CBSE Exam- CBSE १२ वी वैकल्पिक परीक्षा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये

CBSE 12th Class Alternative Examination

The Central Board of Secondary Education (CBSE) has filed a petition in the Supreme Court for the 12th standard. Accordingly, the results of CBSE examination will be announced by July 31. The CBAE also told the apex court that disputes over the outcome would be referred to a committee.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

12th Class Alternative Examination:बारावीसाठी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एजुकेशन (CBSE)ने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)याचिका दाखल केली. त्यानुसार सीबीएसई परीक्षेच्या निकालाची घोषणा ३१ जुलैपर्यंत होईल. तसेच निकालासंदर्भात विवाद एका समितीकडे पाठवले जातील असे सीबीएईने सुप्रीम कोर्टात सांगितले.

र्यायी परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा असेल. जर स्थिती अनुकूल असेल तर ही परीक्षा १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरच्या दरम्यान होऊ शकेल.

वैकल्पिक परीक्षेत मिळवलेल्या गुणांना अंतिम मानले जाईल. पण बारावीच्या बोर्ड परीक्षा (12th Board Exams 2021) प्रकरणी सुप्रीम कोर्ट preme Court) ने सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ला सांगितले की, आम्ही तुमच्या स्किमवर तात्पुरती सहमती दर्शवली आहे. पण काही याचिका बोर्ड परीक्षा रद्द करण्यास आव्हान देतायत. त्यामुळे या याचिकेंचे म्हणणे ऐकून घेणे देखील महत्वाचे आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी २१ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सीबीएसई आणि सीआयसीएसई या केंद्रीय बोर्डांच्या बारावीच्या रद्द परीक्षांच्या मूल्यांकनाच्या निकषांवर सुनावणी घेतली. सोमवारीच सर्वोच्च न्यायालयाद्वारे सीबीएसई आणि सीआईएससीई इव्हॅल्युएशन क्रायटेरिया वर अंतिम निर्णय देईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.


CBSE 12th Exam 2021

12th std CBSE Board Exam Cancelled -It has been decided to cancel the CBSE Board 12th Std Exam. The decision was taken after a high-level meeting chaired by Prime Minister Narendra Modi.

12th std CBSE Board Exam Cancelled : सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा (CBSE Board 12th Std Exam) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

CBSE Board Exam- सीबीएसईच्या ‘या’ परीक्षांचा निकाल जाहीर

गेले अनेक दिवस यावर तोडगा निघत नसल्याने विद्यार्थी चिंतेत होते. या निर्णयामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आल्याचे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले. देशात उद्भवलेल्या करोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अंतिम निकाल कसा लागणार?

बारावीच्या विद्यार्थ्याचा निकाल जाहीर करण्यासाठी वस्तूनिष्ठ कार्यपद्धती जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांच हित लक्षात घेऊन सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.


The Central Government has taken an important decision regarding the Central Board of Secondary Education CBSE Board Examinations. CBSE Board Class X examinations have been canceled for this academic year, while Class XII examinations have been postponed immediately.

CBSE दहावीची परीक्षा रद्द, 12 वीची परीक्षा पुढे ढकलली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या संदर्भात 12 वाजता बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सीबीएसईचे सचिव आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती आहे. या बैठकीमध्ये सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तर, दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 दहावीचा निकाल सीबीएसई बोर्डाकडून वस्तूनिष्ठ पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या मानाकांच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. तर, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा घेण्यासंदर्भात 1 जूनला परिस्थितीची पाहणी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. त्यामुळे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा जूनपर्यंत होणार का? हे पाहावं लागेल.


10th and 12th to change exam centre

The Central Board of Secondary Education (CBSE) has taken a big decision regarding the students appearing for the board exams. CBSE has allowed 10th and 12th class students to change their examination centers. CBSE has issued a notice in this regard on the official website cbse.gov.in.

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (CBSE) ने बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.  10वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यास सीबीएसईनं परवानगी दिली आहे. सीबीएसईने ऑफिशियल वेबसाईट cbse.gov.in वर यासंदर्भात नोटीस जारी केलं आहे. सीबीएसईच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यी एका केंद्रावरुन प्रात्याक्षिक परीक्षा आणि एका केंद्रावरुन लेखी परीक्षा देऊ शकतात.

