राज्यात आदिवासी प्रवर्गातील १२ हजार ५०० पदे रिक्त..! – Adiwasi Vikas Vibhag Bharti 2025

Maha Tribal Bharti 2025, Notification, Apply Link

AdiwasiVikas Vibhag Bharti 2025 | Maha Tribal Bharti 2025 – As per the latest information On December 14, 2022, the General Administration Department announced the recruitment of 12,500 posts in all types of institutions and boards, including government, semi-government, zilla parishads, municipal corporations, corporations, universities and affiliated colleges, agricultural universities, government and private educational institutions, cooperative sugar factories, cotton mills, banks, government-approved institutions receiving grants, which are reserved for tribal category but have been grabbed by non-tribals. However, even after three years, no special recruitment drive has been conducted. 

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

राज्यात आदिवासी प्रवर्गातील १२ हजार ५०० पदे रिक्त – आदिवासींच्या विशेष पदभरतीकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष

सर्वोच्च न्यायालयाने नऊ वर्षांपूर्वी ६ जुलै २०१७ रोजी ऐतिहासिक निर्णय घेऊनही सरकारने आदिवासी प्रवर्गातील १२ हजार ५०० पदांची पदभरती केली नाही. राज्यात शासकीय, निमशासकीय सेवेत अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर नियुक्ती मिळविली. पदभरतीनंतर जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचे आदेश २१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आले. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत अनुसूचित जमाती प्रवर्गाची रिक्त झालेली पदे संबंधित विभागांनी कालबद्ध कार्यक्रम आखून विशेष भरती मोहिमेद्वारे भरायची होती. मात्र, गत सहा वर्षांत १२ हजार ५०० पदांपैकी केवळ १२३ पदे भरण्यात आली आहेत. त्यामुळे बेरोजगार आदिवासी उमेदवारांच्या पदरी निराशा आली आहे.

राज्यात आदिवासी प्रवर्गासाठी राखीव असलेली मात्र बिगर आदिवासींनी हडपलेली शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, महामंडळे, विद्यापीठे व संलग्न महाविद्यालये, कृषी विद्यापीठे, शासकीय व खासगी शिक्षण संस्था, सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, बँका, साहाय्यक अनुदान मिळविणाऱ्या शासनमान्य संस्था अशा सर्व प्रकारच्या संस्था, मंडळे यांच्या आस्थापनेवरील १२ हजार ५०० पदांची पदभरती करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने १४ डिसेंबर २०२२ रोजी शासननिर्णय जाहीर केला. मात्र, तीन वर्षे लोटूनही विशेष पदभरती मोहीम राबविण्यात आली नाही.

सध्या राज्यात ३१ ऑगस्ट २०२० च्या आकडेवारीनुसार राज्य शासनाच्या सेवेतील विविध विभागात अनुसूचित जमातीची १ लाख ५५ हजार ६९६ राखीव पदे आहेत. यापैकी १ लाख ९ पदे भरली आहेत. शासनाच्या विविध विभागात अद्याप अनुसूचित जमातीची ५५ हजार ६८७ पदे रिक्त आहेत. हजारो पदे रिक्त असताना विशेष पदभरतीच्या जाहिरातीसुद्धा निघालेल्या नाहीत. त्यामुळे आदिवासी बेरोजगार तरुणांमध्ये निराशा पसरली आहे. त्यामुळे लवकरात लवकर विशेष पदभरतीची जाहिरात काढण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत पुणेकर यांनी केली.


AdiwasiVikas Vibhag Bharti 2024 | Maha Tribal Bharti 2024 : The Tribal Development Department Maharashtra State, Nashik issue recruitment notification for Nashik / Thane / Amravati / Nagpur District to eligible candidates for direct service recruitment of 633 posts of various cadres of Group (B) Non-Gazetted and Group C cadre direct service quota from the https://tribal.maharashtra.gov.in of the Department from 12.10.2024 to 30.11.2024. Are being ordered. For the recruitment of these posts, online (Computer Based Test) examination will be conducted at the designated examination center in Maharashtra.  Candidates Read the complete details of Maharashtra Tribal Recruitment 2024 given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

आदिवासी विकास विभागांतर्गत आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या अधिपत्याखालील तसेच नियुक्ती प्राधिकारी अपर आयुक्त, नाशिक / ठाणे/अमरावती/नागपूर यांच्या आस्थापनेवरील गट (ब) अराजपत्रित व गट क संवर्गातील सरळसेवा कोट्यातील विविध संवर्गातील 633 पदांच्या सरळसेवा भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाइन पद्धतीने दिनांक 12.10.2024 ते 30.11.2024 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Adiwasi Vikas Vibhag Nashik Notification 2024

Here we give the complete details of Maharashtra Tribal Recruitment 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2024 Details

⚠️Recruitment Name :  Maharashtra State Cooperative Tribal Development Corporation
⚠️Number of Vacancies :  633 posts (Nashik – 217 posts, Thane – 189 posts, Amravati – 112 posts, Nagpur – 115 posts).
⚠️Name of Post :  Senior Tribal Development Inspector, Research Assistant, Deputy Chief Clerk, Statistical Assistant (Senior), Tribal Development Inspector (Non-Pesa), Senior Clerk, Statistical Assistant, Junior Education Extension Officer, Stylist, Housekeeper-Female, Housekeeper-Male, Superintendent Female, Superintendent Male, Librarian, Assistant Librarian, Laboratory Assistant, Cameraman-cum-Projector Operator, Senior Stenographer and Junior Stenographer.
⚠️Job Location :  Nashik/Thane/ Nagpur/ Amravati, Maharashtra
⚠️Pay-Scale Rs. 19,000/- to Rs. 1,22,800/- Per month
⚠️Application Mode :  Online Application Mode
⚠️Age Criteria :  Between 18 to 38 years

