AIIMS मध्ये फॅकल्टीच्या तब्बल 44% जागा रिक्त; आता आरोग्य मंत्रालय अशी करणार भरती

AIIMS Recruitment 2023 @ http://recruitment.aiimsrbl.edu.in/

AIIMS Bharti 2023, VacancyApply Link

As per the latest updates regarding the AIIMS Recruitment is that 44% of faculty posts are vacant in the 18 new AIIMS across the country. Out of 183 sanctioned posts in Rajkot AIIMS, only 40 are faculty members. The health ministry had told the Lok Sabha last year that Rajkot AIIMS is the institute with the least faculty. After Rajkot AIIMS now Vijaypur and Gorakhpur also have the least number of faculty members compared to sanctioned posts. According to health ministry data, only 2,259 posts out of 4,026 sanctioned posts have been filled in 18 new AIIMS. Listing out the provisions made to increase the number of faculty in the newly established AIIMS, the ministry in its reply said that a Standing Selection Committee (SSC) has been constituted in each new AIIMS. Candidates Read the complete details given below on this page regarding the AIIMS Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

AIIMS मध्ये फॅकल्टीच्या तब्बल 44% जागा रिक्त; आता आरोग्य मंत्रालय अशी करणार भरती

देशभरातील 18 नवीन एम्समध्ये सुमारे 44 टक्के फॅकल्टी पदं रिक्त आहेत. राजकोट एम्समध्ये मंजूर 183 पदांपैकी फक्त 40 फॅकल्टी मेंबर्स आहेत. राजकोट एम्स ही सर्वात कमी फॅकल्टी असलेली संस्था आहे, असं आरोग्य मंत्रालयानं गेल्या वर्षी लोकसभेत सांगितलं होतं. राजकोट एम्सपाठोपाठ आता विजयपूर आणि गोरखपूरमध्ये एम्समध्येदेखील मंजूर पदांच्या तुलनेत सर्वात कमी फॅकल्टी मेंबर्स आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 18 नवीन एम्समध्ये 4 हजार 026 मंजूर पदांपैकी केवळ 2 हजार 259 पदं भरण्यात आली आहेत. नव्यानं स्थापन झालेल्या एम्समध्ये फॅकल्टी संख्या वाढवण्यासाठी केलेल्या तरतुदींची यादी मांडत मंत्रालयानं आपल्या उत्तरात असं म्हटलं आहे की, प्रत्येक नवीन एम्समध्ये एक स्थायी निवड समिती (एसएससी) तयार करण्यात आली आहे.

AIIMS Recruitment 2023 Notification Details

  1. भारतभरातील एम्स म्हणजे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था या प्रमुख आरोग्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं फॅकल्टी आणि नॉन-फॅकल्टी पदांसाठी केंद्रीकृत भरती सुरू करण्याच्या विचार केला आहे. सध्या मंत्रालय या भरतीच्या शक्यतेची तपासणी करत आहे. त्यासाठी, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल, आरोग्य मंत्रालयातील पीएमएसएसवायचे अतिरिक्त सचिव, नवी दिल्ली एम्सचे संचालक यांचा समावेश असलेली एक समिती नियुक्त करण्यात आली आहे.
  2. “भुवनेश्वर एम्स येथे 8 जानेवारी रोजी झालेल्या केंद्रीय संस्था मंडळाच्या (सीआयबी) बैठकीनंतर, या कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. केंद्रीकृत भरती सुरू करण्याच्या शक्यतेची तपासणी करण्यासाठी आणि विविध एम्समधील फॅकल्टी व नॉन-फॅकल्टींच्या भरती प्रक्रियेला बळकटी देण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे,” असं 28 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.
  3. एमबीबीएस विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सरकारनं नव्यानं तयार केलेल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांसाठी (एम्स) पुरेशा फॅकल्टी मेंबर्सच्या पदांना मंजुरी देण्यात आली आहे, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. “केंद्रीय भरती प्रणाली ही, फॅकल्टी आणि नॉन-फॅकल्टी पदांची नियुक्ती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरळीत करेल. याशिवाय, या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांचं एका एम्समधून दुसऱ्या एम्समध्ये ट्रान्सफरदेखील सुलभ होईल. सध्या देशभरातील एम्स वैयक्तिक पातळीवर आपल्या कर्मचाऱ्यांची भरती करतात. या प्रक्रियेत असं निदर्शनास आलं आहे की, प्रतिभावान डॉक्टर आपल्या राज्याबाहेर जाण्यास नाखूश आहेत, असं एका अधिकृत सूत्रानं सांगितलं आहे.
  4. जेणेकरून रिक्त पदे लवकर भरता येतील. फॅकल्टी आणि नॉन-फॅकल्टी पदांच्या थेट भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 50 वर्षांवरून 58 वर्षे करण्यात आली आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालये किंवा संस्थांमध्ये सेवा देणार्‍या प्राध्यापकांना प्रतिनियुक्तीवर एम्समध्ये घेण्यासाठीदेखील परवानगी देण्यात आली आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालये किंवा संस्थांमधील सेवानिवृत्त प्राध्यापकांना त्यांच्या वयाच्या सत्तरीपर्यंत करारानुसार नियुक्ती देण्यात आली आहे.
  5. या शिवाय, भारताच्या नागरिकत्वाचं कार्ड असलेल्या परदेशी नागरिकांनाही (ओसीआय) नोकरीत घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
    या शिवाय, अध्यापन आणि शैक्षणिक हेतूंसाठी नव्याने स्थापन झालेल्या एम्समध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्राध्यापकांना काम करण्याची परवानगी देण्यासाठी व्हिजिटिंग फॅकल्टी योजना तयार करण्यात आली आहे. लोन बेसिसवर या फॅकल्टींना एका विभागातून दुसऱ्या विभागात घेण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.
  6. अशी पदं कंत्राटी पद्धतीनं भरली जाऊ शकतात. ही प्रक्रिया जलदगतीने मार्गी लावण्यासाठी एक वर्षाच्या वैधतेसह भरतीची जाहिरात देण्यात आली आहे.
    दिल्ली एम्स शिवाय, बिहार (पाटणा), छत्तीसगड (रायपूर), मध्य प्रदेश (भोपाळ), ओडिशा (भुवनेश्वर), राजस्थान (जोधपूर) आणि उत्तराखंड (ऋषिकेश) येथील सहा एम्सना प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्यात मान्यता देण्यात आली होती.
  7. या संस्था सध्या पूर्णपणे कार्यरत आहेत. 2015 ते 2022 दरम्यान स्थापन झालेल्या 16 एम्सपैकी 10 संस्थांमध्ये एमबीबीएस वर्ग आणि बाह्यरुग्ण विभागाच्या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तर, आणखी दोन संस्थांमध्ये फक्त एमबीबीएसचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. उर्वरित चार संस्था सध्या विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत.

