‘अग्निवीर’ची भरती सुरू, शिवाजी विद्यापीठ मैदानावर पहाटेच शारीरिक चाचणी ARO Kolhapur Bharti 2023

Agniveer Kolhapur Recruitment 2023 Notification, Online Apply Link

ARO Kolhapur Bharti 2023

Kolhapur Agniveer Bharti process for the first day of the fair began at midnight. Candidates started coming to Rajaram College, Cyber Chowk area from 7 pm. They had stopped at a place designated by the armed forces. Police force was also deployed there. A date has been fixed for each district for the recruitment and the process will continue till December 18. The district administration, municipal corporation, Shivaji University and district Sainik Welfare Officer’s office have extended their support for the rally. The recruitment process for the Indian Army Agnipath (Agniveer) began at midnight today at the Athletics Ground of Shivaji University. The Army Recruiting Office has organised a recruitment fair. Around 8,500 candidates from Kolhapur, Satara, Sangli, Sindhudurg, Ratnagiri and Goa (North Goa/South Goa) will participate in the eight-day rally.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

‘अग्निवीर’ची भरती सुरू – शिवाजी विद्यापीठ मैदानावर पहाटेच शारीरिक चाचणी

भारतीय सैन्य दलातील अग्निपथ (अग्निवीर ) भरती प्रक्रिया शिवाजी विद्यापीठातील अॅथलेटिक्स मैदानावर आज मध्यरात्रीपासून सुरू झाली. आर्मी रिक्क्रूटिंग कार्यालयाने भरती मेळावा आयोजित केला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोव्यातील (उत्तर गोवा/दक्षिण गोवा) सुमारे ८ हजार ५०० उमेदवार या आठ दिवसांच्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
या मेळाव्याअंतर्गत अग्निवीर जनरल ड्यूटी, तांत्रिक, लिपिक, स्टोअर कीपर, तांत्रिक, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, ट्रेड्समन तसेच दहावी, आठवी उत्तीर्ण आणि सैनिक तांत्रिक नर्सिंग असिस्टंट पदांची भरती होणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया राबविण्यासाठी आर्मी रिक्रूटिंग कार्यालयाने जय्यत तयारी केली आहे. सैन्य दलाने यावर्षी भरती प्रक्रिया बदल केला आहे. ऑनलाईन परीक्षा आधी घेऊन त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी, वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उमेदवारांची संख्या कमी दिसत आहे.
मेळाव्याच्या पहिल्या दिवसाची प्रक्रिया मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आली. त्यासाठी सायंकाळी सात वाजल्यापासून राजाराम महाविद्यालय, सायबर चौक परिसरात उमेदवार येऊ लागले. सैन्य दलाने निश्चित करून दिलेल्या ठिकाणी ते थांबले होते. त्याठिकाणी पोलिस बंदोबस्तही तैनात होता. या भरतीसाठी प्रत्येक जिल्ह्याकरिता दिवस ठरवून दिला असून त्यानुसार १८ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया चालणार आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, शिवाजी विद्यापीठ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने पायाभूत सुविधांबाबतचे सहकार्य या मेळाव्यासाठी केले आहे.
व्हाईट आर्मीतर्फे अन्नछत्राची सुविधा
सैन्यभरतीसाठी येथे येणाऱ्या उमेदवारांसाठी उद्या, सोमवार ते १८ डिसेंबरदरम्यान जीवन मुक्ती सेवा संस्था व्हाईट आर्मीतर्फे मोफत अन्नछत्राचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत अन्नछत्र सुरू राहणार असल्याची माहिती व्हाईट आमचे संस्थापक अशोक रोकडे यांनी दिली.

कोल्हापूर : भारतीय सैन्य दलातील अग्निवीर भरती प्रक्रिया शिवाजी विद्यापीठातील अॅथलेटिक्स मैदानावर सुरू झाली आहे. आर्मी रिक्रुटिंग कार्यालयाने त्याची जय्यत तयारी केली आहे.

स्टेरॉईड इंजेक्शन, दलालांना बळी पडू नका
■ ‘संपूर्ण भरती प्रक्रिया न्याय्य आणि पारदर्शक असल्याने दलालांना तरुणांनी बळी पडू नये. तसेच शारीरिक चाचणी दरम्यान तात्पुरती ऊर्जा मिळविण्यासाठी काही उमेदवारांकडून स्टेरॉईडचा वापर केला जात असल्याचे यापूर्वीच्या भरती मेळाव्यात निदर्शनास आले आहे. असे प्रकार उमेदवारांनी करू नयेत’, असे आवाहन भारतीय लष्कराने केले आहे.


