‘सीबीएसई’च्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षा सुरू – CBSE Exams 2025

CBSE Board Exams Timetable 205

CBSE Exams 2025 – The CBSE and the State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) had announced the dates for class 10 and 12 board exams. According to the schedule announced by these two boards, the entire month of February and half of March will be spent in the busyness of the exams. CBSE class 10-12 exams will begin from February. The state board class 12 exams will begin on February 11 and the class 10 exams will begin on February 21.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

‘सीबीएसई’च्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षा सुरू

सीबीएसई आणि राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. या दोन्ही बोर्डान जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, संपूर्ण फेब्रुवारी महिना आणि अर्धा मार्च महिना परीक्षांच्या व्यस्ततेतच जाणार आहे. सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. तर, राज्य बोर्डाची बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून आणि दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

  • सीबीएसईने २० नोव्हेंबर रोजी रात्रीच आपले दहावी-बारावीची परीक्षा फेब्रुवारीत वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. सीबीएसईने दोन पेपरदरम्यान विद्यार्थ्यांना भरपूर वेळ दिला आहे.
  • प्रवेश परीक्षा लक्षात घेता, नियोजन – सीबीएसईने २० नोव्हेंबर रोजी आपले वेळापत्रक जाहीर केले होते. बोर्डाने वेळापत्रक नियोजनात प्रवेश परीक्षांची शक्यता विचारात घेतली असून, विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा, यासाठी प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असल्याने अभ्यास आणि मानसिक स्वास्थ्य व्यवस्थापनावर भर देण्याचे आवाहन शिक्षक व पालकांकडून केले जात आहे.

CBSE Exams 2025 – The Central Board of Secondary Education (CBSE) will develop a ‘parenting calendar’ for parents to create harmony between schools and parents. The CBSE has appointed a 10-member committee to submit its recommendations by March 15.

सीबीएसईकडून ‘पेरेंटिंग कॅलेंडर’ दहा सदस्यीय समितीची नियुक्ती

शाळा आणि पालक यांच्यात सुसंवाद निर्माण होण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) पालकांसाठी दिनदर्शिका (‘पेरेंटिंग कॅलेंडर’) विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सीबीएसईने दहा सदस्यीय समिती नियुक्त केली असून, या समितीला १५ मार्चपर्यंत शिफारशी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • सीबीएसईचे सचिव हिमांशू गुप्ता यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर पालक-शाळा यांच्यातील सहकार्य वाढण्याची गरज आहे. त्यात पालक, शिक्षक यांच्यातील संवाद, विद्यार्थ्यांच्या गरजांची पूर्तता करणे, पौगंडावस्था, विशेष गरजा असलेले विद्यार्थी, बाल आणि मध्यमवयीन मुलांचा वयोगट, परीक्षा, वागणुकीतील बदल अशा महत्त्वाच्या घडामोडी हाताळण्यासाठी संवादाची चौकट तयार करणे, रचनात्मक पद्धतीने मध्यस्थी करून उपाय करणे ही पालकांसाठीच्या दिनदर्शिकेची उद्दिष्ट्ये असल्याचे नमूद करण्यात आले आहे…
  • शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये ही दिनदर्शिका विकसित करण्यात येणार आहे. देशभरातील वेगवेगळ्या शाळांतील दहा शाळांच्या मुख्याध्यापकांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. दिल्लीतील सरदार पटेल विद्यालयाच्या प्राचार्या अनुराधा जोशी या समितीच्या समन्वयक आहेत.

CBSE Exams 2025 – The Central Board of Secondary Education (CBSE) has issued instructions for internal grades and marks for class 12 exams for the academic year 2024-25. Accordingly, schools will be able to fill the internal grade and marks of class 12 students on the website till February 14, and if there is a delay or error in filling the internal grade, marks, it will not be corrected.

