‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ आजपासून मोहीम – Bus Pass for Student
Bus Pass for Student in School & College
Bus Pass for Student in School & College – Students now have ST passes at school; State Road Transport Corporation’s special drive from today Lakhs of students studying in schools and colleges will now be distributed passes of ST buses directly to their schools. The decision in this regard has been taken by the Maharashtra State Road Transport Corporation. With this decision, students will not have to stand in queues at bus stands for passes. In this regard, from tomorrow (December 18), the ST administration is conducting a special campaign ‘ST Pass Directly to Your School’.
Students will now get ST passes from the ongoing academic programme in schools and colleges. As a result, students will not have to stand in line all day for passes. The ‘ST Pass Directly to Your School’ campaign. It will be implemented in all depots from June 18,” said Vice President and Managing Director, ST Corporation. Madhav Kusekar said.
विद्यार्थ्यांना आता शाळेतच एसटीचे पास; राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आजपासून विशेष मोहीम
Bus Pass for Student – शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱया लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता एसटी बसचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. याबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पाससाठी बसस्थानकात रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. या संदर्भात उद्यापासून (दि. 18) एसटी प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
- नविन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66 टक्के इतकी सविलत दिली आहे. म्हणजे केवळ 33 टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनें’तर्गत बाराविपर्यंत शिक्षण घेणाऱया सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्राकर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घेतले जात असत.
- पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांचा एक दिवस वाया जात होता. तसेच शाळा व महाविद्यालयात दांडी मारावि लागत होती. त्यामुळे शैक्षणिक नुकसानही होत होते. पण यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा- महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱयांकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एस. टी. पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही.
- विद्यार्थ्यांना एस.टी.चे पास आता शाळा व महाविद्यालयांमध्ये चालू शैक्षणिक कर्षापासून मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत दिवसभर उभे राहावे लागणार नाही. ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही किशेष मोहीम दि. 18 जूनपासून सर्व आगारांत राबवण्यात येणार आहे, असे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ डॉ. माधव कुसेकर यांनी सांगितले.
- ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ आजपासून मोहीम – या संदर्भात उद्यापासून (दि. 18) एसटी प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा, महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नविन वर्षात शिकणाऱया विद्यार्थी-विद्यार्थ्यांची यादी तयार ठेकण्यास सांगितले आहे. या अभिनक योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱया लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.