CAT Exam 2021-CAT 2021 च्या उमेदवारांसाठी करेक्शन विंडो खुली
CAT 2021 Window Will Open For Correction
The window has been opened for the correction of the application for CAT 2021. A link has been activated on the official website for amendment in the application of Indian Institute of Management, IIM, Ahmedabad Common Admission Test 2021 (CAT 2021). This will allow the candidates to make the desired changes in their application. For this students have to visit the official website IIM iimcat.ac.in.
CAT 2021: CAT २०२१ च्या अर्जातील दुरुस्तीसाठी विंडो खुली करण्यात आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, आयआयएम, अहमदाबाद कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१ (CAT 2021) च्या अर्जामध्ये दुरुस्तीसाठी अधिकृत वेबसाइटवर लिंक सक्रिय करण्यात आली आहे. याद्वारे उमेदवार आपल्या अर्जामध्ये इच्छित बदल करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट IIM iimcat.ac.in ला भेट द्यावी लागेल. अर्जात सुधारणा करताना उमेदवार फोटो, स्वाक्षरी आणि परीक्षा केंद्राची पसंती यामध्ये सुधारणा करु शकतील. या व्यतिरिक्त इतर कोणतेही बदल स्वीकारले जाणार नाहीत.
करेक्शन विंडो २५ सप्टेंबरपासून खुली करण्यात आली असून २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ पर्यंत खुली राहील. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. कॅट २०२१ परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया २२ सप्टेंबर २०२१ रोजी बंद करण्यात आली. त्याचबरोबर CAT 2021 ची परीक्षा २८ नोव्हेंबर रोजी घेतली जाईल. तर परीक्षेसाठी प्रवेशपत्र २७ ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल.
CAT 2021: अर्जात असे करा बदल
- CAT अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी उमेदवारांनी सर्वातआधी अधिकृत वेबसाइट IIMs iimcat.ac.in वर जा.
- यानंतर होमपेजवरील अॅप्लिकेशन करेक्शन विंडोवर क्लिक करा.
- स्क्रीनवर एक नवीन पेज खुले होईल.
- त्यानंतर क्रेडेंशियल टाकून आणि अर्जात बदल करा. पेजची प्रिंटआउट घ्या.
संस्थेने CAT परीक्षा नोंदणीसाठी शेवटची तारीख वाढविण्यात आली होती. कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT 2021) साठी १५ सप्टेंबर रोजी संपलेली नोंदणी प्रक्रिया २२ सप्टेंबर २०२१ पर्यंत करता येत होती.
Common Admission Test 2021
The deadline for registration of Common Admission Test has been extended. The registration was to end on September 15, 2021. Candidates can now apply till 5 pm on September 22, 2021.
कॉमन अॅडमिशन टेस्टच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. १५ सप्टेंबर २०२१ रोजी ही नोंदणी संपत होती. उमेदवार आता २२ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांनी अद्याप या परीक्षेसाठी अर्ज केला नाही, ते अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जाऊन नोंदणी करू शकतात. परीक्षा २८ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे.
CAT 2021 Application Fees
- कॅट परीक्षेसाठी सर्वसामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी २२०० रुपये शुल्क असेल.
- आरक्षित प्रवर्गांसाठी ११०० रुपये अर्ज शुल्क असेल.
How to Apply CAT 2021
- कॅट परीक्षेसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी कॅटच्या अधिकृत वेबसाइट- iimcat.ac.in वर जावे लागेल.
- त्यानंतर नोंदणीसाठी ‘New Registration’ टॅबवर क्लिक करा.
- यानंतर ज्यांची आधीच नोंदणी केली आहे त्यांनी ‘लॉगिन’ टॅबवर क्लिक करावे.
- यानंतर कॅट २०२१ चा अर्ज स्क्रीनवर दिसेल.
- त्यानंतर सर्व आवश्यक तपशीलासह अर्ज भरावा.
- आता स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करा.
- कॅट २०२१ अर्ज शुल्क भरा.
- यानंतर सबमिट करा.
- भरलेला अर्ज डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याचे प्रिंट आऊट घेऊन ठेवा.
The online registration process for CAT 2021 Common Admission Test has started from today i.e. on 4th August 2021 at Indian Institute of Management, Ahmedabad. Candidates who want to apply online for this exam can apply online by visiting the official website of IIM Ahmedabad iimcat.ac.in
CAT 2021 कॉमन ऍडमिशन टेस्ट साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आजपासून म्हणजेच 4 ऑगस्ट 2021 रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद येथे सुरू झाली आहे. ज्या उमेदवारांना या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे ते IIM अहमदाबादच्या अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर आहे. या व्यतिरिक्त, सामान्य प्रवेश परीक्षा 28 नोव्हेंबरला होणार आहे. परीक्षा तीन सत्रांमध्ये केंद्र-आधारित चाचणी (CBT) म्हणून घेतली जाईल.
परीक्षेसाठी असा करा ऑनलाइन अर्ज- Howt to Apply For CAT 2021
- कॅट परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम IIM अहमदाबाद iimcat.ac.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- त्यानंतर मेन पेजवर CAT 2021 नोंदणी लिंकवर क्लिक करा. त्यानंतर नोंदणी करा आणि आपला आयडी आणि पासवर्ड तयार करा.
- त्यानंतर तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. त्यानंतर CAT 2021 नोंदणी फॉर्म काळजीपूर्वक भरा.
- CAT अर्ज फी भरा आणि आपला फॉर्म सबमिट करा. फॉर्मची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी ठेवा.
या तारखा लक्षात ठेवा
- नोंदणी प्रक्रिया 4 ऑगस्ट 2021 पासून सुरू होईल
- नोंदणी प्रक्रिया 15 सप्टेंबर 2021 रोजी संपेल
- 27 ऑक्टोबर 2021 रोजी प्रवेशपत्र दिले जाईल
- प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2021 असेल
- CAT परीक्षा 28 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात येईल
- CAT परीक्षेचा निकाल जानेवारी 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल (तात्पुरती)
पात्रता- Eligibility Criteria
कॅट परीक्षेला बसण्यास इच्छुक उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे, की पदवीमध्ये कमीतकमी 50 टक्के गुण किंवा समकक्ष सीजीपीए मिळवले पाहिजे. याशिवाय पदवीच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी किंवा निकालाची वाट पाहणारे उमेदवार देखील अर्ज करू शकतात