मतदान कार्ड नाही? तरी करता येणार मतदान ! Voter ID Card
Voter ID Card
Voter ID Card – Candidates who don’t have a Voter ID? How they Vote? Read the details given here. Do these voters not have voter ID cards? However, 12 types of identity cards, including Aadhaar and PAN cards, will be accepted, he said. Apart from the election id card issued to voters at the time of polling, these proofs include passports, driving licenses, photo identity cards distributed by central or state governments, as well as public sector undertakings, public limited companies, passbooks distributed with photographs by banks or postal departments, PAN cards, smart cards issued by the Registrar General of India and Census Commissioner under the National Population Register, employment issued under MGNREGA The 12 proofs are identity cards, pension documents, official identity cards distributed to members of Parliament, Legislative Assemblies and Legislative Councils, Aadhaar cards, special identity cards distributed to persons with disabilities by the Ministry of Social Justice and Empowerment, Government of India, health insurance smart cards distributed by the Ministry of Labour.
मतदान कार्ड नाही? तरी करता येणार मतदान !
या मतदारांकडे मतदान ओळखपत्र नाही? तरी करता येणार मतदान आधार, पॅनकार्डसह १२ प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य धरणार असल्याचे माहिती दिली. मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र याशिवाय या पुराव्यांमध्ये पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाचे दस्तऐवज, संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत
Voter ID Card