Adivasi Vikas Vibhag Vacancy 2024 – Vacancy Details

Vacancy details as per the district mention here = Nashik + Thane + Amravati + Nagpur

1. Senior Tribal Development Inspector
07 + 03 + 01 + 04 Posts
2. Research Assistant
04 + 07 + 05 + 03 Posts
3. Deputy Accountant / Head Clerk
16 + 07 + 08 + 10 Posts
4. Tribal Development Inspector
01 Posts
5. Senior Clerk / Statistical Assistant
61 + 57 + 43 + 44 Posts
6. Steno – Typist
03 + 03 + 04 Posts
7.  Warden (Male)
14 +16 + 13 + 19 Posts
8. Warden (Female)  10 + 05 + 08 + 06 Posts
9. Superintendent (Male) 09 + 16 + 04 Posts
10. Superintendent (Female) 17 + 27 + 03 + 08 Posts
11. Librarian
24 + 15 + 01 + 08 Posts
12. Laboratory Assistant
12 +13 + 05 Posts
13.Assistant Librarian 01 Posts
14.  Junior Education Extension Officer
21 + 24 Posts
15.  Cameraman-Cum-Project Operator
01 Post
16. Stenographer (Higher Grade) Ayukt Nashik
03 Posts
17.  Stenographer (Lower Grade) Ayukt Nashik
14 Posts

How to Apply for Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

  • The date, time and centre of the examination will be mentioned in the admit card. Information about the potential changes will be disseminated on the tribal development department’s https://tribal.maharashtra.gov.in website from time to time.
  • The method of filling the online application and the https://tribal.maharashtra.gov.in for submission of online application should be visited on the website and details of the posts to be filled cadre wise, details of posts, pay scale, prescribed age limit / age limit relaxation, selection method, general conditions and conditions, educational qualification, social and parallel reservation and provisions regarding reservation, course of online examination according to post, examination fee, guidelines for filling the application etc. will be available on the https://tribal.maharashtra.gov.in website.
  • The Commissioner, Tribal Development, Nashik shall have the power to postpone, cancel, partially change the competitive examination, change the total and cadre-wise number of posts and their decision will be final. No claim can be made in this regard. Also, if the eligible candidate of the parallel reservation shown is not available, then other eligible candidates of the same reserved category will be considered as per the rules prescribed by the government. The Commissioner, Tribal Development, Nashik will have the power to take a final decision regarding disputes, complaints, violations regarding the recruitment process.

⏰ All Important Dates of Adivasi Vikas Vibhag Vacancy 2024

⏰ Last Date to apply online :
30th November 2024

Important Link of Adivasi Vikas Vibhag Nashik Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️APPLY ONLINE– REFUND THE FEES

Link for Capturing the Bank Details for Refund of Fees
Important Events Dates
Commencement of data capture 05/11/2024
Closure of data capture 30/11/2024
⚠️PDF ADVERTISEMENT – FEES REFUND DETAILS
⚠️PDF ADVERTISEMENT – NEW ADVERTISEMENT
⚠️ONLINE APPLY LINK –  Link Activate now

Recruitment of Various Posts
Important Events Dates
Commencement of on-line registration of application 12/10/2024 03:00 PM
Closure of registration of application 02/11/2024
Closure for editing application details 30/11/2024
Last date for printing your application 17/11/2024
Online Fee Payment 12/10/2024 03:00 PM to 02/11/2024

OLD ADVERTISEMENT

Adiwasi Vikas Vibhag Bharti 2024 new update | Adivasi PESA Bhart : The state government is taking several major decisions on the eve of the assembly elections. Meanwhile, the state government has now announced an important decision for the tribal brothers. The state government has decided to fill up the posts under the PESA Act on honorarium basis following protests by some tribal MLAs, including NCP leader Narhari Zirwal, yesterday. The state government has taken this decision after protests by tribals. The posts in 17 cadres will be filled on honorarium basis. Candidates Read the complete details of Maharashtra Tribal Recruitment 2024 given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

