सैन्यदलातील अधिकारी पदांसाठी नाशिकमध्ये १० जूनपासून कोर्स – Army Officer Pre-Training
Army Officer Pre-Training
Army Officer Pre-Training Program Details are given here. CDS Course No. 63 has been conducted from June 10 to August 23 to prepare for the Combined Defence Service (CDS) exam for the recruitment of officers in the Indian Army, Navy and Air Force. The training will be held at the Pre-Student Training Centre in Nashik.The government provides free training, accommodation and food to the trainees during the course period for the youth and the young. The District Sainik Welfare Officer, Sindhudurg has appealed to the interested candidates to appear for the interview on June 5 at the District Sainik Welfare Office, Sindhudurg to enjoy the opportunity of the post of Officer in the Armed Forces.
सैन्यदलातील अधिकारी पदांसाठी नाशिकमध्ये १० जूनपासून कोर्स
भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कम्बाईन डिफेन्स सर्व्हिस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी १० जून ते २३ ऑगस्ट या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक ६३ आयोजित करण्यात आलेला आहे. हे प्रशिक्षण नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात होणार आहे.
शासनातर्फे नवयुवक व नवयुवतीसाठी कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे ५ जुनला मुलाखतीस हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर पुणे (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील सीडीएस ६३ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.
सीडीएस वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील नमूद पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून यावेत
१) उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
२) उमेदवार लोकसंघ आयोग (यूपीएससी) नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस या परीक्षेकरिता ऑनलाईनद्वारे अर्ज केलेला असावा. अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी [email protected], दूरध्वनी क्रमांक किंवा व्हाट्सअॅप क्रमांकावर (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी) संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्गमार्फत केले आहे.
Indian Army TES Recruitment 2024
Interviews will be schedule on Wednesday for Army Officer Pre-Training
SSB Course No. 53 has been organized from 29th May 2023 to 7th June 2023 to prepare eligible candidates for the Service Selection Board examination for recruitment to the posts of officers in the Army, Navy and Air Force. Interested candidates may call for interview on Wednesday 24th May 2023, should be present at District Soldier Office, Nashik, District Soldier Welfare Officer Lieutenant (retd) Omkar Kaple has informed that.
- Candidates for SSB course admission at the center should have passed the Combined Defense Services Examination (CDSE-UPSC) or National Defense Academy Examination (NDA-UPSC) and qualified for the Services Selection Board interview.
- Candidate should have passed NCC ‘C’ Certificate in ‘A’ or ‘B’ Grade. NCC Group HQ should have recommended for SSB.
- Call letter for SSB interview for technical graduate course.
- SSB call letter for university entry scheme or name in recommended list for SSB.
- While appearing for the interview, the candidate should search the Facebook page (Department of Sainik Welfare, Pune (DSW)) and take a printout of the admit card for SSB-53 course and the accompanying annexures and bring it along.
- For more information, e-mail the Officer-in-Charge, Pre-Student Training Center, Nashik Road Kaple has also informed that you should contact [email protected] or directly during office hours.
सैन्यदल अधिकारी पूर्व प्रशिक्षणासाठी येत्या बुधवारी मुलाखती
Army Officer Pre-Training Details
- सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी 29 मे ते 7 जून या कालावधीत एसएसबी (SSB) कोर्स क्रमांक 53 चे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी बुधवार, दि. 24 मे रोजी जिल्हा सैनिक कार्यालय नाशिक येथे उपस्थित राहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट (निवृत्त) ओंकार कापले यांनी कळविले आहे.
- केंद्रामध्ये एसएसबी कोर्स प्रवेशासाठी उमेदवार हा कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास असावा व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेला असावा.
- उमेदवार एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेट ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेडमध्ये पास असावा. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.
- युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीमसाठी एसएसबी कॉल लेटर किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. मुलाखतीसाठी येताना उमेवाराने फेसबुक पेजवर (Department of Sainik Welfare, Pune (DSW)वर सर्च करून त्यामधील SSB-53 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व पूर्ण भरून सोबत आणावी.
- अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकरोड यांचा ई-मेल [email protected] अथवा कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा, असेही कापले यांनी कळविले आहे.
Army Officer Pre-Training