपनी सेक्रेटरी च्या जूनच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नपत्रिकांच्या गुणांसाठी डिजिटल स्कोअर कार्ड जाहीर केले जातील. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना संस्थेद्वारे सक्रिय केलेल्या लिंकद्वारे किंवा खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे निकाल पाहता येणार आहे.

सीएस जूनच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट्स. सीएस प्रोफेशनल रिझल्ट २०२२ आणि सीएस एक्झिक्युटिव्ह रिझल्ट २०२२ पाहण्याची लिंक इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) कडून अधिकृत वेबसाइट icsi.edu वर सक्रिय केली आहे. दोन्ही अभ्यासक्रमांच्या जून २०२२ च्या परीक्षांचे निकाल संस्थेकडून जाहीर करण्यात येत आहे.

ICSI CS Result 2022: असे करा डाऊनलोड

  • सीएस जून २०२२ स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जा.
  • होमपेजवर सक्रिय केलेल्या ‘निकाल आणि ई-मार्क शीट डाउनलोड करा’ या लिंकवर क्लिक करा.
  • नवीन पेजवर, निकाल विभागात दिलेल्या ड्रॉपडाउनमधून त्यांच्या परीक्षेचा पर्याय निवडा.
  • नंतर रोल क्रमांक आणि १७ अंकी नोंदणी क्रमांक भरून सबमिट करा.
  • यानंतर, उमेदवारांना त्यांचा निकाल आणि ई-गुणपत्रिका पाहता येईल.
  • तसेच उमेदवार सॉफ्ट कॉपी प्रिंट आणि डाउनलोड करू शकतील.
  • आयसीएसआयने १ ते १० जून २०२२ या कालावधीत सीएस प्रोफेशनल आणि सीएस एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रमांसाठी परीक्षा आयोजित केल्या होत्या.

सीएस प्रोफेशनल रिझल्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सीएस एक्झिक्युटिव्ह रिझल्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा


 

ICSI CS Exam Results: ICSI, the Institute of Company Secretaries (ICSI) has important news for those who are waiting for the results of the December 2021 examination. ICSI has announced the results of CS Executive Examination. The results of the Company Secretary Professional Examination have been announced at 11 am. Following this, the result of the executive was announced recently. Candidates appearing for this exam can check the results on the official website- icsi.edu.

ICSI CS Executive 2021: आयसीएसआय म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीतर्फे (ICSI) कंपनी सेक्रेटरी डिसेंबर २०२१ च्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आयसीएसआयतर्फे सीएस एक्झिक्युटिव्ह परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल परीक्षेचा निकाल सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला आहे. यानंतर नुकताच एक्झिक्युटिव्हचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट- icsi.edu वर निकाल तपासू शकतात.

ICSI CS executive 2021: असा पाहा निकाल
सीएस एक्झिक्युटिव्ह डिसेंबरचा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट icsi.edu वर लॉग इन करा.
होमपेजवर, ‘एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम (जुना आणि नवीन अभ्यासक्रम) निकाल’ या लिंकवर क्लिक करा.
तुमचे लॉगिन क्रेडेंशियल्स टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
तुमचा आयसीएसआय सीएस डिसेंबर २०२१ चा निकाल स्क्रिनवर दिसेल.
निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढा.

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह प्रोगामसाठी पुढील परीक्षा १ ते १० जून, २०२२ पर्यंत आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया २६ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होणार आहे. या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधातील अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.

निकालाच्या लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


ICSI CS Exam Results Date: ICSI CS December 2021 result date has been announced. The Institute of Company Secretaries of India has dates for professional and executive courses. According to the notice issued by the organization, the result will be announced on February 25, 2022. Candidates who have appeared for the exam in December 2021 can check the results by visiting icsi.edu.

ICSI CS December Result 2021: आयसीएसआय सीएस डिसेंबर २०२१ निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने (Institute of Company Secretaries of India) या तारखा प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह कोर्स (Professional and xecutive course) साठी आहेत. संस्थेकडून जारी झालेल्या नोटीसनुसार निकाल २५ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर केला जाणार आहे. ज्या उमेदवारांनी डिसेंबर २०२१ परीक्षा दिली आहे, ते icsi.edu वर जाऊन निकाल तपासू शकतात.

अधिकृत नोटिसनुसार, प्रोफेशनल अभ्यासक्रमांचे निकाल २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घोषित केले जाणार आहेत. एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामच्या जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमाचे निकाल (Executive Programme result) एकाच दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत जाहीर केले जातील. निकालासह उमेदवारांचा वैयक्तिक निकाल विषयनिहाय संस्थेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येईल.

