जिल्हापरिषदेमधील आरोग्य विभागातील २६०० आरोग्यसेवकांची भरती रखडली..! – Arogya Vibhag Bharti 2025
Arogya Vibhag Recruitment 2025 @https://arogya.maharashtra.gov.in/
Arogya Vibhag Bharti 2025 Arogya Sevak 2600 posts new updates – The recruitment process for the post of health worker in zilla parishad has been stalled since 2019. After a lot of disruption, the recruitment process was completed in 2024, the results were out and 2,600 health workers were appointed before the court stayed the appointment of health workers after some children objected to the guidelines. Read the complete details given below on this page regarding the Maha Arogya Vibhag Recruitment 2025 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
कोर्टाच्या कचाट्यात अडकली आरोग्यसेवकांची भरती!
जिल्हापरिषदेमधील आरोग्य सेवक या पदाची भरती प्रक्रिया २०१९ पासून रखडलेली आहे. खूप व्यत्यय आल्यानंतर २०२४ मध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण झाली, निकाल लागला आणि २६०० आरोग्यसेवकांना नियुक्ती मिळणार त्याच्अगोदरच काही मुलांनी मार्गदर्शक सूचनेवर आक्षेप घेतल्यामुळे न्यायालयाने आरोग्यसेवकांच्या नियुक्तीला स्टे दिला आणि आरोग्य सेवकांची नियुक्ती ही रखडली.
- आज पुन्हा पाच वर्षानंतर चीनमधून HMPV विषाणूचा धोका लक्षात घेता आरोग्यसेवा संचालनालय पुणे यांनी ३ जानेवारी २०२५ रोजी सर्व जिल्हापरिषद तसेच जिल्हा रुग्णालयाला निवेदन पाठवले आहे आणि आवश्यक सूचना केल्या आहेत, पण महाराष्ट्रापुढे भविष्यात अशा संकटासाठी लढायला सैनिक म्हणून जे आरोग्यसेवक पाहिजेत तेच घरी बसलेले आहेत, यावर शासनाने गांभीर्याने विचार करावा.
- न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जर ही भरती अशीच रखडून राहिली तर नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होणार. कारण ग्रामीण भागातील आरोग्य सांभाळण्याची, लसीकरणाची, सर्वेक्षण व नागरिकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ही आरोग्य सेवकांवर आहे. पाच वर्षापासून जवळपास २६०० जागा खाली राहणे हे दुर्दैव आहे. या आवश्यक सेवेसाठी शासनाने न्यायालयीन अधीन राहून उपायोजना कराव्या व लवकरात लवकर आरोग्यसेवकांना नियुक्त करावे, अशी विनंती विद्यार्थ्यांची आहे.
Arogya Vibhag Bharti 2025 new updates – Under the Department of Public Health, multi-purpose staff, including health inspectors, have been recruited through a recruitment process. The appointments were ordered to be put on hold after four candidates challenged them in the Maharashtra Administrative Tribunal (MAT). The order was passed by Justice S.K. Sharma of the Aurangabad bench of the Bombay High Court. Abhay Waghwase has granted an interim stay till November 28.
आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया; खंडपीठात धावा
- सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य निरीक्षकासह बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवून नियुक्त्या देण्यात आल्या आहे. या नियुक्त्यांना चार उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात (मॅट) आव्हान दिल्यानंतर २९० नियुक्त्या स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. अभय वाघवसे यांनी २८ नोव्हेंबरपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे.
- याप्रकरणी ओम बढे व इतर ५३ आणि राहुल तांबे व इतर १८ याचिकाकत्यांनी अॅड. रवी गिते यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करीत आव्हान दिले आहे. या रिट याचिकांवर चार नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांना यापूर्वीच नियुक्त्या दिल्या असल्याने त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मॅट निर्णय घेईल. याचिकाकर्ते पुढील आदेशापर्यंत सेवेत राहण्यास पात्र आहेत. त्यांच्या नियुक्त्या आणि सेवासातत्य पुढील आदेशावर न्यायाधिकरणातील मूळ अर्जाच्या अंतिम निकालावर अवलंबून राहतील, असे स्पष्ट करीत खंडपीठाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.
