पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘अपार आयडी’ अपार कार्डचे कामात वेग येणार – APAAR ID Card
What is Aapar ID
APAAR ID Card – The Union Education Ministry has decided to implement the ‘One Nation, One Student ID’ scheme under the National Education Policy. Automated permanent students pursuing primary to college education will be given an Academic Account Registry ID (APAR CARD). Students in the district will get academic identity through this ‘APAR Card’ and complete information about their academic career will be in the identity card. Candidates Read the complete details given below on this page regarding the APAAR ID Card and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
अपार कार्डचे काम संथगतीने : आता वेग येणार, गुरुजींना आता घ्यावे लागतील ‘अपार’चे कष्ट
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या ‘ऑटोमेटेड पर्मनंट विद्यार्थ्यांना अकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री आयडी’ (अपार कार्ड) दिले जाणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या ‘अपार कार्ड’च्या नवी माध्यमातून शैक्षणिक ओळख मिळणार असून, त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीींची संपूर्ण माहिती ओळखपत्रात असणार आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
- गेल्या महिनाभरापासून विधानसभा निवडणुकीचे काम काही गुरूजींना करावे लागत होते. त्यातून त्यांची सुटका झाली असून, आता अपार कार्डच्या नूतनीकरणामध्ये चांगलाच वेग घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या कामानंतर ‘अपार’साठीही गुरूजींना कष्ट घ्यावे लागणार आहेत.
- काय आहे ‘अपार आयडी’ ? – ‘अपार कार्ड’ प्रणाली एज्युलॉकर- सारखी असणार आहे. त्यात नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती एकत्रित उपलब्ध असणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, पत्ता, शाळा, महाविद्यालय, इयत्ता, त्याचा निकाल, त्याला मिळालेले पुरस्कार, शिष्यवृत्ती आदी माहिती उपलब्ध असणार आहे.
- ‘अपार कार्ड’ ही विद्यार्थ्यांसाठी नवीन ओळख देणारी प्रणाली आहे. त्यामध्ये या विद्यार्थ्यांना ‘बारा अंकी क्रमांक असलेले कार्ड दिले जाणार आहे. संबंधित क्रमांक त्या विद्यार्थ्याची ओळख असणार आहे. या क्रमांकावर असलेल्या कार्डमध्ये प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या शैक्षणिक नोंदीचा समावेश असेल. शिक्षण विभागा- कडून या कार्डसाठीच्या नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- दुसरीकडे राज्याची विधानसभा निवडणूक व दिवाळीची सुट्टी असल्यामुळे ‘अपार आयडी’चे काम संथगतीने सुरू होते. मात्र, आता गुरुजी निवडणुकीनंतर ‘अपार’च्या कामाकडे लक्ष देऊन ते पूर्णत्वास नेतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
- विद्यार्थ्यांना होणार ‘अपार कार्ड’चा फायदा – विद्यार्थ्यांना हे कार्ड अधिक उपयुक्त ठरणार आहे. ते आधारकार्डशी जोडले जाणार आहे. यामध्ये पालकांच्या आधार क्रमांकाचाही समावेश करण्यात आला आहे. अपार कार्डमुळे सर्व शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. अपार कार्डचा क्रमांक टाकल्यानंतर सर्व माहिती समोर येते. त्यामुळे नोकरीसाठी विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही. विकास पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
APAAR ID Card | What is Aapar? – 1st to 12th students will get ‘Apar ID’ Read the given details carefully. Students from pre-primary, 1st to 12th grade through the U-Dice Plus system should have ‘Apar IDs’ available by November 20. Maharashtra Primary Education Council State Director R.K. Sharma has directed the principals of all schools in the state to give instructions in this regard. Vimala said. Every student in the country will have a huge ID. Instructions in this regard have been given by the Union Ministry of Education. In view of this, instructions have been given to provide necessary training to the principals of each school to prepare a comprehensive ID.
- After making the APAR ID available to the students, the principal of all the schools should print this ID on the identity card of the students.
- The education officer (primary and secondary) reviewed every week through video conferencing and the principal of the school who did not produce a number of IDs to the students.
- It has also been made clear that their report should be sent to the commissioner’s office and the office of the Maharashtra Council of Primary Education.
