चंद्रपूर जिल्हा बँकेचे शिपाई व लिपिक नोकर भरतीसाठी आजपासून मुलाखत – CDCC Bank Bharti 2024

Chandrapur Madhyavarti Sahakari Bank Bharti 2024

CDCC Bank Bharti 2024 Walk in interview Dates Declared – Chandrapur District Central Co-operative Bank has declared the result of the online examination in the controversial recruitment process. A total of 291 qualified candidates have been called for interview for 97 posts of constables from Monday, January 13 to 15. Interestingly, the online exam was conducted at nine examination centres in the state namely Pune, Nashik, Sambhajinagar, Jalna, Nagpur and Amravati. However, out of all these centres, 99 per cent of the candidates from Chandrapur district have been called for the interview .

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Chandrapur District Central Co-operative Bank conducted the recruitment process for the post of Clerk 261. As many as 18,876 applications were received from across the state. However, 11,416 applicants turned their backs on the exam. Only 7,450 examinees appeared for the exam. The eligible list of these examinees has not been released. However, his interview schedule has been scheduled for January 16-23. It is being said that the list of eligible candidates will be announced soon.

चंद्रपूर जिल्हा बँकेची शिपाई व लिपिक नोकर भरती आजपासून मुलाखत

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील वादग्रस्त नोकर भरतीत ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये शिपाईच्या ९७ पदांसाठी २९१ उत्तीर्ण परीक्षार्थीना सोमवार १३ ते १५ जानेवारी या कालावधीत मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्यातील पुणे, नाशिक, संभाजीनगर, जालना, नागपूर, अमरावती अशा ९ परीक्षा केंद्रावर ही ऑनलाईन परीक्षा झाली. मात्र या सर्व केंद्रपैकी चंद्रपूर मधील ९९ टक्के परीक्षार्थी मुलाखतीला बोलवले आहे .

बँकेने लिपीकपदाच्या १६ जानेवारीपासून मुलाखती – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून लिपिक २६१ या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. सुमारे १८ हजार ८७६ अर्ज राज्यभरातून या पदासाठी करण्यात आले. मात्र, ११ हजार ४१६ अर्जदारांनी परीक्षेकडे पाठ फिरवली. केवळ ७ हजार ४५० परिक्षार्थ्यांनी परीक्षा दिली. या परिक्षार्थ्यांची पात्र यादी लावण्यात आलेली नाही. मात्र, त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम १६ ते २३ जानेवारी हा ठरविण्यात आला आहे. यामुळे लवकरच पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असे बोलले जात आहे.

  • चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पदभरती अगदी पहिल्या पासूनच वादात सापडली आहे. शिपाई व लिपिक पदाला मंजुरी मिळाल्या पासून सुरू झालेला वाद ऑनलाईन परीक्षेच्या दिवसांपर्यंत सुरू होता. अखेर, सर्व अडथळे पार करीत शिपाई पदाच्या पात्र परिक्षार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. २९१ पात्र परीक्षार्थ्यांना मुलाखतीचे पत्र पाठविण्यात आले आहे. १३ ते १५ जानेवारी या कालावधीत मुलाखतीची प्रक्रिया पार पडणार आहे. लिपिक पदाची यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
  • बँकेकडून लिपिक २६१ आणि शिपाई ९७ अशा ३५८ पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आयटीआय लि. कंपनीला पदभरतीचे कंत्राट देण्यात आले. या कंपनीने पुणे, नागपूर, अमरावती,चंद्रपूर, गोंदिया, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा एकूण नऊ या जिल्ह्यात या परीक्षेचे केंद्र ठेवले होते. त्यामुळे आधीच प्रशिक्षणार्थ्यांत संताप व्यक्त होत होता. परीक्षेच्या दिवशी ऑनलाईन परीक्षते गोंधळ उडाल्याने परीक्षार्थींचा संतापाचा उद्रेक झाला. शेवटी शिपाई पदाची पहिल्या दिवशीची परीक्षा रद्द केली होती. काही ठिकाणी तोडफोडीच्या घटनासुद्धा घडल्या. यानंतर संबंधित कंपनीने शिपाई पदासाठी २९ डिसेंबर रोजी शिपाई पदाच्या परीक्षा आटोपल्या.
  • ९७ शिपाई पदासाठी राज्यभरातून १२ हजार २८० अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील ३ हजार ७८४ परिक्षार्थ्यांनी परीक्षा दिली. तर, ८ हजार ८९५ अर्जदार अनुपस्थित होते. आता परीक्षा दिलेल्या परिक्षार्थ्यांतून २९१ परीक्षार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले. सोमवार १३ ते १५ जानेवारी या काळात मुलाखतीचा कार्यक्रम बँकेने जाहीर केला आहे. यानंतर नियुक्ती दिली जाणार आहे. मात्र ज्या परीक्षार्थीना मुलाखतीला बोलावले आहे त्यात ९९ टक्के चंद्रपूरचे आहेत. त्यामुळे पुणे, नाशिक मधील परीक्षार्थी इतके ढब्बू व चंद्रपूरचे हुशार कसे असाही प्रस्न पडला आहे.
  • भद्रावतीत संचालकांची बैठक – उद्यापासून शिपाई पदासाठी मुलाखती होत असताना भद्रावती येथील बँकेच्या एका संचालकाच्या घरी बँकेच्या सर्व संचालकांची बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्याच्या मुलाखतीसाठी व कोणत्या उमेदवाराची निवड मुलाखतीत करायची यासाठी ही बैठक असल्याचे सांगण्यात येत आहे.

CDCC Interview Date


CDCC Bank Bharti 2024 Answer key available now.चंद्रपूर जिल्हा बँकेच्या लिपिक व शिपाई पदांच्या भरती परीक्षेची आन्सर कि उपलब्ध –

CDCC Bank Bharti Results


CDCC Bank Bharti 2024 Exam Date, admit card downloadChandrapur District Central Co-operative Bank has conducted a written examination on 29th December 2024 for the recruitment of 97 vacant posts for the post of “Peon” through online mode. This is to inform you that the Recruitment Examination for the post of Peon, which was previously scheduled and cancelled on 21st December 2024, has been rescheduled. The new examination date is scheduled on 29th December 2024. Admit cards shall be released on 25th December 2024

Important Instructions:

  1. The examination will be conducted bilingually in English and Marathi.
  2. The examination of Clerk Position will be of Graduation Lever and the examination for the post of peon will be at SSC (10th ) Level
  3. The examination paper pattern for Clerk and Peon positions will be as follows:
  4. Exam Pattern:
    1. Total Questions :90
    2. Duration :120 min
    3. Total Marks 90

Admit Card Download


CDCC Bank Bharti 2024 Scam -The online examination for 97 constable posts in the Chandrapur District Central Co-operative Bank was held on Saturday. It was cancelled due to a technical snag. MLA Kishore Jorgewar has complained of huge irregularities in the recruitment process and examination. Praveen Singh, ODS of Delhi-based ITI Limited Company, was contacted over the phone and enquired about the technical snag. However, as they could not get a satisfactory answer, the examinees suspected that it was a case of ‘hacking’. The examinees alleged that all this was done only for the students who were guaranteed to pass the exam.

चंद्रपूर जिल्हा बँकेची ऑनलाइन परीक्षा वादात, परीक्षार्थ्यांना ‘हॅकिंग’चा संशय

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ९७ शिपाई पदांसाठी ऑनलाइन परीक्षा शनिवारी झाली. तांत्रिक बिघाडामुळे ती रद्द करण्यात आली. आमदार किशोर जोरगेवार यांनी या भरती प्रक्रियेत व परीक्षेत मोठा घोळ सुरू असल्याची तक्रार केली आहे. दिल्ली येथील आयटीआय लिमिटेड कंपनीचे ओडीएस प्रवीण सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत तांत्रिक बिघाडाची माहिती घेतली. मात्र, समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने परीक्षार्थ्यांनी हा ‘हॅकिंग’चा प्रकार आहे, असा संशय व्यक्त केला. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण करून देण्याची हमी देण्यात आली, त्यांच्यासाठीच हा सर्व प्रकार गेला गेला, असा आरोप परीक्षार्थ्यांकडून केला जात आहे.

  • चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकरी भरती प्रक्रिया सुरू आहे. शनिवारी शिपाई पदासाठीची परीक्षा तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली, तर रविवारी लिपिक पदासाठीची परीक्षा झाली. मात्र, सदर परीक्षा विदर्भातील लगतच्या जिल्ह्यांमध्ये न घेता पुणे, नाशिक या दूरच्या जिल्ह्यांमध्ये घेतली गेली. त्यामुळे उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या भरती प्रक्रियेत मोठा आर्थिक व्यवहार म्हणजे प्रत्येक जागेसाठी ४० लाख रूपये घेतल्या गेल्याचा आरोप आमदार जोरगेवार यांनी केला आहे. प्रक्रियेबाबत अनेक उमेदवारांच्या मनात शंका आहेत. शनिवारी ऑनलाइन पेपर सोडवताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. प्रश्नाचे उत्तर लिहिल्यानंतर ते सेव्ह करताच लिहिलेले उत्तर बदलत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. याची दखल घेत अर्ध्या तासांनी पेपर रद्द करून परीक्षा दोन दिवस पुढे ढकलण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
  • आमदार जोरगेवार यांनी वरिष्ठ अधिकारी आणि परीक्षा घेणाऱ्या दिल्लीतील आयटीआय लिमिटेड कंपनीचे ओडीएस प्रवीण सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत तांत्रिक बिघाडाची माहिती जाणून घेतली. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे सांगत आमदार जोरगेवार यांनी शंका उपस्थित केली. ही परीक्षा स्थानिक केंद्रावरच घेण्यात यावी. पुन्हा परजिल्ह्यात केंद्र देऊन परीक्षार्थ्यांवर आर्थिक भुर्दंड लादू नये, अशा सूचना आमदार जोरगेवार यांनी केल्या. सदर कंपनी व्यवस्थापनानेही आता पुढील परीक्षा स्थानिक केंद्रावर घेण्याचे मान्य केले आहे.
    सखोल चौकशीची मागणी
  • शनिवारी शिपाई पदासाठी झालेल्या परीक्षेतील तांत्रिक बिघाडाची तसेच रविवारी लिपिक पदासाठी झालेल्या परीक्षेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी परीक्षार्थ्यांनी केली आहे. शनिवारी अर्धा पेपर सोडवल्यानंतर परीक्षा रद्द केली गेली, तर रविवारीही परीक्षा केंद्रावर संशयास्पद हालचाली बघायला मिळाल्या. त्यामुळे या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी परीक्षार्थ्यांनी केली आहे.

CDCC Bank Bharti 2024 – The district central co-operative bank, which has been embroiled in a controversy since the advertisement was released, has once again come to the fore in the recruitment process. Even though the examination center is Chandrapur at the time of filling the application form, the hall ticket has given the examination center to a far away city like Nashik, Nagpur. When Chandrapur is the examination centre for various bank recruitments, including MPSC, is located in Chandrapur, what is the reason for keeping the district bank examination center so far away? Read the more details given below:

सीडीसीसी बँक भरतीसंदर्भात पुन्हा एक गोंधळ समोर – भरती चंद्रपूर जिल्हा बँकेची, पेपर नाशिक अन् नागपूरला

सीडीसीसी बँक भरतीसंदर्भात पुन्हा एक गोंधळ समोर : परीक्षार्थ्यांना बसणार आर्थिक फटका – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून वादात अडकलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरती प्रक्रियेतील पुन्हा एक गोंधळ समोर आला आहे. अर्ज भरताना परीक्षा केंद्र चंद्रपूर असतानाही हॉल तिकिटामध्ये परीक्षा केंद्र चक्क नाशिक, नागपूर अशा दूरच्या अंतरावरील शहर देण्यात आले आहे. एमपीएससीसह विविध बँक भरतीचे परीक्षा केंद्र चंद्रपूर राहत असताना जिल्हा बँकेचे परीक्षा केंद्र एवढ्या दूर ठेवण्याचे कारण काय, असा प्रश्न परीक्षार्थ्यांना पडला आहे.