- मॅटने याचिकाकर्त्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती दिल्यानंतर संबंधित प्रकरणाच्या चौकशीअंती राज्य सरकारने संबंधित विभागांना १० ऑक्टोबर २०२४ रोजी परिपत्रक जारी करीत नियुक्ती आदेश देण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे डीएमईआरद्वारे भरती प्रक्रियेत मान्यताप्राप्त नसलेल्या संस्था असतानाही या परिपत्रकाचा आधार घेण्यात आला. जाहिरात प्रकाशित करण्यात आली तेव्हा मान्यताप्राप्त संस्थांची यादी जाहीर करण्यात आली नव्हती. तरी १० ऑक्टोबरच्या परिपत्रकाला निवड न झालेल्या उमेदवारांनी मॅटमध्ये याचिकेद्वारे आव्हान दिले होते. या प्रकरणात निवड झालेल्या उमेदवारांना सुनावणीची संधी न देता, पक्षकार न करता मॅटने स्थगिती दिली. या नाराजीने उमेदवारांनी खंडपीठात धाव घेतली.
Arogya Vibhag Bharti 2025 GR For 2600 posts filled through the external agencies. Despite the state government’s decision (GR) not to recruit on contractual basis through external mechanisms, it seems that the government itself has forgotten about it. The health department has decided to fill up 2,603 posts of skilled and unskilled manpower on contractual basis for newly established and upgraded health institutions in the state. The decision for the recruitment was taken on 10th September 2024.
According to the GR issued by the health department regarding this contractual recruitment, the recruitment will be done for three years from 2024-25 to 2026-27. It will cost Rs 59.87 crore annually. The recruitment process will also be done by the Commissioner of Health Services. The government had decided in 2022 to recruit jobs on contractual basis. However, the decision was scrapped on October 31, 2023, after criticism from the opposition and protests by students preparing for competitive exams.
आरोग्य विभागाने २,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
राज्य शासनात बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने भरती करायची नाही, असा निर्णय (जीआर) असूनही शासनालाच त्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाने राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व श्रेणीवर्धन केलेल्या आरोग्य संस्थांसाठी कुशल व अकुशल मनुष्यबळाच्या २,६०३ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. १० सप्टेंबर रोजी या भरतीचा निर्णय काढण्यात आला आहे.
आरोग्य विभागाने या कंत्राटी भरतीसंदर्भात जारी केलेल्या जीआरमध्ये ही भरती सन २०२४-२५ ते २०२६-२७ पर्यंत, अशा तीन वर्षांकरिता करण्यात येणार आहे. यासाठी वार्षिक ५९ कोटी ८७ लाख रुपये खर्च येणार आहे. आरोग्य सेवा आयुक्तांमार्फत ही कंत्राटी पदभरती करण्याची कार्यवाही होणार आहे. कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यासाठी सरकारने २०२२ मध्ये निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयावर विरोधकांकडून टीका झाल्यानंतर, तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विरोध केल्यानंतर ३१ ॲाक्टोबर २०२३ रोजी हा निर्णय रद्द करण्यात आला होता.
शासकीय नोकरभरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी हा खेळ आहे. शासनाने हा जीआर तत्काळ रद्द करून कंत्राटी नोकरभरती रद्द करावी.
– महेश घरबुडे, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटना
Maharashtra Medical and Health Services Medical Officer Group A S20 Recruitment 2024 BAMS Candidates Exam Admit Card Available now. Click Here for downloading Call Letter of Medical Officer (BAMS) Exam 05/09/2024. Click Here for Grievances regarding Call Letter of Medical Officer (BAMS) Exam 05/09/2024
Important Dates
Commencement of Call letter Download | 28 – 08 – 2024 |
Closure of Call letter Download | 05 – 09 – 2024 |
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट अ एस२० पदभरती २०२४ बीएएमएस BAMS उमेदवारांचे परिक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
- वैद्यकीय अधिकारी (BAMS) परिक्षेचे ( दि. ०५/०९/२०२४) प्रवेशपत्र (Call Letter) डाऊनलोड करणेसाठी उमेदवारांनी येथे क्लिक करावे
- वैद्यकीय अधिकारी (BAMS) परिक्षेचे ( दि. ०५/०९/२०२४) प्रवेशपत्रबाबत (Call Letter) काही अडचणी उदभवल्यास उमेदवारांनी येथे क्लिक करावे
As per the latest updates about Maharashtra Arogya Vibhag Bharti 2025 – In view of the opposition to contractual recruitment, the state government had cancelled the decision of contractual recruitment; However, the government medical, ayurvedic and homeopathic college and hospital under the aegis of the government’s Directorate of Medical Education and Research will be recruiting for 6,830 posts of Group C and D cadre in 59 such institutions. In colleges and hospitals, 1730 posts of Group ‘C’ and 5100 posts of Group ‘D’ will also be recruited, all these posts will be filled through external sources. Candidates Read the complete details given below on this page regarding the Arogya Vibhag Bharti 2025 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
