CAT 2024: कॅटचा निकाल जाहीर! ‘इतक्या’ विद्यार्थ्यांनी मिळवले १०० टक्के गुण, वाचा सविस्तर माहिती फक्त एका क्लिकवर
CAT Result 2024: कॅट परीक्षेचा निकाल जाहीर
The Indian Institute of Management, Calcutta has declared the CAT Result 2024. Candidates can now download their scorecard by logging on to cat 2024 website iimcat.ac.in. A total of 14 candidates have scored 100 per cent marks this year, including one girl and 13 boys. Of these 14 candidates, 1 is non-engineer and 13 are engineer candidates.
CAT 2024 Score Card is live now. Candidates can download their scorecards by logging into the CAT 2024 website (https://iimcat.ac.in), using the CAT application login id and password.
Please be aware that this (https://iimcat.ac.in) is the only authentic website for CAT 2024, as has been publicly advertised, and there is no other website for information or registration/submission of the CAT 2024 application form.
कॅटचा निकाल जाहीर! ‘इतक्या’ विद्यार्थ्यांनी मिळवले १०० टक्के गुण, वाचा सविस्तर माहिती फक्त एका क्लिकवर
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कलकत्ता यांनी CAT निकाल २०२४ जाहीर केला आहे. CAT 2024 ची वेबसाइट iimcat.ac.in वर लॉग इन करून उमेदवार आता त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात. कॅटच्या या निकालाच यावर्षी एकूण १४ उमेदवारांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत, ज्यात १ मुलगी आणि १३ मुलांचा समावेश आहे. या १४ उमेदवारांपैकी १ नॉन इंजिनियर आणि १३ इंजिनियर उमेदवार आहेत.
- CAT निकाल २०२४ मध्ये १०० टक्के गुण मिळविणारे सर्वाधिक उमेदवार महाराष्ट्राचे आहेत, त्यानंतर दोन तेलंगणातील आणि आंध्र प्रदेश, दिल्ली, हरियाणा, केरळ, मध्यप्रदेश, ओडिशा, उत्तरप्रदेशतील प्रत्येकी १ उमेदवार आहे.
- २९ उमेदवारांनी ९९.९९ टक्के गुण मिळवले, यात २ मुली आणि २७ मुले उमेदवार आहेत. या उमेदवारांपैकी २८ इंजिनियर आणि १ नॉन इंजिनियर उमेदवार आहे.
- IIM CAT निकालात महाराष्ट्रातील उमेदवारांना सर्वाधिक ९९.९९ टक्के गुण मिळाले. महाराष्ट्रातील ५ उमेदवारांनी, कर्नाटकातील ४, राजस्थानमधील ३, दिल्ली आणि गुजरातमधील २ उमेदवारांनी ९९.९९ टक्के गुण मिळवले आहेत.
- एकूण ३० उमेदवारांनी ९९.९८ टक्के गुण मिळवले असून त्यात १ मुलगी आणि २९ मुलांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमधील चार, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमधील दोन उमेदवारांनी ९९.९८ टक्के गुण मिळवले आहेत.
Check CAT 2024 Results
- IIM CAT 2024 च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या म्हणजेच iimcat.ac.in
- आता होमपेजवर, ‘कॅन्डिडेट लॉगिन’ वर क्लिक करा.
- तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड टाका.
- तुमचे CAT 2024 स्कोअर तुमच्या स्क्रीनवर दिसतील
- काळजीपूर्वक तपासा आणि डाउनलोड करा
CAT 2024 Examine Dates
- CAT परीक्षा २४ नोव्हेंबर रोजी भारतभरात तीन सत्रांमध्ये घेण्यात आली होती. iimcat.ac.in वेबसाइटवर शेअर केलेला डेटा सूचित करतो की एकूण ३.२९ लाख नोंदणीकृत पात्र उमेदवारांपैकी सुमारे २.९३ लाख उमेदवार परीक्षेला बसले होते.
- ३.२९ लाख नोंदणीकृत पात्र उमेदवारांपैकी १.१९ लाख मुली, २.१० लाख मुलं आणि १४ ट्रान्सजेंडर उमेदवार होते.