  1. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरतीची ३६० पदांची जाहिरात मागील काही महिन्यांपूर्वी झळकली. यात परीक्षा दिनांक व परीक्षा केंद्र चंद्रपूर असल्याची नोंद होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले. मात्र, काही दिवसातच जाहिरातीमध्ये नमूद केलेली परीक्षा दिनांक बदलण्यात आली. एवढेच नाही तर भरतीविरोधात काहीजण न्यायालयात गेल्याने नोकर भरतीवर स्थगिती आली होती. काही दिवसानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपी स्थगिती हटवली. त्यामुळे आतातरी भरती निर्विघ्नपणे होईल, असे परीक्षार्थीना वाटत होते.
  2. दरम्यान, २० ते २३ डिसेंबर २०२४ या कालावधीत परीक्षा घोषित करण्यात आली. त्याबाबतचा आलेला संदेश बघून तर परीक्षार्थीचे होशच उडाले. कुणाला परीक्षा केंद्र नाशिक, कुणाला नागपूर यासह दूर अंतरावरील केंद्र देण्यात आले. त्यामुळे परीक्षार्थीना आता परीक्षेसाठी नाशिक अन् नागपूरवारी करावी लागणार आहे.
  3. अर्ज भरायला एक हजार, परीक्षेला जायला पाच हजार – बँकेचा अर्ज भरण्यासाठी पाचशे रुपयांचे शुल्क होते. यासोबतच ऑनलाइन अर्ज भरण्याचा खर्च वेगळा असे हजाराच्या जवळपास रुपये परीक्षार्थीचे खर्च झाले. मात्र, आता नाशिकसारखे केंद्र दिल्याने परीक्षेला जाणे-येणे, राहणे, जेवण आदी खर्च पकडून पाच हजारांच्या जवळपासचा भुर्दंड बसणार आहे. पूर्वीच बेरोजगार, त्यातही एका परीक्षेसाठी पाच हजार रुपये खर्च करायचा कसा, असा प्रश्न परीक्षार्थ्यांना पडला आहे.

CDCC Bank Bharti 2024 Exam Date, admit card downloadChandrapur District Central Co-operative Bank has conducted a written examination on 21st December 2024 for the recruitment of 358 vacant posts for the post of Constable through online mode. Also, written examination has been conducted for the post of Clerk on 22nd and 23rd December 2024. The admit card will be availabe from 18th December 2024 on below given link.

Important Instructions:

  1. The examination will be conducted bilingually in English and Marathi.
  2. The examination of Clerk Position will be of Graduation Lever and the examination for the post of peon will be at SSC (10th ) Level
  3. The examination paper pattern for Clerk and Peon positions will be as follows:
  4. Exam Pattern:
    1. Total Questions :90
    2. Duration :120 min
    3. Total Marks 90

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या रिक्त ३५८ पदाची पदभरती ऑनलाईन पध्दतीने करणेकरीता दिनांकी २१ डिसेंबर २०२४ या तारखेला शिपाई पदाकरीता लेखी परिक्षा आयोजित करण्यात आली आहे. तसेच दिनांकी २२ व २३ डिसेंबर २०२४ या तारखेला लिपिक पदाकरीता लेखी परिक्षा आयोजित करण्यात आली आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Admit Card Download


The Commissioner of Co-operation and Registrar, Co-operative Societies, Pune has stayed the recruitment of 360 posts in Chandrapur District Central Co-operative Bank till the hearing of the contempt petition pending in the court. The recruitment process was scheduled to be conducted on November 15 and 17. Job recruitment in the bank has been stuck for the past several years.  A complaint was lodged with the Commissioner of Co-operation regarding the recruitment of employees. It pointed out that the bank chose ITI Limited instead of TCS.