एक्झिक्युटिव्ह प्रोगाम (जुना आणि नवा अभ्यासक्रम) परीक्षांचा औपचारिक ई निकाल आणि गुण उमेदवारांनी डाऊनलोड करण्यासाठी निकालाच्या घोषणेनंतर तत्काळ संस्थेच्या वेबसाइटवर अपलोड केले जातील. निकाल जाहीर झाल्यानंतर ते उमेदवारांना देखील पाठवले जातील.

याव्यतिरिक्त, प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह प्रोगामसाठी पुढील परीक्षा १ ते १० जून, २०२२ पर्यंत आयोजित केली जाईल. या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया २६ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होईल. या व्यतिरिक्त, परीक्षेसंबंधातील अधिक माहितीसाठी उमेदवारांना ऑफिशिअल वेबसाइटला भेट द्यावी. सीएस एक्झिक्युटिव्ह आणि सीएस प्रोफेशनल डिसेंबर २०२१ ची परीक्षा २१ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२१ या कालावधीत विविध परीक्षा केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेच्या निकालासंबंधीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.


CS June 2021 Session Company Secretary Professional Executive (CS Professional Executive) and Foundation Course Exams Candidates waiting for CS Result 2021 is over. ICSI CS June Exam Results Declared Now.  Candidates can check the result from the direct link given below

ICSI CS Result 2021: सीएस जून २०२१ सत्राच्या कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल एक्झिक्युटिव्ह (CS Professional Executive) आणि फाउंडेशन कोर्स परीक्षांमध्ये उपस्थित झालेल्या उमेदवारांच्या सीएस निकाल २०२१  ची प्रतीक्षा संपली आहे. ICSI ने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे निकाल नियोजित वेळापत्रकानुसार १३ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केले आहेत. परीक्षेत बसलेले उमेदवार निकाल पोर्टल अधिकृत वेबसाइट icsi.examresults.net वर दिलेल्या लिंकवर जाऊन निकाल पाहू शकतात. उमेदवारांना बातमीखाली दिलेल्या थेट लिंकवरून निकाल तपासता येईल.

How To Check ICSI CS June 2021 Result

  • – icsi.edu या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • – लिंकवर क्लिक करा
  • – क्रिडेन्शिअल्सच्या मदतीने लॉग इन करा
  • – आता निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • – उमेदवारांनी निकाल डाऊनलोड करावा.

उमेदवारांनी त्यांचा ई-रिझल्ट डाऊनलोड करावा, कारण प्रत्यक्ष मार्कशीट पाठवली जाणार नाही. मात्र प्रोफेशनल प्रोग्राम परीक्षेची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना दिली जाईल. आयसीएसआयने सांगितल्यानुसार, निकाल लागल्यानंतर उमेदवारांना निकाल आणि गुणपत्रिका फिजिकली पाठवण्यात येईल.

एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल अभ्यासक्रमांच्या जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमाच्या कार्यक्रमांच्या पुढील परीक्षा २१ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १४ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.

द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना १९६८ मध्ये झाली आहे. भारतातील कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनचा विकास, नियमन, प्रमोशन आदी बाबींची जबाबदारी ही संस्था पार पाडते.

निकालाच्या थेट लिंकवर जाण्यासाठी क्लिक करा



ICSI CS Result 2021: इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने कंपनी सेक्रेटरीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी जून २०२१ सत्राच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. २७ सप्टेंबर २०२१ रोजी संस्थेने जाहीर केलेल्या महत्त्वपूर्ण सुचनेनुसार, सीएस फाउंडेशन, कार्यकारी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल १३ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर होणार आहेत.

आयसीएसआयतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार तिन्ही अभ्यासक्रमांच्या निकालाची वेळ वेगळी ठेवण्यात आली आहे. सीएस प्रोफेशनल निकाल २०२१ सकाळी ११ वाजता जाहीर केला जाईल. तर जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमासाठी सीएस एक्झिक्युटिव्ह निकाल २०२१ दुपारी २ वाजता जाहीर केला जाईल. त्यानंतर सीएस फाउंडेशन निकाल २०२१ दुपारी ४ वाजता जाहीर केला जाणार आहे.

ICSI CS निकाल २०२१ कुठे आणि कसा तपासाल?

