MHT-CET 2020 प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या; सेलकडून सुधारित वेळापत्रक जाहीर

सीईटी प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या; सेलकडून सुधारित वेळापत्रक जाहीर

कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकांमध्ये अडचणी येत आहेत. अनेक परिक्षांचे नियमित वेळापत्रकात बदल झाले आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक 21 सप्टेंबर ला जाहीर करण्यात आले होते. परंतु कॉलेजमधील अंतिम वर्षांच्या परीक्षा आणि सीईटी परीक्षांच्या तारखा एकाच दिवशी येत होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेला बसता आले नसते. विद्यार्थी व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाने सीईटीच्या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक सीईटी सेल कडून जाहीर करण्यात आले आहे.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

11 ऑक्टोबरला होणारी बीए-बीएससी बीएड इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाची 18 ऑक्टोबरला होणार आहे.
5 वर्ष एलएलबीची सीईटी 11 ऑक्टोबरलाच होणार आहे.
एमपी एड ही परीक्षा 3 ते 7 ऑक्टोबरदरम्यान होणार होती. ही परीक्षा आता 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरदरम्यान होणार आहे.
म एड सीईटी 3 ऑक्टोबरऐवजी 5 नोव्हेंबरला होणार आहे
11 ते 16 ऑक्टोबरदरम्यान होणारी;बी.पी.एड सीईटी 4 ते 8 नोव्हेंबरदरम्यानहोईल.
एलएलबी 3 वर्ष अभ्यासक्रमाची सीईटी 2 व 3 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आली आहे. हीपरीक्षा विविध सत्रामध्ये होणार आहे.
बी.एड अभ्यासक्रमाची सीईटी 21 ते 23 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे.
बी.एड-एम.एड इंटिग्रेटेडची परीक्षा 27 ऑक्टोबर, एम.एड 5 नोव्हेंबर, एम आर्च 27 ऑक्टोबर, एम.एचएमसीटी 27 ऑक्टोबर, एमसीए 28 ऑक्टोबर, बी.एचएमसीटी 10 ऑक्टोबरला होणार आहे.

 सीईटी सेलच्या वतीने सुधारीत वेळापत्रकासंबधीची सविस्तर माहिती व परीक्षा प्रवेशपत्र ;संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रवेश पत्रावर विद्यार्थ्यांची नेहमीप्रमाणे माहिती देण्यात आली आहे. प्रवेश पत्रावर कोणत्याही प्रकारची चूक वा त्रूटी आढळल्यास संबधित;यंत्रणेशी तत्काळ संपर्क करण्याचे आवाहन सीईटी सेल ने केले आहे.


MHT-CET 2020 चे सुधारित वेळापत्रक जाहीर

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (सीईटी सेल) तंत्र शिक्षण विभाग; तसेच उच्च शिक्षण विभागाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार सीईटी परीक्षांना येत्या तीन ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे,’ अशी माहिती’सीईटी सेल’ने प्रसिद्ध केली आहे.

सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार तंत्र शिक्षण विभागाच्या चार सीईटी परीक्षा; तर उच्च शिक्षण विभागाच्या आठ सीईटी परीक्षा येत्या ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत. ‘या परीक्षांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेबसाइटवर लिंक देण्यात येणार आहे. सीईटी परीक्षा सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन करून घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांची माहिती, रिपोर्टिंग टाइम, परीक्षा सुरू होण्याची वेळ आदींबाबतचा तपशील प्रवेशपत्रावर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे परीक्षा केंद्रावरील सुरक्षित वावराच्या नियमांची माहितीदेखील त्यावर देण्यात येईल. परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही,’ असेही सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, एलएलबी (तीन वर्षे) आणि बीएड/ बीएड (ईएलसीटी) या अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षांबाबत अधिक माहिती www.mahacet.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

