BSNL Customer Service Center Outsource

BSNL Customer Service Center Outsource

BSNLमध्ये १ हजार नोकऱ्या- पुण्यात सर्वाधिक जागा

BSNL Recruitment 2020 – BSNL wants to recruiting the 1163 employees very soon on contract basis. Due to the financial loss to BSNL, BSNL decided to given voluntary recruitment while implementing a voluntary retirement plan to reduce the financial burden. As a result of the immediate effect of retirement work taken by the 8544 employees on January 31 in the state, immediate recruitment of 1163 personnel will be made in the state as an immediate solution.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

तोट्यात गेलेल्या बीएसएनएलने आर्थिक भार कमी करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती योजना राबवली असताना कंत्राटी नोकरभरती करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात ३१ जानेवारीला ८,५४४ कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या सेवानिवृत्तीचा कामावर परिणाम झाल्याने अवघ्या २० दिवसांत तातडीची उपाययोजना म्हणून राज्यात १,१६३ कर्मचाऱ्यांची तातडीने कंत्राटी नियुक्ती करण्यात येणार आहे.

स्वेच्छानिवृत्तीचा फटका बीएसएनएलच्या राज्यभरातील कामाला बसू लागला असल्याने, प्रशासनाने राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये व गोव्यात तातडीने १,१६३ कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. ही भरती ३० एप्रिलपर्यंतच्या कालावधीसाठी असून, तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले जाईल. त्यानंतर, राज्यभरातील कामाचा व कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेचा आढावा घेऊन नेमकी किती कर्मचाऱ्यांची भरती करायची, याचा निर्णय घेतला जाईल व त्याप्रमाणे, निविदा प्रक्रिया राबवून कंत्राट पद्धतीने भरती केली जाईल. बीएसएनएलचे उपमहाव्यवस्थापक (प्रशासन) के.एच.मोरे यांच्या स्वाक्षरीने हे निर्देश देण्यात आले आहेत. बीएसएनएलची सेवा विस्कळीत होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत बीएसएनएलची सेवा नसल्याने मुंबईत या टप्प्यात कोणतीही भरती करण्यात येणार नाही. मात्र, गरज भासल्यास पुढील टप्प्यात भरती प्रक्रिया राबविली जाईल, असे सांगण्यात आले.
राज्यात सर्वाधिक ११० जणांची भरती पुण्यात करण्यात येईल, तर सोलापूरमध्ये सर्वात कमी १३ जणांची भरती होईल.

कुठे किती जणांची गरज ?
पुणे- ११०, अहमदनगर- ७५,अकोला- ५५, अमरावती- ५५, औरंगाबाद- ६३, भंडारा- २४, बीड- १८, बुलडाणा- २५, चंद्रपूर- २२, धुळे- ४५, गडचिरोली- ३२, जळगाव- ५०, जालना- २४, कल्याण- ७५, कोल्हापूर- ५०, लातूर- २४, नागपूर- ५०, नांदेड- २९, नाशिक- ७५, उस्मानाबाद- २५, परभणी- २४, रायगड- ३०, रत्नागिरी- ३६, सांगली- २०, सातारा- २०, सिंधुदुर्ग- ४०, सोलापूर- १३, वर्धा- १४, यवतमाळ- २० व गोवा- २०

स्वेच्छानिवृत्त कर्मचारी : देशात ३१ जानेवारीला बीएसएनएलच्या १ लाख ५३ हजार ७८६ कर्मचाऱ्यांपैकी ७८ हजार ५६९ जणांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे. महाराष्ट्रातील १३ हजार ६७२ कर्मचाऱ्यांपैकी ८,५४४ जणांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्याने ५,१२८ जण कार्यरत आहेत.


BSNL ग्राहक सेवा केंद्र ‘आउटसोर्स’

BSNL Pune Bharti 2020 : Most of the customer service centers of BSNL in Pune will now be outsourced. The BSNL administration has informed that the employees will now be recruited by private companies instead of BSNL employees in a contractual manner. The BSNL has taken this step, with 1300 employees out of two thousand employees in Pune applying for ‘BSNL’. Read the more details given below:

BSNL 13000 Employees Retired soon

BSNL Recruitment 2020 update

BSNL Pune Bharti 2020

बीएसएनएलच्या 78,500 कर्मचाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती

पुणे – भारत दूर संचार निगमने (बीएसएनएल) सुरू केलेल्या स्वेच्छा निवृत्ती योजनेला प्रतिसाद मिळाला असून, देशातील 78 हजार 500 कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती कंपनीवे संचालक अरविंद वडनेरकर यांनी दिली.

कंपनीच्या पुणे विभागाचा आढावा घेण्यासाठी वडनेरकर आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी बीएसएनएलने तीन उपाययोजना केल्या आहेत. त्यात स्वेच्छा निवृत्ती योजना ही एक योजना होती. या योजनेत 31 जानेवारी अखेर 50 पेक्षा अधिक वय असलेल्या सुमारे 78 हजार 500 कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे आता कंपनीमध्ये 70 हजार कर्मचारी राहिले आहेत. त्यातील सुमारे 7 हजार कर्मचारी 58 ते 59 वर्षांचे आहेत. ते देखील लवकरच निवृत्त होणार आहे. त्यामुळे वर्षाला वेतनापोटी दिले जाणारे 7 हजार कोटी रुपये वाचणार आहेत. हे पैसे कंपनीच्या आर्थिक वाढीसाठी गुंतवणूक म्हणून वापरता येतील. याशिवाय लवकरच बीएसएनएलच्या मालमत्तांचा सर्व्हे करण्यात येणार असून, उपयुक्त नसलेल्या मालमत्ता विकून अथवा भाडे तत्त्वावर देण्यात येणार आहेत.