10th And 12th To Change Exam Centre


CBSE SSC and HSC NEW Exam Time Table 2021

CBSE SSC and HSC NEW Exam Time Table 2021: Important news for Central Board of Secondary Education (CBSE) students, the board has decided to change the exam dates of some subjects, CBSE has given new schedule of 10th and 12th board exams on their website cbsc.gov.in. The CBSE Board has given a new schedule, you can download it by going to the link below.

CBSE दहावी व बारावी परीक्षेच्या तारखेत बदल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या(CBSE) विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, काही विषयांच्या परीक्षेच्या तारखा बदलण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे, सीबीएसईने त्यांच्या वेबसाईट cbsc.gov.in यावर दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक दिले आहे. सीबीएसई बोर्डाचं नवीन वेळापत्रक दिलं आहे, तुम्ही खालील लिंकवर जाऊन ते डाऊनलोड करू शकता.

नव्या वेळापत्रकानुसार, बारावीची फिजिक्स परीक्षा ८ जूनरोजी होणार आहे, याआधी ती १३ मे रोजी होणार होती, तर मॅथ्सचा पेपर ३१ मेला घेण्यात येईल, जो आधीच्या वेळापत्रकानुसार १ जून रोजी होणार होता. त्याशिवाय बारावीचा ज्योग्राफीचा पेपर आता ३ जून रोजी घेण्यात येणार आहे, आधी तो २ जून रोजी होता.


CBSE Exam 2021: The Central Board of Secondary Education (CBSE) has issued a circular regarding Class X and XII examinations. This circular is about 10th and 12th practical examination (CBSE 10th 12th practical), work of projects and internal evaluation. The Board has sent this circular to all the concerned schools. Find out what the rules are for these exams.

CBSE बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षांसाठी सांगितले नियम… कोणते ते जाणून घ्या

CBSE बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षांसाठी परिपत्रक जारी केले आहे. यात परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. बोर्डाने हे परिपत्रक सर्व संलग्न शाळांना पाठवले आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. हे परिपत्रक दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा (CBSE 10th 12th practical), प्रकल्पांचे काम आणि अंतर्गत मूल्यांकनाबद्दल आहे. मंडळाने सर्व संबंधित शाळांना हे परिपत्रक पाठविले आहे. या परीक्षांबाबत कोणते नियम आहेत ते जाणून घ्या.

आतापर्यंत सीबीएसई प्रात्यक्षिक परीक्षा १ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत होत होत्या. पण यावेळी कोविडमुळे संपूर्ण सत्र उशिरा सुरू झाले. परिणामी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा मे-जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रात्यक्षिक आणि अंतर्गत परीक्षांचा कालावधीही वाढविण्यात आला आहे. यावेळी मंडळाने सर्व शाळांना दिनांक १ मार्च २०२१ ते ११ जून २०२१ या कालावधीत दहावी आणि बारावीच्या सर्व प्रात्यक्षिक परीक्षा, प्रोजेक्ट वर्क आणि अंतर्गत मूल्यांकन पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

CBSE practical, project, internal exams 2021: हे आहेत नियम –

१. या परीक्षा संपल्यानंतर शाळांनी सर्व विद्यार्थ्यांचे गुण मंडळाच्या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकद्वारे अपलोड करावे लागतील. गुण अपलोड करताना विशेष काळजी घ्यावी लागेल कारण सीबीएसई त्यामध्ये सुधारणा करण्याची दुसरी संधी देणार नाही.

२. प्रत्यक्ष परीक्षा केवळ मंडळाने नियुक्त केलेल्या परीक्षकाद्वारे घेतली जाईल. जर एखाद्या शाळेने ही परीक्षा एखाद्या शिक्षकाद्वारे घेतली तर ती रद्द होईल. विद्यार्थ्यांना थिअरी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे सरासरी गुण दिले जातील. तसेच शाळेची मान्यता रद्द होईल आणि तेथील प्राचार्यांविरोधात कारवाई केली जाईल.

३. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत येऊन प्रात्यक्षिक परीक्षा आणि अंतर्गत मूल्यांकन द्यावे लागेल. बाह्य परीक्षक तसेच अंतर्गत परीक्षकही प्रत्येक शाळेत यासाठी उपलब्ध असतील. या परीक्षांच्या देखरेखीसाठी मंडळामार्फत निरीक्षकही नेमले जातील.

४. शाळांना १ मार्च ते ११ जून २०२१ पर्यंत अंतर्गत गुण अपलोड करावे लागतील. ११ जूननंतर यास परवानगी दिली जाणार नाही आणि ही मुदतदेखील वाढविली जाणार नाही.