उच्च शिक्षण विभाग

अभ्यासक्रम – ‘सीईटी’ची तारीख

एमपीएड – ३ ऑक्टोबर, फिल्ड टेस्ट ४ ते ७ ऑक्टोबर

एमएड – ३ ऑक्टोबर

बीएड/एमएड सीईटी – १० ऑक्टोबर

एलएलबी (पाच वर्षे) – ११ ऑक्टोबर

बीपीएड – ११ ऑक्टोबर, फिल्ड टेस्ट १२ ते १६ ऑक्टोबर

बीए/ बीएस्सी बीएड इंटिग्रेटेड – ११ ऑक्टोबर

तंत्र शिक्षण विभाग

अभ्यासक्रम – सीईटी परीक्षा दिनांक

एम-आर्च सीईटी – ३ ऑक्टोबर

एम-एचएमसीटी – ३ ऑक्टोबर

एमसीए – १० ऑक्टोबर

बी-एचएमसीटी – १० ऑक्टोबर


सामायिक प्रवेश परीक्षा १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान!

CET Exam 2020  : राज्यात इंजिनीअरिंग आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुमारे सात लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात सर्वाधिक विद्यार्थी हे इंजिनीअरिंग आणि औषधनिर्माण शास्त्र विषयात करिअर करू इच्छिणाऱ्या ‘एमएचटी-सीईटी’चे आहेत. या विद्यार्थ्यांची प्रवेशपरीक्षा १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान आयेाजित करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी स्पष्ट केले.

राज्यातील इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्या गुणांआधारे या अभ्यासक्रमांसंबंधी तब्बल तीन लाख जागांवर प्रवेश दिले जातात. मात्र करोनासंकट तीव्र झाल्याने यंदा या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. १३ विविध सीईटी परीक्षांसाठी राज्यातून ६ लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. यापैकी सर्वाधिक, पाच लाख ३२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटीसाठी नोंदणी केली आहे. यावर इंजिनीअरिंग प्रवेश अवलंबून असणार आहेत. ही परीक्षा कधी होणार याबाबत संभ्रम होता. आता ही परीक्षा १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केली जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले. ही परीक्षा नेमकी कशी घेतली जाईल, त्याचे वेळापत्रक याबाबत पुढील दोन दिवसांत स्पष्टीकरण येईल, ही परीक्षा झाल्यानंतर उर्वरित सीईटीचे आयोजन केले जाईल, असेही सामंत यांनी सांगितले. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

यंदा ही परीक्षा तालुकास्तरावर आयोजित करण्याचा मानस असून त्याची पूर्वतयारी सुरू असल्याचेही मंत्र्यांनी यापूर्वी सांगितले होते. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या वेळापत्रकानुसार, ऑक्टोबर महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होणे आवश्यक आहे. ही तारीख राज्य सरकार नेमकी कशी पाळणार, हे वेळापत्रक आल्यावरच स्पष्ट होईल.

अंतिम परीक्षांबाबत अद्याप निर्णय नाही

राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा कधी व कशा होणार याबाबतचा निर्णय बुधवारीही होऊ शकला नाही. या संदर्भात बुधवारी उदय सामंत यांनी राज्यपालांची भेट घेत तपशीलवार चर्चा केली. यानंतर प्रत्येक विद्यापीठाची नेमकी काय तयारी आहे हे जाणून घेण्यासाठी आज, गुरुवारी दुपारी ४ वाजता राज्यपालांकडे बैठक होणार आहे. परीक्षा कशा घ्यावात याचा निर्णय विद्यापीठांनी घ्यावा, त्यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी बाहेर कुठे जाऊन परीक्षा द्यावी असे मत कोणत्याही कुलगुरूंचे नाही, परीक्षा सोप्या पद्धतीने घ्याव्यात, असे मत कुलपतींनी बैठकीत व्यक्त केले. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून आपात्ती व्यवस्थापन कक्षाची बैठक बोलावून विद्यापीठ अनुदान आयोगाला मुदतवाढीसाठी पत्र पाठवणार असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.


CET Exam 2020 Details

सीईटी होणार की नाही? काय म्हणाले उच्च शिक्षणमंत्री?