सीबीएसई बारावीचे अंतर्गत गुण भरण्यासाठी १४ फेब्रुवारीची मुदत

  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या बारावीच्या परीक्षेसाठी अंतर्गत श्रेणी, गुण देण्यासंदर्भातील सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शाळांना बारावीच्या विद्यार्थ्यांची अंतर्गत श्रेणी, गुण १४ फेब्रुवारीपर्यंत संकेतस्थळावर भरता येणार असून, अंतर्गत श्रेणी, गुण भरताना विलंब झाल्यास किंवा त्यात त्रुटी राहिल्यास ती दुरुस्त करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
    सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी याबाबतच्या सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. सीबीएसईची दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत, तर बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ४ एप्रिल या कालावधीत होणार आहे. या अनुषंगाने शाळा स्तरावरील प्रात्यक्षिक, प्रकल्प परीक्षांचे गुण, श्रेणी भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सीबीएसईने शाळांना सूचना दिल्या आहेत. शाळांना अंतर्गत श्रेणी, गुण भरण्यासाठीचे संकेतस्थळ १४ फेब्रुवारीपर्यंत खुले ठेवण्यात येणार आहे.
    शाळांनी संकेतस्थळावर गुण भरताना दक्षता घ्यावी, आधीच पडताळणी करावी. संकेतस्थळावर एकदा गुण, श्रेणी भरल्यानंतर त्यात दुरुस्ती, संपादन करता येणार नाही. अंतर्गत श्रेणी, गुणांची जबाबदारी शाळांची आहे. त्यामुळे श्रेणी, गुण योग्य असल्याची खातरजमा करून ही शाळांचीच घेणे जबाबदारी आहे.

CBSE Additional Question Bank

OFFICIAL WEBSITE


The Central Board of Secondary Education (CBSE) will conduct the practical examination of class 10 and 12 on January 1 and the written examination on February 15. The details have been released on the official website of the board. According to the CBSE notice, at least 75 per cent attendance of students is required to appear for the board exams. Only medical emergencies, participation in national or international sporting events and other serious reasons will be exempted by 25 per cent. The board made it clear that the necessary documents should be submitted for the purpose.

सीबीएसईची दहावी, बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीला –  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या १० वी आणि १२ वीची प्रात्यक्षिक परीक्षा १ जानेवारी आणि लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जारी करण्यात आली आहे. सीबीएसईच्या नोटीसनुसार, बोर्डाच्या परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांची किमान ७५ टक्के उपस्थिती आवश्यक आहे. केवळ वैद्यकीय आणीबाणी, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग आणि इतर गंभीर कारणांसाठी २५ टक्के सूट दिली जाईल. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे बोर्डाने स्पष्ट केले.


CBSE Exams 2024 Updates – The Central Board of Secondary Education (CBSE) class 11 and 12 board exams will now examine how much clarity there is among students about the concepts in the syllabus. For this, the CBSE has clarified that the method of question paper will be changed from the academic year 2024-25.

CBSE has already started accepting changes as per the new National Education Policy. More questions will be asked that emphasize that students have clarity of concepts in the curriculum and develop the necessary competencies. Thus, CBSE has started making changes in the question paper. In this regard, the format of the question paper will also be changed. Under this, multiple choice questions in class 11 and 12 exams will be increased. Similarly, the number of multiple choice questions, source-based combined questions and other questions will be increased by 40 to 50 per cent, while the number of short and long answers will be reduced by 30 to 40 per cent.

सीबीएसई ११ वी, १२ वीच्या परीक्षा पद्धतीत होणार बदल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अकरावी, बारावीच्या परीक्षांमधून आता अभ्यासक्रमातील संकल्पनांबाबत विद्यार्थ्यामध्ये कितपत स्पष्टता आली आहे, हे तपासण्यात येणार आहे. यासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून प्रश्नपत्रिकेच्या पद्धतीत बदल केला जाणार असल्याचे ‘सीबीएसई’ने स्पष्ट केले.

  • नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सीबीएसईने यापूर्वीच बदल स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. अभ्यासक्रमांतील संकल्पनांची स्पष्टता विद्यार्थ्यांना यावी आणि त्यासाठी आवश्यक क्षमता त्यांच्यात विकसित व्हावी, यावर भर देणारे प्रश्न अधिक विचारले जाणार आहेत. याप्रकारे प्रश्नपत्रिकेत बदल करण्यास सीबीएसईने सुरूवात केली आहे. त्यादृष्टीने प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपातही बदल केला जाणार आहे. या अंतर्गत अकरावी- बारावीच्या परीक्षेतील बहुपर्यायी प्रश्न वाढविण्यात येतील. त्याचप्रमाणे बहुपर्यायी प्रश्न, स्रोत आधारित एकत्रित प्रश्न आणि अन्य प्रश्नांचे प्रमाण ४० ते ५० टक्क्यांनी वाढविणार आहेत तर लघु लघु आणि दीर्घ उत्तरे लिहिणे अपेक्षित असणाऱ्या प्रश्नांची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी कमी करण्यात येईल, असे ‘सीबीएसई ने स्पष्ट केले आहे.
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या ( २०२०) अनुषंगाने सीबीएसईने महत्त्वपूर्ण धोरणाच्या (२०१२) पावले उचलली आहेत. त्यानुसार शाळांमध्ये क्षमतेवर आधारित शिक्षणावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यता, क्रिटिकल आणि सिस्टिम थिंकिंग निर्माण व्हावी, त्यादृष्टीने बदल करण्यात येत आहेत. अकरावी-बारावीच्या परीक्षेत वास्तविक जीवनातील संकल्पनांच्या वापराचे मूल्यांकन करण्यासाठी आवश्यक त्या क्षमतेवर आधारित प्रश्नांची टक्केवारी वाढविणार आहे. – जोसेफ इमॅन्युअल, संचालक (शैक्षणिक), केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ

CBSE Date Sheet 2024 | CBSE Board Exams Timetable 2024 – The Central Board of Secondary Education (CBSE) has released the schedule for class 10 and class 12 board exams 2024. As per the schedule, the CBSE Class 10 and 12 board exams for the academic year 2023-24 will begin from February 15, 2024 and will end on April 2, 2024. While cbse has not advertised the official dates of these exams, the schedule will be available on the official website soon.

The dates of cbse 10th-12th important exam are given in the following table. Parents and students should please keep in mind that the following schedule will be for CBSE written exams only. Cbse Class 12 practical exams and class 10 internal exam dates will be communicated to students by individual schools. Also, for private students, cbse 2024 exam dates will remain the same. Separate dates will not be announced for private candidates appearing for cbse board exams.

सीबीएसई २०२४, १०वी आणि १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून…?

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच, सीबीएसईने २०२४ च्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या, CBSE च्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होणार असून, २ एप्रिल २०२४ ला रोजी परीक्षा संपणार आहे. CBSE च्या वतीने या परीक्षांच्या अधिकृत तारखांची जाहिरात करण्यात आली नसली तरी, हे वेळापत्रक लवकरच अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे.

CBSE १०वी-१२वीच्या महत्त्वाच्या परीक्षेच्या तारखा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत. खालील वेळापत्रक हे केवळ सीबीएसईच्या लेखी परीक्षेसाठी असणार आहे, हे पालक आणि विद्यार्थ्यांनी कृपया लक्षात ठेवणे गरजेचे आहे. CBSE बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा आणि दहावीच्या अंतर्गत परीक्षेच्या तारखा वैयक्तिक शाळांद्वारे विद्यार्थ्यांना कळवल्या जातील. तसेच, खाजगी विद्यार्थ्यांसाठी, CBSE 2024 ची परीक्षेच्या तारखा समान राहील. CBSE बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या खाजगी उमेदवारांसाठी स्वतंत्र तारखा जाहीर केल्या जाणार नाहीत.