Indian Army Kolhapur Agniveer Bharti 2023 – The online application registration of Agniveer will start from February 10 for candidates from seven districts including Kolhapur, and the written exam will be held in April. Candidates from North Goa and South Goa districts of Goa along with Kolhapur, Sangli, Satara, Ratnagiri, Sindhudurg districts will get an opportunity to participate in this recruitment process. Online applications can be filled on the join Indian army website till March 11. Candidates who qualify for the written test after verifying the applications will be conducted the written test at the online examination centers.

अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल १० फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी

  1. कोल्हापूरसह सात जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी १० फेब्रुवारीपासून अग्निवीरची ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होणार असून, एप्रिलमध्ये लेखी परीक्षा होणार आहे. या भरती प्रक्रियेत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह गोव्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील उमेदवारांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. join indian army या संकेतस्थळावर ११ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. अर्जांची पडताळणी करून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
  2. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच शारीरिक क्षमता चाचणी आणि मेडिकलसाठी बोलावले जाईल. लेखी परीक्षेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शारीरिक चाचणीची प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. त्याबद्दलची माहिती उमेदवारांना त्या-त्या वेळी संकेत स्थळावरून मिळेल, असे आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.
  3. ९० हजारांतून ५३६ पात्र – शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर २२ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२२ दरम्यान पार पडलेल्या अग्निवीर भरती प्रक्रियेचा निकाल २९ जानेवारीला सैन्य दलाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला. भरती प्रक्रियेसाठी ९० हजार ऑनलाइन अर्ज आले होते. त्यापैकी ५३६ उमेदवार पात्र ठरले. यावरून येणाऱ्या भरती प्रक्रियेलाही तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळेल, असा अधिकाऱ्यांना विश्वास आहे.
  4. उमेदवारांमध्ये नाराजी – सैन्य दलातील जवानांच्या भरती प्रक्रियेत आजवर प्रथम शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा असेच स्वरूप होते. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेले उमेदवार लेखी परीक्षेला पात्र ठरत होते. आता मात्र शारीरिक क्षमता चांगली असूनही, आधी लेखी परीक्षा होणार असल्याने अनेक सक्षम आणि सुदृढ उमेदवारांना लेखी परीक्षा अडथळा ठरणार आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी आहे. गेली दोन वर्षे पोलिस भरतीतही असा बदल करण्यात आला होता. मात्र राज्यभरातून तीव्र विरोधामुळे पुन्हा पूर्ववत बदल करण्यात आले.

अग्निवीरसाठी पात्रता

  1. वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे
  2. शिक्षण – पदानुसार
  3. ट्रेड्समन – ८ वी पास (४५ टक्के)
  4. ट्रेड्समन – १० वी पास (४५ टक्के)
  5. जनरल ड्युटी – १० वी पास (४५ टक्के)
  6. टेक्निकल – १२ वी सायन्स पास (५० टक्के)
  7. नर्सिंग – १२ वी सायन्स पास (५० टक्के)
  8. लिपिक – १२ वी पास (कोणतीही शाखा) ६० टक्के

ARO Kolhapur Recruitment 2022 Results

कोल्हापूर अग्निवीर सैन्य भरतीत ५३६ तरुणांची निवड

कोल्हापूर ः अग्निवीर सैन्य भरतीतून ५३६ तरुणांची निवड करण्यात आली. २२ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर ही भरती झाली होती. अग्निवीर जनरल ड्यूटी, टेक्निकल आणि ट्रेडस्‌मन पदांसाठी ही भरती झाली होती. या भरतीसाठी ९० हजार उमेदवारांनी अर्ज केला होता. यामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, येथून उमेदवार सहभागी झाले होते. शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी, लेखी परीक्षा या द्वारे उमेदवारांची निवड करण्यात आली. आज निवड झालेल्या तरुणांची ऑनलाईन यादी जाहीर करण्यात आली. पात्र ठरलेल्या उमेदवारांना कोल्हापुरातील टेंबलाई टेकडी येथील सैन्य दलाच्या एआरओ कार्यालयात तीन ते पाच फेब्रुवारीदरम्यान हजर राहण्याच्या सूचना सैन्य अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. हजर होताना सर्व शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईजचे फोटो आवश्यक आहेत.

The military recruitment process for Kolhapur Firefighters was conducted between 22nd November to 11th December. This recruitment will be done for technical and nursing. Medical test will be held on 12th and 13th December.