आरोग्य विभागात होणार ६,८३० पदाची कंत्राटी भरती
कंत्राटी भरतीला होणारा विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केला होता; मात्र पुन्हा नव्याने शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचनालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या शासकीय वैद्यकीय, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालयात अशा ५९ संस्थामध्ये गट क व ड संवर्गातील ६,८३० पदांसाठी कंत्राटी भरती होणार आहे. यात महाविद्यालय व रुग्णालयात गट ‘क’ ची १७३०, तर गट ‘ड’ ची ५१०० पदासाठीही भरती होणार असून, ही सर्व पदे बाह्यस्त्रोतामार्फत भरण्यात येणार आहेत. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
- प्रशासनावरील होणारा खर्च आटोक्यात आणून विकासकामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक तिथे कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याचे शासनाचे धोरण आहे. गतवर्षी कंत्राटी भरतीची तयारी करण्यात आली होती. त्यावेळेस विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली व तरुणांनी विरोध केल्याने सरकारने ही भरती रद्द केल्याचा शासन निर्णय दि. ३१ ऑक्टोबरला काढला. मात्र आता नव्याने निर्णय जाहीर करून बाह्यस्त्रोतामार्फत ही पदे भरण्यासाठी मंजुरी दिली आहे. ही पदे नियमितपणे भरली असती तर शासनाचा जितका खर्च झाला असता त्या खर्चाच्या २०-३० टक्के बचत होणे आवश्यक असल्याची अट संबंधित कंपन्यांना घातली आहे.
- ही भरणार पदे – लघु लेखक, वाहनचालक, शस्त्रक्रिया सहायक, ग्रंथपाल सहायक, प्रयोगशाळा सहायक, टंकलेखक, तंत्रज्ञ, कनिष्ठ लिपिक आदी पदे भरण्यात येणार आहेत.
- ही भरती नऊ कंपन्यांकडून होणार आहे. या कंपन्या आमदार, खासदार व मंत्र्याच्या आहेत. एका नियमित कर्मचाऱ्यांच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करणार आहेत व या कंपन्यांना त्या पगारातील कमिशन म्हणून तीस टक्के मिळणार आहेत. यावरून असे दिसते की कर्मचारी तुटपुंजा पगारावर राबणार आणि कंपनी मालामाल होणार आहे. आणि गेल्यावर्षी सरकारने आम्हाला आरोग्यसेवेत कंत्राटी भरती करणार नाही, असे अश्वासन दिले होते. त्यामुळे या भरतीला आमचा विरोध राहील. – अनिल लव्हेकर जिल्हा सरचिटणीस, राज्य सरकारी कर्मचारी संघटना, कोल्हापूर
- या कंत्राटी भरतीमुळे गोरगरीब गरजू व योग्य मुलांच्यावर अन्याय होणार असून, निवडणुकीच्या तोंडावर होणारी भरती म्हणजे वशिलेबाजी व पैशाचा खेळ असणार आहे. संजय पवार, उपनेते, उद्धवसेना
Maharashtra Medical and Health Services Group A Recruitment 2024 Notification for BAMS Candidates. Maharashtra Medical and Health Services Medical Officer Group AS 20 Recruitment 2024 BAMS Notification for Candidates
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ पदभरती २०२४ बीएएमएस उमेदवारांबाबत प्रसिध्दी पत्रक
Maharashtra Medical and Health Services Group A Recruitment Notification Released by Arogya Vibhag. Applications are invited from eligible candidates through the online portal for selection to the post of Maharashtra Medical and Health Services Group-A. The deadline for filling the said online application was issued upto dt. 01/02/2024 to dt. 18/02/2024. Along with this the list of MBBS qualified candidates prepared by the department is being published as per the online application form filled by the candidates. In the last column of this list, the documents accompanying the application and other ancillary matters are given feedback.
According to that feedback MBBS qualified candidates are being given an opportunity to re-upload the incomplete documents. Along with this, the candidates themselves should verify the marks and experience given to the candidates. Also, candidates should register on the portal if they have any objections in this regard. A period of two days (up to 23.02.2024 at 11.59 PM) is being given to file objections.
Objections received after this period will not be considered. The said list is only for MBBS qualified candidates and PG / Diploma wise list is not published in this but it is published for verification of the information mentioned by the applicants in the application.
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ पदभरतीबाबत प्रसिद्धी पत्रक
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट – अ पदावर निवडीसाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. सदरचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. ०१/०२/२०२४ ते दि. १८/०२/२०२४ पर्यंत देण्यात आलेली होती.
