मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही – मंत्री आदिती तटकरे यांचा दावा..! – Chief Minister Mazi Ladki Bahin Yojana

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Ladki Bahin Yojana Aadhar Link

Chief Minister Mazi Ladki Bahin Yojana New update – Shiv Sena (Thackeray) leader Aaditya Thackeray had expressed fear that the Mahayuti government would stop the scheme by increasing the list of ineligible Ladki Bahin after the upcoming civic polls. In response, Aditi Tatkare said, “The money of the ineligible Ladki Bahin who return the money on their own will be taken back, but the money of the Ladki Bahin who were disqualified in the verification will not be taken back.”

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही – मंत्री आदिती तटकरे यांचा दावा

आगामी महापालिका निवडणूक झाल्यावर महायुती सरकार अपात्र बहिणींची यादी वाढवून ही योजना बंद करेल, अशी भीती शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्याला उत्तर देताना आदिती तटकरे यांनी ‘स्वतःहून पैसे परत देणाऱ्या अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जातील, पण पडताळणीत अपात्र ठरणाऱ्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नाहीत, असे स्पष्ट केले.

  • ‘लाडकी बहीण’ योजनेवरून सध्या उलट सुलट चर्चा सुरू आहे.. चार ते साडेचार हजार लाडक्या बहिणींनी ही योजना बंद करण्यात यावी, असे अर्ज केले आहेत. ही यादी प्रत्येक दिवस वाढत आहे. या योजनेची पडताळणी करताना कुटुंबाचे उत्पन्न तपासण्यासाठी आयकर विभाग, तर घरात चार चाकी वाहन आहे का हे पाहण्यासाठी परिवहन विभागाची मदत घेतली जाणार असल्याचे तटकरे यांनी जाहीर केले आहे. त्याचा धसका अनेक लाडक्या बहिणींनी घेतला.
  • काही बहिणींनी स्वतःहून ही योजना नको, असे अर्ज केले आहेत. त्यांना देण्यात आलेला पाच महिन्यांचा लाभ सरकारी तिजोरीत शासकीय चलनाने परत घेतला जाणार आहे. स्वेच्छेने योजना नाकारणाऱ्या लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार आहेत. पण पडताळणीत अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींकडून दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही, असा दावा आदिती तटकरे यांनी केला.
  • दरम्यान, अपात्रतेचा शिक्का बसणाऱ्या प्रत्येक बहिणीकडून सरकारी लाभ परत घ्यावा लागणार असल्याचा ठाम विश्वास या विभागाचे वरिष्ठ अधिकारी व्यक्त करीत आहेत.

Latest information More than 4,000 women from across the state have applied for ‘no scheme’ even before the verification drive to exclude women who do not fit the eligibility criteria from the ‘Ladki Bahin Yojana’ scheme was launched. According to senior officials of the women and child development department, applications have been received in government offices at the local level requesting to stop the benefits of the scheme. The ‘withdrawal of applications’ appears to be driven by fears that the amount of benefit earned if disqualified at the verification will be recovered along with a fine.

पडताळणीपूर्वीच चार हजार ‘बहिणीं’ची माघार !

पात्रता निकषात न बसणाऱ्या महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम राबवण्याच्या आधीच राज्यभरातून चार हजारांहून अधिक महिलांनी ‘योजना नको’ असा अर्ज केला आहे. महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयांत योजनेचे लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज येत आहेत. पडताळणीत अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्यात येण्याच्या भीतीने ही ‘अर्ज माघार’ सुरू असल्याचे दिसून येत आहे. या महिलांना दंड आकारण्याचा कोणताही विचार नसला तरी, त्यांनी मिळवलेली रक्कम ‘थेट हस्तांतर योजनेशी संलग्न खात्यांमधून वसूल करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारच्या पडताळणीत अपात्र ठरण्याची टांगती तलवार आणि आतापर्यंत मिळालेले पैसे परत करावे लागण्याची भीती यामुळे अनेक महिला आतापासूनच लेखी अर्ज देऊन ‘लाडकी बहीण’ योजनेतून बाहेर पडत आहेत.

  • महायुती सरकारने गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. राज्यातून दोन कोटी ६३ लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. दोन कोटी ४७ लाख महिला पात्र ठरल्या. त्यातील दोन कोटी ३४ लाख बहिणींना विधानसभा निवडणुकी अगोदर पाच महिने दरमहा दीड हजार रुपये देण्यात आले. या योजनेचा महायुतीला चांगला फायदा झाला. महायुती सत्तेत आल्यानंतर डिसेंबरचा हप्ताही देण्यात आला. मात्र, या योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर प्रचंड भार पडणार असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेतील लाभार्थीची पडताळणी करण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागाला केल्या होत्या. त्यानुसार या विभागाकडून पडताळणी मोहीम राबवण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच शेकडो महिलांनी योजनेतून माघार घेण्यासाठी लगबग चालवली आहे.
  • या योजनेतील लाभार्थी असलेल्या पिवळ्या आणि केसरी शिधापत्रिकाधारक वगळता अन्य लाभार्थीची पडताळणी करण्याची घोषणा महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. त्यानुसार नमो शेतकरी सन्मान योजना व संजय गांधी निराधार योजनेतून लाभ घेणाऱ्या ‘बहिणीं’ ना वगळण्यासाठी त्यांची माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मागवण्यात आली आहे. यापैकी निराधार योजनेतील महिलांना आधीच दरमहा दीड हजार रुपये मिळत असल्याने त्यांना कोणताही लाभ दिला जाणार नाही तर, नमो शेतकरी सन्मान योजनेत एक हजार रुपये दिले जात असल्याने या महिलांना आणखी केवळ पाचशे रुपये देण्यात येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच पडताळणीत अपात्र ठरणाऱ्या महिलांकडून गैरप्रकारे मिळवलेल्या लाभाची रक्कम वसूलण्यात येईल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पडताळणी कशी?

  • केवळ पिवळ्या आणि केसरी शिधापत्रिकाधारक महिलांनाच योजनेचा लाभ.
  • नमो शेतकरी सन्मान योजनेतील १९ लाख २० हजार ८५ महिलांना दरमहा केवळ पाचशे रुपये
  • संजय गांधी निराधार महिला योजनेतील महिलांना पूर्णपणे वगळणार.

तीन ते चार लाख अपात्र ठरणार

  • राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षांनी मोहिमा राबवत महिलांचे अर्ज भरून घेतले.
  • त्या वेळी पात्रता निकषात बसत नसलेल्या महिलांकडूनही अर्ज भरून घेण्यात आले. शासनानेही निवडणुकीच्या तोंडावर पडताळणी न करता सरसकट लाभ दिले.
  • मात्र, आता पडताळणीनंतर तीन ते चार लाख महिला योजनेतून अपात्र ठरतील, असा अंदाज महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवला.
  • येत्या २५ जानेवारीपर्यंत याबाबतचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर २६ जानेवारीला पुढील हप्ता दिला जाईल, अशी शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Chief Minister Mazi Ladki Bahin Yojana – The state government’s ambitious ‘Ladki Bahini Yojana’ is within the constitutional framework and not to lure women voters. The state government has filed an affidavit in the Nagpur bench of the Bombay High Court stating that the scheme has been launched to empower women in the state. The state government also made it clear in the affidavit that the scheme does not impose additional financial burden on the state.

‘लाडकी बहीण’ योजना महिला सशक्तीकरण्यासाठी

राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण योजना’ ही संवैधानिक चौकटीत असून महिला मतदारांना आमिष दाखविण्यासाठी नाही. ही योजना राज्यातील महिलांना सशक्त करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे, असे शपथपत्र राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आले आहे. या योजनेमुळे राज्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत नसल्याचेही राज्य सरकारने शपथपत्रातून स्पष्ट केले.

  • सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी उच्च न्यायालयात लाडकी बहीण योजनेसह राज्य शासनाच्या मोफत योजनेच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्या. नितीन सांबरे आणि न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने याप्रकरणी ऑक्टोबर महिन्यात राज्य शासनाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. यावर तीन महिन्यांनंतर राज्य शासनाकडून उच्च न्यायालयात उत्तर दाखल करण्यात आले आहे.
  • राजकीय हेतू नाही – वित्त विभागाने नोंदविलेले आक्षेप हे अंतर्गत आहेत आणि यामुळे मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णयावर परिणाम होत नाही. सामाजिक व कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील इतर प्रकल्पांवर परिणाम झालेला नाही. राज्य शासन सर्वच प्रकल्पांना योग्य निधी उपलब्ध करून देत आहे. राज्य शासनाने सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून ही योजना कार्यान्वित केली आहे. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात यावी अशी मागणी राज्य शासनाने केली.