AIIMS Bharti 2023: All India Institute of Medical Sciences has declared the notification for the recruitment of Assistant Professor Posts. There are total of 100 vacancies to be filled. All Interested and Eligible applicants need to submit application form the given address before the last date. The  last date for submission of application form is 15 November 2022. Candidates Read the complete details given below on this page regarding the AIIMS Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

AIIMS ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रायबरेली यांनी प्राध्यापक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट recruitment.aiimsrbl.edu.in वर जाऊन त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात. या भरतीद्वारे प्राध्यापक पदांवरील एकूण 100 रिक्त जागा भरल्या जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर आहे.

रिक्त जागांचा तपशील- Vacancy Details For AIIMS Recruitment 2023

एकूण पदे- 100

  • प्राध्यापक – 28 पदे
  • अतिरिक्त प्राध्यापक – 22 पदे
  • असोसिएट प्रोफेसर – 18 पदे
  • सहाय्यक प्राध्यापक – 32 पदे

महत्वाची तारीख- Important Date For AIIMS Jobs 2023

  • ऑनलाइन अर्जाची सुरुवात – 1 ऑक्टोबर 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ नोव्हेंबर २०२२

वय मर्यादा- Age Criteria For AIIMS Vacancy 2023

  • प्राध्यापक आणि अतिरिक्त प्राध्यापक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 58 वर्षांपेक्षा जास्त नसावे, तर सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • शैक्षणिक पात्रता
  • सर्व पदांच्या भरतीसाठी विविध शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे.

अर्ज फी- Application Fees For AIIMS Career 2023

  • सामान्य, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 2,000 रुपये असेल,
  • तर SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 1,000 रुपये भरावे लागतील
  • PWD श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही याची नोंद घ्या.

Online Apply Link


AIIMS Recruitment 2022- As per the posts More than 50 per cent vacancies for professors are vacant in 19 AIIMS across the country. There are also large vacancies for non-teaching staff. Union Health Minister Dr. Bharti Pawar gave this information in a written reply to a question in Rajya Sabha. There are 4,209 sanctioned posts of professors in 19 AIIMS. Of these, 2,041 posts are vacant.

 देशातील १९ एम्सममध्ये प्राध्यापकांच्या २,०४१ पदे रिक्त

 देशातील १९ एम्समधील प्राध्यापकांच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागाही मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.  केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ एम्समध्ये प्राध्यापकांची ४,२०९ मंजूर पदे आहेत. त्यातील २,०४१ पदे रिक्त आहेत. पाटणा येथील एम्समध्ये ३०५ पैकी तब्बल १६९ प्राध्यापक पदे रिक्त आहेत. नागपूर एम्समध्ये प्राध्यापकांच्या १८३ पदांपैकी ७८ पदे तर शिक्षकेतर कर्मचान्यांच्या १,०५४ पदांपैकी७७१ पदे रिक्त आहेत.

Professor Bharti -राज्यात प्राध्यापकांच्या जवळपास १२ हजार जागा रिक्त

सगळ्यात वाईट स्थिती गुवाहाटी एम्सची आहे. तेथील प्राध्यापकांच्या १८३ पदांपैकी १६२ पदे रिक्त आहेत. राजकोट (गुजरात) येथील १८३ पैकी १४० पदे रिक्त आहेत. रायबरेली येथील एम्समध्ये १८३ पैकी १२० प्राध्यापक पदे रिक्त आहेत. गुवाहाटी एम्समध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या १,०१८ पदांपैकी १,०११ पदे रिक्त आहेत.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    AIIMS Recruitment 2023 @ http://recruitment.aiimsrbl.edu.in/

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!