Requested to postpone the recruitment of employees in the bank. Accordingly, the Divisional Joint Registrar, Co-operative Societies Nagpur did not conduct the recruitment process as per the bank’s affidavit in the court. Therefore, a report was submitted to the Additional Commissioner stating that it was necessary to pass prohibitory orders to discourage recruitment. Following the report, Shrikrishna Wadekar, Additional Commissioner and Special Registrar Co-operative Society, Pune, has ordered that the recruitment process be postponed till the next hearing of the contempt petition. The petition will come up for hearing on December 3.

जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ३६० जागांच्या नोकर भरतीला स्थगिती सहकार आयुक्तांचा आदेश

  • न्यायालयात प्रलंबित अवमान याचिकेवरील सुनावणीपर्यंत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३६० पदांच्या नोकर भरतीला सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था पुणे यांनी स्थगिती दिली आहे. १५ व १७ नोव्हेंबरला ही भरती प्रक्रिया राबविली जाणार होती. मागील अनेक वर्षांपासून बँकेतील नोकरी भरती अडकली आहे.
  • बँकेतील नोकर भरतीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या सुनावणीवेळी बँकेने उच्च न्यायालयात एक शपथपत्र सादर केले. त्यात नोकर भरती टीसीएस या संस्थेमार्फत राबविली जाईल, असे नमूद केले. त्यानंतर ही याचिका २० ऑक्टोबर २०२३ रोजी निकाली काढली. मात्र बँकेच्या संचालक मंडळाने या शपथपत्राकडे दुर्लक्ष केले. ठराव घेऊन आयटीआय लिमिटेड या कंपनीची नोकर भरतीसाठी निवड केली. भरती प्रक्रिया राबविली. ऑनलाइन परीक्षेची तारीख जाहीर झाली. पण आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आली. दुसरीकडे, या नोकर भरतीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक अवमान याचिका दाखल झाली. या याचिकेत बँकेच्या नोकर भरतीला प्रक्रियेला स्थगिती द्यावी आणि टीसीएस व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कंपनीमार्फत नोकर भरती प्रक्रिया न करण्याबाबत बँकेला निर्देश देण्याची विनंती केली आहे.
  • याचिकेवर ३ डिसेंबरला सुनावणी होणार – सहकार आयुक्तांकडे नोकर भरतीबाबत तक्रार करण्यात आली. त्यात टीसीएसऐवजी आयटीआय लिमिटेड या कंपनीची बँकेने निवड केली, याकडे लक्ष वेधले आहे. बँकेतील नोकर भरतीस स्थगित करण्याची विनंती केली. त्यानुसार विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नागपूर यांनी बँकेने न्यायालयातील शपथपत्रानुसार नोकर भरती प्रक्रिया केली नाही. त्यामुळे भरतीपासून परावृत्त करण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश देणे आवश्यक असल्याचा अहवाल अपर आयुक्तांकडे सादर केला. या अहवालानंतर आता उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ नये, त्यामुळे अवमान याचिकेवरील पुढील सुनावणीपर्यंत नोकर भरती प्रक्रिया पुढे ढकलावी, असे आदेश श्रीकृष्ण वाडेकर, अपर आयुक्त व विशेष निबंधक सहकारी संस्था, पुणे यांनी दिले आहे. या याचिकेवर येत्या ३ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

CDCC Bank Bharti 2024 Exam DateChandrapur Central Cooperative Bank Ltd. Postponed recruitment exam for the post of Clerk and Peon due to the Code of Conduct. Chandrapur District Central Co-operative Bank recruitment for 358 vacant posts The written examination for the posts of clerk and Peon was scheduled to be held from November 15 to 17, 2024. During this period, the Model Code of Conduct for Assembly elections was in force in the state. As per the instructions of the District Collector and District Returning Officer, Chandrapur, The exam, scheduled to be held from November 15 to 17, 2024, has been postponed till the end of the Model Code of Conduct period. However, candidates should take note of this.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या रिक्त ३५८ पदाची पदभरती ऑनलाईन पध्दतीने करणेकरीता दि. १५ ते १७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान लिपीक व शिपाई पदाकरीता लेखी परिक्षा घेण्याचे नियोजीत केले होते. सदर कालावधीत राज्यात विधानसभा निवडणुक संदर्भातील आदर्श आचारसंहीता लागू असल्यामुळे मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी, चंद्रपूर हयांच्या सूचनेप्रमाणे, दि. १५ ते १७ नोव्हेंबर २०२४ ला आयोजीत केलेली परिक्षा आदर्श आचारसंहिता कालावधी संपेपर्यंत पुढे ढकलण्यांत आलेली आहे. तरी परिक्षार्थी उमेदवारांनी याबाबत नोंद घ्यावी.