५. ज्या विद्यार्थ्यांना ठरलेल्या तारखेला प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापन परीक्षेस उपस्थित राहता येणार नाही, त्या विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीची माहिती शाळांना संबंधित सीबीएसई रिजनल ऑफिसला द्यावी लागेल. त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेतली जाऊ शकते, ज्यांच्यासाठी परीक्षकांची नेमणूक प्रादेशिक कार्यालयामार्फत केली जाईल. या पुनर्परीक्षा ११ जून २०२१ पूर्वी घेता येतील. यानंतर कोणतीही संधी मिळणार नाही.

६. या परीक्षांच्या वेळी प्रत्येक शाळेने कोविड -१९ सुरक्षाविषयक नियमांचे योग्य पालन केले पाहिजे. जर २५ विद्यार्थ्यांची तुकडी असेल तर त्यांना दोन लहान गटात विभागून परीक्षा दिली जाऊ शकते. पुढे दिलेल्या सीबीएसई नोटिस दुव्यावर क्लिक करुन तुम्ही तपशीलवार माहिती मिळवू शकता.


CBSE Practical Exam 2021

CBSE प्रॅक्टिकल परीक्षा 2021 तारखां जाहीर

CBSE Practical Exam 2021: CBSE Class 10 and 12 Board practical examinations are to be conducted by the schools between March 1, 2021, and June 11, 2021. Due to the special circumstances, the board this year has allowed the schools to complete the practical examinations by the last date of the theory exam – June 11, 2021.

सीबीएसई प्रॅक्टिकल परीक्षा २०२१ च्या तारखा मार्गदर्शक सूचनांसह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केल्या आहेत.

अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध वेळापत्रकानुसार सीबीएसई इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षा प्रॅक्टिकल परीक्षा 1 मार्च 2021 आणि 11 जून 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. विशेष परिस्थितीमुळे यावर्षी मंडळाला परवानगी देण्यात आली आहे. 11 जून 2021 रोजी – सिद्धांत परीक्षेच्या शेवटच्या तारखेपर्यंत शाळा प्रॅक्टिकल परीक्षा पूर्ण करतील.

सीबीएसईच्या व्यावहारिक परीक्षेचे वेळापत्रक आणि सूचना आणि मार्गदर्शक सूचना असलेल्या अधिकृत अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत – cbse.gov.in. येथे उपलब्ध असलेल्या थेट लिंकद्वारे उमेदवार सीबीएसईची अधिकृत अधिसूचना देखील तपासू शकतात.

CBSE प्रॅक्टिकल परीक्षा अधिकृत सूचना


CBSE Board Exams 2021

CBSE Board Exam 2021: The Central Board of Secondary Education (CBSE) has announced the schedule of Class X, XII for the upcoming Board Examinations. For the first time since the Corona epidemic, the exams will be held in two sessions for the first time. The first session will be from 10.30 am to 1.30 pm and the second session will be from 2.30 pm to 5.30 pm.


cBSE 10th 12th Exam Datesheet Declared

The dates of 10th and 12th examinations to be conducted by the Central Board of Secondary Education have been announced. Union Education Minister Dr. These dates were announced by Ramesh Pokhriyal. CBSE board exams will start from May 4, 2021. According to the schedule, these examinations will continue till June 10, 2021

CBSE दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या परीक्षांच्या सविस्तर वेळापत्रकाची विद्यार्थी वाट पाहत होते. मंगळवार २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी वेळापत्रकाची घोषणा केली.

CBSE Exam DateSheet 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी या तारखांची घोषणा केली. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा ४ मे २०२१ पासून सुरू होणार आहेत. वेळापत्रकानुसार या परीक्षा १० जून २०२१ पर्यंत सुरू राहणार आहेत.

पोखरियाल म्हणाले, ‘दोन पेपरच्या मध्ये अंतर ठेवण्यात आले आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना तणावमुक्त पद्धतीने परीक्षा देता येतील.’ प्रतिकूल परिस्थितीत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे पोखरियाल यांनी कौतुक केले. शिक्षकांनीही कोविड योद्ध्याप्रमाणे काम केले असे सांगत त्यांनी त्यांच्या कामाप्रति आभार मानले.