उमेदवारांनी भरलेल्या ऑनलाईन अर्जाच्या अनुषंगाने या सोबत MBBS अर्हताधारक उमेदवारांची विभागाने तयार केलेली यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर यादीमध्ये शेवटच्या रकान्यात अर्जा सोबत असलेल्या कागदपत्रे व इतर अनुषंगीक बाबीचे अभिप्राय दिलेले आहेत. त्या अभिप्रायानुसार MBBS अर्हताधारक उमेदवारांना अपुर्ण असलेले कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्याची संधी देण्यात येत आहे. याचबरोबर उमेदवारांना देण्यात आलेले गुण व अनुभव याचे गुण उमेदवारांनी स्वतः पडताळणी करावी. तसेच या संदर्भात उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास पोर्टलवर नोंदवावेत. आक्षेप नोंदविण्यासाठी दोन दिवसांचा ( २३.०२.२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत ) कालावधी देण्यात येत आहे. सदर कालावधीनंतर आलेले आक्षेप विचारात घेण्यात येणार नाहीत.
सदरची यादी ही फक्त MBBS अर्हताधारक उमेदवारांची असुन यामध्ये PG / Diploma निहाय यादी प्रसिध्द करण्यात आलेली नसुन अर्जदारांनी अर्जामध्ये नमुद केलेल्या माहितीच्या पडताळणीसाठी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
*BAMS अर्हताधारक उमेदवारांची यादी स्वतंत्ररित्या प्रसिध्द करण्यात येईल.
हेल्प लाईन नं. १) ९०२८५२०४३७ २) ०२२-२२६२११८६
आक्षेप नोंदविण्यासाठी सुचना
- १) अर्जदारास आक्षेपांची (objections) नोंद करावयाची असल्यास अर्जदाराने https://morecruitment.maha-arogya.com/objections.aspx या पोर्टलवर जाऊन आपले आक्षेप एकदाच नोंदवावेत.
- २) अर्जदाराने पोर्टलवर एकापेक्षा जास्त वेळेस आक्षेपाची (objection) नोंद करु नये. एकापेक्षा जास्त वेळेस केलेल्या आक्षेपांचा विचार करण्यात येणार नाही. त्यासाठी आक्षेप सादर करतांना संपुर्ण तयारी करुनच आक्षेप नोंदवावा.
- ३) आक्षेपासोबत अर्जदाराने संबंधित दस्ताऐवज / प्रमाणपत्रे एकाच PDF File मध्ये upload करावयाची असून PDF File ची क्षमता २ MB पेक्षा जास्त नसावी.
- ४) प्रसिध्द केलेल्या यादीतील माहिती व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती अर्जदाराने आक्षेपा सोबत सादर करु नये.
- ५) अर्ज करण्यासाठी जो Mobile क्रमांक आणि e-mail टाकलेला होता तोच Mobile क्रमांक आणि e-mail आक्षेप सादर करताना वापरावा.
- ६) आक्षेप नोंदवयाचा कालावधी संपल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराचे दस्ताऐवज / प्रमाणपत्रे स्विकारले जाणार नाही.
Arogya Vibhag Bharti 2025 for 1729 posts Online Link given here. Government of Maharashtra, Department of Public Health has published the “Medical Officer Group-A” recruitment advertisement. Recruitment of 1729 vacancies in Medical Officer Group-A (7th Pay Commission Pay Commission Pay Scale – 20 Pay Scale Rs. 56,100-1,77,500) cadre has started. Maharashtra Medical and Health Services Group-A (S-20) is inviting applications from eligible candidates for recruitment to the post of Medical Officer in health institutions under the Public Health Department of the State of Maharashtra. Applications should be submitted online from 10.00 am on 1st February 2024 to 11.59 pm on 15th February 2024. Applications received by mail or other means will not be accepted after the due date and time. Candidates Read the complete details given below on this page regarding the Arogya Vibhag Bharti 2025 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
The complete advertisement and application link information has been made available on the http://arogya.maharashtra.gov.in website for recruitment to the post of “Medical Officer (S-20) in the cadre of Maharashtra Medical and Health Services Group “A”. Accordingly, the candidates have to fill the application form completely online on the https://www.morecruitment.maha-arogya.com website. Candidates who wish to apply for the above mentioned post should visit this website for details such as pay scale, eligibility, age limit, application fee, instructions, selection criteria etc.
