AISSEE Results – सैनिक शाळा प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
AISSEE Results 2022
AISSEE Results 2022: The results of All India Sainik School Entrance Exam (AISSEE Sainik School Result 2022) have been announced by the National Testing Agency (NTA). Students who have appeared for the exam will be able to view their results on the official website aissee.nta.nic.in. This is the result of class VI and IX entrance exams. Applicants can check their results from the given link
AISSEE Sainik School Result 2022
सैनिक शाळा प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
AISSEE Result 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (NTA) रोजी ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रन्स एक्झामचा (AISSEE Sainik School Result 2022) निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आपला निकाल अधिकृत वेबसाइट aissee.nta.nic.in वर पाहता येणार आहे. इयत्ता सहावी आणि नववीच्या प्रवेश परीक्षांचा हा निकाल आहे.
परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यांच्या मदतीने लॉगिन करुन AISSEE सैनिक स्कूल स्कोअरकार्ड २०२२ तपासता येणार आहे. या प्रवेश परीक्षेद्वारे विविध सैनिक शाळांमध्ये शैक्षणिक सत्र २०२२-२३ साठी इयत्ता सहावी आणि नववीचे प्रवेश केले जातात.
यापूर्वी एनटीएने या वर्गांसाठी प्रवेश परीक्षेच्या उत्तरतालिका जाहीर केल्या होत्या. यावर आक्षेप घेण्यासाठी ५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. तज्ज्ञांकडून आक्षेपांची पडताळणी केल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला.
AISSEE निकाल २०२२ पाहण्यासाठी थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. सहावी आणि नववी प्रवेश परीक्षेचा सैनिक शाळेचा निकाल २०२२ पाहण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
AISSEE Sainik School Result 2022: असा पाहा निकाल
- स्टेप्स १: सर्वप्रथम निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट aissee.nta.nic.in वर जा.
- स्टेप्स २: वेबसाइटवर दिलेल्या ‘AISSEE 2022 NTA Score card’ या लिंकवर क्लिक करा.
- स्टेप्स ३: अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करा.
- स्टेप्स ४: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. निकाल तपासा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढा.
गुणवत्ता यादीत असलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय सैनिक शाळांमध्ये इयत्ता सहावी किंवा नववीमध्ये हव्या असलेल्या जागा सहज मिळू शकतात. सैनिक शाळा प्रवेशासाठी गुणवत्ता यादी वय, जागांची संख्या, सर्वाधिक गुण आणि एकाधिक मूल्यमापन यांसारख्या इतर समान घटकांनंतर तयार केली जाते.