What is Aapar ID – काय आहे अपार आयडी?
APAAR ID Card – Under the ‘One Nation One Student ID’ scheme, ‘Apar ID’ (Automated Permanent Academic Registry) will be created for school students across the country. The immense ID is for the academic identity of the students. Therefore, the vast ID will have comprehensive information such as exam results, comprehensive reports, performance of students in academic activities, sports, skill training. The number will also be attached to DigiLocker. This will enable students to access all their certificates online.
How to create APAAR ID?
- APAAR ID card will be made for the students by the school through Aadhar card.
- For this, the parents of the students will have to go to the school and submit the consent format form.
- And the students will have to create their account on DigiLocker through Aadhar card.
- Visit the official APAAR or ABC ID CARD website.
- You can find the specific URLs provided by the respective authorities for registration.
- Visit the “My Account” section on the website and choose the option for student registration.
- Click on the “Sign Up” or “Register” button if you are a new user.
‘अपार आयडी’साठी २० नोव्हेंबरची मुदत – महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे निर्देश
यू-डायस प्लस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक, पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ‘अपार आयडी’ येत्या २० नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध करून द्यावेत. त्याबाबतच्या सूचना राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकाऱ्यांनी देण्याचे निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य ल्प संचालक आर. विमला यांनी दिले. देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सूचना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना अपार आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने आवश्यक प्रशिक्षण देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
- राज्य प्रकल्प संचालक कार्यालयाच्या परिपत्रकानुसार अपार आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने पालक-शिक्षक सभा आयोजित करून शाळा स्तरावर पालकांकडून ना हरकत प्रमाणपत्र भरून घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
- अपार आयडी तयार करण्यासाठी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना गट स्तरावर प्रशिक्षण देण्यात यावे. अपार आयडी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्यानंतर सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना अपार आयडी हा विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर छापण्याबाबत कळवण्यात यावे. माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे दर आठवड्याला याबाबतचा आढावा घ्यावा. अपार आयडी तयार करून न दिलेल्या शाळांबाबत आढावा घेऊन अहवाल सादर करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.
Apar ID : पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘अपार आयडी’
- APAAR ID Card – केंद्र शासनाकडून देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांला अपार आयडी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी देण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रथम प्राधान्याने यू-डायस प्रणालीमधून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी येत्या 20 नोव्हेंबरपर्यंतची डेडलाइन देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी दिले आहेत.
- आर. विमला यांनी दिलेल्या निर्देशानुसार, केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्यासाठी कळविण्यात आले असून, यू-डायस सॉफ्टवेअरमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अपार आयडी उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याची कार्यवाही पूर्ण करून घेण्यात यावी. अपार आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचना व या कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना व प्रशिक्षण जिल्ह्याचे सर्व संगणक प्रोग्रामर व तालुक्याचे एमआयएस समन्वयक यांना देण्यात आल्या असून, शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यासाठी कळविले आहे.
- अपार आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने शिक्षक-पालक बैठक शाळास्तरावर आयोजित करून पालकांकडून ना हरकत प्रमाणपत्र भरून घेण्यात यावे. अपार आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रशिक्षण गट स्तरावरून प्रशिक्षण देण्यात यावे व दररोज आढावा घेण्यात यावा. अपार आयडी तयार करण्याचा राज्य स्तरावरून दररोज आढावा घेण्यात येईल. तसेच, विद्या समिक्षा केंद्रामार्फत त्याचा आढावा घेण्यात येईल. याचप्रमाणे, जिल्हा व तालुका स्तरावरून अपार आयडी तयार करण्याबाबत दररोज आढावा घेण्यात यावा आणि हा अहवाल विभागीय उपसंचालक, शिक्षण संचालक, आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयास पाठविण्यात यावा.
- अपार आयडी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्यानंतर सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी हा आयडी विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर प्रिंट करून घ्यावा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्येक आठवड्याला आढावा घेऊन ज्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना अपार आयडी तयार करून दिले नाहीत. त्यांचा अहवाल आयुक्त कार्यालयास आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयास पाठविण्यात यावा, असेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.