CBSE Board Exams Timetable 2024

CBSE 2024 चे वेळापत्रक खाली देण्यात आले आहे :

सीबीएसई २०२४ दहावीचे वेळापत्रक :

  • हिंदी : २१ फेबृवारी २०२४
  • इंग्रजी : २६ फेब्रुवारी २०२४
  • विज्ञान : २ मार्च २०२४
  • सामाजिक विज्ञान : ७ मार्च २०२४
  • गणित : ११ मार्च २०२४

सीबीएसई २०२४ बारावीचे वेळापत्रक :

  • इंग्रजी : २२ फेब्रुवारी २०२४
  • गणित : २२ फेब्रुवारी २०२४
  • भौतिकशास्त्र : ९ मार्च २०२४
  • रसायनशास्त्र 4-मार्च
  • जीवशास्त्र: ९ मार्च २०२४
  • व्यवसाय अभ्यास : २७ मार्च २०२४
  • अकाउंटन्सी : २३ मार्च २०२४
  • अर्थशास्त्र : १८ मार्च २०२४
  • शारीरिक शिक्षण : १२ मार्च २०२४
  • इतिहास : २८ मार्च २०२४
  • राज्यशास्त्र : २२ मार्च २०२४
  • मानसशास्त्र : १५ मार्च २०२४

बोर्ड परीक्षांची तपशीलवार वेळापत्रक तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर भेट द्या. विद्यार्थी CBSE दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२४ साठी अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वरून PDF देखील डाउनलोड करू शकतात. CBSE १० वी आणि १२ वी २०२४ च्या बोर्डाच्या परीक्षांचे निकाल मे २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होईल.
महत्त्वाचे : सदरचे वेळापत्रक हे सीबीएसईच्या वतीने शाळांच्या मुख्याध्यापकांना महितीसाठी दिले आहे. बोर्डाच्या परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक लवकरच सीबीएसई च्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे मूळ वेळापत्रकात वरील वेळापत्रकाच्या तुलनेत बादल असण्याची महत्त्वाचे : सदरचे वेळापत्रक हे सीबीएसईच्या वतीने शाळांच्या मुख्याध्यापकांना महितीसाठी दिले आहे. बोर्डाच्या परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक लवकरच सीबीएसई च्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे मूळ वेळापत्रकात वरील वेळापत्रकाच्या तुलनेत बादल असण्याची शक्यता आहे.

cbse


CBSE Exams 2024 Updates is that CBSE results remove grading system now  onwards. The Central Board of Secondary Education (CBSE) has decided to discontinue grades and special proficiency. The total percentage of students will not even be told, said CBSE Controller of Examinations. Patience Bhardwaj said. It will be implemented from 2024. CBSE’s class 10 and 12 main written exams will begin from 15th  February 2024. Bhardwaj said he has been informed that students, schools and teachers should take note of these changes. If the students have appeared for more than five subjects, then the best five subjects will be selected. Schools and colleges will have the right to choose these subjects.

सीबीएसईच्या निकालातून श्रेणी पद्धत बाद

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) श्रेणी, विशेष प्रावीण्य बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना एकूण टक्केवारीही सांगितली जाणार नाही, अशी माहिती ‘सीबीएसई’चे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी दिली. २०२४पासून याची अंबलबजावणी होणार आहे.
सीबीएसईची दहावी आणि बारावीची मुख्य लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.. त्यामुळे या बदलांची विद्यार्थी, शाळा, शिक्षकांनी नोंद घ्यावी, यासाठी ही माहिती दिल्याचे भारद्वाज यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी पाचपेक्षा जास्त विषयांची परीक्षा दिली असल्यास त्यातील सर्वोत्तम पाच विषय निवडण्यात येतील. हे विषय निवडण्याचे अधिकार शाळा, कॉलेजना असतील.


