आयुषच्या मुक्त फेरीसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस – BAMS Admission 2024-2025
BAMS Admission 2024-2025 – Maha CET BAMS Admission Last Date –Students can apply for the open round of AYUSH courses in Ayurveda, Homeopathy and Unani conducted by the State Common Entrance Test Cell till Today, November 11. The merit list will be released on November 14.
The CET cell has conducted three regular rounds for admission to AYUSH courses. Now, after these rounds, we have started a free round for admission to the vacant seats. The CET cell has announced that no round will be conducted after this round. This will be the last chance for students to get admission.
The details of the seats for the free round have been announced on November 9. Students who had applied for regular rounds but did not get admission will be eligible for the open round. However, students who have been admitted in the first two regular rounds and selected in the third round will not be eligible for this round.
आयुषच्या मुक्त फेरीसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या आयुष कोर्सेसच्या आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या मुक्त फेरीसाठी विद्यार्थ्यांना आज, ११ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. तर गुणवत्ता यादी १४ नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहे.
सीईटी सेलने आयुष अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नियमित तीन फेऱ्या राबविल्या आहेत. आता या फेऱ्यांनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेशासाठी मुक्त फेरी सुरू केली आहे. या फेरीनंतर कोणतीही फेरी राबविली जाणार नसल्याचे सीईटी सेलने जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ही अंतिम संधी असणार आहे.
मुक्त फेरीसाठी ९ नोव्हेंबरला जागांचा तपशील जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नियमित फेऱ्यांसाठी अर्ज भरला होता, मात्र प्रवेश मिळाला नाही ते मुक्त फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. मात्र, पहिल्या दोन नियमित फेऱ्यांमध्ये प्रवेश घेतलेले आणि तिसऱ्या फेरीमध्ये निवड झालेले विद्यार्थी या फेरीसाठी पात्र ठरू शकणार नाहीत.
BAMS Admission 2024-2025