आदिवासी आमदारांच्या आंदोलनाला यश! पेसा कायद्यातली पदे भरण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर राज्य सरकारकडून अनेक मोठे निर्णय घेतले जात आहेत. यातच आता राज्य सरकारने आदिवासी बांधवांसाठी महत्वाच्या निर्णयाची घोषणा केली आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांच्यासह काही आदिवासी आमदारांनी केलेल्या आंदोलनानंतर पेसा कायद्यातली पदे मानधन तत्वावर भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आदिवासींच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. १७ संवर्गातील पदे मानधन तत्वावर भरती केली जाणार आहेत. विशेष बाब म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह काही आदिवासी आमदारांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीत उड्या घेतल्या होता. पेसा कायद्याअंतर्गत विविध जिल्ह्यातील रखडलेली भरती प्रक्रिया आणि नियुक्ती पत्र उमेदवारांना देण्यात यावेत यासाठी हे आदिवासी आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. या आंदोलनाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
  • राज्यात ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, नांदेड, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, आणि यवतमाळ या जिल्ह्यांत पेसा कायदा लागू आहे. पण सध्या सध्या पेसाभरती संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ठ असून अंतिम आदेश येईपर्यंत पेसा क्षेत्रातील निवडप्रक्रियाबाबत कोणताही निर्णय न घेण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे या १३ जिल्ह्यांतील १७ संवर्गातील भरतीप्रक्रिया रखडली आहे. या ठिकाणी आता १७ संवर्गातील पदांवर मानधन तत्वावर भरती केली जाणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
  • पेसा कायदा आहे? – पंचायत एक्स्टेंशन टू शेड्युल एरिया अ‍ॅक्ट (Panchayat Extension to Scheduled Areas Act) म्हणजेच पेसा कायदा २४ डिसेंबर १९९६ साली अस्तित्वात आला आह . या पेसाअंतर्गत येणाऱ्या भागांमध्ये आदिवासी समुदायातील १७ संवर्गातील पदानुसार जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. आदिवासी समाजाचा विकासासाठी तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षणासाठी हा कायदा अस्तित्वात आणण्यात आला आहे.

Adiwasi Vikas Vibhag Bharti 2024 new update – Two government decisions and a letter have already been issued for the recruitment of 12,500 posts of tribal communities in the state. On August 13, 2024, the General Administration Department has directed all additional chief secretaries, principal secretaries and secretaries of the department to expedite the process of recruitment without delay. However, as no action has been taken on the recruitment even after 22 days of issuing these directions, the office bearers of the ‘Tribal Forum’ association have reached mantralaya directly and submitted a memorandum to the chief minister, both deputy chief ministers, ministers of various departments and heads of ministerial departments raising questions in this regard.

‘दोन शासन निर्णय’; ‘एक पत्र’ तरीही आदिवासींची पदभरती का रखडली?

लोकमत’ने ‘आदिवासी समाजाची विशेष पदभरती नेमकी कुणी रोखली?’ या मथळ्याखाली २५ ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केले होते. राज्यात आदिवासी समाजाच्या १२ हजार ५०० पदांच्या भरतीसाठी यापूर्वी दोन शासन निर्णय आणि एक पत्र जारी केले आहे. एवढे नव्हे तर पुन्हा सामान्य प्रशासन विभागाने १३ ऑगस्ट २०२४ रोजी मंत्रालयीन विभागातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिवांना या पदभरतीची कार्यवाही विनाविलंब तात्काळ करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र हे निर्देश देऊन २२ दिवस लोटले तरी पदभरतीची कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे ‘ट्रायबल फोरम’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मंत्रालय गाठून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीद्वय, विविध खात्याचे मंत्री, मंत्रालयीन विभागातील प्रमुखांना निवेदन देऊन यासंदर्भात सवाल उपस्थित केला आहे. 

  • या वृत्ताची दखल ‘ट्रायबल फोरम’ संघटनेने घेतली आहे, हे विशेष. आदिवासी समाजाची विशेष पदभरती मोहीम राबविण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने २१ डिसेंबर २०१९ व १४ डिसेंबर २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित केले आहे. दोन शासन निर्णय निर्गमित करुनही विशेष पदभरतीची मोहीम राबविण्यात आली नाही. पुन्हा सामान्य प्रशासन विभागाने १३ ऑगस्ट २०२४ रोजी एक स्वतंत्र पत्र जारी केले आहे. असे असताना आदिवासी समाजाची विशेष पदभरती मोहीम का राबविण्यात आली नाही? असा सवाल उपस्थित करीत १२ हजार ५०० पदांची विशेष पदभरती मोहीम तात्काळ राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
  • केवळ १२३ पदांची भरती – अनुसूचित जमातींच्या राखीव जागेवर नियुक्ती मिळविली. परंतु नंतर मात्र जातप्रमाणपत्र अवैध ठरले, अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करुन रिक्त जागा भरण्याचे आदेश २१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आले होते. ही रिक्त पदे ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत संबंधित विभागांनी कालबद्ध कार्यक्रम आखून विशेष भरती मोहीमेद्वारे भरायची होती. पण केवळ १२३ पदेच भरण्यात आली आहे.
  • मुख्य सचिवांनीही दिली होती हमी- राष्ट्रीय जनजाती आयोगासमोर राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी ८ ऑगस्ट २०२२ रोजी शपथपत्र देऊन मुख्यमंत्री व वित्त विभागाची मंजुरी घेऊन लवकरच अनुसूचित जमातीची विशेष पदभरती केली जाईल, अशी हमी आयोगासमोर दिली होती. याशिवाय शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जमातीची ५५ हजार ६८७ पदे रिक्त असल्याची ३१ ऑगस्ट २०२० ची स्थिती आयोगासमोर मांडली होती.
  • आदिवासी समाजाने दुसऱ्याच्या ताटातील आमच्या ताटात वाढा, अशी मागणी कधीही आजपर्यंत केलेली नाही. फक्त संविधानाने दिलेले शासकीय सेवेतील घटनात्मक प्रतिनिधीत्व एवढाच विषय आहे. आमच्या घटनात्मक हक्काच्या राखीव जागा भरुन आदिवासी समाजाला न्याय द्यावा.- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम महाराष्ट्र

Adiwasi Vikas Vibhag Bharti 2024 new updates – In 13 tribal-dominated districts of Thane, Palghar, Nashik, Dhule, Nandurbar, Jalgaon, Ahmednagar, Pune, Nanded, Amravati, Yavatmal, Gadchiroli and Chandrapur, tribal unemployed candidates have not been recruited for more than a decade. The issue of recruitment of tribal candidates in 17 cadres in PESA region is getting serious.
Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis On the letter of Sandeep Dhurve, additional chief secretary of general administration department and principal secretary of tribal development department have been directed to check the problem in PESA recruitment and take action. Appoint a senior advocate in the Supreme Court. The stay on the recruitment process should be lifted and the recruitment process should be started. Appointment orders should be issued subject to the supreme court’s decision or appointments should be made by creating a majority of posts (additional) for tribal brothers in pesa area.