Arogya Vibhag Recruitment 2025 Online Apply
महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी गट-अ पदभरती जाहिरात प्रकाशित केली आहे. वैद्यकीय अधिकारी गट-अ (सातवा वेतन आयोग वेतनस्तर – २० वेतनश्रेणी रु. ५६१००-१७७५००) संवर्गातील १७२९ रिक्त पदांची भरती सुरु झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (एस-२०) या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावरील भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विस्तृत जाहिरातीत नमुद केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन (Online) पद्धतीने दिनांक ०१.०२.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते दिनांक १५.०२.२०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Arogya Vibhag Bharti 2025 Notification Details
- महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट “अ” या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावर सरळ सेवेने पदभरती करण्यासाठी http://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- पदसंख्या-
- (अ) एम.बी.बी.एस. व पदव्युत्तर पदवी/पदविका (एकूण- १४४६ पदे)
- (ब) बी.ए.एम.एस. व पदव्युत्तर पदवी/पदविका (एकूण- २८३ पदे)
- महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट “अ” या संवर्गातील “वैद्यकीय अधिकारी (एस-२०) या पदावर सरळसेवेने पदभरती करण्यासाठी http://arogya.maha rashtra.gov.in या संकेतस्थळावर संपूर्ण जाहिरात / अर्जाबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांनी https://www.morecruitment.maha-arogya.com या संकेतस्थळावर सदर अर्ज पूर्णपणे ONLINE पद्धतीने भरावयाचे आहेत. उपरोक्त नमूद पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वेतनश्रेणी, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, सूचना, निवडीचे निकष इत्यादी तपशिलासाठी सदर संकेतस्थळाला भेट द्यावी.
- विस्तृत जाहिरातीत नमुद केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन (Online) पद्धतीने दिनांक ०१.०२.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते दिनांक १५.०२.२०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत. निर्धारित दिनांक व वेळेनंतर तसेच टपालाने अथवा अन्य मार्गाने प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Arogya Vibhag 2025 Vacancy Details
Arogya Vibhag Recruitment 2025 Important Links
Complete Notification-short
Arogya Vibhag Bharti 2025 Document Verification Notice and Required Documents list are given here. All the concerned candidates who have been shortlisted on Merit List under the Arogya Vibhag Bharti 2023 are hereby informed in advance that they should prepare original copies along with original copies of educational qualification and other necessary documents for document verification. Bio-metric verification of candidates will be done as per requirement. Only certificates of seasonal spraying staff issued as per government norms will be considered.
Document Verification Process: – The verification process will be done at District / Division level. This advance notification is being published for all the candidates to avoid unnecessary wastage of time of the candidates and the government. According to the terms and conditions mentioned in the advertisement as well as the prevailing government decision, the documents of all the candidates will be checked and the final decision will be taken in this regard.
Candidates who do not have any of the following documents i.e. Domicile Certificate should submit the said documents on stamp paper of Rs.100/- within 01 month from appointment otherwise the appointment order of the concerned candidate will be canceled and any educational, reservation, experience documents submitted are bogus / forged. If found, the order of appointment will be cancelled. Affidavit documents to this effect are to be submitted by the candidate at the time of examination. Any educational, caste or experience certificate found to be false or forged at any level will result in immediate termination of service of the concerned appointee and permanent disqualification from government service and criminal offence.
Arogya Vibhag Document Verification
आरोग्य विभाग गट क व ड सरळसेवा भरती 2025 उत्तर पत्रिका उपलब्ध – Arogya Vibhag Bharti Answer Key
महाराष्ट्र आरोग्य विभाग गट. क, गट. डी भरती परीक्षेचे सुधारित स्वरूप आणि अभ्यासक्रम 2025
आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध…! – Arogya Hall Ticket 2025 download
आरोग्य विभाग भरती आवश्यक कागदपत्रांची यादी..!
Arogya Vibhag Bharti 2025 Paper Sets
-
Old Paper Set – आरोग्य विभाग भरती परीक्षेचे जुने प्रश्न पेपर्स येथे पहा…
-
Staff Nurse Mega Bharti 2025 Click here
-
स्टाफ नर्स भरती 2025 ला अनुसरून सराव पेपर
Arogya Vibhag Bharti 2023 in 2 phases for 23000 posts.- आरोग्य विभागातील २३,००० हजार रिक्त जागा भरणार..!
Advertisement nahi ali ka ajun?
Thank you so much sir for valuable information.
Arogya Vibhag Group C Exam Cancelled
Arogya Vibhag Bharti 2022 latest Update is here..