विद्यार्थ्यांनी परीक्षांची नीट तयारी करावी असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तसेच परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

सीबीएसईच्या वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


CBSE Date sheet 2021

CBSE Exam Circular: The Central Board of Secondary Education (CBSE) has issued a circular regarding the 10th and 12th board examinations to be held in 2021. The CBSE has provided information about the board’s examination schedule, schedule and some other precautions.

सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक कधी जाहीर होणार याची विद्यार्थी, पालक, शिक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. यासंदर्भात सीबीएसई बोर्डाने एक परिपत्रक जारी केले होते…

CBSE 10th 12th Datesheet: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात मंडळाने एक परिपत्रक जारी केले आहे. सीबीएसईने बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक, तारीखपत्रक व त्यातील काही इतर सावधगिरीबाबतची माहिती दिली आहे. त्याचा तपशील आणि बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकाची लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे.

परिपत्रकात असे म्हटले आहे की सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा मंगळवार, ४ मे २०२१ पासून देशभर सुरू होतील. तर सर्व सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळा १ मार्च २०२१ पासून दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा (सीबीएसई प्रॅक्टिकल परीक्षा) घेऊ शकतात. परंतु बोर्डाने लेखी परीक्षा सुरू करण्यापूर्वी शाळांना त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा, प्रोजेक्ट आणि अंतर्गत मूल्यांकन पूर्ण करावे लागेल.

सीबीएसईने म्हटले आहे की दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा २०२१ चे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होईल. २८ जानेवारी रोजी शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मुख्याध्यापकांना सांगितले होते की बोर्ड ०२ फेब्रुवारी २०२१ रोजी वेळापत्रक जारी करेल.

या परिपत्रकामध्ये सीबीएसईने सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि इतर संबंधितांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंडळाने म्हटले आहे की परीक्षेसंदर्भात कोणतीही माहिती सीबीएसई वेबसाइट cbse.gov.in वर प्रसिद्ध केली जाईल. कोणत्याही सोशल मीडिया पोस्टवर किंवा कोणत्याही प्रकारच्या फॉरवर्डेड मेसेजवर विश्वास ठेवू नका.

सीबीएसई परीक्षा सूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


CBSE Board Exam 2021

CBSE Exam 2021:: The date of the Central Board of Secondary Education’s 10th and 12th examinations.CBSE Board X and XII examinations will start from 4th May 2021 and will end by 10th June. The results of these examinations in time. He clarified that he will try to get the result by July 15.

CBSE Exam Dates: सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षा ४ मे पासून

सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षा ४ मे पासून सुरू होणार आहेत…

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ४ मे २०२१ पासून सुरू होणार आहेत आणि १० जून पर्यंत संपणार आहेत.

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीपर्यंत होणार नाहीत, असे शिक्षणमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. पण त्या मार्च-एप्रिल महिन्यातही होऊ नयेत, अशी अनेक विद्यार्थ्यांची मागणी होती. विद्यार्थ्यांच्या या मागणीचा विचार करत बोर्डाने थेट मे महिन्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षांचा निकाल वेळेत निकाल लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही पोखरियाल यांनी सांगितले. १५ जुलै पर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोखरियाल यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली. विद्यार्थ्यांना आता पुरेसा वेळ मिळाला असल्याने त्यांनी निश्चिंत मनाने आणि पूर्ण क्षमतेने परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले. पूर्वी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात परीक्षा सुरू होऊन त्या मार्चपर्यंत संपायच्या. मात्र २०२० मध्ये करोना परिणामामुळे शैक्षणिक वर्ष विलंबाने सुरू झाले परिणामी परीक्षाही थोड्या विलंबाने होणार आहेत.


CBSE Board Exams 2021:: The date of the Central Board of Secondary Education’s 10th and 12th examinations will be announced on December 31. This information was given by Union Education Minister Ramesh Pokhriyal Nishank. Pokhriyal tweeted this information. He himself will announce the dates of the CBSE 10th and 12th examinations at 6 pm.

CBSE Board Exams 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखेची घोषणा ३१ डिसेंबर रोजी केली जाणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली.

पोखरियाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ते स्वत: सायंकाळी ६ वाजता सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांच्या तारखांची घोषणा करणार आहेत. ही माहिती मिळताच काही विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्र्यांना आग्रह केला की परीक्षेसाठी त्यांना अजून काही कालावधीची गरज आहे. काही विद्यार्थ्यांनी परीक्षा एप्रिल-मेपर्यंत घेऊ नयेत अशीही मागणी केली आहे. काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की अद्याप त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही.