राज्यात पेसा भरती केव्हा? आदिवासी बहुल १३ जिल्ह्यात विषय तापतोय!

राज्यातील ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, नांदेड, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर या आदिवासीबहुल १३ जिल्ह्यात गेल्या एक तपाहून अधिक काळापासून आदिवासी बेरोजगार उमेदवारांची भरतीच झाली नसल्यामुळे आदिवासी बांधवांच्या पदरात निराशा पडली आहे. पेसा क्षेत्रातील १७ संवर्गामधील आदिवासी उमेदवारांची भरतीचा विषय गंभीर होत चालला असताना राज्य सरकारकडून आश्वासनाची खैरात दिली जात आहे.

  1. 

सामान्य प्रशासन विभागाने थांबविली भरती प्रक्रिया – सामान्य प्रशासन विभागाने १३ ऑक्टोबर २०२४ ला सर्वोच्च न्यायालयाचे अंतिम आदेश येईपर्यंत पेसा क्षेत्रातील निवड प्रक्रियाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये किंवा गरज वाटल्यास सामान्य प्रशासन विभागाचा अभिप्राय घेतल्याशिवाय पुढील कार्यवाही करू नये, असे आदेशात म्हटले आहे. महसूल व वन विभाग मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांनी सामान्य प्रशासन विभागाने १३ ऑक्टोबर २०२३ च्या पत्राच्या आधारे १७ ऑक्टोबर २०२३ रोजी पत्र काढून अनुसूचित क्षेत्रातील संपूर्ण भरती प्रक्रिया थांबवली आहे.
  2. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले निर्देश – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्णी-केळापूरचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचे पत्रावर सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव यांना पेसा भरतीतील अडचण तपासून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे.

 सर्वोच्च न्यायालयात जेष्ठ वकिलाची नेमणूक करावी. भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवून भरती प्रक्रिया सुरू करावी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिनस्त राहून नियुक्ती आदेश देणे किंवा पेसा क्षेत्रात आदिवासी बांधवांसाठी अधिसंख्य पदे (जादा) निर्माण करून नियुक्त्या द्यावा.
- महानंदा टेकाम, राज्य संघटिका, ट्रायबल वुमेन्स फोरम

Adiwasi Vikas Vibhag Bharti 2024 new updates – All kinds of institutions and offices in the state, including government, semi-government, government undertakings, zilla parishads, municipal councils, municipalities, municipal corporations, gram panchayats, boards, corporations, universities and affiliated colleges, agricultural universities, government and private educational institutions, cooperative sugar factories, cotton mills, banks, government-approved voluntary institutions receiving grants, etc., which are reserved for tribal communities but have been grabbed by non-tribals, etc. The recruitment of 12,500 posts in all types of institutions and boards receiving grants and grants is stalled.
On December 14, 2022, the Mahayuti government had issued a government resolution directing the government to complete the process of filling up the posts of ‘Group C’ and ‘Group D’ by July 31, 2023 and publish the advertisement within one month of the issuance of the government decision. It has been a year and a half since the government took the decision, but the special recruitment drive is yet to be launched.

Deputy Chief Minister and Home Minister Devendra Fadnavis has directed the tribal development department to take action for the recruitment of 12,500 posts of tribal communities in the state. Kelapur-Arni constituency MLA Sandeep Dhurve submitted a memorandum to Deputy Chief Minister Devendra Fadnavis. The statement has been directed and sent to the tribal development department immediately.

राज्यातील आदिवासी समाजाच्या १२ हजार ५०० पदांच्या पदभरतीची कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी विकास विभाग यांना दिले आहे. या मागणीसाठी केळापूर-आर्णी मतदारसंघाचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन चर्चा केली. निवेदनावर निर्देश देऊन आदिवासी विकास विभागाला तत्काळ पाठविण्यात आले आहे.