सरकारने हायकोर्टात दिली माहिती

  1. राज्य शासनाच्या शपथपत्रानुसार, राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजना वंचित घटकांच्या कल्याणासाठी आहेत. यात लाडकी बहीण योजनेचाही समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना सशक्त करण्यासाठी आर्थिक साहाय्य पुरविले जाते.
  2. याचिकाकर्त्याने राज्याच्या आर्थिक स्थितीवर पडत असलेल्या आरोपांनाही राज्य शासनाने फेटाळले.
  3. राज्याची वित्तीय तूट ही कायम ३ टक्क्याच्या आत राहिलेली आहे. चालू आर्थिक वर्षात ही तूट २.५९ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
  4. राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेमुळे यात फार मोठा परिणाम होईल, हा आरोप निराधार असल्याचे शपथपत्रात सांगण्यात आले.
  5. राज्य शासनाच्या या उत्तरावर ५ याचिकाकर्त्याला प्रत्युत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाने दोन आठवड्यांचा कालावधी दिला. याचिकेवर पुढील सुनावणी ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Chief Minister Mazi Ladki Bahin Yojana New update – The government has decided to scrutinise the beneficiaries of the Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana announced ahead of the Assembly elections, for which the help of income tax department will be taken. If the income is more than Rs 2.5 lakh and there is a four-wheeler in the family, then such women will not get the benefit of the scheme now.

According to the latest information, it seems that a received many complaints regarding the beloved sister scheme. Based on that, we are taking some steps. Women who are not eligible are also getting the benefit of this scheme. “We will scrutinise the applications received,” Women and Child Development Minister Aditi Tatkare told the media on Thursday.

We will seek information from the income tax department to verify that the income of the family income of the applicant women is less than Rs 2.5 lakh. Aditi Tatkare said that income verification will also be done with PAN card, and women who have a four-wheeler in their family will also be excluded from the scheme. Information will also be sought from the transport department. He also said that the beneficiary women who are getting the benefit of other government schemes will be given the benefit of the upper difference amount.

लाडकी बहीण योजनेची छाननी सुरू-कुटुंबात चार चाकी असेल तर ‘लाडकी’ ला निधी नाही

विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठी प्राप्तीकर विभागाची (इन्कम टॅक्स) मदत घेतली जाणार आहे. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, तसेच कुटुंबात चारचाकी गाडी असेल तर अशा महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही.

  • लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्याआधारे आम्ही काही पावले उचलत आहोत. पात्र नसलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे तक्रारी आलेल्या अर्जांची आम्ही छाननी करणार असल्याचे महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.
  • अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत असल्याची पडताळणी करण्यासाठी प्राप्तीकर विभागाकडून माहिती मागवणार आहोत. पॅन कार्डशीही उत्पन्नाची पडताळणी केली जाईल, असे अदिती तटकरे यांनी सांगितले, तसेच ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असेल अशा महिलांनाही या योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्यासाठी परिवहन विभागाकडूनही माहिती मागवली जाणार आहे. इतर शासकीय योजनेचा लाभ मिळत असलेल्या लाभार्थी महिलांना वरच्या फरकाच्या रकमेचा लाभ दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
  • कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख असेल तरच लाभ-
    • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख असणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल, अशी अट ही योजना घोषित करतानाच सरकारने टाकली होती.
    • मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्जांची पडताळणी न करता सरसकट अर्ज केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला आहे.
    • या योजनेत लाभार्थी महिलांची संख्या अडीच कोटीच्या घरात आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा भार येत असल्याने अपात्र महिलांना वगळण्यासाठी सरकारने आता पावले उचलली आहेत.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 5th Installment – Before the assembly elections, the beneficiary women were given the benefit till November and now the benefit of December has remained. The women and child welfare department of the state government has planned to give two months’ benefit (Rs 8,100 crore) to the beloved sisters on January 14, due to Makar Sankranti.

As of October 15, 3.5 crore women have applied for the Chief Minister’s Dear Sister Scheme. However, there are also women beneficiaries of the Sanjay Gandhi Niradhar Yojana. Apart from this, more than two women from the same family with an annual financial income of more than Rs 2.5 lakh are also applicants. Meanwhile, women who take advantage of the government’s second personal scheme can take advantage of the same scheme. Therefore, the verification of applications will definitely be done, but the government has not taken a decision in this regard.

लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रातीची भेट! १४ जानेवारीपूर्वीच मिळणार डिसेंबर-जानेवारीचा लाभ; ‘एवढ्या’ महिलांच्या खात्यात जमा होणार प्रत्येकी ३००० रुपये

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पावणेअकरा लाख तर राज्यभरातील दोन कोटी ६९ लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी लाभार्थी महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभ देण्यात आला असून आता डिसेंबरचा लाभ राहिलेला आहे. पुढे १४ जानेवारीला मकर संक्रांत असल्याने लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचा लाभ एकत्रितपणे (८,१०० कोटी) देण्याचे नियोजन राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने केले आहे.

  • हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये महिला व बालविकास विभागासाठी दोन हजार १५५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आता नव्या मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत दोन महिन्यांच्या निधीला मान्यता अपेक्षित आहे. तत्पूर्वी, राज्य सरकारने २०२४-२५ या आर्थिक वर्षात एक लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून मान्यता मिळविली आहे. विधानसभेपूर्वी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी आठवड्याला साधारणत: तीन ते साडेतीन हजार कोटींचे कर्ज घेण्यात आले. पण, आता कर्जाची मर्यादादेखील संपत आल्याने त्या रकमेचे नियोजन काटेकोरपणे केले जात आहे.
  • निवडणुकीनंतर आमदारांना देखील विकासकामांचा निधी मिळालेला नाही. जिल्हा नियोजन समित्यांचाही निधी प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा लाभ एकत्रित देऊन पुढे अर्थसंकल्पी अधिवेशनापूर्वी दोन महिन्यांचा लाभ दिला जाईल, असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. मार्चनंतर शक्य झाल्यास लाडक्या बहिणींना १ एप्रिलपासून प्रत्येकी २,१०० रुपये दिले जावू शकतात, असेही सांगण्यात आले.
  • पडताळणी निश्चित, पण निर्णयासाठी ‘वेट ॲण्ड वॉच’ – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १५ ऑक्टोबरच्या मुदतीपर्यंत पावणेतीन कोटी महिलांनी अर्ज केले आहेत. पण, त्यात संजय गांधी निराधार योजनेतील देखील लाभार्थी महिला आहेत. याशिवाय कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न अडीच लाखांहून अधिक असलेल्या व एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलादेखील अर्जदार आहेत. दरम्यान, शासनाच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना एकाच योजनेचा लाभ घेता येतो. त्यामुळे अर्जांची पडताळणी निश्चितपणे होणार आहे, पण तुर्तास त्यासंबंधीचा शासन निर्णय झाला नाही.
  • काही दिवसांत जमा होईल लाभाची रक्कम-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना डिसेंबर महिन्यातील लाभ काही दिवसांत अपेक्षित आहे. मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर महिलांना योजनेच्या लाभाची रक्कम वितरित होईल. दरम्यान, योजनेतील लाभार्थींच्या अर्जांच्या पडताळणीसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. , महिला व बालकल्याण अधिकारी, सोलापूरप्रसाद मिरकले

Latest infomation about the Ladki Bahin Yojana is given here. The Chief Minister Ladki Bahin Yojana will continue. “As promised by us, Rs 2,100 per month will be given to the women beneficiaries of the scheme soon,” Fadnavis had said. We have received complaints that some women do not fit the criteria. Fadnavis had indicated that the applications would be scrutinised.

A big detail has come to light about the Chief Minister’s Ladki Bahin Yojana, which was at the centre of the campaign in the Assembly elections and brought the Grand Alliance back to power. According to reports, the applications received under the Ladki Bahin Yojana will be scrutinised. Also, if they do not fit the criteria, the applications of the women concerned will be rejected.

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा रेकॉर्ड तपासला जाणार, छाननीत गडबड आढळल्यास 1500 रुपये बंद होणार

विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि महायुतीला पुन्हा सत्तेत बसवणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेतील तक्रार आलेल्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. तसेच निकषात बसत नसेल तर संबंधित महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. 

  • देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते संकेत  – राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर याबाबतचे सूतोवाच केला होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे. तसेच आम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे या योजनेच्या लाभार्थी महिलांना महिन्याला 2100 रुपये लवकरच देण्यात येणार आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले होते. यासह काही महिला निकषात बसत नाहीत, तशा आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे  अर्जांची छाननी केली जाईल, असे संकेत फडणवीस यांनी दिले होते.
  • सर्व अर्जांची छाननी होणार नाही – सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. लवकरच हा लाभ 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल. सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन आगामी अर्थसंकल्पात त्यासंबंधीची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. त्याआधी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्‍या महिलांच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. मात्र सरकारला सर्व अर्जांची छाननी करणे शक्य नाही. त्यामुळे ज्या अर्जांसंदर्भात तक्रार आलेली आहे, त्याच अर्जांची छाननी केली जाईल, असे सांगितले जात आहे. सध्या या योजनेअंतर्गत 2 कोटी 34 लाख महिला लाभार्थी आहेत.
  • वेळोवेळी योजनेत अनेक बदल – दरम्यान, या योजनेत वेळोवेळी अनेक बदल करण्यात आले. लाभार्थी महिलांचे वय 21 ते 65 वर्षे करण्यात आले. तसेच अगोदर कुटुंबातील एका महिलेसाठी ही योजना लागू असेल असा नियम होता. मात्र तो बदलून कुटुंबातील 21 ते 65 वर्षे वय असणाऱ्या सर्व महिलांसाठी ही योजना लागू असेल, असा बदल करण्यात आला. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? किती महिलांचे अर्ज बाद होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

New Registration for Ladki Bahin Yojana | How to link Ladki Bahin Yojna With Aadhar ? Chief Minister Mazi Ladki Bahin Yojana – As soon as the new government comes to power, the criteria for the Ladki Bahin Yojana are likely to change significantly, according to the administration. The scheme was implemented keeping in mind the voting of women voters before the elections. However, the plan is now likely to be shelved to meet the financial burden. The criteria were not strictly scrutinised while implementing the scheme before the elections. In one family, only two women were given benefits, but more than that were given benefits.

नवे सरकार सत्तारूढ होताच लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता प्रशासनातून व्यक्त होत आहे. निवडणुकीपूर्वी महिला मतदारांचे मतदान डोळ्यांसमोर ठेवून योजना राबविली गेली. पण, आता आर्थिक ओझे पेलण्यासाठी या योजनेला चाळणी लावली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. निवडणुकीपूर्वी योजना राबविताना निकषांची काटेकोर छाननी करण्यात आली नव्हती. एका कुटुंबात दोनच महिलांना लाभाचा निकष असतानाही त्यापेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आला.

  • घरात चारचाकी वाहन, आयकर भरणारे यांनाही योजनेचा लाभ घेता येत नव्हता, तरीही अशा कुटुंबातील महिलांच्या खात्यांवर पैसे जमा झाले. लाभार्थी महिलांच्या नावांची यादी ग्रामपंचायतीत ग्रामसभेत जाहीर वाचन करून मान्यता देण्याचा नियम होता, तोदेखील पाळला गेला नाही. ग्रामसभांत यादीचे वाचन झालेच नाही.
  • काही महिला पात्र असूनही तांत्रिक कारणास्तव त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. आता नवे सरकार सत्तारूढ होताच योजनेचे पोर्टल पुन्हा सुरू होऊन त्यांच्या खात्यांवर पैसे जमा होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
  • दरम्यान, योजनेसाठी खर्च होणाऱ्या निधीचा मोठा बोजा सरकारला पेलावा लागत आहे हे लक्षात घेऊन योजनेचे निकष अधिक काटेकोर केले जातील असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • महिलांना १५०० रुपयांवरून आता २१०० रुपये दिले जाणार आहेत, त्यामुळे हा बोजा आणखी वाढणार आहे. योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हप्ते देण्यात आले आहेत. जुलै ते नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळाले.
  • मात्र, आचारसंहितेमुळे डिसेंबर महिन्याचे पैसे निवडणुकीनंतर देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. आता निकालानंतर लाडक्या बहिणींचे लक्ष हप्त्याकडे लागले आहेत. आता १५०० रुपये मिळणार की २१०० याचीही उत्सुकता आहे.

दुबार लाभ टाळण्याचा प्रयत्न; नव्याने नोंदणी होणार का?

  • या लाभार्थ्यांमधून आयकर भरणारे, घरात चारचाकी वाहन असणारे वगळले जाण्याची शक्यता आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असणारे कुटुंब योजनेसाठी पात्र नाही, तरीही त्यांना आतापर्यंत लाभ मिळाला आहे. याचीही छाननी होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली.
    संजय गांधी निराधार किंवा अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा दुबार लाभ मिळणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.
    लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी अद्यापही प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून आता नवीन २१०० रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे. त्यामुळे प्रलंबित लाभार्थ्यांचा यावेळी शासन विचार करणार का, असा प्रश्न प्रतीक्षेत असणाऱ्या लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

Ladki Bahin Yojana New Installment Dates and Amount Details are given here. The ‘Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana ‘, launched by the Eknath Shinde government ahead of the assembly elections, has become very popular among women voters. Under this scheme, women in the state are given a financial benefit of Rs 1500 per month. Though the scheme was launched to provide financial support to women, there were different reactions in political circles. Meanwhile, the Grand Alliance has got a big boost in the Maharashtra Assembly elections. So now the question is when will the money come from the Ladki Bahin Yojana.  Polling will be held on November 20 and after the results are declared on November 23, the Installment for the month of December will be directly credited to the account. Besides, there is enough planning for the future as well.”

When will the next installment be released? – At the same time, now once again after the landslide victory of the Shinde faction, the women of the state are eagerly waiting for the next installment of this scheme. However, the date for releasing the installment of December 2024 has not been announced by the government. But many media reports have claimed that the CM is swearing in on December 2 in Maharashtra. After this, the beneficiaries will be given an update about the December installment.

महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर….

एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महिला मतदारांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला ₹1500 चा आर्थिक लाभ देण्यात येतो. महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असली, तरी तिच्यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा कल मिळाला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहणीचे पैसे कधी येणार, असा प्रश्न विचारल्या जात आहे.

  • ‘लाडकी बहीण’ योजना हा केवळ राजकीय डावपेच नसून महिलांसाठी आर्थिक बळकटीचा स्त्रोत ठरणार आहे, हे दाखविण्याचे आव्हान आता शिंदे सरकारपुढे आहे.
  • निवडणूक डावपेचांमध्ये योजनेची भूमिका- महायुती सरकारच्या या योजनेवर विरोधकांनी टीका करताना ही योजना फक्त महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुरू केली असल्याचा आरोप केला होता. तसेच, ही योजना फार काळ चालणार नाही, असे भाकीत देखील केले गेले. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा जनाधार मिळाल्यानंतर महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
  • आता, लाडक्या बहिणींना वचन दिलेला हप्ता कधी येणार? असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारादरम्यान या संदर्भात स्पष्ट आश्वासन दिले होते.
  • हप्ता कधी मिळणार? शिंदे यांचे आश्वासन – प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले होते, “ही योजना फक्त घोषणांसाठी नाही. आम्ही या योजनेसाठी पूर्ण आर्थिक नियोजन केले आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल आणि २३ नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता सरळ खात्यात टाकला जाईल. याशिवाय, पुढील कालावधीसाठीही पुरेसे नियोजन केले आहे.”
  • शिंदे यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. “आम्ही फक्त ₹1500 देणार नाही, तर योजनेचा लाभ वाढवून ₹2100 करणार आहोत,” असे त्यांनी सांगितले होते.

Ladki Bahin Yojana 5th Installment 2024 – Ladki Behin Yojana is an important scheme launched by the Government of Maharashtra. Under this, women from economically weaker sections of the state will be given a monthly assistance of ₹ 1500 from the government, so that their financial condition can be strengthened. For information, we tell you that about 2 crore 40 lakh women are getting benefits in the state under this scheme. All eligible women have received 4 months installments under the scheme. Now that the model code of conduct has come into force in the state, women waiting for the fifth installment will have to wait longer.
Following the Election Commission’s order, the Women and Child Development Department has stopped the amount given by Maharashtra to eligible women under the scheme. In such a situation, the women beneficiaries of the Ladki Bahin Yojana will be paid salaries for the months of October and November together, the government said.

  • लाडकी बहिन योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या अंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना सरकारकडून दरमहा ₹ 1500 ची मदत दिली जाईल, जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, या योजनेअंतर्गत राज्यात सुमारे 2 कोटी 40 लाख महिलांना लाभ मिळत आहे. सर्व पात्र महिलांना योजनेअंतर्गत 4 महिन्यांच्या हप्त्याचे पैसे मिळाले आहेत.
  • आता राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने पाचव्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर महिला व बालविकास कल्याण विभागाने महाराष्ट्राकडून या योजनेंतर्गत पात्र महिलांना देण्यात येणारी रक्कम थांबवली आहे. अशा परिस्थितीत लाडकी बहिन योजनेतील महिला लाभार्थींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे वेतन एकत्रितपणे दिले जाईल, असे सरकारने म्हटले आहे.

Latest updates regarding the Ladki Bahin Yojana – Eknath Shinde has announced ten promises. Shinde said that if voted to power, he would increase the money of the beloved sister scheme. Shinde announced that the current payment of Rs 1,500 will be increased to Rs 2,100 per month. Also, 25,000 women will be recruited in the state’s police force. Farmers will be given loan waivers. The amount of Kisan Sannan Yojana will also be increased. Currently, 12,000 are given, which is increased to 15,000. Shinde said these announcements will be implemented if the Grand Alliance comes to power in the state.

लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला आजपासून सक्रियपणे सुरुवात झाली. कोल्हापूरमध्ये आज महाविकास आघाडी आणि महायुतीची सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी महाविकास आघाडीववर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, राज्यातील महिला, शेतकरी, वृद्ध आणि तरुणांसाठी 10 महत्त्वाच्या घोषणाही केल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी दहा वचनांची घोषणा केली आहे. त्यात सत्ता आल्यास लाडकी बहीण योजनेच्या पैशात वाढ करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सध्या 1500 रूपये दिले जातात, त्यात वाढ करून 2100 रूपये दर महिन्याला देण्याचे शिंदे यांनी जाहीर केले. तसेच, राज्यातील पोलीस दलात 25 हजार महिलांची केली जाईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. शेतकरी सन्नान योजनेच्या रक्कम मध्ये ही वाढ केली जाईल. सध्या 12 हजार दिले जातात, ते 15000 करण्यात येई. राज्यात महायुतीचे सरकार आल्यास या घोषणांची अंमलबजावणी केली जाईल असे शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घोषणा

  1. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 दिले जाणार. राज्यातील पोलीस दलात 25,000 महिलांची भरती.
  2. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.12,000 वरुन रु.15,000 मिळणार. तसेच MSP वर 20% अनुदान दिले जाणार.
  3. प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा दिला जाणार.
  4. वृद्ध पेन्शन धारकांना रु.1500 वरुन रु.2100 मिळणार.
  5. राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवल्या जाणार.
  6. 25 लाख रोजगार निमिर्ती, तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 विद्यावेतन मिळणार.
  7. राज्यातील ग्रामीण भागात 45,000 गावांत पाणंद रस्ते बांधले जाणार.
  8. अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला रु.15,000 वेतन मिळणार.
  9. वीज बिलात 30% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर दिला जाणार.
  10. सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@2029 ‘ 100 दिवसांच्या आत सादर केला जाणार.

Ladki Bahin Yojana Diwali Gift new update – Since the state government launched the Mukhyamantri Mazri Ladki Bahini Yojana, eligible women have been given financial assistance of Rs 1,500 per month. However, opposition parties have levelled allegations against the Grand Alliance government over the scheme. The opposition has said that the beloved sister scheme will be discontinued. Meanwhile, Deputy Chief Minister Ajit Pawar once again hit out at the opposition parties and made a big announcement about the scheme. We have made provision for the next five years for the expenses of the beloved sister scheme. Ajit Pawar said that this scheme will continue. He was speaking at an event in Sangvi, Pune.

लाडक्या बहिणींना मिळालं ‘दिवाळी गिफ्ट’! उपमुख्यमंत्र्यांनी योजनेबाबत केली मोठी घोषणा

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यापासून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. परंतु, या योजनेबाबत विरोधी पक्षांनी महायुती सरकारवर आरोपांची राळ उडवली आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा सूर विरोधकांनी आवळला आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षांना पुन्हा एकदा धारेवर धरलं आणि या योजनेबाबत मोठी घोषणा केली. आम्ही लाडकी बहीण योजनेच्या खर्चाबाबत पुढील पाच वर्षांची तरतूद केली आहे. ही योजना पुढे सुरु राहील, असं मोंठ विधान अजित पवार यांनी केलं. ते पुण्याच्या सांगवी येथील कार्यक्रमात बोलत होते.

  • अजित पवार म्हणाले, विरोधी पक्ष महिलांना खोटी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 2 कोटी 3 लाख महिलांना लाभ मिळाला आहे. पैसा थेट महिलांच्या खात्यात जमा केला आहे. जेव्हा एखाद्याच्या घरी मनी ऑर्डर येतं, तेव्हा त्या व्यक्तीलाही असं वाटतं की, मलाही काहीतरी बक्षिस मिळालं पाहिजे. त्यामुळे मनी ऑर्डर आणणाऱ्या व्यक्तीला काहीतरी बक्षिस द्यावं लागत होतं. परंतु, आम्ही लाडकी बहीण योजनेत कोणताही अडथळा ठेवला नाहीय. आम्ही महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा करत आहोत. या योजनेसाठी पुढील पाच वर्ष पैशांची तरतूद केली आहे.
  • लाडकी बहीण योजना सुरू राहण्यासाठी महायुतीला मतदान करा. विधानसभा निवडणुकीनंतर अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली, तर राज्याचा पुढील अर्थसंकल्प हा सात लाख कोटींचा असेल. ज्यामध्ये 45,000 कोटी लाडक्या बहिणींसाठी असतील आणि राज्यातील शेतकऱ्यांचं वीजबील माफ करण्यासाठी 15000 कोटींची तरतूद केली जाईल. राज्याचा मागील अर्थसंकल्प साडेसहा कोटींचा होता.
  • “लाडकी बहीण योजना इतक्या मोठ्या प्रमाणात चालवली जाऊ शकते, असं विरोधकांना वाटलं नव्हतं. त्यामुळे विरोधकांसाठी ते अनपेक्षित होतं. “लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकू नये यासाठी महिलांना नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये दिले. 20 नोव्हेंबरला निवडणुकीचं मतदान आहे. तर निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला आहे. त्यामुळे महिलांना डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच देण्यात येणार आहेत”,असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एनएनआयला दिलेल्या मुलाखतीत नुकतच केलं.

Ladki Bahin Yojna 2024 : Chief Minister Shinde reiterated that he would not allow the beloved sister scheme to be discontinued under any circumstances and promised that the beloved sisters would get Rs 2,000 instead of Rs 1,500 if the government came to power. He also announced compensation to farmers who suffered losses due to heavy rains. The Mahayuti rally was held in Muktainagar on Monday. Shinde was speaking at the time. He said five instalments have already been deposited in the sisters’ bank accounts so that the opposition will sabotage the beloved sister scheme.

म्हणून ‘लाडक्या बहिणींना आधीच पाच हप्ते दिले…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : दोन हजार रुपये देणार

लाडकी बहीण योजना कुठल्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आणि सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दीड हजारऐवजी दोन हजार रुपये मिळतील, असे आश्वासन दिले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचेही त्यांनी जाहीर केले. मुक्ताईनगर येथे सोमवारी महायुतीचा मेळावा झाला. त्यावेळी शिंदे बोलत होते. ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेला विरोधक खोडा घालतील म्हणून आधीच पाच हप्ते बहिणींच्या बँक खात्यात जमा केले आहेत.

चंद्रकांत पाटील यांना शिंदेसेनेतर्फे उमेदवारी

  1. मुक्ताईनगरचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यांनी या मेळाव्यात शिंदेसेनेत प्रवेश केला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीतर्फे त्यांची उमेदवारी जाहीर केली.
  2. आपले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे मी सीएम नाही, तर कॉमन मॅन आहे, असे मुख्यमंत्री शिदे यावेळी म्हणाले.
  3. राज्य सरकारने तीर्थयात्रेसारख्या विविध लोककल्याणकारी योजना सुरु केल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू आता सरकत चालली आहे, अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.

The much-hyped ‘Chief Minister – My Dear Sister’ scheme has been put on hold by the government for the time being. The decision has been taken by the women and child welfare department of the state government. However, the election commission has been given a thumbs up by the sisters as the advance installment for the month of November has been deposited in the bank accounts of 2.34 crore women. Now only one million women have not received the installment in their accounts. The Chief Electoral Officer’s office has again directed all administrative departments to immediately stop schemes that influence voters by giving them financial benefits. What are the schemes that offer financial benefits? This was reviewed again today. Chief Electoral Officer S Chokkalingam has asked all departments about the same. At that time, officials in the Commission pointed out that the ‘Ladki Bahini’ scheme of the Women and Child Welfare Department was providing huge financial benefits. The department sought information on the scheme. The department has informed the commission that it has stopped disbursing funds for the scheme four days ago. The government has decided to stop the election due to the code of conduct.