यापूर्वी शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी हे स्पष्ट केलं आहे की सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी २०२१ नंतरच आयोजित केल्या जाणार आहेत. दरम्यान, बोर्ड परीक्षांच्या तारखा अद्याप स्पष्ट झालेल्या नसल्याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी प्रिलिम परीक्षा आयोजित केल्या आहेत.


CBSE Exam 2021: परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

सीबीएसई दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे…

CBSE Board Exam 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२१ साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज सादर केलेले नाहीत ते ९ डिसेंबरपर्यंत आपले अर्ज अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जाऊन भरू शकतात. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे, ते १० डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत त्यांच्या अर्जात सुधारणा करू शकतात.

सीबीएसई बोर्डाने सांगितले, ‘खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची माहिती सादर करण्याची शेवटची तारीख झाल्यानंतर काही उमेदवारांनी डेटा दुरुस्त करण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. उमेदवारांनी केलेली मागणी लक्षात घेऊन खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी / दुरुस्ती करण्यासाठी लिंक पुन्हा एकदा अॅक्टिव्ह केली आहे.’

CBSE Board Exam 2021: पुढील पद्धतीने भरा अर्ज –
– प्रथम अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जा.
– यानंतर, खासगी विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई परीक्षा फॉर्म 2020 च्या लिंकवर क्लिक करा.
– आपल्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.
– येथे उमेदवारांना विचारलेली रोल नंबर आणि अन्य माहिती भरावी लागेल.
– फॉर्म भरून शुल्क भरा.
– भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊट घेऊन ठेवा.


CBSE Board Exams 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच (Offline mode) होणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या परीक्षा ऑनलाइन होण्याची शक्यता नाही. बोर्डाने हेही स्पष्ट केल ेआहे की जे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध केला जाईल.

सीबीएसई बोर्डाने एक निवेदन जारी केलं आहे. यात म्हटलंय की, ‘बोर्डाच्या परीक्षा जेव्हा होतील तेव्हा त्या लेखी आणि ऑफलाइन पद्धतीनेच होतील. ऑनलाइन पद्धतीने होणार नाहीत. कोविड प्रोटोकॉल पाळून परीक्षांचे आयोजन केले जाईल.’ मात्र परीक्षा नेमक्या कधी घेतल्या जातील, याबाबत बोर्डाने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही. संबंधितांशी विचारविनिमयाची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याचे बोर्डाने सांगितले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालय शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांशी १० डिसेंबर रोजी परीक्षांसंदर्भात संवाद साधणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

सीबीएसईच्या दहावी, बारावी परीक्षा सर्वसामान्य परिस्थितीत दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात घेतल्या जातात. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. आतापर्यंत विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. विविध विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा कशा होणार याबाबत शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषत: बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी अधिक चिंतेत आहेत, कारण त्यांना प्रात्यक्षिक परीक्षेसाठी ३० गुण असतात.

दरम्यान, बोर्डाने यापूर्वीच परिस्थिती लक्षात घेऊन ३० टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. मात्र, प्रात्यक्षिक परीक्षांसाठी कोणताही बदल नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. दिल्ली सरकारने आणखी अभ्यासक्रम कमी करण्याचीही मागणी केली होती. दुसरीकडे, बोर्डाने पेपर पॅटर्न बदलत विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा दिला आहे. एमसीक्यू प्रश्नांवर यंदा अधिक भर दिला जाणार आहे.

सोर्स: म. टा.


CBSE Board class 12th practical exam 2021: कोविड – १९ विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शाळांचे शैक्षणिक सत्र विलंबाने सुरू झाले. बहुतांश शाळा आता बंद आहेत आणि वर्ग ऑनलाइन सुरू आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ३० टक्क्यांपर्यंत अभ्यासक्रम कमी केला आहे. मात्र उपलब्ध शैक्षणिक साधनांमध्ये उर्वरित ७० टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे देखील विद्यार्थी-शिक्षकांसाठी कठीण जात आहे. याच दरम्यान बोर्डाने २०२१ मधील बोर्ड परीक्षांची तयारी सुरू केली आहे.

काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी २०२१ च्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याची शक्यता फेटाळून लावली होती. परीक्षा निश्चितपणे होणारच असे त्यांनी स्पष्ट केले होते. आता सीबीएसईमार्फत बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यासह स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरही (SOP) देखील तयार करण्यात आले आहे.