- ३.२९ लाख नोंदणीकृत पात्र उमेदवारांपैकी, श्रेणीनिहाय (कॅटेगरीनुसार) विभाजन खालीलप्रमाणे आहे:
- General – 67.53%, EWS – 4.80%, NC-OBC – 16.91%, SC – 8.51%, ST – 2.25%, PwD (एकूण श्रेणी) – 0.44%. 2.93
- २.९३ लाख उमेदवारांपैकी General – 67.20%, EWS – 5.09%, NC-OBC – 17.5%, SC – 8.08%, ST – 2.12%, PwD (एकूण श्रेणी) – 0.41%.
- २.९३ लाख उमेदवारांपैकी १य०७ लाख मुली, १.८६ लाख मुलं आणि ९ ट्रान्सजेंडर उमेदवार होते. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार IIM CAT ची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.
CLAT 2020: Results: Indian Institute of Management, Indore (IIM Indore) has announced the results of the Common Admission Test (CAT 2020). This result is available on the official website iimcat.ac.in. Candidates who had appeared for the CAT exam should check their results by visiting the official website. For this, candidates have to login with the help of user ID and password.
CAT Result 2020: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंदूर (IIM Indore) ने कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT 2020) चा निकाल जाहीर केला आहे. अधिकृत संकेतस्थळ iimcat.ac.in वर हा निकाल उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी कॅट परीक्षा दिली होती, त्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपला निकाल पाहावा. यासाठी उमेदवारांना यूजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉगइन करावं लागेल. देशभरात विविध व्यवस्थापन संस्थांमधील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी कॅट परीक्षा घेण्यात येते.
पुढील पद्धतीने डाऊनलोड करा कॅट २०२० निकाल :
– सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ iimcat.ac.in वर जा.
– होमपेजवर Download Cat 2020 Score Card च्या लॉगइन लिंक वर क्लिक करा. आता एक नवी विंडो ओपन होईल.
– आता उमेदवारांनी आपला यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगइन करावे.
– आता उमेदवारांचे स्कोअर कार्ड स्क्रीनवर दिसेल.
– स्कोअर कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट काढून ठेवा.
आयआयएम, इंदूरने कॉमन अॅडमिशन टेस्ट म्हणजेच कॅट परीक्षा २०२० चे आयोजन २९ नोव्हेंबर २०२० रोजी केले होते. संगणकीकृत माध्यमातून एकूण तीन स्लॉटमध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे सव्वा दोन लाखांहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली. करोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक संपूर्ण खबरदारीसह, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून परीक्षा घेण्यात आली होती. दोन तासांच्या या परीक्षेत तीन विभागांत प्रश्न विचारण्यात आले होते.
CAT Exam Answer Key Released 2020
CAT Exam Answer Key 2020: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदूर (IIM Indore) ने कॉमन अॅडमिशन टेस्ट अर्थात CAT 2020 ची उत्तरतालिका (CAT 2020 Answer Key) जाहीर केली आहे. कॅट परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ही पाहता येईल. उत्तरतालिकेसोबतच आयआयएम इंदूरने कॅट रिस्पॉन्स शीटदेखील उपलब्ध केली आहे. ज्यांना या उत्तरतालिकेवर हरकत घ्यायची असेल, त्यांच्यासाठी ११ डिसेंबर २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
आयआयएम इंदूरने यासंदर्भात असं म्हटलं आहे की, ‘CAT 2020 Answer key वर हरकती नोंदवण्यासाठी लिंक ८ डिसेंबर सकाळी १० वाजल्यापासून ११ डिसेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत अॅक्टिव्ह असेल. उमेदवारांना या कालावधीत आन्सर की देखील पाहता येईल आणि हरकती असल्यास त्याही नोंदवता येतील.
CAT 2020 Answer Key कशी डाऊनलोड कराल?
– अधिकृत संकेतस्थळ iimcat.ac.in वर जा.
– रजिस्टर्ड कॅंडिडेट लॉगइनवर क्लिक करा.
– तुमचे लॉगइन क्रिडेन्शिअर वापरून लॉगइन करा.
– आता कॅट २०२० परीक्षेची उत्तरतालिक तुमच्या समोर दिसेल. ती डाऊनलोड करा.
आन्सर की मध्ये परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिलेली आहेत. त्यावरून उमेदवारांना त्यांचा संभाव्य स्कोअर काढता येईल. ११ डिसेंबर रोजी कॅट आन्सर की ची हरकती घेण्याची विंडो बंद होईल.