ARO Kolhapur Medical Test

अग्निवीरांसाठी लष्करी भरती प्रक्रिया २१ नोव्हेंबरपासून सुरु आहे. यासाठी आज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पुणे, नाशिक आदी जिल्ह्यातून सात हजार ३०० युवक अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी आले. टेक्निकल आणि नर्सिंगसाठी ही भरती असेल. यातून जे अग्निवीर उत्तीर्ण होतील, त्यांची १२ आणि १३ डिसेंबरला वैद्यकीय चाचणी असणार आहे.

सर्व अग्निवीरांची थांबण्याची व्यवस्था राजाराम महाविद्यालयाच्या माळावर केलेली आहे. भरतीसाठी येणाऱ्या तरुणांना माहिती देणे, नियोजन करणे आदी कामे जिल्हा प्रशासनातर्फे सुरु आहेत. याबरोबर प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही जिल्हा प्रशासनातर्फे केली आहे. कोंढवा (पुणे) येथील प्रदीप तावडे म्हणाला, ‘आम्ही पुण्यातून रात्री प्रवासाला सुरवात केली. पहाटे आम्ही कोल्हापुरात पोहोचलो. आम्ही भरतीसाठी लागणारी कागदपत्रे घेऊन आलो आहोत. ’ पुणे (गणेश पेठ) येथील शुभम बडदे म्हणाला, ‘‘१२ विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीएमबी ग्रुप) विषय असलेल्या तरुणांसाठी ही भरती असणार आहे.’

रात्री ११ ते १२ च्या दरम्यान, सर्व अग्निवरांना टप्प्याटप्प्याने शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर नेले जाते. तिथपर्यंत नेण्यासाठीचे नियोजन जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाने केले आहे.


ARO Kolhapur Recruitment 2022:  Indian Army, Army Recruiting Office Kolhapur is going to conduct Rally For Agniveer Posts. An Army recruitment rally under the new Agnipath scheme will be held at Kolhapur city from 22nd November to 11th December 2022 to recruit Agniveers in various categories Interested candidates must apply online by registering on Indian Army website www.joinindianarmy.nic.in. For more information, the recruitment office has requested to contact the website www.joinindianarmy.nic.in or 0231-2605491.

सैन्यदलातील अग्निवीर भरतीसाठी तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. उद्या दि. २२ पासून कोल्हापुरात सुरू होणाऱ्या भरतीसाठी ९८ हजार उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. राजाराम कॉलेज मैदान व शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर भरती प्रक्रिया होणार आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निवीर भरतीसाठी सुरुवातीला तरुणांच्या संघटनांनी विरोध दर्शविला; मात्र प्रक्रिया सुरू होताच, त्याला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळला आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगावसह गोव्यातील उमेदवारांचा यात समावेश आहे. उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने भरती प्रक्रिया ११ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

तालुकानिहाय रोज ५ हजार उमेदवारांना भरतीसाठी बोलावले जाणार आहे. राजाराम कॉलेजच्या मैदानावर कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. दोन्ही ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाणी व शौचालयांची व्यवस्था केली आहे. व्हाईट आर्मी सामाजिक संस्थेकडून उमेदवारांसाठी अन्नछत्र सुरू केले जाणार आहे.


ARO Kolhapur Recruitment 2022:  Indian Army, Army Recruiting Office Kolhapur is going to conduct Rally For Agniveer Posts. An Army recruitment rally under the new Agnipath scheme will be held at Kolhapur city from 22nd November to 11th December 2022 to recruit Agniveers in various categories Interested candidates must apply online by registering on Indian Army website www.joinindianarmy.nic.in. For more information, the recruitment office has requested to contact the website www.joinindianarmy.nic.in or 0231-2605491.

अग्निपथ’ योजनेअंतर्गत कोल्हापूर येथे मेळाव्याचे आयोजन

अग्निपथ योजनेअंतर्गत (Agnipath Scheme) गोवा आणि महाराष्ट्रातील (Goa And Maharashtra) युवकांची भरती करण्यासाठी कोल्हापूर आर्मी भरती कार्यालयामार्फत (Kolhapur Army Recruitment Office) 22 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर या काळात कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University, Kolhapur) क्रीडा मैदानावर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ARO Kolhapur Agniveer Army Rally Bharti 2022

  • इच्छुक उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • ज्या उमेदवारांनी यशस्वीरित्या ऑनलाईन नोंदणी केली आहे त्यांना प्रवेशपत्र त्यांच्या ई-मेल आयडीवर पाठवले जाईल अशी माहिती पीआयबीने दिली आहे.
  • दरम्यान, अधिसूचनेत दिलेली कागदपत्रे (मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, छायाचित्रांच्या पुरेशा प्रती, नमुन्यानुसार वैध प्रतिज्ञापत्र, अधिवास, जात प्रमाणपत्र इत्यादी) ऑनलाईन नोंदणी करताना सोबत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • योग्यरित्या भरलेल्या शपथपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही.
  • उमेदवारांनी मूलभूत वैद्यकीय पूर्व तपासणी करणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटशी किंवा 0231-2605491 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन भरती कार्यालयाने केले आहे.

