असंघटित क्षेत्राने दिल्या तब्बल १२ कोटी नोकऱ्या, व्यावसायिक प्रतिष्ठानांची संख्याही ७.३४ कोटींवर – Bigar Krushi Naukri
Non-Agriculture Jobs
Bigar Krushi Naukri | Non-Agriculture Jobs – as per the latest information jobs in unorganised sector industries increased by 10.01 per cent to Rs 12 crore in the year ended September 2024. The number of commercial establishments in the sector also increased by 12.28 per cent to 7.34 crore. This information has been given in the survey of unorganised non-agricultural sector released by the Ministry of Statistics and Programme Implementation, Government of India.
The report said that between October 2023 and September 2024, gross value added (GVA) increased by 16.52 per cent. The findings come from an annual survey of industries in the unorganised sector. Between October 2023 and September 2024, the unorganised sector employed 12.05 crore workers.
Increase in women-owned businesses The number of women-owned business establishments increased from 22.9 percent to 26.2 percent during the period. This reflects a positive change in women’s share in commercial ownership.
असंघटित क्षेत्राने दिल्या तब्बल १२ कोटी नोकऱ्या, व्यावसायिक प्रतिष्ठानांची संख्याही ७.३४ कोटींवर
सप्टेंबर २०२४ ला संपलेल्या वर्षात असंघटित क्षेत्राच्या उद्योगांतील रोजगार १०.०१ टक्के वाढून १२ कोटींवर गेले. या क्षेत्रातील व्यावसायिक प्रतिष्ठानांची संख्याही १२.२८ टक्के वाढून ७.३४ कोटी झाली. केंद्र सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केलेल्या असंघटित बिगर कृषी क्षेत्राच्या सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत सकळ मूल्यवर्धनात (जीव्हीए) १६.५२ टक्के वाढ झाली. असंघटित क्षेत्रातील उद्योगांच्या वार्षिक सर्वेक्षणात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत असंघटित क्षेत्राने १२.०५ कोटी श्रमिकांना रोजगार दिला.
महिलांच्या मालकीच्या व्यवसायांत वाढ – या कालावधीत महिलांच्या मालकीच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांची संख्या २२.९ टक्क्यांवरून वाढून २६.२ टक्के झाली. व्यावसायिक मालकीत महिलांच्या हिस्सेदारीत सकारात्मक बदल यातून दिसून येतो.