लाडकी बहिण योजना सरकारनं तुर्तास थांबवली! काय आहे कारण? जाणून घ्या

बहुचर्चित ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना सरकारनं तुर्तास थांबवली आहे. राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने हा निर्णय घेतला आहे. मात्र २ कोटी ३४ लाख महिलांच्या बँक खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा आगाऊ हफ्ता जमा झाला असल्याने निवडणूक आयोगाला लाडक्या बहिणींनी गुंगारा दिला आहे. आता केवळ दहा लाख महिलांच्या खात्यात अद्याप हप्ता आलेला नाही. मतदारांवर आर्थिक लाभ देऊन प्रभाव टाकणाऱ्या योजना ताबडतोब थांबविल्या जाव्यात अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून सर्व प्रशासकीय विभागांना आज पुन्हा देण्यात आल्या आहेत. आर्थिक लाभ देणाऱ्या कोणत्या योजना आहेत? याचा आज पुन्हा आढावा घेण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सर्व विभागांकडे याबाबतची विचारणा केली आहे. त्यावेळी महिला व बालकल्याण विभागाची ‘लाडकी बहिण’ योजना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ देत असल्याकडे आयोगातील अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. विभागाकडून या योजनेची माहिती मागवण्यात आली. विभागाने या योजनेसाठीचे निधी वितरण चार दिवसांपूर्वी थांबविल्याची माहिती आयोगाला दिली आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तुर्तास थांबविण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

  • सरकारने अशी घेतली काळजी – या महिन्याच्या १५ तारखेपर्यंत जेव्हा लाडकी बहीणसाठी निधी वितरित झाला तेव्हा किमान दोन हफ्ते तरी तिच्या खात्यावर जमा होतील याची काळजी महायुती सरकारने घेतली आहे त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलेला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. काही महिलांच्या खात्यावर चार ते पाच महिन्यांचे पैसे एकाचवेळी जमा झाले आहेत. २ कोटी ३४ लाख महिलांच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता जमा झाला आहे. वेळेअभावी १० लाख महिलांच्या खात्यावर मात्र पैसे जमा होवू शकले नसल्याची माहिती विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
  • ‘योजनादूत’ देखील थांबविली – राज्य सरकारच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी दर महिन्याला दहा हजार रुपयांच्या मानधनावर नियुक्त करण्यात आलेल्या योजनादूतांच्या नियुक्तीला माहिती व प्रसारण विभागाने स्थगित केले आहे. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेत ‘योजनादूत’ तातडीने बंद करावी अशी मागणी केली होती. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खा. अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ. जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
  • महाविकास आघाडीचा आक्षेप – महाविकास आघाडीने ‘योजनादूत’वर आक्षेप घेतल्यानंतर मुख्य निवडणूक कार्यालयाने माहिती व प्रसारण विभागाकडून या योजनेची संपूर्ण माहिती मागविली. या योजनेतून थेट आर्थिक लाभ दिला जात असल्याने ही योजना तुर्तास थांबविण्याची तयारी विभागाने दर्शविली आहे.
    ‘भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता कालावधीत कोणत्याही शासकीय योजनांची प्रचार अन् प्रसिद्धी करता येत नाही. त्यामुळे आचारसंहिता सुरू असेपर्यंत योजनादूतांमार्फत कोणत्याही प्रकारचे प्रचार प्रसिद्धीचे काम करण्यात येणार नाही. सद्यःस्थितीत योजनादूतांमार्फत प्रचार प्रसिद्धीचे कोणतेही काम नसल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक मोबदला दिला जाणार नाही. यासंदर्भात जिल्हास्तरीय अंमलबजावणी यंत्रणांनाही सूचना देण्यात आल्या आहे.’ असे स्पष्टीकरण विभागाने दिले आहे.

Chief Minister Mazi Ladki Bahin Yojana | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Required documents list, apply link given here – The state government has announced a special gift for Diwali to the women who are beneficiaries of the Ladki Sister Scheme. But there will be certain conditions. The government has said that a bonus of Rs 3000 will be given to all eligible women of the scheme on the occasion of Diwali festival. This amount will be deducted from the regular monthly payment. An additional amount of Rs 2,500 will also be given to a select few women. In this way, some women will get a total benefit of Rs 5500 (3000+2500). The government has said that in addition to the bonus of Rs 3000, an additional amount of Rs 2500 will also be given to select women.

This additional benefit will be available to the following women’s classes:

  • Disabled women
  • Single mothers
  • Unemployed women
  • Women below the poverty line
  • Women in tribal areas
  • Women in this category will get a total benefit of Rs 5500 (3000+2500). This will help them in celebrating Diwali.

लाडक्या बहिणींना महायुती सरकारकडून 5500 रुपयांचा बोनस

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिवाळीसाठी एक खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. पण यासाठी काही अटी असतील. सरकारने म्हटलंय की, दिवाळीच्या सणानिमित्त योजनेच्या सर्व पात्र महिलांना 3000 रुपयांचं बोनस दिलं जाईल. ही रक्कम महिन्याला नियमित मिळणारे पैसे वगळून दिली जाईल. काही निवडक महिलांना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही दिली जाईल. याप्रकारे काही महिलांना एकूण 5500 (3000+2500) रुपयांचा लाभ मिळणार आहे.

Term & Conditions to get Extra 2500 Bonus…तरच मिळणार लाभ

  • कोणत्या महिलांना 2500 रुपये मिळतील?
    • सरकारने म्हटले आहे की 3000 रुपयांच्या बोनसशिवाय काही निवडक महिलांना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कम देखील दिली जाईल. हा अतिरिक्त लाभ खालील महिला वर्गासाठी उपलब्ध असेल:
    • अपंग महिला
    • एकल माता
    • बेरोजगार महिला
    • दारिद्र्यरेषेखालील महिला
    • आदिवासी भागातील महिला
    • या श्रेणीतील महिलांना एकूण 5500 रुपये (3000+2500) चा लाभ मिळेल. यामुळे त्यांना दिवाळी साजरी करण्यात अतिरिक्त मदत मिळेल.
  • कोणत्या महिलांना 3000 रुपये मिळतील?
  • दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच मिळणार आहे. यासाठी या अटी पूर्ण कराव्या लागतील.
  • महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
  • त्यांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
  • त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
  • ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.
  • या अटी पूर्ण केलेल्या सर्व महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळेल. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेंतर्गत आतापर्यंत अनेक महिलांना 3000 रुपये मिळाले आहेत. मात्र, 30 सप्टेंबरपूर्वी अर्ज करूनही अनेक महिलांच्या बँक खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत. अर्ज मंजूर होऊनही या महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही.
  • बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक न झाल्याने आणि अर्जातील इतर त्रुटींमुळे महिलांना त्याचा लाभ मिळू शकला नाही. त्यामुळे वरील सर्व त्रुटी दूर केलेल्या महिलांना आता तिसऱ्या टप्प्यात 4500 रुपये मिळणार आहेत.

Chief Minister Mazi Ladki Bahin Yojana | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Required documents list, apply link given here –   The Chief Minister Mazi Ladki Bahin scheme, the most ambitious scheme of the Grand Alliance government, will be extended once again. The extension has been extended to extend the benefits to women who have not availed the benefits of the scheme so far.  Women in Maharashtra have now been given a new deadline of October 15, 2024 to apply under the Mukhyamantri Mazi Ladki Bahin Scheme. Earlier, the deadline to apply for the scheme was till september-end. Applications can now be made till 12 pm on October 15, 2024. However, these applications will have to be filled only through anganwadi workers. Candidates keep visit on our website www. govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा एक संधी, आता या तारखेपर्यंत दिली मुदतवाढ, फक्त ही अट असणार

महायुती सरकारची सर्वात महत्वकांक्षी योजना असलेल्या “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत ज्या महिलांना मिळाला नाही, त्यांच्यापर्यंत लाभ पोहचवण्यासाठी ही मुदतवाढ देणात आली आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • आता महाराष्ट्रातील महिलांना मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 ही नवीन मुदत दिली आहे. यापूर्वी या योजनेत अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत होती. आता 15 ऑक्टोबर 2024 रात्री बारा वाजेपर्यंत या योजनेत अर्ज करता येणार आहे. मात्र हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच भरावे लागणार आहे.
  • महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत ग्रामीण भागापासून शहरापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला होता. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. त्यामुळे सरकारने अ‍ॅप आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात केली होती. परंतु आता जी मुदतवाढ दिली आहे. परंतु ऑनलाईन पद्धतीने किंवा अ‍ॅपने अर्ज करता येणार नाही. आता फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज करावा लागणार आहे.
  • तिसऱ्यांदा वाढवली मुदत  – लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी आधी १ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत मुदत दिली होती. परंतु त्यानंतर ती वाढवून ३१ ऑगस्ट केली. त्यानंतर पुन्हा एकदा मुदत वाढवून ३० सप्टेंबर केली. आता तिसऱ्यांदा मुदत वाढवते १५ ऑक्टोंबर करण्यात आली आहे.

Chief Minister Mazi Ladki Bahin Yojana | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Required documents list, apply link given here. The eligible beneficiaries of the Ladki Bahini Scheme have received the money for the months of July and August. Now, the eligible women of the scheme are waiting for the next September money. Meanwhile, a major update has come out through the government in this regard. According to reports, the third installment of the ladki bahini scheme will be credited to the bank accounts of eligible women on September 29. Women who applied in September will receive only September payments. Also, those who have already received the money for the previous two months will also get the money for September only. In such a situation, a big news has come out from Solapur district.

लाडकी बहिण योजनेच्या नियमांमुळे ‘या’ महिलांना पात्र असून सुद्धा पैसे मिळणार नाही

लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळालेले आहेत. आता या योजनेच्या पात्र महिलांच्या माध्यमातून पुढील सप्टेंबर महिन्याच्या पैशांची वाट पाहिली जात आहे. दरम्यान याच संदर्भात सरकारच्या माध्यमातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहिण योजनेचा पुढील हफ्ता म्हणजेच तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.

  • आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू झाली आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
    या योजनेसाठी राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र ठरणार आहेत. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिला याच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत. याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या महिलांना दिला जाणार आहे.
  • तथापि ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिला देखील याच्या लाभासाठी पात्र ठरतील.
  • या योजनेसाठी सुरुवातीला 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार होते, मात्र या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता अन असंख्य महिलांचे अर्ज भरणे बाकी असल्याने अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. राज्यातील असंख्य महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळालेले आहेत.
  • दरम्यान आता या योजनेचा तिसरा हप्ता देखील 29 सप्टेंबरला पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधी अर्ज केले आहे आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे 4500 रुपये दिले जाणार आहेत.
  • मात्र ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये अर्ज केला आहे त्या महिलांना फक्त सप्टेंबर चे पैसे मिळणार आहेत. तसेच ज्यांना आधीचं दोन महिन्यांचे पैसे मिळाले आहेत त्यांनाही फक्त सप्टेंबरचेचं पैसे मिळणार आहेत. अशातच मात्र सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
  • सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ३६ हजार महिलांच्या बँक खात्याला आधारलिंक नाही. त्यांना आता बँक खात्याशी आधारलिंक केल्याशिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • २९ सप्टेंबरपूर्वी संबंधित बँकेत जाऊन त्या अर्जदार महिलांना खात्याला आधारलिंक करून घ्यावे लागणार आहे. त्यांची यादी राज्यस्तरावरून जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. ज्यांनी योजनेच्या सुरवातीला अर्ज केलाय पण अद्याप लाभ मिळालेला नाही, अशा त्या महिला आहेत.
  • यामुळे जर तुमचेही बँक अकाउंट आधार सोबत लिंक नसेल तर लवकरात लवकर हे काम करून घ्यावे लागणार आहे. अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत.

How to link Ladki Bahin Yojna With Aadhar ? Chief Minister Mazi Ladki Bahin Yojana | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Required documents list, apply link given here – The third installment of the Mukhyamantri Mazri Ladki Bahini Yojana will be given to the beloved sisters from today. So the wait for women is over now. Women whose applications have been approved now? Also, women whose accounts are yet to be deposited for September? Women should start checking their accounts and messages on their mobile phones for three days from today. So that you can be sure that the money has been deposited in your account.

तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली! ‘या’ दिवसापासून 4500 थेट खात्यात येणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तिसऱ्या हप्त्याचा  लाभ आजपासून लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे.आजपासून तीन दिवस महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांची प्रतिक्षा आता संपली आहे. आता ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत? तसेच ज्या महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा निधी जमा व्हायचा बाकी आहे? त्या महिलांनी आजपासून तीन दिवस आपले खाते आणि मोबाईलवरील मेसेज तपासायला सुरूवात करा. जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याची खात्री पटेल.

  1. लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती सुरुवातील समोर आली होती. मात्र या तीन दिवसात महिलांच्या खात्यात पैसेच जमा झाले नव्हते. त्यानंतर आता आजपासून तीन दिवस महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांनी आता खाते तपासायला सुरूवात करा. पण सध्या अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत? काहींना वाटतेय फक्त 1500 रूपये तर काहींना वाटतंय,4500 जमा होतील? त्यामुळे नेमक्या कोणत्या महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात.
  2. आता ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते. त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी म्हणून 3000 रूपये जमा झाले होते. या योजनेत दरमहा 1500 रूपये दिले जातात. पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये देण्यात आले होते. आता ऑगस्टपर्यंतचा निधी या महिलांना मिळाला होता. आता उरला फक्त चालू असलेला सप्टेंबर महिना आहे. त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये जमा होणार आहेत.
  3. मग 3500 कुणाला मिळणार? – ज्या महिलांना 31 जुलैआधी अर्ज भरता आले नव्हते. तसेच अर्ज भरून देखील मंजूर झाले नव्हते. अशा महिलांच्या खात्यात हे 4500 जमा होणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे पैसे हे जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात एकही रूपया आला नाही आहे, अशा महिलांच्या खात्यात 4500 जमा होणार आहे.
  4. ज्या महिन्यात अर्ज त्याच महिन्यात लाभ – ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे. आतापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसऱ्या महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा. मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाऊंटला डिबीटी करणार आहोत,असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
  5. ‘इतक्या’ महिला ठरल्या लाभार्थी – ”मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
  6. ”सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जांची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा”, असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

How to link Ladki Bahin Yojna With Aadhar ? Chief Minister Mazi Ladki Bahin Yojana | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Required documents list, apply link given here – After applying for the scheme for my Ladki Bahin Yojana, the first installment of Rs 3,000 has been transferred to the bank account of the beneficiary women from August 14, 2024, but still many women’s applications are being accepted for this scheme in the state. If your beloved sister scheme form has also been accepted but you have not received the first installment under the scheme, then it is mandatory to link the beloved sister scheme with Aadhaar first.

माझी लाडकी बहीण योजने पैसे मिळाले नाही तर करा ‘या’ गोष्टी, लगेच मिळतील 3000 रु.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल पण तुम्हाला योजनेअंतर्गत 3000 रुपये मिळाले नसतील तर काही गोष्टी झटपट करणं हे महत्त्वाचं आहे. कारण त्यानंतरच तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणे सुरू होईल.  या योजनेच्या अंमलबजावणीनंतर महिलांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, त्याअंतर्गत महिला नारीशक्ती दूत ॲप आणि योजनेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात, याशिवाय राज्य सरकारद्वारे ऑफलाइन माध्यमातून अर्ज महिलांना अर्ज करता येणार आहे. ज्यासाठी फॉर्मही जारी केले आहेत.

योजनेसाठी अर्ज केल्यानंतर महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले असून, या योजनेंतर्गत 14 ऑगस्ट 2024 पासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपयांचा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे, मात्र तरीही राज्यात अनेक या योजनेसाठी महिलांचे अर्ज स्वीकारले जात असताना त्यांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळालेला नाही. जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म देखील स्वीकारला गेला असेल परंतु तुम्हाला योजनेअंतर्गत पहिला हप्ता मिळाला नसेल, तर सगळ्यात आधी तुम्हाला लाडकी बहीण योजना आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे.

Ladki Bahin Yojana Aadhar Link

  • जर तुम्हालाही लाडकी बहीन योजनेअंतर्गत पहिला हप्ता मिळाला नसेल, तर सगळ्यात आधी आपण आधार लिंक लवकर करून घ्या, जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला डीबीटीद्वारे पैसे मिळू शकत नाहीत आणि हेच कारण आहे.
  • माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुमचा अर्ज स्वीकारला गेला असेल आणि तुम्हाला योजनेअंतर्गत पहिला हप्ता मिळाला असेल तर आता तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. येत्या 15 तारखेला तुमच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे पुन्हा पैसे जमा केले जातील .
  • पण जर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाला नसेल, तर तुम्हाला लवकरात लवकर लाडकी बहीण योजना आधार लिंक करावं लागेल. यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करावे लागेल. येत्या 15 तारखेला तुम्हाला योजनेअंतर्गत 4500 रुपयांचा तीन महिन्यांचा हप्ता दिला जाईल.
  • आता तुम्ही घरबसल्या तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करू शकता, यासाठी तुम्हाला UPI च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आणि खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, त्यानंतर तुम्ही तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक देखील करू शकता.

How to link Ladki Bahin Yojna With Aadhar माझी लाडकी बहीण योजना आधार लिंक कसं करावं?

  • सर्व प्रथम तुम्हाला www.npci.org.in या वेबसाइटवर जावे लागेल आणि नंतर ग्राहक (consumer) पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, येथे तुम्हाला भारत आधार सीडिंग एनेबल (Bharat Aadhaar Seeding Enabler) म्हणजेच बेस (BASE) पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्या समोर आधार सीडिंग फॉर्म उघडेल, येथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल आणि तुमचे बँक खाते असलेल्या बँकेची निवड करावी लागेल.
  • बँक निवडल्यानंतर, तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक टाकावा लागेल आणि कॅप्चा
  • टाकून पुढे जा बटणावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, येथे तुमच्या आधार कार्डसोबत नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP पाठवला जाईल, तुम्हाला तो OTP टाकावा लागेल आणि सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आधार कार्ड पडताळणीनंतर आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केले जाईल.
  • अशा प्रकारे तुम्ही माझी लाडकी बहीण योजना आधार लिंक करू शकता.

Chief Minister Mazi Ladki Bahin Yojana | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Required documents list, apply link given here – Under the Chief Minister’s Dear Sister Scheme, a total of Rs 3,000 has been deposited in the accounts of women for the two months of July and August. When will women get the benefit in the second phase? That’s the question dear sisters are asking. Meanwhile, the big news in this regard has now come out. The government has now given the exact date when the benefits of the second phase will be given to women.