  • राज्यात आदिवासी समाजासाठी राखीव असलेली मात्र बिगर आदिवासींनी हडपलेली शासकीय, निमशासकीय, शासकीय उपक्रमातील संविधानिक संस्था, जिल्हा परिषदा, नगरपरिषदा, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, मंडळे, महामंडळे, विद्यापीठे व संलग्न महाविद्यालये, कृषी विद्यापीठे, शासकीय व खासगी शिक्षण संस्था, सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, बँका, सहायक अनुदान मिळणाऱ्या शासनमान्य स्वेच्छा संस्था यांच्यासह ज्या ज्या प्रकारच्या संस्था व कार्यालये यांना राज्याच्या तिजोरीतून निधी, अनुदान, सहायक अनुदान मिळते अशा सर्व प्रकारच्या संस्था, मंडळे यांच्या आस्थापनेवरील १२ हजार ५०० पदांची पदभरती रखडलेली आहे.
  • आमदार धुर्वे यांनी २०२१ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २ मार्च २०२१ रोजी ३१ क्रमांकावर तारांकित प्रश्न विचारला होता. खुद्द तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी प्रश्नाला लेखी उत्तर देऊन सन २०२१ पर्यंत आदिवासी उमेदवारांची विशेष पदभरती करण्यात येईल, अशी लेखी हमी विधिमंडळात दिली होती. त्यानंतरही भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही.
  • महायुती सरकारने १४ डिसेंबर २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित करून ‘गट क’ व ‘गट ड’ मधील पदे भरण्याची कार्यवाही ३१ जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आणि शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून एक महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. शासन निर्णय काढून दीड वर्षे उलटले, परंतु अद्यापही विशेष भरती मोहीम राबविण्यात आलेली नाही.
  • त्यामुळे राज्यभरात आदिवासी समाजात असंतोष पसरला आहे.

कोरोना आला अन् पदभरती प्रक्रिया रखडली
सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्र. ८९२८/२०१५ व इतर याचिका यामध्ये ६ जुलै २०१७ रोजी ऐतिहासिक न्यायनिर्णय दिलेला आहे. तद्अनुषंगाने या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी खुद्द शासनानेच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतीज्ञापत्र दिले होते. ही पदे ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रिकामी करून भरण्यात येणार होती.
  • परंतु, मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यात कोरोना प्रादुर्भाव उद्भवल्याने ही पदभरतीची प्रक्रिया रखडलेली होती. शासनाकडे गेल्या पाच वर्षांपासून ‘ट्रायबल फोरम’ वारंवार पत्रव्यवहार करून आदिवासी समाजाच्या १२ हजार ५०० पदांच्या विशेष पदभरतीसाठी पाठपुरावा करीत आहे. पण, यश आले नाही. त्यामुळे आमदार संदीप धुर्वे यांना निवेदन दिले होते.

Maharashtra Adiwasi Vikas Vibhag Bharti 2024 | Maha Tribal Bharti 2024 : The Tribal Development Department Maharashtra State Latest updates is given here.  The state government on Thursday put on hold the recruitment process initiated last year to fill up 602 vacancies in Group ‘C’ in the tribal development department. The government has clarified that the advertisement published earlier for this recruitment has been cancelled and a revised advertisement will be published again. Candidates Read the complete details of Maharashtra Tribal Recruitment 2024 given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

The advertisement was released last year i.e. on November 23, 2023 to fill various vacancies in the tribal development department of the state. However, the state government today cancelled the advertisement on the ground that it did not include the socially and educationally backward class category in the advertisement. In addition, the revised advertisement for the same recruitment will be republished, including the socially and educationally backward class category.

आदिवासी विकास विभागाच्या नोकरभरती प्रक्रियेला स्थगिती; ‘इतक्या’ जागांवर होणार होती भरती

आदिवासी विकास विभागातील गट ‘क’मधील विविध ६०२ रिक्त पदे भरण्यासाठी गेल्या वर्षी सुरु केलेल्या भरती प्रक्रियेस राज्य सरकारने गुरुवारी (ता. २७) स्थगिती दिली. या नोकरभरतीसाठी याआधी प्रसिद्ध केलेली जाहिरात रद्द करण्यात आली असून, यासाठी पुन्हा नव्याने सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • राज्याच्या आदिवासी विकास विभागातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी गेल्या वर्षी म्हणजेच, २३ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, या जाहिरातीत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग या संवर्गाचा समावेश केलेला नसल्याचे कारण देत, राज्य सरकारने आज ही जाहिरात रद्द केली आहे. शिवाय याच भरतीसाठीची सुधारित जाहिरात ही सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग या संवर्गाचा समावेश करून, पुन्हा प्रसिद्घ केली जाणार आहे.
  • या नोकरभरतीसाठीची जाहिरात रद्द करून, पुन्हा सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याचे राज्याच्या आदिवासी विभाग विभागाने कळविले आहे. त्यामुळे ही नोकर भरती स्थगित करण्यात येत असल्याचे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे ही जाहिरात रद्द करण्यासाठी काढण्यात आलेल्या आदेशात नमूद केले आहे.
  • दरम्यान, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग संवर्गाचा या जाहिरातीत समावेश करून आणि पुन्हा बिंदूनामावली अद्ययावत करून ही जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करण्याबाबतचा आदेश राज्य सरकारने दिलेला आहे. सरकारच्या या आदेशानुसार आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून पुन्हा बिंदूनामावली अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे गुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Adiwasi Vikas Vibhag Bharti 2023 | Maha Tribal Recruitment 2023 Online Examine Time Schedule and Hall Ticket etc., will be available on this page very shortly. Now the last date to apply for various 602 posts is over, candidates whose apply online for this recruitment they can print the online application form till the 28th December 2023. After that link were close. Candidates keep visit on this page for the further updates of Adiwasi Vikas Vibhag Bharti 2023 admit card etc.,,

आदिवासी विकास विभाग विविध पदांची भरती अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख..!

