सिंधुदुर्गात आरोग्याची रिक्त पदे भरणार
सिंधुदुर्गात आरोग्यची रिक्त पदे भरणार
Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2021: To make the health system of Sindhudurg district more efficient in the coming period, all the vacancies in the health system will be filled immediately. Also, an independent women’s hospital at Kudal will be ready to serve patients in the next two months, said Rajesh Tope, state health minister.
Arogya Vibhag-राज्यात विशेषज्ञ डॉक्टरांची ५० टक्के पदे भरली जाणार
सिंधुदुर्गनगरी :सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा येत्या काळात अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील. तसेच कुडाळ येथील स्वतंत्र महिला हॉस्पिटल येत्या दोन महिन्यात रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज होईल, अशी ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली, असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर यांनी दिली. बाळ कनयाळकर, भास्कर परब, बाळा सातार्डेकर आदी उपस्थित होते.
कुडाळकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आरोग्यमंत्री टोपे यांची भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने बाबतच्या समस्या, रिक्त पदे, कुडाळ येथील महिला रुग्णालय याकडे आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा इतर जिल्ह्याच्या मनाने खूप दुबळी असून ती अधिक सक्षम व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने टोपे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन आरोग्य यंत्रणेची पाहणी करण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. कुडाळ येथील महिला रुग्णालयाची इमारत पूर्ण होवून अनेक वर्षे झाल्याने ही इमारत जनतेच्या सेवेत दाखल करण्यात यावी, याकडेही त्यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी हे रुग्णालय येत्या दोन महिन्यात नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज होईल अशी ग्वाही आरोग्य मंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाला दिली आहे.
महिला रुग्णालय सुरू करताना सुरुवातीला कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचा स्टाफ वापरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी या रुग्णालयासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग देण्यात यावा, याकडेही त्यांचे लक्ष वेधण्यात आले. आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांचेही लक्ष वेधण्यात आले असून या रुग्णालयासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. कुडाळ ग्रामीण रुग्णालय वगळता अन्य ठिकाणी डायलिसिस सेवा सुरू आहे; मात्र कुडाळ ग्रामीण रुग्णालयात जागा अपुरी असल्याचे कारण देत ही सेवा सुरू केली जात नाही; मात्र नागरिकांची मागणी पाहता येथे ही सेवा सुरू करण्यात यावी, याकडे जिल्हा शक्य चिकित्सक यांचे लक्ष वेधण्यात आले असल्याचे कुडाळकर यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालय हे हायवेनजीक असावे. जेणेकरून रुग्णांना जास्त लांब जावे लागू नये, अशी मागणी असताना मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यावेळी जिल्हा रुग्णालय हे हायवेपासून २ ते ३ किमी अंतरावर बांधण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना रुग्णालयात येण्यासाठी वाहतूक खर्च सहन करावा लागतो. त्यामुळे आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांधताना ती चूक होऊ नये.
जिल्हा निर्मितीच्या वेळी जिल्हा रुग्णालय एका कोपऱ्यात बांधण्यात आले ती चूक आता सुधारली जावू शकते. त्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय हायवेनजिक बांधण्यात यावे जेणेकरून रुग्णांना सोयीस्कर असेल याकडेही आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे कुडाळकर यांनी सांगितले.
सोर्स: सकाळ
Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2020: Arogya Vibhag Sindhudurg COVID-19 has issued the notification for the recruitment of “Physician, Medical Officer, Ayush Medical Officer, Staff Nurse, ECG Technician, Lab Technician ” Posts. There are a total of various vacancies available for these posts. Candidates who are well qualified and ready to serve as COVID warrior can apply to these posts. Willing applicants need to submit their application form before the last date. The last date for submission of the application form is 29th September 2020. More details about NHM Sindhudurg Recruitment 2020 like application and application address are given below.
सार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ईसीजी टेक्निशियन, लॅब तंत्रज्ञ पदाच्या विविध रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 सप्टेंबर 2020 पर्यत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
सार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग
- अंतिम तारीख:29 सप्टेंबर 2020
- पदाचे नाव : फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ईसीजी टेक्निशियन, लॅब तंत्रज्ञ
- नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग
- अधिकृत वेबसाईट: www.zpsindhudurg.maharashtra.gov.in
- अर्ज पाठविण्याचा पता: फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारीईसीजी टेक्निशियन- [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पता स्टाफ नर्स- [email protected]
Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2020 |
|
? Department (विभागाचे नाव) | Arogya Vibhag Sindhudurg |
⚠️ Recruitment Name |
Arogya Vibhag Sindhudurg Recruitment 2020 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Online (Email) Application Forms |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | zpsindhudurg.maharashtra.gov.in |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] | |
पदानुसार शैक्षणिक पात्रता |
|
|
MD Medicine |
|
MBBS |
|
BAMS/BUMS |
|
B.SC Nursing/GNM |
|
Retired X-Ray Technician |
|
B.Sc with Physics/chemistry/Biology, ECG course |
|
B.Sc DMLT |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)
|
|
⏰ शेवटची तारीख | – 29th September 2020 |