CBSE Board Exam 2023 – The Central Board of Secondary Education (CBSE) has extended the deadline for registration for Class 9 and Class 11 for Board Examination 2024. As per revised schedule, students can now register till 25th October 2023. The CBSE board has announced the schedule for the 10th-12th exams. However, the detailed schedule has not been announced yet. The final schedule is expected to be announced by the board on the official website in the last week of October. Candidates Read the complete details given below on this page regarding and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक CBSE मंडळाने जाहीर केले आहे. मात्र, सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मंडळाकडून अधिकृत वेबसाइटवर अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे मानले जाते.

सीबीएसई बोर्डाने ९ वी आणि ११ वी नोंदणीची तारीख वाढवली; आता या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बोर्ड परीक्षा २०२४ साठी इयत्ता ९ वी आणि ११ वी साठी नोंदणीची अंतिम मुदत वाढवली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, विद्यार्थ्यांना आता २५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. शाळेचे अधिकारी अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जाऊन नवीन वेळापत्रक तपासू शकतात. सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर याबद्दलचा तपशील देण्यात आला आहे. शिवाय, बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांनी एलओसीमध्ये (List Of candidates) मध्ये सादर केलेल्या विषयांमध्ये कोणतेही बदल या विवित तारखेपर्यंत स्वीकारले जातील. सोबतच, सीबीएसईने शाळांना विद्यार्थ्यांचे आणि विषयांचे तपशील काळजीपूर्वक सादर करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. कारण त्यानंतर पुनरावृत्तीची संधी दिली जाणार नाही.

सीबीएसईने १७ ऑगस्ट, ६ सप्टेंबर, २० सप्टेंबर आणि २६ सप्टेंबर यादीवशी ४ अधिसूचना जाहीर केल्या होत्या ज्यामध्ये शाळांना त्यांचा डेटा पूर्ण करण्यास आणि विद्यार्थी आणि विषयांचा तपशील LOC मध्ये योग्यरित्या भरण्यास सांगितले होते. त्यानंतर, एलओसी सादर केल्यानंतर विषय दुरुस्तीचा कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नाही, असेही यात नमूद करण्यात आले.

CBSE ९ वी आणि ११ वीसाठी नोंदणी कशी करावी :

  • – सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
  • – यानंतर नोंदणी लिंकवर क्लिक करा.
  • – सर्व तपशील भरा आणि सबमिट करा.
  • – कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
  • – यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

CBSE


The CBSE Board Prelims will begin in a few months. This is a great opportunity when candidates can not only understand the new pattern by downloading the sample papers but also prepare accordingly. CBSE Board has made many major changes in the 2024 paper pattern. The board has released a set of sample papers for students to understand this new paper pattern. With the help of these sample papers, students (10th and 12th) can easily know what type of questions will be asked in this year’s exam and what will be their marking scheme. Central Board of Secondary Education has released the new pattern on its website. The biggest change this time is that now 50 percent of the questions will be competency based. Candidates Read the complete details given below on this page regarding and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

CBSE Exams 2024 : 10वी-12वीच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठा बदल; कसा असेल पेपर अन् मार्किंग स्कीम?

CBSE बोर्डाने 2024 च्या पेपर पॅटर्नमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. विद्यार्थ्यांना हे नवीन पेपर पॅटर्न समजावेत यासाठी बोर्डाने सॅम्पल पेपर्सचा सेट जारी केला आहे. या सॅम्पल पेपर्सच्या मदतीने विद्यार्थ्यांना (10 वी आणि 12 वी) या वर्षीच्या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि त्यांची मार्किंग स्कीम काय असेल हे सहजपणे कळू शकेल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आपल्या वेबसाईटवर नवीन नमुने जारी केले आहेत. यावेळी सर्वात मोठा बदल म्हणजे आता 50 टक्के प्रश्न कॉम्पिटेन्सीवर आधारित असतील. बोर्डाच्या पूर्व परीक्षा काही महिन्यांत सुरू होणार आहेत. ही उत्तम संधी आहे जेव्हा उमेदवार नमुना पेपर डाउनलोड करून नवीन पॅटर्न समजून घेऊ शकत नाहीत तर त्यानुसार तयारी देखील करू शकतात. नवीनतम अद्यतनांसाठी वेबसाईटला भेट देत रहा.