Last date to print application form Adiwasi vikas vibhag Recruitment of Various Posts

Important Events Dates
Commencement of on-line registration of application 23/11/2023 03:00 PM
Closure of registration of application 13/12/2023
Closure for editing application details 13/12/2023
Last date for printing your application 28/12/2023
Online Fee Payment 23/11/2023 03:00 PM to 13/12/2023


 OLD


Adiwasi Vikas Vibhag Bharti 2024 Last date for printing your application is 27th November 2024.

Recruitment of Various Posts Maha Tribal Bharti 2024
Important Events Dates Reopen
Commencement of on-line registration of application 12/10/2024 05/11/2024
Closure of registration of application 02/11/2024 12/11/2024
Closure for editing application details 02/11/2024 12/11/2024
Last date for printing your application 17/11/2024 27/11/2024
Online Fee Payment 12/10/2024 to 02/11/2024 05/11/2024 to 12/11/2024

 

Print Application Form


Adiwasi Vikas Vibhag Bharti 2023 | Maha Tribal Bharti 2023 : The Tribal Development Department Maharashtra State, Nashik issue recruitment notification for Nashik / Thane / Amravati / Nagpur District to eligible candidates for direct service recruitment of 602 posts of various cadres of Group (B) Non-Gazetted and Group C cadre direct service quota from the https://tribal.maharashtra.gov.in of the Department from 23.11.2023 to 13.12.2023. Are being ordered. For the recruitment of these posts, online (Computer Based Test) examination will be conducted at the designated examination center in Maharashtra.  Candidates Read the complete details of Maharashtra Tribal Recruitment 2023 given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

आदिवासी विकास विभागांतर्गत आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या अधिपत्याखालील तसेच नियुक्ती प्राधिकारी अपर आयुक्त, नाशिक / ठाणे/अमरावती/नागपूर यांच्या आस्थापनेवरील गट (ब) अराजपत्रित व गट क संवर्गातील सरळसेवा कोट्यातील विविध संवर्गातील ६०२ पदांच्या सरळसेवा भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाइन पद्धतीने दिनांक २३.११.२०२३ ते १३.१२.२०२३ या कालावधीत अर्ज | मागविण्यात येत आहेत. सदर पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

सरळसेवा भरती – २०२३ गट (ब) अराजपत्रित संवर्ग व गट-क संवर्ग – प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) शैक्षणिक अर्हतेबाबत

जाहिरात क्रमांक आस्था- पद भरती-२०२२/ प्र.क्र. १४२/का. २ ( १ ) / नाशिक दिनांक : २२ / ११ / २०२३ रोजी वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर जाहिरातीमध्ये अनुक्रमांक १९ वर प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) हे पद नमूद आहे. या पदाकरिता संकेतस्थळावरील सविस्तर जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता व अनुभव नमूद करण्यात आलेला आहे. सदर पदाची शैक्षणिक पात्रता ही उमेदवार हा इयत्ता 1 ते 10 वी इंग्रजी माध्यमामधून शिकलेला असावा किंवा 1 ते 12 वी इंग्रजी माध्यमामधून शिक्षण शिकलेला असावा तसेच DED पदविका इंग्रजी माध्यमातून केलेली असावी व TET उत्तीर्ण अनिवार्य आहे.
स्पष्टीकरण
प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) या पदाकरिता अर्जदाराने लिंकवर अर्ज भरताना इयत्ता 1 ते 10 वी चे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे किंवा कसे या पर्यायावर NO पर्याय निवडला व त्यापुढील पर्यायात 1 ते 12 वी चे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे किंवा कसे या पर्यायावर Yes हा पर्याय निवडला असेल तरी अशा उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जातो.
याबाबत विभागामार्फत खुलासा करण्यात येतो की, सदर पदाकरिता उमेदवारांचे 1 ते 10 वी चे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असल्याचे बंधनकारक आहे तथापि लिंकमध्ये अशा उमेदवारांनी या पर्यायासमोर No पर्याय निवडला तरी त्याला पुढील 1 ते 12 वी चे शिक्षण इंग्रजी माध्यमातून पर्याय उपलब्ध होतो. ह्या पर्यायात काही अर्जदाराचे केवळ 11 वी व 12वी चे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असल्याने त्यांनी तेथे Yes हा पर्याय निवडला तरी 1 ते 10 वी चे मूळ शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले नसल्याने जरी अशा उमेदवाराचा अर्ज त्यांने भरलेल्या चुकीच्या माहितीमुळे स्वीकारला गेला असेल तरी असा उमेदवार पात्र केला जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी व अशा उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सुयोग्य पदाकरिता अर्ज करावा.

Adiwasi Vikas Vibhag Nashik Notification

Here we give the complete details of Maharashtra Tribal Recruitment 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Maharashtra State Cooperative Tribal Development Corporation
⚠️Number of Vacancies :  602 vacancies
⚠️Name of Post :  Upper Grade Stenographer, Lower Grade Stenographer, Senior Tribal Development Inspector, Research Assistant, Accountant, Senior Clerk, Housekeeper Female & Male, Superintendent Female & Male, Librarian, Senior Clerk Stenographer,  Laboratory Assistant, Tribal Development Inspector, Assistant Librarian, Primary & Secondary Education Servant
⚠️Job Location :  Nashik/Thane/ Nagpur/ Amravati
⚠️Pay-Scale Refer PDF File attached below.
⚠️Application Mode :  Online Application Mode
⚠️Age Criteria :  Between 18 to 38 years