  • निकाल आणि स्कोअर कार्ड अधिकृतपणे नियोजित तारखेला आणि वेळेवर जाहीर केल्यानंतर उमेदवार निकाल पाहू शकतात.
  • सीएस फाउंडेशन, एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल कोर्सच्या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना आयसीएसआयची अधिकृत वेबसाइट icsi.edu वर निकाल पाहता येणार आहे.
  • उमेदवारांनी वेबसाइटवरील एक्झाम सेक्शनमध्ये जावे.
  • तिथे निकाल तपासण्यासाठी लिंक सक्रिय केली जाईल.
  • येथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा कोड एन्टर करु सबमिट बटणावर क्लिक करा.
  • तुमचा रिझल्ट स्क्रीनवर दिसेल. रिझल्ट डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घ्या.

The results of the CS Foundation, Executive and Professional examinations for the Institute of Company Secretaries of India (ICSI) for June 2021 will be announced. Candidates appearing for this exam can soon check their result by visiting the official website of ICSI icsi.edu.

ICSI CS Result 2021: इंस्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) जून २०२१ साठी सीएस फाउंडेशन, एग्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल परीक्षेचा निकाल जाहीर जाहीर केला जाणार आहे. या परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार लवकरच आयसीएसआय (ICSI) ची अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जाऊन आपला निकाल तपासू शकतात.

ICSI ने नुकतीच आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात सूचना दिली आहे. आयसीएसआय सीएस परीक्षा १३ ऑगस्ट आणि १४ ऑगस्ट रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांमध्ये आयोजित करण्यात आली होती.

ICSI CS Result 2021: असा तपासा निकाल

  • निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जा.
  • होमपेजवर सीएस फाउंडेशन एग्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल एग्झाम रिझल्ट २०२१ ची अॅक्टिव्ह लिंक दिसेल
  • रिझल्ट लिकंवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज खुले होईल
  • येथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा कोड एन्टर करु सबमिट बटणावर क्लिक करा
  • तुमचा रिझल्ट स्क्रीनवर दिसेल
  • रिझल्ट डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घ्या

येथे जाहीर होणार ICSI CS निकाल


ICSI CS June Exam 2021

Institute of Chartered Accountants of India (ICAI) announces CA exam schedule. After this, now the Institute of Company Secretaries of India (ICSI) has given important information regarding CS exams. Revised schedule for June 2021 exams has been announced. ICSI has announced that the CSS exam will now be conducted from 10th August 2021 to 20th August 2021.

जून २०२१ च्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

ICSI CS June 2021 Exam:इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (ICAI)सीए परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. यानंतर आता इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (ICSI)ने सीएस परीक्षांसदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. जून २०२१ च्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे

४ मेच्या अधिसूचनेनुसार सीएस जूनची परीक्षा स्थगित करण्यात आली. पण आता परिषदने फाऊंडेशन प्रोग्राम, एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम आणि प्रोफेशनल प्रोग्राम्ससाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

फाऊंडेशन प्रोग्राम, एक्झिक्यूटिव्ह प्रोग्राम (जुना आणि नवीन पाठ्यक्रम) आणि प्रोफेशनल प्रोग्राम (जुन्या आणि नवीन पाठ्यक्रम) साठी सीएसएस परीक्षा आता १० ऑगस्ट २०२१ ते २० ऑगस्ट २०२१ पर्यंत केली जाणार असल्याची घोषणा ICSIने केली.

परीक्षेबद्दलची माहिती अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.


ICSI CS June Exam 2021: The application window for filling up applications for ICSI CS June Exam 2021 will be reopened from Saturday 15th May 2021 at the Institute of Company Secretaries of India. The last date for submission of applications is May 22, 2021.

ICSI CS June Exam 2021: इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (Institute of Company Secretaries of India) शनिवार १५ मे २०२१ पासून आयसीएसआय सीएस जून परीक्षा २०२१ साठी अर्ज भरण्यासाठी अॅप्लिकेशन विंडो पुन्हा एकदा उघडली जाणार आहे.

अशात ज्या उमेदवारांनी आतापर्यंत सीएस फाउंडेशन / एक्झिक्युटिव / प्रोफेशनल प्रोगाम परीक्षांसाठी आपला अर्ज भरला नव्हता, ते आता अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून आपला परीक्षा अर्ज भरू शकतात.

उमेदवारांना यासाठी सीएस जून परीक्षा २०२१ परीक्षेचे अर्ज भरण्याच्या आयसीएसआयच्या अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जाऊन लॉगइन करायचे आहे. अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख २२ मे २०२१ आहे.