This has brought great relief to the women. Women whose applications have been approved before July 31 under the Beloved Sister Scheme. The money for July and August has been deposited in the accounts of the women. Therefore, the amount for the month of September will be deposited in the account of these women. and women whose applications have been approved after July 31. The money will be deposited in their account for three months – July, August and September. Now, when exactly is this money going to be deposited? Let’s find out. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये जमा झाले आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात महिलांना लाभ कधी मिळणार? असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे. असे असतानाच आता या संदर्भातली मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने आता दुसऱ्या टप्प्यातील लाभ महिलांना कधी दिला जाणार आहे, याची नेमकी तारीख सांगितली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाडकी बहिण योजनेत ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैआधी मंजूर झाले आहेत. त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याची रक्कम जमा होणार आहे. आणि ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैनंतर मंजूर झाले आहेत. त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे जमा होणार आहे. आता हे पैसे नेमके कधी जमा होणार आहेत. हे जाणून घेऊयात. 

  • दुसऱ्या टप्प्यात लाभ कधी मिळणार? – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत. त्याचा निधी 31 ऑगस्टपासून वितरीत होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
  • तसेच 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरावर पडताळणी सूरू आहे. जिल्हास्तरावर मान्यता प्राप्त अर्जाचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँककडे पाठवली जाणार आहेत.ही सगळी प्रक्रिया युद्ध पातळीवर सूरू असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी एक्सवर दिली होती.
  • त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची पडताळणी युद्धपातळीवर सूरू झाली आहे. या काळात महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येणार आहेत. या मेसेजनंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का? याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
  • दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरु आहे. 31 जुलै पर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. 31 जुलैनंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरु आहे. आत्तापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी 2 कोटी 6 लाख 14 हजार 990 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 1 कोटी 47 लाख 42 हजार 476 अर्ज पात्र ठरले आहेत. तर 42 हजार 823 अर्जाची पडताळणी सुरु आहे.

Chief Minister Mazi Ladki Bahin Yojana | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Required documents list, apply link given here –  Mukhyamantri Majhi Ladki Bahin Schme is currently in the news across the state. Under this scheme, eligible women will be given Rs 1500 per month. Women have started getting direct benefits under this scheme. Many women have received Rs 3,000 in their accounts for the months of July and August. Meanwhile, the state government has taken an important decision in view of the increasing response of women to the scheme.

The last date to apply for the scheme was August 31. That’s why what will happen to women who can’t apply by Aug. 31? That was the question being asked. Women and Child Development Minister Aditi Tatkare has now clarified on this. The deadline of August 31 is not the deadline for the Chief Minister’s Dear Sister Scheme. The application process for the scheme will continue. Therefore, the applications of women who apply after August 31 will also be accepted. Tatkare had made it clear on August 11 that eligible women who have applied after August 31 will be given the honorarium fund under this scheme.

लाडक्या बहीणींना आणखी एक खुशखबर, अर्जाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; लाखो महिलांना होणार फायदा!

सध्या राज्यभरात चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठी 3000 रुपये आले आहेत. दरम्यान, या योजनेसाठी महिलांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  1. 17 ऑगस्टपर्यंत सन्मान निधी मिळणार – राज्य सरकारकडून महिलांनी केलेल्या अर्जांची युद्धपातळीवर तपासणी केली जात आहे. महिलांच्या अर्जांची छननी करून संबंधित महिला पात्र आहे की नाही, हे ठरवले जात आहे. 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात सरकारने 3000 रुपये टाकले आहेत. अजूनही 17 ऑगस्टपर्यंत महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळणार आहे.
  2. आतापर्यंत 80 लाख महिलांना लाभ – राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने आतापर्यंत 80 लाख महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी वितरित केला आहे. 14 ऑगस्टच्या रात्री साधारण 32 लाख पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ देण्यात आला. तर स्वातंत्र्यदिनी पहाटे 4 वाजता 48 लाख महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले. म्हणजेच सरकारने आतापर्यंत एकूण 80 लाख पात्र महिलांना या योजनेअंतर्गत पैसे पाठवले आहेत. सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
  3. आता 31 ऑगस्टनंतरही अर्ज करता येणार – या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळेच 31 ऑगस्टपर्यंत अर्ज न करू शकणाऱ्या महिलांचे काय होणार? असा प्रश्न विचारला जात होता. यावरच आता महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट़ पर्यंतची मुदत ही अंतिम नाही. या योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया ही निरंतर चालणार आहे. त्यामुळे 31 ऑगस्टनंतर ज्या महिला अर्ज करतील त्यांचेही अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. 31 ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या पात्र महिलांनी या योजनेअंतर्गत सन्मान निधी दिला जाईल, असे तटकरे यांनी 11 ऑगस्ट रोजीच स्पष्ट केलेले आहे.

Chief Minister Mazi Ladki Bahin Yojana | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Required documents list, apply link given here. The Chief Minister’s Dear Sister Scheme has started across the state. Women from across the state have gathered to file applications to avail the benefits of the scheme. Therefore, in view of this rush, the state government has decided to extend the deadline for filling the application form for the Chief Minister’s Dear Sister Scheme. Not only this, some conditions related to this scheme have also been relaxed. So under these new conditions, let’s know the information about who will be the beneficiaries of the Mukhyamantri Majhi Ladki Bahin  Scheme and what documents they need etc., given briefly here.

गुड न्यूज ! लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, असे शोधा नाव..!

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करताय? पण ‘ही’ अट तुम्ही करताय का पूर्ण?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला तिच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार म्हणजेच वर्षाला १८ हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेची घोषणा झाल्यानंतर महिलांनी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी केलीये. ही गर्दी लक्षात घेता काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या योजनेसंदर्भात एक बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटींमध्ये काही बदल करण्यात आलेत. आता हे बदल नेमके कोणते ते बघूया. राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सुरुवात सुरुवात झाली आहे. राज्यभरातील महिलांनी या योजनेचा लाभ मिळवण्याकरिता अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी केलीये. त्यामुळे ही गर्दी लक्षात घेता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. एवढंच नाही तर या योजनेसंबंधीच्या काही अटीही शिथिल करण्यात आल्या आहेत. तर या नवीन अटींनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी कोण असतील आणि त्यांना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

New Rules Chief Minister Mazi Ladki Bahin Scheme

  1. तर पहिला बदल म्हणजे, या योजनेची घोषणा झाल्यानंतर अर्ज करण्याची मुदत १ जुलै ते १५ जुलै ठेवण्यात आली होती. परंतू, आता यात सुधारणा करुन अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलीये. विशेष म्हणजे ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना १ जुलैपासून दरमहा दीड हजार रुपये मिळणं सुरु होईल.
  2. या योजनेच्या अटींमधील दुसरा बदल म्हणजे सुरुवातीला राज्यातील २१ ते ६० वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला या योजनेच्या लाभार्थी असतील, अशी घोषणा करण्यात आली होती. परंतू, आता लाभार्थी महिलांच्या वयाची अट वाढवण्यात आलीये. यानुसार आता २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  3. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील तिसरी महत्वाची अट म्हणजे अर्ज भरताना लाभार्थी महिलेला महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र आवश्यक होतं. पण आता या अधिवास प्रमाणपत्राची अटही शिथिल करण्यात आलीये. जर अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यापैकी कोणतेही प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे.
  4. या योजनेची चौथी अट होती, ती म्हणजे ज्या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, अशा कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र, आता ५ एकर शेतीची अटही मागे घेण्यात आलीये. याशिवाय अर्ज भरतेवेळी अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येणारे.
  5. तसेच जर परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
  6. विशेष म्हणजे कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणारे.
  7. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन अटींनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागणार?
  8. तर सर्वात आधी लाभार्थी महिलेचं आधारकार्ड असावं.
  9. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच रहिवाशी प्रमाणपत्र असावं. पण समजा जर तुमच्याकडे हे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यापैकी कोणतेही प्रमाणपत्र चालेल.
  10. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडीच लाखांच्या उत्पन्नाची अट आहे. त्यासाठी लाभार्थी महिलेच्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. परंतू, जर उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येईल.
  11. यासोबतच पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो, रेशनकार्ड आणि सदर योजनेच्या अटीशर्तींचे पालन करण्याबाबत हमीपत्र ही सगळी कागदपत्रे अर्ज भरताना आवश्यक आहेत.
  12. आता तुम्ही अर्ज कसा करणार? तर पात्र महिलांना या योजनेसाठी पोर्टल किंवा मोबाइल अॅपद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
  13. समजा जर एखाद्या महिलेला ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर अंगणवाडी केंद्र किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये जसं ग्रामपंचायत, सेतु सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल.
  14. अर्ज भरताना लाभार्थी महिलेने स्वत: उपस्थित राहणं आवश्यक आहे. मुख्य म्हणजे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. महत्वाचं म्हणजे अर्ज दाखल केल्यानंतर त्याची पोचपावती घ्यायला विसरु नका.