Adivasi Vikas Vibhag Vacancy 2023-Vacancy Details for the above posts

1. Upper Grade Stenographer 03 Posts
2. Lower Grade Stenographer 13 Posts
3. Senior Tribal Development Inspector 14 Posts
4. Research Assistant 17 Posts
5. Deputy Accountant  41 Posts
6. Senior Clerk 187 Posts
7.  Stenographer 05 Posts
8. Housekeeper (Female)  43 Posts
9. Housekeeper (Male) 25 Posts
10. Superintendent (Female) 26 Posts
11. Superintendent (Male) 48 Posts
12. Librarian  38 Posts
13. Laboratory Assistant 29 Posts
14.  Tribal Development Inspector 08 Posts
15.  Assistant Librarian 01 Post
16. Primary Education Servant  75 Posts
17.  Secondary Education Servant 15 Posts
18. Higher Secondary Education Servant 14 Posts

How to Apply for Adivasi Vikas Vibhag Bharti 2023

  • The date, time and centre of the examination will be mentioned in the admit card. Information about the potential changes will be disseminated on the tribal development department’s https://tribal.maharashtra.gov.in website from time to time.
  • The method of filling the online application and the https://tribal.maharashtra.gov.in for submission of online application should be visited on the website and details of the posts to be filled cadre wise, details of posts, pay scale, prescribed age limit / age limit relaxation, selection method, general conditions and conditions, educational qualification, social and parallel reservation and provisions regarding reservation, course of online examination according to post, examination fee, guidelines for filling the application etc. will be available on the https://tribal.maharashtra.gov.in website.
  • The Commissioner, Tribal Development, Nashik shall have the power to postpone, cancel, partially change the competitive examination, change the total and cadre-wise number of posts and their decision will be final. No claim can be made in this regard. Also, if the eligible candidate of the parallel reservation shown is not available, then other eligible candidates of the same reserved category will be considered as per the rules prescribed by the government. The Commissioner, Tribal Development, Nashik will have the power to take a final decision regarding disputes, complaints, violations regarding the recruitment process.

⏰ All Important Dates of Adivasi Vikas Vibhag Vacancy 2023

⏰ Last Date
13th of December 2023

Important Link of Adivasi Vikas Vibhag Nashik Recruitment 2023

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️APPLY ONLINE
⚠️PDF ADVERTISEMENT 

Adivasi vibhag bharti apply

Maha Tribal Maharashtra Recruitment of Various Posts
Important Events Dates
Commencement of on-line registration of application 23/11/2023 03:00 PM
Closure of registration of application 13/12/2023
Closure for editing application details 13/12/2023
Last date for printing your application 28/12/2023
Online Fee Payment 23/11/2023 03:00 PM to 13/12/2023


Adivasi Vikas Vibhag Bharti 2023

Union Ministry of Tribal Welfare has invited applications from qualified candidates for the post of Joint Director. This recruitment is on deputation basis and will be for a period of three years. Ministry of Tribal Affairs has released the official notification for this recruitment for the post of Joint Director. The notification said that there is only one post vacant, and the age of the interested candidates should be up to 56 years. Candidates must have a Master’s Degree in Sociology or Social Work or Anthropology or Economics or Statistics or Mathematics or Geography from any recognized university. It has been clarified in the notification that the selected candidate will get salary up to Rs 39,100 per month.

आदिवासी कल्याण मंत्रालयात उच्च पदासाठी भरती, येथे करा अर्ज

  • केंद्र सरकारच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाने संयुक्त संचालक अर्थात जॉइंट डायरेक्टर या पदासाठी क्वालिफाइड उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. ही भरती डेप्युटेशन अर्थात प्रतिनियुक्ती तत्त्वावर असून, ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी असेल.
  • आदिवासी मंत्रालयाने जॉइंट डायरेक्टर पदावर या भरतीसाठी अधिकृत नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. एकच पद रिक्त असून, त्यासाठी इच्छुक उमेदवारांचं वय जास्तीत जास्त 56 वर्षांपर्यंत असावं, असं नोटिफिकेशनमध्ये म्हटलं आहे.
  • उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून सोशिऑलॉजी किंवा सोशल वर्क किंवा अँथ्रॉपॉलॉजी किंवा अर्थशास्त्र किंवा स्टॅटिस्टिक्स किंवा गणित किंवा भूगोल यांपैकी एका विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेली असणं आवश्यक आहे.
  • निवड झालेल्या उमेदवाराला मासिक 39,100 रुपयांपर्यंत वेतन मिळेल, असं नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

Latest news regarding adivasi vikas vibhag bharti is here. All the vacant posts in the tribal development department will be filled in the next four months and the people will get the services of the department more efficiently, said tribal development minister Dr. Vijayakumar Gavit expressed. He said that works worth 2 thousand crores will be done to connect all ashram schools, hostels, caste verification offices etc. under the Tribal Development Department with perennial roads. He expressed confidence that the completion of recruitment of vacancies and the completion of the work of connecting the offices with perennial roads will help in efficiently providing the services of the department to the public. Candidates Read the complete details given below on this page regarding the Maha Tribal Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