संचालक अरविंद वडनेरकर म्हणाले…
बीएसएनएलने मागितलेल्या आर्थिक पॅकेजला केंद्राने मंजुरी दिली आहे.
सुमारे पंधरा हजार कोटी रुपये उर्जितव्यवस्थेसाठी टप्याटप्याने मिळणार दि. 1 एप्रिलपासून फोर-जी सेवा सुरू करणार

बीएसएनएल विकणार नाही
बीएसएनएल विकण्यात येणार असल्याची चर्चा म्हणजे निव्वळ अफवा आहे. दिल्ली येथून या बातम्या पेरल्या गेल्या आहेत, तसे काहीही होणार नाही. उलट केंद्र सरकारने सर्वतोपरी सहकार्य करुन बीएसएनएलला फायद्यात कसे आणले जाईल यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या विविध योजना राबवण्यात येत आहेत, ते पाहता येत्या तीन ते चार वर्षांत नक्कीच बीएसएनएलला उर्जितावस्था येईल, असेही अरविंद वडनेरकर म्हणाले.


भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) पुण्यात असलेली बहुतांश ग्राहक सेवा केंद्रे आता आउटसोर्स केली जाणार आहेत. बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांऐवजी खासगी कंपन्यांद्वारे कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असून, हे कर्मचारी आता ग्राहकांना ‘बीएसएनएल’च्या सेवा पुरवणार असल्याची माहिती ‘बीएसएनएल’ प्रशासनाने दिली. ‘बीएसएनएल’साठी लागू केलेल्या ‘व्हीआरएस’ योजनेत पुण्यातील दोन हजार कर्मचाऱ्यांपैकी तेराशे कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने ‘बीएसएनएल’ने हे पाऊल उचलले आहे.

‘बीएसएनएल’ची शहरात अनेक ग्राहक सेवा केंद्र आहेत. बिल भरण्यापासून ग्राहकांना ‘बीएसएनएल’कडून विविध सेवा देण्यासाठी ही केंद्र कार्यरत असतात. मात्र, व्हीआरएस योजनेमुळे या केंद्रांमध्ये फारसे मनुष्यबळ नसल्याने ती ‘आउटसोर्स’ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती. ‘बीएसएनएल’च्या केंद्रीय मनुष्यबळ विभागाचे संचालक अरविंद वडनेरकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ‘बीएसएनएल’च्या पुणे विभागाचे व्यवस्थापक संदीप सावरकर या वेळी उपस्थित होते.

या ग्राहक सेवा केंद्रांमध्ये २५ टक्के कर्मचारी ‘बीएसएनएल’चे असतील, तर उर्वरीत कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरले जात आहेत, असेही वडनेरकर यांनी सांगितले. त्यासाठी खासगी कंपन्यांची मदत घेण्यात येत असून, या कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण दिल्यानंतर ते ग्राहक सेवा केंद्रांमध्ये कार्यरत होणार आहेत. सध्या ग्राहक सेवा केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने काही सेवा वेळेत पुरवण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीमुळे ते अडथळे दूर होऊन अधिक जलद पद्धतीने ग्राहकांना सुविधा मिळू शकतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुढील काही दिवसांमध्ये कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती केली जाणार असून, त्यानंतर ग्राहक सेवा केंद्रांवर देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यासाठी व्हीआरएस योजनेनंतर ‘बीएसएनएल’कडे उरलेल्या सर्व स्टाफचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्राहक सेवा केंद्रांवर अधिकाधिक उच्चप्रशिक्षित कर्मचारी कार्यरत असतील, याची योग्य ती काळजी घेण्यात आल्याचे वडनेरकर यांनी स्पष्ट केले.

कंत्राटी कर्मचारी काम करणार?

वर्षानुवर्षे ‘बीएसएनएल’साठी काम करणारे कर्मचारी ‘बीएसएनएल’ला आपली कर्मभूमी मानून जलदगतीने काम करत होते. आता त्यांच्याजागी कंत्राटी कामगार येतील. त्यांच्याकडून योग्य ते काम होईल का, याबाबत साशंक असल्याचे कर्मचारी संघटनांनी म्हटले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून ‘बीएसएनएल’ची पत खालावली जाणार नाही, यावर प्रशासनाने लक्ष केंद्रीत करावे, अशी मागणीही संघटनांकडून करण्यात आली आहे.

‘बीएसएनएल’चे कर्मचारी केवळ सकाळी ९ ते ५ या वेळेते काम करू शकत होते. परंतु, आता एखादा कंत्राटी कामगार रात्री आठ वाजताही ग्राहकांच्या घरी जाऊन त्यांची समस्या सोडवू शकतो. या नव्या दमाच्या कामगारांमुळे ‘बीएसएनएल’ची कार्यक्षमता वाढणार आहे. ग्राहकांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा देऊन पुन्हा एकदा ‘बीएसएनएल’चा दबदबा निर्माण करण्याचा मानस आहे.

– अरविंद वडनेरकर, संचालक, केंद्रीय मनुष्यबळ विभाग, ‘बीएसएनएल’

सौर्स : मटा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!