ICSI CS June 2021 Exam Postponed

Company Secretary examination has been postponed due to COVID-19. The Institute of Company Secretaries of India (ICSI) has announced on its website icsi.edu that it has postponed the CS June 2021 exam.

कंपनी सेक्रेटरी जून 2021 मध्ये होणाऱ्या परीक्षा स्थगित. आयसीएसआयने कंपनी सेक्रेटरी जून २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. नव्या तारखांसंबंधी माहिती देण्यात आली आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने आपली वेबसाइट icsi.edu वर सीएस जून २०२१ परीक्षा स्थगित केल्याची घोषणा केली आहे. CS Foundation, CS Executive प्रोग्राम्स (ओल्ड और न्यू सिलेबस) साठी या परीक्षा १ जून २०२१ ते १० जून २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.


ICSI CS Exam 2021

ICSI CS Exam 2021: Although examinations in school education and higher education institutions are either canceled or postponed due to COVID epidemic, the Secretary of Indian Institutes (ICSI) has informed all students that the proposed CS exam in June 2021 will be held on given time.

ICSI CS Exam 2021 : कोविडच्या महामारीमुळे शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण संस्थांमधील परीक्षा एकतर रद्द अथवा पुढे ढकल्या जात असल्या, तरी भारतीय संस्था सचिवांनी (आयसीएसआय) सर्व विद्यार्थ्यांना असे सूचित केले आहे, की जून 2021 मधील प्रस्तावित सीएस परीक्षा पूर्वनिर्धारित वेळेत घेतली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. गुरुवार 22 एप्रिल 2021 रोजी संस्थेने जाहीर केलेल्या महत्त्वपूर्ण घोषणेनुसार, आयसीएसआय ही कोविड साथीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, शिवाय या संदर्भातील सर्व आवश्यक उपाययोजना विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आयसीएसआयने आपल्या नोटिसीमध्ये नमूद केले आहे, की संस्था सर्व जबाबदाऱ्या आपल्यावर घेत विद्यार्थी हिताचे निर्णय घेत आहे. यासह संस्थेच्या सचिवांनी परीक्षा जून -2021 च्या पूर्व-नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.


ICSI CS Professional Results 2020 Declared

ICSI CS Results : ICSI CS Professional results 2020: The results of the Professional and Executive Examination conducted by the Institute of Company Secretaries of India (ICSI) have been announced. Students can view the results on the official website of ICSI. Those who have taken this exam can view and download the results from the website icsi.edu.

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने प्रोफेशनल व एक्झिक्युटिव्ह परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. कसा पाहाल निकाल, निकालाची थेट लिंक आदी माहितीसाठी क्लिक करा…

ICSI CS Professional results 2020: इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे (ICSI) घेण्यात आलेल्या प्रोफेशनल व एक्झिक्युटिव्ह परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना आयसीएसआयच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. ज्यांनी ही परीक्षा दिली आहे ते icsi.edu या वेबसाइटवरून निकाल पाहू आणि डाऊनलोड करू शकतात. प्रोफेशनल प्रोग्राम (नवीन आणि जुना अभ्यासक्रम) दोन्ही परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. सीएस एक्झिक्युटिव्ह परीक्षेत नव्या अभ्यासक्रमात आकांक्षा गुप्ता आणि जुन्या अभ्यासक्रमात तन्मय अग्रवाल यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

ICSI CS Professional Result Direct Link

एक्झिक्युटिव कोर्समध्ये उत्तीर्ण होण्यासाठी पेपरमध्ये (पेपर १,२,३, आणि ४) कमीत कमी ४० टक्के गुण आवश्यक आहेत. सर्व पेपरमध्ये सरासरी एकूण ५० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. संकेतस्थळावर वैयक्तिक निकालाशिवाय विषयनिहाय ब्रेक अप देखील उपलब्ध होणार आहे.

ICSI CS Professiona results 2020: कसा पाहाल?

  • स्टेप १ – सर्वात आधी अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जा.
  • स्टेप २ – ‘What’s new’ सेक्शन मध्ये जा.
  • स्टेप ३ – विचारलेली माहिती भरा.
  • स्टेप ४ – आता निकाल स्क्रीन वर दिसू लागेल.
  • स्टेप ५ – भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घेऊन ठेवा.

