‘होमिओपॅथी’साठी गुणमर्यादा होणार आता ३५ पसैंटाईल – BHMS Admission
BHMS Admission
BHMS Admission 2024 latest updates- The minimum marks requirement in NEET for admission to undergraduate and postgraduate courses in homeopathy has now been relaxed. Accordingly, the National Homoeopathy Commission has relaxed the marks of NEET and similar entrance examinations by 15 percentile for all categories, which has come as a big relief to the students interested in this course.
It was mandatory to score 50 percentile marks in NEET and similar examination for undergraduate and postgraduate courses of BHMS courses. Students scoring less than 50 percentile were denied admission to the course.
As a result, there were calls for relaxation of these scores. In view of this, the marks limit has been reduced by 15 percentile, so that students with 35 percentile will be eligible for admission.
The relaxation has been given for the year 2024-25. The circular in this regard was issued by the National Commission of Homoeopathy on Monday. Meanwhile, the Commission has decided to extend the deadline for admission to undergraduate and postgraduate degree courses. The cut-off date for admission has been extended to December 20.
‘होमिओपॅथी’साठी गुणमर्यादा होणार आता ३५ पसैंटाईल
होमिओपॅथी शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेतील कमीत कमी गुणांची अट आता शिथिल करण्यात आली आहे. त्यानुसार राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाने सर्वच प्रवर्गासाठी नीट आणि तत्सम प्रवेश परीक्षांमधील गुणांमध्ये तब्बल १५ पर्सेटाईलची शिथिलता दिली असून, या अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या पदवी आणि पदव्युत्तरसाठी नीट आणि तत्सम परीक्षेत ५० पर्सेटाईल गुण मिळविणे बंधनकारक होते. त्यातून ५० पर्सेटाईलपेक्षा कमी गुण असलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहत होते.
- परिणामी या गुणांमध्ये शिथिलता देण्याची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर गुणांची अट १५ पर्सेटाईलने कमी करण्यात आली असून, त्यामुळे ३५ पर्सेटाईल असलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.
- ही शिथिलता २०२४-२५ या वर्षासाठी देण्यात आली आहे. त्याबाबतचे परिपत्रक राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाने सोमवारी जारी केले. दरम्यान, आयोगाने पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवेशाची कट ऑफ डेट २० डिसेंबर करण्यात आली आहे.
BHMS Admission