बोर्डाने सांगितलं आहे की बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा १ जानेवारी २०२१ ते ८ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान होणार आहे. मात्र तारखांवर अद्याप अंतिम निर्णय होणं शिल्लक आहे. यानंतर प्रॅक्टिकल परीक्षांचे अंतिम वेळापत्रकाचे अंतिम नोटिफिकेशन जारी केले जाईल.

कशा होणार प्रॅक्टिकल परीक्षा?

बोर्डाने यासंबंधातील एसओपी तयार केले आहे. यानुसार, शाळांना प्रॅक्टिकल परीक्षांसाठी बोर्डाद्वारे विविध तारखा पाठवण्यात येतील. त्या तारखांमध्ये शाळांनी या परीक्षा घेणे अपेक्षित आहे. बोर्डाकडून एक पर्यवेक्षक शाळांमध्ये परीक्षांच्या वेळी उपस्थित असेल.

दरम्यान, २०२१ च्या बोर्डाच्या परीक्षांची तयारी सुरू आहे. सर्व गोष्टी नियोजनानुसार घडल्या तर परीक्षा नियोजित वेळेतच होतील, असे बोर्डाने सांगितले आहे.


CBSE Board Exam 2020

CBSE Board Exam 2020 : CBSE Board Exams 2021: सीबीएसई बोर्डाची इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा होणार की होणार नाही याविषयीच्या सर्व शंकाकुशंकांना बोर्डाने पूर्णविराम दिला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावी, बारावीची बोर्ड परीक्षा आयोजित करणार आहे आणि लवकरच परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी ही माहिती दिली.

लवकरच सीबीएसईच्या संकेतस्थळावर cbse.nic.in वर याबाबतची सविस्तर माहिती अपडेट केली जाणार आहे. त्रिपाठी म्हणाले, ‘बोर्ड परीक्षा निश्चित स्वरुपात होणार आणि लवकरच कार्यक्रम घोषित केला जाणार. सीबीएसई यासंदर्भातील योजना बनवत आहे.’

‘मार्च-एप्रिल दरम्यान आम्ही आमची पुढील वाटचाल समोर ठेवली होती. आमच्या शाळा आणि शिक्षकांनी बदल स्विकारला. शैक्षणिक उद्दिष्टांसाठी नव्या तंत्रांचा वापर करण्याचे प्रशिक्षण घेतले. काही महिन्यातच ऑनलाइन वर्ग सुरु झाले. अॅप्स आले,’ असेही त्रिपाठी म्हणाले.

अंतिम तारखांचे स्वरुप स्पष्ट नाही

पुढील वर्षी सीबीएसई बोर्ड परीक्षा होणार हे नक्की असले तरी अद्याप अंतिम तारखा निश्चित झालेल्या नाहीत. परीक्षा कशा पद्धतीने होणार याबाबतची देखील कोणतीही माहिती वा घोषणा करण्यात आलेली नाही. सर्वसाधारणपणे बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवार आणि मार्च महिन्यात आयोजित केल्या जातात.

आतापर्यंत गुजरात आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांनी कोविड -१९ महामारी आणि त्यामुळे झालेलं चालू शैक्षणिक वर्षाचं नुकसान लक्षात घेऊन दहावी, बारावी बोर्ड परीक्षा मे महिन्यापर्यंत पु्ढे ढकलल्या आहेत. चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे करोना महामारीमुळे खूप नुकसान झाले आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे, काही शाळांनी तेही विलंबाने सुरू केले. दहावी, बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू होण्याबाबतही समानता नाही. काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत तर काही ठिकाणी बंद आहेत. परिणामी या दोन राज्यांनी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

सोर्स : म. टा.


CBSE 12th Class Improvement Exam 2020:

सीबीएसई बारावीची श्रेणीसुधार परीक्षा सप्टेंबरमध्ये

CBSE 12th Class Improvement Exam 2020: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईची इयत्ता बारावीची श्रेणीसुधार परीक्षी सप्टेंबर महिन्यात होणार आहे. सीबीएसई बोर्डाने ही माहिती दिली. ही परीक्षा कोविड – १९ महामारीमुळे रद्द झाली होती. गेल्या महिन्यात तिचा निकाल जाहीर झाला आहे. दरम्यान, सीबीएसई दहावी, बारावीच्या फेरपरीक्षादेखील सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

ऑनलाइन शिक्षणाचे व्यासपीठ होणार आता सहजपणे उपलब्ध! 