ARO Kolhapur Bharti Rally 2022– Important Documents 

नोंदणीबाबत खालील बाबी आणि कागदपत्रांची माहिती लक्षात ठेवा

  • 05 ऑगस्टपासून वेबसाईटवर अर्ज उपलब्ध झाले असून 03 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार.
  • संभाव्य उमेदवारांची त्यांच्या प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तारखेनुसार जिल्हा आणि तालुक्यानुसार तपासणी केली जाईल.
  • निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे कोविड लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक.
  • उमेदवारांची बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी केली जाईल.
  • प्रत्यक्ष निवड चाचणी घेण्याआधी तीन टप्प्यांमध्ये प्रवेशपत्रे स्कॅन केली जातील.
  • शारीरिक चाचण्या, वैद्यकीय चाचण्या आणि सामायिक प्रवेश परीक्षा (लेखी परीक्षा) अशा टप्प्यांमध्ये या चाचण्या होतील.
  • शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असलेले उमेदवार 15 जानेवारी, 2023 रोजी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई) देतील.
  • अंतिम गुणवत्तेत निवड झालेल्या उमेदवारांना राष्ट्रसेवेसाठी अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यात सामील करून घेतले जाईल.

ARO Kolhapur Army Rally 2022

खालील पदांसाठी होणार भरती

  • अग्निवीर सामान्य सेवा (सर्व शाखा)
  • अग्निवीर तांत्रिक कर्मचारी
  • अग्निवीर लिपिक/ भांडार व्यवस्थापक
  • तांत्रिक विभाग/ वस्तुसूची व्यवस्थापन (सर्व शाखा)
  • अग्निवीर कुशल कारागीर (दहावी उत्तीर्ण) (सर्व शाखा)
  • अग्निवीर कुशल कारागीर (सर्व शाखा) (आठवी उत्तीर्ण) (हाऊसकीपर आणि मेस कीपर)

ARO Kolhapur Bharti 2022: Army Recruiting Office Kolhapur has published the notification for the recruitment of Multi Tasking Staff (MTS), Civil Motor Driver. There is a total of 02 vacanicees1. Job Location for these posts in Kolhapur. Applicants age should not exceed 27 Year . All Interested and Eligible applicants need to sending their application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 21st May 2022. More details about ARO Kolhapur Bharti 2022/ARO Kolhapur Recruitment 2022 like application and application address are given below.

आर्मी रिक्रूटिंग ऑफिस नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), सिव्हिल मोटर चालक पदांच्या 02 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 21 मे 2022 पर्यत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

आर्मी रिक्रूटिंग ऑफिस

  • अंतिम तारीख: 21 मे 2022
  • पदाचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) , सिव्हिल मोटर चालक
  •  रिक्त पदे: 02 पदे.
  •  नोकरी ठिकाण: कोल्हापूर
  •  आवेदन का तरीकाऑफलाईन.
  •  आवेदन पाठवण्याचा पत्ता: आर्मी रिक्रूटिंग ऑफिस (कोल्हापूर) मिलिटरी स्टेशन, टेंबलाई हिल युनिव्हर्सिटी रोड – कोल्हापूर – 416004 (महाराष्ट्र).

Army Recruiting Office Bharti 2022 

? Department (विभागाचे नाव)  Army Recruiting Office Kolhapur
⚠️ Recruitment Name
Army Recruiting Office Kolhapur Recruitment 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल)  Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://joinindianarmy.nic.in/

आर्मी रिक्रूटिंग ऑफिस भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Army Recruiting Office Bharti 2022- Vacancy Details

1 Multi Tasking Staff (MTS)  01  पद
2 Civil Motor Driver 01  पद
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Multi Tasking Staff (MTS) 
Matriculation or equivalent
  • For Civil Motor Driver
Matriculation or equivalent

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख :  16th April 2022
⏰ शेवटची तारीख  21st May 2022

Important Link of Kolhapur ARO Recruitment 2022

?OFFICIAL WEBSITE
APPLICATION FORM 
PDF ADVERTISEMENT

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!