  1. येथून तपासू शकता – जे विद्यार्थी या वर्षीच्या परीक्षेला बसले आहेत ते अधिकृत वेबसाईटवरून PDF डाऊनलोड करू शकतात. पेपर पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना cbseacademic.nic.in. या साईटवर जावे लागेल.
  2. ‘हे’ मोठे बदल आहेत? – जर आपण नवीन परीक्षा पद्धतीबद्दल बोललो तर आता अधिक विश्लेषणात्मक (Analitical), संकल्पनेवर आधारित प्रश्न (Concept based questions) येतील. प्रश्नांची विविधता MCQ, लहान उत्तरे आणि थोडक्यात उत्तरे सारखीच राहतील. जवळपास 50 टक्के प्रश्नांचे MCQ मध्ये रूपांतर करण्यात आले असून त्यांना एक ते दोन गुण आहेत. तुम्ही वेबसाइटवरून नमुना पेपर आणि मार्किंग स्कीम दोन्ही तपासू शकता.

CBSE Old Question Bank Download Link

असे डाउनलोड करा

  1. नवीन नमुना पेपर डाउनलोड करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाईटवर cbseacademic.nic.in. या वेबसाईटला भेट द्या.
  2. येथे मुख्यपृष्ठावर, प्रश्नावली (Question Bank) नावाचा विभाग शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  3. येथून अतिरिक्त सराव प्रश्नांवर जा आणि क्लिक करा.
  4. असे केल्याने एक नवीन पेज उघडेल. या पृष्ठावर तुम्हाला अतिरिक्त सराव प्रश्न दिसतील.
  5. विषयानुसार ते येथून डाउनलोड करा आणि तपासा.
  6. आता यावेळेस कोणते प्रश्न येतील ते कळेल.

CBSE Additional Question Bank


CBSE will conduct Board examinations for the academic year 2023-24 for classes 10th and 12th from the 15th of February 2024 onwards. These examinations will be conducted for a period of approximately 55 days and are expected to conclude by the 10th of April 2024. All the organisations holding any examinations are requested to fix the dates of their examinations keeping in view the above said schedule of Board examinations. Candidates Read the complete details given below on this page regarding and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

CBSE बोर्डाने प्रसिद्ध केले 10 वी आणि 12 वी साठी सँपल पेपर

CBSE Board has released sample papers for 10th and 12th Exam 2024. Students who are going to appear for CBSE board 10th or 12th exam in 2024 can download this paper to understand the exam pattern. How the marking is done in each subject i.e. what criteria are used to give marks, what the board expects to write in the paper, students can get an idea from the sample paper.

 

CBSE सीबीएसई बोर्डाने 10 वी आणि 12 वी साठी सँपल पेपर प्रसिद्ध केले आहेत. जे विद्यार्थी 2024 मध्ये सीबीएसई बोर्डाची 10 वी किंवा 12 वीची परीक्षा देणार आहेत ते विद्यार्थी हे पेपर डाऊनलोड करून परीक्षेचे स्वरुप समजून घेऊ शकतील. प्रत्येक विषयात कशा प्रकारे मार्किंग केले जाते अर्थात गुण देण्यासाठी कोणते निकष वापरले जातात, पेपरमध्ये काय लिहिणे बोर्डाला अपेक्षित आहे याचा अंदाज विद्यार्थ्यांना सँपल पेपर बघून येईल.

