Bhartiya Navdal Bharti 2019
Bhartiya Navdal Bharti 2019
नौदलात ‘सेलर’ व्हायचंय?; २७०० पदांची भरती
Indian Navy Recruitment 2019 : 12th pass candidates apply for Sailor posts. There are total 2700 vacancies available for Sailor posts. Eligible candidates apply online on or before 18th November 2019. All other important details regarding this recruitment are given below, Candidates directly apply for Sailor posts from this page. Link are given below. Keep visit on our website for the latest updates.
Indian Navy Mega Bharti 2019
भारतीय नौदलात कार्यालयीन कामकाज करण्याची संधी बारावी उत्तीर्ण उमेदवारांना मिळणार असून ‘सेलर’ या पदावर नियुक्ती केली जाणार आहे. जवानांना विविध वस्तू पुरविण्यासह इतर कार्यालयीन कामकाजाच्या २७०० रिक्त पदांची भरतीप्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांना १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार असल्याचे नौदलाने सांगितले आहे.
भारतीय नौदलात कार्यालयीन रिक्त पदांवर ऑगस्ट २०२० च्या तुकडीकरिता भरती होणार आहे. या अंतर्गत आर्टिफिशिअल अॅप्रेंटिस विभागात ५००, तर वरिष्ठ माध्यमिक भरती विभागात २ हजार २०० पदे भरण्यात येतील. दोन विभागांतील पदांकरिता गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसहित ६० टक्के गुणांनी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आर्टिफिशिअल अॅप्रेंटिस विभागात २०, तर वरिष्ठ माध्यमिक भरती विभागात १५ वर्षांची नियुक्ती असेल. लेखी परीक्षेनंतर होणारी मेडिकल ओडिशातील चिल्का येथे होणार असून नियुक्ती संपूर्ण भारतातील कार्यालयांमध्ये दिली जाणार आहे. अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार असून १४ हजार ६०० रुपये वेतन असेल. वेतनासहित इतर भत्ते आणि पदोन्नतीसंदर्भातील अटी व नियम नौदलातर्फे अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहेत. इच्छुकांनी https://www.joinindiannavy.gov.in/ या वेबसाइटवर अर्ज नोंदणी करायची असून फक्त नौदलाच्या वेबसाइटवरील अधिकृत माहिती ग्राह्य धरावी. तसेच काही गैरप्रकार अथवा अडचणी संभावल्यास नौदलाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
फेब्रुवारीत परीक्षा Indian Navy Recruitment Exam Details
सेलर पदाच्या भरतीअंतर्गत ऑनलाइन परीक्षा फेब्रुवारी २०२० मध्ये होणार असून त्यासंदर्भातील अपडेट उमेदवारांना ई-मेल आणि वेबसाइटद्वारे कळविण्यात येतील. परीक्षेनंतर उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार असून १.६ किलोमीटर अंतर ७ मिनिटांत धावत पूर्ण करणे, २० ते ३० बैठका आणि १० पुशअप्स या चाचणीत उमेदवारांना पूर्ण करावे लागतील. ऑनलाइन परीक्षा आणि शारीरिक चाचणीच्या गुणवत्ता यादीनंतर वैद्यकीय तपासणी होईल. त्यानंतर नियुक्तीची स्वतंत्र यादी जाहीर होईल, असे नौदलाने सांगितले.
सौर्स : मटा
Online Apply Link of Sailor 2700 Recruitment 2019