राज्यातील सीईटी संदर्भात सीईटी सेलचे आयुक्त आढावा घेत आहेत… असे सांगतानाच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री परीक्षेविषयी नेमके काय म्हणाले वाचा…

पुणे: राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्ष पदवी परीक्षांबाबत राज्य सरकारची जी भूमिका आहे तीच सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. कोविड – १९ संसर्ग परिस्थितीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा महाराष्ट्रात होऊ शकत नाहीत, हेच आम्ही सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या हिताचाच विचार करत आहोत. पण या संपूर्ण विषयाबाबत गैरसमज पसरवला गेला आहे. परीक्षा घेणार नाही असं आम्ही कोणत्याही जीआरमध्ये म्हटलेलं नाही. परिस्थिती सामान्य झाल्यावर विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याचा पर्याय खुला राहील असेच आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे राज्यातील सीईटीसंदर्भात ७-८ दिवसात बैठक होऊन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
उदय सामंत गुरुवारी पुण्यात होते. तेथे त्यांनी एक आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि सीईटीबाबत सामंत यांनी माहिती दिली.

MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020- परीक्षेच्या तारखेत बदल!

ते म्हणाले, ‘सीईटी परीक्षेचं आयोजन करण्यात सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणावर आपण विद्यार्थ्यांना आणू शकतो का? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तालुका स्तरावर शिवाय विभागीय स्तरावर सीईटीची परीक्षा केंद्रे करू शकतो का याचा सर्व्हे सीईटी आयुक्त करत आहेत. सीईटीच्या आयुक्तांना स्वायत्त अधिकार दिले गेले आहेत. येत्या ७-८ दिवसात सीईटीसंबंधी बैठक होऊन निर्णय घेतला जाईल.’

‘आम्ही आधी हे पाहतो आहोत की सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून सुमारे साडेपाच लाख विद्यार्थ्यांची सीईटी घेता येईल का, तालुका स्तरावर संस्था सक्षम आहेत का, व्यवस्था कशी आहे या सर्व बाबींची पडताळणी सुरू आहे. सीईटी यंत्रणा स्वायत्त आहे, त्यांचे यासंबंधीचे सर्वेक्षण सुरू आहे. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर बारावीच्या गुणांवर प्रवेश देण्याचा विचारही केला जाऊ शकतो,’ असेही सामंत म्हणाले.
दरम्यान, पदवी परीक्षा सप्टेंबरअखेरपर्यंत घ्याव्यात असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठांना दिले आहेत. हे निर्देश ६ जुलै रोजी मार्गदर्शक तत्त्वांच्या माध्यमातून यूजीसीने दिले आहेत. यूजीसीच्या या निर्णयाविरोधात युवा सेनेसह अनेक विद्यार्थी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यावरील सुनावणी १४ ऑगस्ट रोजी होणार आहे.

CET Exam 2020 Details

CET Exam 2020: The State Common Entrance Examination Cell (CET Cell 1) has announced the MHT CET Examination marks to be taken for the first year admission to engineering and technology, pharmacology, agricultural courses. This exam will be based on the XI and XII study courses. As per last year, this exam will be conducted online and the mathematics paper will be 100 marks and two other subjects will be of 50 marks.

CET is conducted through CET Cell for first year admission to engineering and technology, pharmaceuticals, agricultural courses. The mathematics paper is going to be 100 marks. It will ask 10 marks based on the syllabus of the XII and 40 marks in the syllabus of the XII. Each question of this paper will be of 2 marks.

Students are given 90 minutes to complete the question paper. Physics, Chemistry are going to be 50 marks. It will also consist of 10 marks based on the syllabus of the 11th  and 40 marks on the 12th syllabus. These topics have 3 marks for each question.

For biology and zoology, there will be 50 marks paper. There is going to be a similar pattern of 10:40 A notification has been given on the website about how to qualify for the exam for April this year. Candidate should note that if he/she appearing for both the the groups i.e. PCM and PCB, the Percentile score of Physics or Chemistry will not be interchanged among the groups.

For More Details Click Here 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!