सीबीएसई परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाची घोषणा केली होती. या घोषणेनुसार सीबीएसई बोर्ड यावेळी 15 फेब्रुवारी 2024 पासून परीक्षेचे आयोजन करण्याची तयारी करत आहे. परीक्षा जवळपास 545 दिवस चालणार आहे. शेवटचा पेपर 10 एप्रिल 2024 रोजी होणार आहे.

CBSE Question Paper Download असा डाऊनलोड करा सँपल पेपर

  • https://cbseacademic.nic.in/index.html या वेबसाईटवर जा आणि Sample Question paper या टॅबवर क्लिक करा
  • SQP 2023-2024 हा पर्याय निवडा यानंतर क्लास 10 वी किंवा 12 वी यापैकी योग्य तो पर्याय निवडा
  • आपल्या 10 वी चे पेपर बघायचे असतील तर 10 वी वर क्लिक करा जर 12 वी चे पेपर बघायचे असतील तर 12 वी वर क्लिक करा
  • आता सॅम्पस क्वेश्चन पेपर (SQP) आणि मार्किंग सँपल किंवा मार्किंग स्कीम (MS) या दोन्हीच्या प्रत्येक विषयाच्या PDF File आपण विनामूल्य डाऊनलोड करून बघू शकता

CBSE 10th 12th Sample Paper


CBSE Board Exam Time Table: The Central Board of Secondary Education (CBSE) has announced the dates for the 10th, 12th board exams for the academic session 2022-23. The board exam will start from 15 February 2023. The board has informed that the CBSE exams will continue till April 5, 2023.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने(CBSE) शैक्षणिक सत्र 2022-23 साठी 10वी, 12वी च्या बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 15 फेब्रुवारी 2023 पासून बोर्डाच्या परिक्षेला सुरवात होणार आहे. CBSE च्या परिक्षा 5 एप्रिल 2023 पर्यंत सुरु राहणार असल्याची माहीती बोर्डाने दिली आहे.

CBSE परीक्षेची तारीख पत्रक 2023: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) ने शैक्षणिक सत्र 2022-23 साठी वर्ग 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसई वर्ग १०वी बोर्ड परीक्षा १५ फेब्रुवारी, २०२३ ते २१ मार्च २०२३ पर्यंत. 12वी बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारी, 2023 ते 05 एप्रिल, 2023 पर्यंत आयोजित करण्यात आली आहे.

यापूर्वी, जेईई मेन, एनईईटी यूजी, सीयूईटी यूजी इत्यादी प्रवेश परीक्षांच्या तारखा नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएने आधीच जाहीर केल्या होत्या. त्याच वेळी, ICSE आणि ISC बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक देखील CISCI द्वारे प्रसिद्ध केले गेले होते. अशा परिस्थितीत सीबीएसईच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक प्रलंबीत होते, जे आज जाहीर झाले आहे.

इतर परिक्षेचे वेळापत्रक लक्षात घेऊन तारखा जाहिर – CBSE ने इयत्ता 10वी, 12वी बोर्ड परीक्षेची तारीख पत्रक 2023 जाहीर करताना सांगितले की, साधारणपणे दोन्ही वर्गांमध्ये, दोन प्रमुख विषयांमधील परीक्षेत पुरेशी अंतर असणार आहे. सीबीएसईने म्हटले आहे की, इयत्ता 10वी, 12वीची तारीखपत्रक सुमारे 40 हजार विषयाचे संयोजन तयार केले आहे. जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याला एकाच तारखेला दोन विषयांसाठी उपस्थित राहावे लागणार नाही. केंद्रीय बोर्डाने पुढे सांगितले की, इयत्ता 12वीची तारीखपत्रिका तयार करताना, JEE मेन, NEET,CUET UG यासह इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या तारखांशी टक्कर होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

Circular and Date Sheet for Main Exam-2023 for Class X & XII 29/12/202


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    CBSE Exams 2024 Updates, Question Paper

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!