CDCC Bharti Postponed


Chandrapur Madhyavarti Sahakari Bank Bharti 2024 Exam Details. Notice / Corrigendum regarding Exam Dates and Paper Pattern for the applied candidates. The Computer Based Test (CBT) for the post of Clerk and Peon will be conducted on 15-Nov-2024 to 17-Nov-2024. Each examination will be held in multiple shifts, with different question sets for each shift. Please note that the Equi-percentile Method will be applied to normalize the examination scores for the post of clerk and peon.
Details regarding the Equi-percentile Method are Annexure-I. provided in Candidates are encouraged to check the official website of Chandrapur regularly for updates.

चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँक लि. अंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी परीक्षेच्या तारखा आणि पेपर पॅटर्न संदर्भात सूचना / शुद्धीपत्र

NOTICE / CORRIGENDUM REGARDING EXAM DATES & PAPER PATTERN FOR APPLIED CANDIDATES

Download 1
Download 2

NORMALISATION DETAILS

Download


Chandrapur Madhyavarti Sahakari Bank Bharti 2024 : The Chandrapur Madhyavarti Sahakari Bank Ltd has issued the notification for the recruitment of “Clerk & Peon” Posts. There are total 358 vacancies available for these posts. Job Location for these posts is in Chandrapur. The Candidates who are eligible for this posts they only apply here. The Candidates who are eligible for this posts they only apply in Bank. Eligible applicants need to apply online from 8th October 2024 from below given link. The closing date for online applications is 22nd October 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Chandrapur DCC Bank Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँक लि. नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “लिपिक आणि शिपाई” पदांच्या रिक्त 358 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 22 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज  दिलेल्या पत्यावर पाठविणे अनिवार्य आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Chandrapur DCC Bank Recruitment 2024 Notification

Here we give the complete details of Chandrapur Madhyavarti Sahakari Bank Ltd Recruitment 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Chandrapur Madhyavarti Sahakari Bank Bharti 2024 Details

⚠️Recruitment Name :  Chandrapur Madhyavarti Sahakari Bank Ltd
 Number of Vacancies :  358 post
✳️ Name of Post :  Clerk & Peon
✅ Job Location :  Chandrapur, Maharashtra
⚠️Pay-Scale
  • For Clerk: Rs. 13,625/- per month
    For Peon: Rs. 8,635/- per month
✅ Application Mode :  Online  Application Form
⚠️ Age Criteria :  Not Exceeding 45 years

Sahakari Bank Chandrapur Vacancy 2024 Details

Educational qualification details are given below for every posts.

1. Clerk & Peon
261 posts
1. Clerk & Peon
97 posts

Sahakari Bank Chandrapur Vacancy 2024 Details

Educational qualification details are given below for every posts.

1. Clerk
Graduate from any stream + MS-CIT + Typing
2.  Peon
10th Pass

How to Apply for Chandrapur DCCB Bharti 2024

Here we explain the process of applying the posts. Read it carefully and then apply.