‘ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बारावीच्या गुणांमध्ये किंवा श्रेणीमध्ये सुधारणा करायची आहे त्यांच्यासाठी सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऐच्छिक आहे. यासोबतच दहावी आणि बारावीची कम्पार्टमेंट परीक्षा (फेरपरीक्षा) देखील सप्टेंबरमध्ये होणार आहे. परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर होतील,’ असे सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक सन्यम भारद्वाज म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना जे गुण मिळतील ते अंतिम असतील. नियमित विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळांमार्फत अर्ज करायचे आहेत, तर खासगीरित्या परीक्षा देणारे विद्यार्थी थेट बोर्डाच्या संकेतस्थळावरील लिंकवरून अर्ज करू शकतील. २२ ऑगस्टपर्यंत ही अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे.’

विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वर्षाच्या कालावधीतल्या सिलॅबसमधील प्रश्न येतील. विद्यार्थ्यांनी पात्रता निकष, उत्तीर्णतेचे निकष, अभ्यासक्रम आणि योजनेची संपूर्ण माहिती घेऊन मगच परीक्षेसाठी अर्ज करावा असेही भारद्वाज यांनी सांगितले.
यावर्षी सीबीएसई बारावीत विद्यार्थिनींचे उत्तीर्णतेचे प्रमाण विद्यार्थ्यांच्या तुलनेत सुमारे सहा टक्के अधिक आहे. निकालाची एकूण टक्केवारी ५.३८ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्यावर्षीचा बारावीचा निकाल ८३.४० टक्के होता तर यावर्षी तो ८८.७८ टक्के आहे.

CBSE Compartment Exam 2020

CBSE Compartment Exam 2020: The Central Board of Secondary Education has conducted the compartment examination (re-examination) of Class X and XII. The link to fill the application for this exam has been started. Students who have failed in one or more subjects and their X or XII results have been declared as compartments, can apply online for this exam. Candidates will be able to apply online for compartment examination till 5 pm on August 20.

सीबीएसई दहावी, बारावी कंपार्टमेंट परीक्षा सप्टेंबरमध्ये

CBSE Compartment Exam 2020: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षेचे (फेरपरीक्षा) आयोजन केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची लिंक सुरु करण्यात आली आहे. जे विद्यार्थी एक किंवा अधिक विषयांत अनुत्तीर्ण झाले आहेत आणि त्यांचा दहावी किंवा बारावीचा निकाल कंपार्टमेंट म्हणून जाहीर करण्यात आला आहे, असे विद्यार्थी या परीक्षेसाठी ऑलाइन अर्ज करू शकतात. उमेदवार कंपार्टमेंट परीक्षेसाठी २० ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.

दहावी, बारावी उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

सीबीएसईने आपल्या निवेदनात म्हटले आहे की ‘कंपार्टमेंट परीक्षा सप्टेंबर महिन्यात आयोजित केली जाईल. परीक्षेची तारीख लवकरच घोषित केली जाईल.’ नियमित विद्यार्थी आपल्या शाळेच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. मात्र, खासगी स्तरावर उमेदवार सीबीएसईचे अधिकृत संकेतस्थळ www.cbse.nic.in वर जाऊन थेट अर्ज करू शकतात. सीबीएसई कंपार्टमेंट परीक्षेसाठी अर्ज तेव्हाच स्वीकारले जातील जेव्हा विद्यार्थी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेच्या आधी अर्जाचे शुल्क जमा करतील. परीक्षा अर्ज, परीक्षा शुल्क आदी अर्जाशी संबंधित सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

यावर्षी सीबीएसई बारावीत ८७,६५१ विद्यार्थ्यांना कंपार्टमेंटसाठी पात्र हा शेरा मिळालेला आहे. यावर्षी बारावीचा निकाल ८८.७८ टक्के लागला होता. दहावीचे १,५०,१९८ विद्यार्थी कंपार्टमेंटसाठी पात्र आहेत. बोर्डाने दहावीचा निकाल १५ जुलै रोजी जारी केला होता. दहावीचा निकाल यंदा ९१.४६ टक्के लागला होता.

दरम्यान, देशभरातून एकूण सुमारे ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सीबीएसई फेरपरीक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून सीबीएसईच्या फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयाची दखल घेऊन (स्यू मोटो) सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. कोविड – १९ महामारी काळात परीक्षा घेण्याचा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय विद्यार्थी हिताचा नाही, असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!