शाश्वत ऊर्जा क्षेत्र देणार १७ लाख जणांना नोकऱ्या, तीन वर्षांत कुशल कामगार २६% वाढणार – Sustainable Energy
Jobs in Sustainable Energy | Renewable Energy
As per the latest news job opportunity in sustainable energy sector for eligible candidates. The sustainable energy sector will employ 17 lakh people, skilled workers will increase by 26% in three years – the survey revealed that 17 lakh jobs will be created in the country’s renewable energy sector in the next three years. The availability of skilled youth is up to 12 lakh less than the demand in the sector. The number of skilled workers will increase by 26 per cent, the report said. Ashwini Sehgal, president of the Indian Solar Manufacturers Association, said there is a shortage of skilled workers in the solar energy industry. This includes cell manufacturing, advanced grid integration.
Renewable Energy – शाश्वत ऊर्जा क्षेत्र देणार १७ लाख जणांना नोकऱ्या, तीन वर्षांत कुशल कामगार २६% वाढणार – देशात सौर ऊर्जेसह शाश्वत ( रिन्यूएबल) ऊर्जा क्षेत्रात आगामी ३ वर्षांत १७ लाख रोजगार निर्माण होतील, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. या क्षेत्रातील मागणीच्या तुलनेत कुशल तरुणांची उपलब्धता १२ लाखांपर्यंत कमी आहे. कुशल कामगारांची संख्या २६ टक्के वाढेल, असेही अहवालात म्हटले आहे.
‘इंडियन सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’चे अध्यक्ष अश्विनी सहगल यांनी सांगितले की, सौर ऊर्जा क्षेत्रातील उद्योगात कुशल कामगारांची कमी आहेत. सेल निर्मिती, अद्ययावत ग्रिड एकीकरणचा त्यात समावेश आहे.
कर्मचारी नसल्याने यंत्रे पडून
- सध्या कुशल कामगारांची वार्षिक टंचाई जवळपास २० टक्के आहे. त्यामुळे महागडी यंत्रे नुसतीच पडून आहेत. त्याचा उत्पादन योजनांवर परिणाम होत आहे.
- यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने या वर्षाच्या प्रारंभी कामगारांच्या कौशल्य प्रशिक्षणात मदत देण्याचा तसेच चीनच्या तंत्रज्ञांसाठी व्हिसा व्यवस्था शिथिल करण्याचा प्रस्ताव दिला होता.