OFFICIAL WEBSITE


Under the ‘Chief Minister My Dear Sister’ scheme, beneficiary women can now apply till August 31. Earlier, the deadline was Till July 15. Earlier, domicile certificates were mandatory. Now, if the beneficiary woman does not have this certificate, then any one of the four identity cards / certificates of ration card, voter ID card, school leaving certificate, birth certificate of 15 years will be accepted instead. The scheme excludes the requirement of five acres of land.
If an income certificate of Rs 2.5 lakh is not available, then the family who has yellow and orange ration card has been exempted from the income certificate certificate. Chief Minister Eknath Shinde on Tuesday announced in the State Assembly that the age limit of 60 years for the Chief Minister’s Beloved Sister Scheme will be increased to 65 years.

लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा आता ६० वरून ६५ वर्षे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची ६० वर्षांची वयोमर्यादा ६५ वर्षे करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केली. योजनेच्या पात्रता अटीतून जमिनीची अट रद्द केल्याचेही त्यांनी जाहीर केले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महायुतीच्या आम्हा भावंडांकडून महाराष्ट्रातील माता- भगिनींना हा माहेरचा अहेर दिलाय, तो नियमित देत राहणार आहोत, असे शिंदे यांनी सांगितले.

  • उद्योग व सेवाक्षेत्रात महाराष्ट्र अव्वल : देशाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा १४ टक्के आहे. परदेशी गुंतवणुकीत देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. उद्योगात आणि सेवा क्षेत्रात राज्य क्रमांक एकवर आहे. राज्याचे स्थूल उत्पन्न ४० लाख ५० हजार लाख कोटी इतके आहे. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न २ लाख ७७ हजार ६३० इतके आहे.
  • या योजनेत लाभार्थी महिलांना आता ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल. आधी ही मुदत १५ जुलैपर्यंत होती.
  • आधी अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य होते. आता लाभार्थी महिलेकडे हे प्रमाणपत्र नसल्यास त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र / प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
  • अडीच लाख रुपयांचा उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली आहे.

नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज नाही

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासननिर्णयही लगेचच काढला. या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. यासाठी ४६ हजार कोटी रुपये तरतूद केली आहे.
  • अंमलबजावणी त्वरित व व्यवस्थित व्हावी म्हणून सध्याचा बीपीएलचा जो डेटाबेस आहे त्याचा उपयोग करण्यास सांगितले आहे. यामुळे नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही.

Chief Minister Mazi Ladki Bahin Yojana | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Required documents list, apply link given here – The Grand Alliance government has opened the state’s coffers to appease women in the state, which has 50 per cent voters, ahead of the assembly elections. Finance Minister Ajit Pawar announced several popular schemes for women in the budget presented in the Assembly on Friday. Ajit Pawar said that these schemes have been announced for the all-round development of women including economic freedom and self-reliance, health and nutrition. Candidates keep visit on our website www. govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरतांना ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजना : महिन्याला १५०० रुपये; अंमलबजावणी जुलै २०२४ पासून

विधानसभा निवडणुकीपूर्वी ५० टक्के मतदार असलेल्या राज्यातील महिलावर्गाला खुश करण्यासाठी महायुती सरकारने राज्याची तिजोरी खुली केली आहे. वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजना जाहीर करण्यात आल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Eligibility for Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

  • In Madhya Pradesh, the ‘Ladli Bahena’ scheme for women announced by the then Chief Minister Shivraj Singh Chouhan before the assembly elections had benefited the BJP in the elections. On the same lines, the ‘Mukhyamantri Meri Ladki Bahini Yojana’ has been announced in the budget.
  • Under this scheme, the government will provide Rs 1,500 per month to eligible women in the age group of 21 to 60 years from economically weaker sections, for which rs 46,000 crore will be provided annually.
  • The ‘Chief Minister My Dear Sister’ scheme will be implemented immediately from next month i.e. from July 2024.
  • To avail the ladki bahini scheme, there is an income requirement of Rs 2.5 lakh per year and this income should be linked to the Aadhaar card.

Where to apply for Ladki Bahin अर्ज भरण्याची सुविधा

  • अंगणवाडी केंद्रात,
  • बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये,
  • ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस,
  • सेतू सुविधा केंद्र व
  • महा- इ- सेवा केंद्रे येथे पात्र महिलांना योजनेचा अर्ज भरता येणार आहे.

Important Dates to apply online Ladki Bahini Yojana अर्ज भरण्याची प्रक्रिया

  • – अर्ज करण्याची सुरुवात : १ जुलै
  • – अर्ज करण्याची शेवट तारीख : १५ जुलै
  • – प्रारूप निवड यादी प्रकाशित : १६ ते २० जुलै
  • – प्रारूप यादीवर हरकत, तक्रार करणे : २१ ते ३० जुलै
  • – लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित : १ ऑगस्ट
  • – लाभ देण्यास सुरुवात : 14 ऑगस्टपासून

Selection Process of Ladki Bahini Yojana

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी उद्यापासून (सोमवारी) अर्ज करता येणार असून त्याचे संकेतस्थळ लाभार्थींना उपलब्ध करून दिले जाईल. प्राप्त अर्जांची पडताळणी अंगणवाडी पर्यवेक्षक, प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका करतील. ग्रामसेवक देखील अर्जांची पडताळणी करू शकतात. त्यांच्याकडील अर्ज आमच्याकडे आल्यावर आम्ही यादी अंतिम करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करू. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थींची अंतिम यादी जाहीर करेल आणि त्यांना लाभ मिळेल.

Applications for the ‘Mukhyamantri Ladki Bahin’ scheme can be made available from tomorrow (Monday) and its website will be made available to the beneficiaries. The applications received will be verified by anganwadi supervisors, project officers, anganwadi workers. Gram sevaks can also verify the applications. Once we get the application from them, we will finalise the list and submit it to the district collector. The committee headed by the district collector will then release the final list of beneficiaries and they will get the benefit.

  • मध्य प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांसाठी जाहीर केलेल्या ‘लाडली बहेना’ योजनेचा फायदा भाजपला निवडणुकीत झाला होता. त्याच धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे.
  • या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार असून, त्यासाठी दरवर्षी ४६ हजार कोटी रुपये निधी उपलब्ध केला जाईल.
  • ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेची अंमलबजावणी पुढील महिन्यापासून लगेच म्हणजे जुलै २०२४ पासून केली जाणार आहे.
  • लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी वर्षाला अडीच लाख रुपये उत्पन्नाची अट असून हे उत्पन्न आधार कार्डशी लिंक हवे.
  • बचत गटाच्या निधीत वाढ राज्यात ६ लाख ४८ हजार महिला बचत गट असून, ही संख्या ७ लाख करण्यात येणार आहे. बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत १५ हजार रुपयांवरून ३० हजार रुपये वाढ करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

मुलींना मोफत उच्चशिक्षण देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषिविषयक सर्व व्यावसायिक उत्पन्न व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी हा निर्णय लागू राहील. ८ लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्कात १०० टक्के प्रतिपूर्ती दिली जाईल. राज्यातील मोफत अंदाजे २ लाख ५ हजार ४९९ मुलींनी याचा लाभ होणार असून यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana महिलांसाठी तिजोरी खुली

  • वर्षाकाठी मिळणार ३ मोफत सिलिंडर
  • पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलिंडर मोफत देण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली.
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असे या योजनेला नाव देण्यात आले आहे.
  • पिवळे व केशरी रेशनकार्ड असलेल्यांनाच वर्षाला तीन मोफत सिलिंडर मिळतील.
  • राज्यातील तब्बल ५२ लाख १६ हजार ४१२ कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे.

पिंक ई-रिक्षा योजना

  • अंतरिम अर्थसंकल्पात महिलांच्या स्वयंरोजगारनिर्मितीसाठी जाहीर केलेल्या ‘पिंक ई-रिक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्यात १७ शहरातील १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसाह्य केले जाणार आहे. या योजनेसाठी ८० हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
  • याबरोबर शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान १० हजार रुपयांवरून वाढवून २५ हजार रुपये करण्यात आले आहे.
  • राज्यातील सर्व आरोग्य केंद्रात स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असून त्यासाठी ७८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद घोषित करण्यात आली आहे.

Ladki Bahini Yojana:  – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास ‘या’ 15 दिवसांचीच मुदत! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?

Which women will be eligible? कोणत्या महिला असणार पात्र?

  • – महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक
  • – विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला
  • – वयाची किमान २१ वर्ष पूर्ण व कमाल ६० वर्ष मर्यादा
  • – अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्‍यक
  • – अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे
  • – अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल
  • – ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल, अशा महिला.

Required Documents for Ladki Bahin Yojana ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक

  • – ऑनलाइन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा
  • – आधार कार्ड आवश्‍यक
  • – राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला
  • – बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
  • – पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड
  • – योजनेच्या अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
  • – अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्‍यक

Important Link Complete Details in PDF

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणयोजनेचा पूर्ण शासन निर्णय (GR) येथे पहा

Download Narishakti Doot App For Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरतांना ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक

कुटंबातील किती महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ..! 

लाडकी बहीण योजनेचा आॕनलाईन अर्ज अश्या प्रकारे भरा?


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!