आदिवासी विकास विभागातील सर्व रिक्त पदांसाठी ४ महिन्यात जम्बो भरती

  1. आदिवासी विकास विभागातील सर्व रिक्त पदे येत्या चार महिन्यात भरण्यात येणार असून यामुळे जनतेला विभागाची सेवा अधिक सक्षमपणे मिळेल, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला. आदिवासी विकास विभाग, नागपूर कार्यालयात डॉ. गावित यांच्या हस्ते 62 रोजंदारी कर्मचाऱ्यांना आणि 5 अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. नागपूर आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी स‍मिती नागपूरच्या सहआयुक्त बबिता गिरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता उज्ज्वल डाबे आदी मंचावर उपस्थिती होते.
  2. डॉ. गावित म्हणाले, आदिवासी विकास विभागाच्या सेवा जनतेपर्यंत प्रभावीपणे पोचविण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची साथ महत्वाची असते. नागपूर विभागाने रोजंदारी आणि अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यासाठी गतीने काम केले. यातील कर्मचाऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्ती पत्र देतांना आनंद होत आहे. आदिवासी विभागाच्या राज्यातील अन्य कार्यालयांमध्ये रिक्त, रोजंदारी व अनुकंपा तत्वावर जागा भरण्याची प्रक्रिया येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  3. आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्व आश्रमशाळा, वसतीगृह, जात पडताळणी कार्यालये आदींना बारमाही रस्त्यांनी जोडण्यासाठी 2 हजार कोटींची कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रिक्त जागांची भरती आणि कार्यालयांना बारमाही रस्त्यांनी जोडण्याचे काम पूर्ण झाल्याने जनतेला या विभागाच्या सेवा सक्षमपणे पुरविण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘ड’ यादीमध्ये नाव नसलेल्या आदिवासी कुंटुंबांनी घरांसाठी अर्ज करण्याचे आवाहन डॉ. गावित यांनी केले. अशा सर्व अर्जांना मंजुरी देवून आदिवासी कुंटुंबांना घरे देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
  4. तत्पूर्वी, डॉ. गावित यांनी आयुक्त कार्यालयाच्या दर्शनी भागात स्थित गोंडराणी हिराई विविध वस्तू केंद्राला भेट दिली. येथे नागपूर विभागातील विविध आदिवासी महिला बचतगटांच्या खाद्य पदार्थ आणि हस्तकलेच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Adiwasi Vikas Vibhag Yojana – Employment for tribals, self-employment schemes: State cabinet – It was decided in the cabinet meeting held today to launch two schemes for employment, self-employment and setting up of farmer producer companies to improve the quality of life of tribals in the state. The two schemes will be implemented by the Shabri Tribal Finance and Development Corporation. In the first scheme, on the lines of The National Scheduled Tribes Finance and Development Corporation, New Delhi, loans up to Rs 5 lakh will be given for self-employment for self-employment in passenger vehicles, mini trucks, trucks and tractors, malvahu electric rickshaws as well as agri-allied businesses, automobile hotels, dhabas etc.,

आदिवासींसाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना – राज्य मंत्रिमंडळ निर्णय

राज्यातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी दोन योजना सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत या दोन योजना राबविण्यात येतील. यातील पहिल्या योजनेत राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्या धर्तीवर स्वयंरोजगारासाठी प्रवासी वाहन, मिनी ट्रक, ट्रक व ट्रॅक्टर, मालवाहू इलेक्ट्रिक रिक्षा त्याचप्रमाणे कृषी संलग्न व्यवसाय, ऑटोमोबाईल हॉटेल, धाबा सुरु करण्यासाठी पाच लाखांपर्यंत कर्ज दिले जाईल.

  • राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात येईल. यासाठी लागणाऱ्या ५३ कोटी ८६ लाख खर्चासदेखील मान्यता देण्यात आली. अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९९४ पासून कालबद्ध पदोन्नती देण्यात येते. राज्य शासनाने १ ऑक्टोबर २००६ पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केली आहे. याच धर्तीवर या शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील १ जानेवारी २०२४ पासून ही योजना लागू करण्यात येईल.
  • २७ अश्वशक्ती (एचपी) पेक्षा जास्त पण २०१ एचपीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रति युनिट ७५ पैसे अतिरिक्त वीज सवलत देण्यात येईल. २७ पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रति युनिट १ रुपया अतिरिक्त वीज सवलत लागू करण्यात येईल. ही वीज सवलत २७ एचपीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना तसेच २७ एचीपीपेक्षा जास्त परंतु २०१ एचपी पेक्षा कमी जोडभार असलेल्या व वस्त्रोद्योग विभागाकडे नोंदणी करणाऱ्या तसेच मान्यता मिळालेल्या उद्योगांना लागू राहील. ही सवलत राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०२३ २०२८ या कालावधीपर्यंत लागू असेल.

इतर प्रमुख निर्णय

  • धनगर समाजाचे काम करणाऱ्या अभिनव समाज फाउंडेशनला नवी मुंबई येथे चार हजार चौरस मीटरचा भूखंड
  • वस्तू व सेवा कर विभागात (जीएसटी) नवीन ५२२ पदांना मान्यता
  • राज्यातील ६१ आदिवासी अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करणार

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
  1. Admin says

    Adiwasi Vikas Vibhag Bharti Details

  2. 12 विच्या बेसवर आदिवासी विकास विभागमध्ये जागा असल्यास कृपया मला मार्गदर्शन करा

  3. Pravin. Warkhede says

    Where is the tribal development department vacancy available in this msw

  4. Pravin. Warkhede says

    ,गृहपाल आणि अधिक्षक या पदासाठी जाहिरात केवा निघणारं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!