अहमदनगर जिल्हा सहकारी बँक भरती लेखी परीक्षा ९ ते १९ जानेवारी, परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध – ADCC Bank Admit Card Download
ADCC Bank Hall Ticket Download
ADCC Bank Admit Card Download available for download for various 700 posts – The Written examination for recruitment to Ahmednagar District Cooperative Bank will be held from January 9 to January 19. Candidates from Ahilyanagar district have started getting hall tickets for the exam. Surprisingly, the exam is being conducted at various centres in Pune district. Candidates keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
बँक अहिल्यानगरची; भरती परीक्षा मात्र पुण्याला वर्क वेलबाबत आक्षेप; तरी दिली संधी
अहिल्यानगर अहमदनगर जिल्हा सहकारी बँक नोकर भरतीची लेखी परीक्षा ९ जानेवारी ते १९ जानेवारी या दरम्यान होणार आहे. आश्चर्य म्हणजे ही परीक्षा अहिल्यानगरऐवजी पुणे जिल्ह्यात होत आहे. जिल्हा बँकेच्या विविध ७०० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीचे काम वर्क वेल इन्फोटेक प्रा. लिमिटेड या कंपनीला देण्यात आलेले आहे. या कंपनीबाबत अनेक आक्षेप उपस्थित झालेले आहेत. कंपनीने सहकार विभागाच्या यादीवर येण्यासाठी दाखवलेला अनुभव चक्क बोगस असल्याचे पुरावेच लोकमतने समोर आणलेले आहेत. याबाबत कोणाची तक्रार आल्यास आपण चौकशी करू असे सहकार आयुक्त दीपक तावरे लोकमतशी बोलताना म्हणाले होते.
अहिल्यानगर जिल्ह्यातील टिळक भोस यांनी कंपनीबाबत लिखित तक्रार सहकार आयुक्तांकडे केली आहे. मात्र सहकार विभागाने अद्यापपर्यंत याबाबत चौकशी केलेली दिसत नाही. वर्क वेल या कंपनीकडेच भरतीचे काम कायम असून त्यांनी लेखी परीक्षेची कार्यवाही सुरू केलेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील उमेदवारांना परीक्षेचे हॉल तिकीट प्राप्त होण्यास सुरुवात झालेली आहे. आश्चर्य म्हणजे ही परीक्षा पुणे जिल्ह्यातील विविध केंद्रांवर होत आहे. अहमदनगर जिल्हा बँकेच्या भरतीची परीक्षा पुणे जिल्ह्यात होण्याचा हा इतिहासातील पहिलाच प्रसंग आहे.
पारदर्शकता कशी राहणार?
- ■ अनेक उमेदवारांनी लोकमतशी बोलताना आक्षेप उपस्थित केले. पुणे जिल्ह्यात कंपनीने कोणती केंद्र निवडलेली आहेत? तेथील केंद्रांवर नजर कोण ठेवणार? पारदर्शकता कशी राहणार? याबाबत संभ्रम आहे.
- ■ अहिल्यानगर जिल्ह्यातील हजारो मुलांनी भरतीसाठी अर्ज केले आहेत. या सर्व मुलांना परीक्षेसाठी पुणे जिल्ह्यात वारी करण्याची वेळ येणार आहे.
अ. क्र. | तपशील | दिनांक |
---|---|---|
१ | संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरणे दिनांक व वेळ | १३ सप्टेंबर २०२४ ते २७ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
२ | ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक | ०४/०१/२०२५ |
३ | ऑनलाईन परीक्षा दिनांक | ०९/०१/२०२५, १०/०१/२०२५, ११/०१/२०२५, १२/०१/२०२५. १३/०१/२०२५ आणि १९/०१/२०२५ |
४ | कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक | बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल |
पदभरती अंतिम पात्र उमेदवार यादी :-
अ. क्र. |
पोस्टचे नाव |
पात्र उमेदवार यादी |
१ | जनरल मॅनेजर (संगणक) | Click here |
२ | मॅनेजर (संगणक) | Click here |
३ | डेप्युटी मॅनेजर (संगणक) | Click here |
४ | इन्चार्ज प्रथम श्रेणी | Click here |
५ | क्लार्क | Click here |
६ | वाहनचालक | Click here |
७ | सुरक्षा रक्षक | Click here |
ADCC Bank Hall Ticket Download