राज्यातील लिपिक संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया MPSC मार्फत

Clerical Cadre Recruitment Process Through MPSC

राज्यातील लिपिक संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत

राज्यातील शासकीय विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महाराष्ट्र लोकसेवा अयोगाशी (एमपीएससी) निगडित बाबींची आढावा बैठक श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार सर्वश्री रोहित पवार, संजय शिंदे, अतुल बेनके यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव राहुल कुलकर्णी, श्रीमती गीता कुलकर्णी, श्रीमती सु. मो. महाडिक, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सु. ह. अवताडे आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. भरणे यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट अ आणि ब संवर्गासाठी, पोलीस उपनिरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आदी काही गट क मधील पदांसाठी तसेच बृहन्मुंबईतील लिपिक संवर्गासाठीही एमपीएससीमार्फत भरतीप्रक्रिया राबविण्यात येते. तथापि, राज्यातील उर्वरित जिल्ह्यात बहुतांश गट ब अराजपत्रित आणि गट क मधील पदांची भरतीप्रक्रिया स्थानिक पातळीवर होते. त्यामुळे उमेदवारांना प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करावा लागल्याने खर्च वाढतो.

श्री. भरणे पुढे म्हणाले की, एमपीएससीच्या माध्यमातून केंद्रीकृत पद्धतीने एकाच वेळी या पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवावी अशी मागणी उमेदवारांकडून येत आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या सर्वच गट ब आणि गट क संवर्गातील पदांची भरती एमपीएससीच्या माध्यमातून राबविता येईल काय याबाबत चाचपणी करण्यात येईल. तथापि, प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला लिपिक संवर्गासाठी एमपीएससीच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया राबविण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांना वेगवेगळ्या विभागांच्या परीक्षेसाठी प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करण्याची गरज भासणार नाही तसेच त्यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक तसेच शारीरिक त्रास वाचू शकेल, असेही ते म्हणाले.

आमदार रोहित पवार यांनी एमपीएससी देणाऱ्या उमेदवारांच्या अनुषंगाने बैठकीच्या आयोजनाबाबत मागणी केली होती. या बैठकीमध्ये एमपीएससी मुख्यालयाच्या बेलापूर येथील प्रस्तावित इमारत उभारणीबाबतही चर्चा करण्यात आली. लवकरच या इमारतीसाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. एमपीएससीच्या सदस्य नियुक्तीसाठी अर्ज प्राप्त झाले असून त्याची छाननी आणि नियुक्तीप्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया गतीने पार पाडण्यासाठी सदस्यांची सर्व पदे लवकरात लवकर भरणे आवश्यक आहे, असे श्री. भरणे म्हणाले. मंत्रालयीन संवर्गातील प्रलंबित पदोन्नत्यांच्या अनुषंगानेही त्वरीत कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!