  • Mention all required details in the online applications form as per the requirement for the post
  • Also, applicants need to upload their scan copy of their photograph & signature as per the required scale
  • Before registering/applying online, candidates are advised to go through Detailed Instructions
  • Applicants to the posts posses with all require qualifications as per the posts are eligible to apply.
  • The prescribed application form is attached with below given PDF.
  • Fill the applications to the posts with all require details as necessary to the post
  • Also need to attach with all necessary documents & certificates as necessity to the posts
  • Address: Head Office Civil Lines, Nagpur Road Chandrapur
  • District: ChandrapurPin: 442401
  • State: Maharashtra
  • Country: India
  • Call Us at: (EPBX) 07172- 252180 / 254253
  • Fax: 07172- 255224
  • E-mail ID: [email protected]

⏰ All Important Dates of CDCC Bank Vacancy 2024

⏰ Last Date:
22nd October 2024

Important Link of CDCC Bank Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT
⚠️ONLINE APPLY
  • Oct 08 2024 Online Application with Exam Fee Submission
  • Oct 22 2024 Last date for online application
  • Oct 23-25 2024 Last date for payment of Examination Fee and Correction
  • Nov 06 2024 Tentative Date of Downloading Exam Admit Card
  • Nov 09, 10, 11 2024 Tentative Date of Examination
  • Document Verification and Interview Date

Chandrapur DCC Bank Bharti 2022

Chandrapur District Central Bank had sanctioned the recruitment of 360 posts but due to some reasons this recruitment process was suspended. This recruitment process has been deleted but 360 vacancies will be recruited soon.

जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, नोकरदार व सामान्य नागरिकांची बँक (CDCC Bank) असलेली चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरतीवर असलेली स्थगिती 23 ऑक्टोबर 2022 च्या पत्रानुसार राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत हटविण्यात आली आहे. परिणामी जिल्ह्यातील बेरोजगारांना सुवर्णसंधी प्राप्त झाली असून, बेरोजगारांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी दिली आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (CDCC Bank) पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने त्याचा विपरित परिणाम बँकेच्या दैनंदिन कामकाजावर होत आहे. त्यामुळे नोकर भरतीकरिता बँकेतर्फे राज्य शासनाच्या सहकार विभागाकडे रितसर परवानगी मागण्यात आलेली होती. 17 फेब्रुवारी 2022 च्या सहकार आयुक्तांच्या पत्रानुसार बँकेला 360 पदे सरळ सेवेव्दारे भरण्याची मंजुरी प्राप्त झाली होती. मात्र, भरती प्रक्रिया सुरु असतानाच 12 मे 2022 ला याच विभागातर्फे सरळ सेवेने भरावयाच्या पदास स्थगिती देण्यात आली होती.

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (CDCC Bank) मुख्यालयातील 6 विभाग, 4 विभागीय कार्यालय व 82 शाखांसह 11 पे ऑफीस, असे एकुण 93 शाखा कार्यरत आहेत. बँकेला एकूण 885 पदे मंजूर असून, आजस्थितीत बँकेत विविध श्रेणीत 501 कर्मचारी कार्यरत आहे. आजच्या स्थितीत 384 पदे रिक्त आहेत व 31 मार्च 2023 पर्यंत 13 पदावरील अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत.
सद्यस्थितीत बँकेच्या 93 शाखांमार्फत 501 कर्मचारी घेऊन बँकेचे कामकाज चालविणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. अशा परिस्थीतीत कर्मचारी भरती न झाल्यास बँकेचे कामकाज बंद पडून ग्राहक सेवेत अडचण निर्माण होऊन शाखा बंद पडण्याची शक्यता आहे, असेही रावत यांनी सांगितले आहे. अकारण राजकारण करुन बँकेला वेठीस धरल्या गेले. मात्र, राज्य शासनाने भरतीबाबत लोकहितार्थ निर्णय घेतला. राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करून सर्व भरती प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने राबवू, अशी प्रतिक्रिया रावत यांनी व्यक्त केली आहे.

