10th Results दहावी निकाल: दहावीच्या परीक्षेचा आज ‘निकाल’ लागणार?
SSC Board Exam Results
अकरावीची प्रवेश प्रक्रिया CET ने होणार, नेमकी कशी? जाणून घ्या प्रक्रिया…
There is still confusion about how to assess students in 10th class. Various options are being explored at the state government level and the results of 10th Class students are likely to be announced based on the examinations conducted in 11th Class and 10th Class schools.
महाराष्ट्र सरकार आज (28 मे) मुंबई उच्च न्यायालयात दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकार राज्यातील कोरोना आरोग्य संकटाची सद्यपरिस्थिती, दहावीच्या निकालाचे निकष, अकरावीचे प्रवेश कसे होणार? आणि बारावीच्या परीक्षा कधी घेणार? यासंदर्भात आपली भूमिका मांडणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत असताना दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापनाचे निकष ठरवणारा शासन निर्णय सुद्धा शालेय शिक्षण विभाग आज जारी करण्याची शक्यता आहे असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. त्यामुळे दहावीच्या 16 लाख विद्यार्थ्यांचा निकाल कसा जाहीर होईल याबाबतही आज चित्र स्पष्ट होऊ शकतं.
दहावीचे मूल्यमापन कसे होणार?
- दहावीचे मूल्यमापन म्हणजेच विद्यार्थ्यांना मार्क कसे द्यायचे यासाठी राज्य सरकार विविध पर्यायांची चाचपणी करत आहे.
- यासाठी नववी आणि दहावीच्या शालांतर्गत परीक्षांच्या आधारे दहावीचा अंतिम निकाल जाहीर करण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे समजते. यानुसार, नववीच्या चाचणी परीक्षा, सहामाही परीक्षा आणि दहावीची चाचणी, तोंडी आणि पूर्व परीक्षेचे मार्क ग्राह्य धरले जाऊ शकतात.
- यासंगर्भातील शासन निर्णय आज किंवा उद्या जाहीर होईल असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
- दहावीच्या मूल्यमापनाच्या निकषांसोबतच अकरावीचे प्रवेश याच निकालाच्या आधारावर करण्यात येणार की यासाठी राज्य सरकार वेगळे नियम जाहीर करणार हे पहाणं आता महत्त्वाचे ठरेल.
- दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कसा जाहीर करणार? असा प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गेल्या आठवड्यात फटकारलं होतं.
- अकरावीचे प्रवेश कसे होणार असाही प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला होता. त्यामुळे राज्य सरकारनच्या प्रतिज्ञापत्रानंतर मुंबई उच्च न्यायालय दहावीच्या परीक्षांबाबत काय निर्णय देणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे.
SSC Result 2020 How To Do Online Rechecking Process After 10th Result
From the second day immediately after the online result, students will be able to apply online to the concerned Divisional Board for verification of any compulsory subjects other than grades, photocopies of answer sheets and re-evaluation and migration certificate. Students and parents can apply for this on the website http://verification.mh-ssc.ac.in in person or through the school. Necessary conditions and instructions are given on the website. Fees for these procedures can also be paid online
कोविड – १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.
ऑनलाइन निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना श्रेणीव्यतिरिक्त कोणत्याही अनिवार्य विषयांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठी विद्यार्थी-पालकांना http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर स्वत: किंवा शाळेमार्फत अर्ज करता येऊ शकेल. यासाठी आवश्यक अटी व सूचना संकेतस्थळावर दिल्या आहेत. या प्रक्रियांसाठी शुल्कदेखील ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.
महत्त्वाच्या तारखा –
गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत – ३० जुलै २०२० ते ८ ऑगस्ट २०२०
छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत – ३० जुलै २०२० ते १८ ऑगस्ट २०२०
श्रेणीसुधार योजना
मार्च २०२० परीक्षेत सर्व विषयांत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन संधी श्रेणी / गुणसुधार योजनेसाठी उपलब्ध राहतील. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना आपला निकाल सुधारायचा असेल ते विद्यार्थी लगतच्या दोन परीक्षा देऊन आपली टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करू शकतील.
सीबीएसई निकालानंतर गुणपडताळणी अर्ज कसा कराल?
How to apply for marks Verification and Revaluation after CBSE Result?
CBSE 10th 12th result marks verification and revaluation detail: Central Board of Secondary Education (CBSE) results for Class X and XII have been announced. The results of Class XII have been announced on July 13 and the results of Class X have been announced on July 15. CBSE has released information regarding quality verification and re-examination for both the classes.
If you are not satisfied with the marks you got or did not get the expected marks, you have a chance to re-verify. You will also get a photocopy of your answer sheet. All three of these processes require you to apply online. We are giving detailed information about this here
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) चे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. बारावीच्या निकालाची घोषणा १३ जुलै तर दहावीच्या निकालाची घोषणा १५ जुलै रोजी झाली आहे. सीबीएसईने दोन्ही इयत्तांसाठी गुणपडताळणी आणि पुनर्तपासणीसंबंधी माहिती जारी केली आहे.
जर तुम्ही तुम्हाला मिळालेल्या गुणांनी समाधानी नसाल किंवा अपेक्षेएवढे गुण मिळाले नसतील तर तुम्हाला पुन्हा पडताळणी करण्याची संधी आहे. सोबत तुमची उत्तरपत्रिकेची छायाप्रतही तुम्हाला मिळू शकेल. या तीन्ही प्रक्रियांसाटी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. याबाबतची विस्तृत माहिती येथे देत आहोत.
गुणपडताळणी – यासाठी १७ जुलै २०२० ते २१ जुलै २०२० पर्यंत अर्ज करायचा आहे. या प्रक्रियेसाठी प्रतिविषय ५०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.
रि-ईव्हॅल्युएशन – रि-ईव्हॅल्युएशनसाठी ६ ऑगस्ट २०२० पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. ७ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. प्रति प्रश्न १०० रुपये शुल्क आकरण्यात येईल.
उत्तरपत्रिकांची छायाप्रत – उत्तरपत्रिकांची छायाप्रत मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १ ऑगस्ट २०२० पासून सुरू होणार आहे. विद्यार्थी २ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करायचे आहेत. प्रति उत्तरपत्रिका ७०० रुपये शुल्क आहे. जे विद्यार्थी गुण पडताळणीसाठी अर्ज करणार, त्यांनाच केवळ त्या विषयाच्या उत्तपत्रिका छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे.
सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर
कसा करायचा अर्ज?
या तिन्ही प्रक्रियांसाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. cbse.nic.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अर्जाचे शुल्क क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग द्वारे भरता येईल. ऑफलाइन अर्ज किंवा ऑफलाइन शुल्काचा स्वीकार केला जाणार नाही.
कमीदेखील होऊ शकतील गुण
बोर्डाने यासंबंधी जारी केलेल्या नोटीशीत म्हटलं आहे की रिव्हॅल्युएशन किंवा गुणपडताळीदरम्यान तुमचे गुण वाढू शकतात किंवा कमीदेखील होऊ शकतात. निकाल काहीही असला तरी विद्यार्थ्यांचा निकाल नव्या गुणांद्वारेच ग्राह्य धरण्यात येईल. जो निकाल येईल गुणपडताळणीचा तो विद्यार्थ्यांना स्वीकारावा लागेल. गुणांमध्ये कोणताही बदल झाल्यावर जुनी गुणपत्रिका सरेंडर करावी लागेल. बोर्ड बदललेल्या गुणनुसार नवी मार्कशीट देईल.
सीबीएसईची गुणपडताळणीसंबंधीची सूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सीबीएसईच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.