निकालाच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


CS Foundation 2020 परीक्षेचा निकाल जाहीर

ICSI CS Results: इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने CS फाउंडेशन परीक्षा २०२० चा निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते आपला निकाल आयसीएसआयच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतील.
उमेदवार आपले लॉगइन क्रिडेन्शिअल्सच्या सहाय्याने आपला निकाल पाहू शकतील. तसेच आपले गुणांचे तपशील डाऊनलोडही करू शकतील. CS Foundation 2020 परीक्षेचे आयोजन २६ आणि २७ डिसेंबर २०२० या दोन दिवशी दोन सत्रात करण्यात आले होते. आणि ICSI CSEET 2021 े आयोजन ९ आणि १० जानेवारी २०२१ रोजी करण्यात आले होते. एका अधिकृत सूचनेनुसार उमेदवारांना आपला वैयक्तिक निकाल www.icsi.edu वर उपलब्ध होईल . ICSI CSEET चा निकाल १८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जाहीर केला जाणार आहे.
ICSI CS Foundation Result 2020: असा पाहा निकाल
  • स्टेप १- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जा.
  • स्टेप २ – ‘result link’ या पर्यायवर क्लिक करा.
  • स्टेप ३ – विचारलेली माहिती भरा आणि सबमिट करा.
  • स्टेप ४ – निकाल आता तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • स्टेप ५ – भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट काढून ठेवा.

CS Exam 2019 Results Announced

सीएस परीक्षेचा निकाल जाहीर

CS Exam 2019 : The Institute of Company Secretaries of India has announced the results of the company secretary exam online. This professional exam was conducted in December 2019. Students who want to see the results can log in to the official website of ICSI and see the results. The results can be downloaded and the score sheet can be downloaded by clicking on icsi.examresults.net.

CHECK RESULTS HERE

CS RESULT 2019 DECLARED

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने कंपनी सेक्रेटरी परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर केला आहे. ही व्यावसायिक परीक्षा डिसेंबर २०१९ मध्ये घेण्यात आली होती.

ज्या विद्यार्थ्यांना निकाल पाहायचा आहे ते आयसीएसआयच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करून निकाल पाहू शकतील. icsi.examresults.net येथे क्लिक करून निकाल पाहता येईल आणि गुणपत्रिका डाऊनलोड करता येईल.

विद्यार्थ्याचे विषयनिहाय गुणदेखील संकेतस्थळावर उपलब्ध असतील. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ISCI) ने CS फाउंडेशनच्या डिसेंबर २०१९ परीक्षेचा निकाल २५ जानेवारी २०२० रोजी जाहीर केला होता. कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाच्या एक्झिक्युडिव परीक्षेचा निकालही मंगळवारी २५ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता जाहीर होणार आहे.

सीएस परीक्षेत मुंबईची श्रुती शाह देशात प्रथम

कंपनी सेक्रेटरी (सीएस) परीक्षेचे सर्व निकाल मंगळवारी जाहीर झाले असून सीएस प्रोफेशनल परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमांमध्ये मुंबईतील श्रुती शाह देशात प्रथम आली आहे. तर याच परीक्षेत मैत्री मेघानी तिसरी आली आहे.

यंदा सीएसची परीक्षा नव्या व जुन्या पद्धतीने घेण्यात आली होती. जुन्या अभ्यासक्रमांमध्ये इंदूरचा हर्शित जैन पहिला आला तर मुंबईचा सुशील कुमावत आणि अब्दुलकादीर कोहझेम जावडवाला हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आले आहेत. तर एक्झिक्युटीव्ह परीक्षेत पुण्याची कल्याणी पुंडलिक प्रथम तर मुंबईचा अमनदीपसिंग ओबेराय दुसरा आला आहे. या सर्व परीक्षा डिसेंबर २०१९मध्ये घेण्यात आल्या होत्या.

ज्या विद्यार्थ्यांना निकाल पाहायचा आहे ते आयसीएसआयच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करून निकाल पाहू शकतील. icsi.examresults.net येथे क्लिक करून निकाल पाहता येईल आणि गुणपत्रिका डाऊनलोड करता येईल.

या परीक्षेला प्रोफेशनलच्या नव्या अभ्यासक्रमाचा निकाल ४०.०८ टक्के इतका लागला आहे. तर जुन्या अभ्यासक्रमाचा निकाल ३०.११ इतका लागला आहे. तर एक्झिक्युटीव्ह प्रोग्रामच्या नव्या अभ्यासक्रमाचा निकाल ७.६८ टक्के आणि जुन्या अभ्यासक्रमाचा निकाल १३.५४ टक्के इतका लागला आहे. सीएसची एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम आणि प्रोफेशनल प्रोग्रॅमची परीक्षा १ ते १० जून या कालावधीमध्ये होणार आहे.

सौर्स : मटा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!