CDDC Bharti 2022- The state government’s co-operative recruitment postpond department had approved the recruitment of 360 posts to the Chandrapur district central bank. However, two previous recruitment cases were disputed. The term of the Board of Directors of the Bank has come to an end. There have been several financial scams in the bank. Therefore, the CBI should investigate these scams by postponing recruitment. Balu Dhanorkar and Aa. It was done by Pratibha Dhanorkar. Now the Special Operations Officer and Co-Registrar Maharashtra Government has postponed this recruitment

 राज्य शासनाच्या सहकार recruitment Postpond खात्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला 360 पदांच्या नोकर भरतीला मंजुरी दिली होती. परंतु, याआधीचे दोन नोकर भरती प्रकरण वादग्रस्त ठरले होते. बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. बँकेत अनेक आर्थिक घोटाळे झाले आहेत. त्यामुळे नोकर भरतीला स्थगिती देवून या घोटाळ्यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी खा. बाळू धानोरकर व आ. प्रतिभा धानोरकर यांनी केली होती. आता विशेष कार्य अधिकारी व सहनिबंधक महाराष्ट्र शासन यांनी या भरतीला स्थगिती दिली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती सोबत गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील बँकेच्यादेखील समावेश आहे.

  •  चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा recruitment Postpond कार्यकाळ सन 2012 ते 2017 पर्यंत होता. याकाळात दोन वेळा नोकरी भरती करण्यात आली. ही नोकर भरती वादग्रस्त ठरली आहे. या मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाल्याची आरोप भरती प्रक्रियेदरम्यान झाला आहे.
  • तसेच या काळात बँक अनेक घोटाळ्यांनी गाजली. एका अध्यक्षाला तुरुंगात जावे लागले. ही शेतकर्‍यांची बँक आहे. परंतु, शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी काही संचालक आपले हितसंबंध जोपासत आहे. संचालक मंडळाचा कार्यकाळ आधीच संपला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जून 2021 रोजी दिलेल्या आदेशात कार्यकाळ संपलेल्या बँकांवर प्रशासक नियुक्त करुन निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहे.
  •  परंतु चंद्रपूर मध्यवर्ती बँकेवर अद्याप प्रशासक recruitment Postpond नियुक्त झाला नाही, याकडे खासदार धानोरकरांनी लोकसभेचे लक्ष वेधले होते. याउलट सहकार खात्याने 360 जणांच्या नोकर भरती मान्यता देवून घोटाळ्यांना खतपाणी घालण्याचे काम केले आहे.
  • याशिवाय बँकेचे मुख्याधिकारी यांच्यावर यापूर्वीच बँकेतील घोटाळा प्रकरणात दोन फौजदारी खटले दाखल आहे. अशा व्यक्तीला सामान्य व्यवस्थापकपदी घेऊ नये, असे रिजर्व बँक, नाबार्ड, सहकार विभागाचे निर्देश आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष करुन बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाने त्यांना मुदत वाढ दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकार विभागाने दिलेल्या आदेशानुसार नोकरभरतीला स्थगिती दिली आहे

CDCC Bank Bharti 2022- As per the report, The state government’s co-operation department has approved the recruitment of 165 posts to Chandrapur district central bank. Recruitment of 165 vacant posts in Chandrapur District Central Bank will start soon.

चंद्रपूर DCC बँकेत 165 पदं भरण्यास मंजुरी

CDCC Bank Recruitment 2022- राज्य शासनाच्या सहकार खात्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला 165 पदांच्या नोकर भरतीला मंजुरी दिली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ सन २०१२ ते २०१७ पर्यंत होता. सुप्रीम कोर्टानं प्रशासक नेमण्याचे आदेश दिले. मात्र, अद्याप प्रशासक नेमण्यात आलेला नाही.

Chandrapur DCC Bank Bharti 2022

CDCC Bank Bharti 2022

 चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ सन 2012 ते 2017 पर्यंत होता. परंतु, आता पर्यंत संचालक मंडळ बरखास्त झाले नाही. त्याउलट दोन वेगवेगळ्या प्रकरणात 420 कलमाचा आरोपाचा गुन्हा दाखल होऊन देखील मुख्य व्यवस्थापक ती व्यक्ती पदावर कार्यरत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून तात्काळ चौकशी समिती गठीत करून प्रशासक नेमावा अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधानसभेत केली.

अधिकृत वेबसाईट 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!