बीड जिल्हातील गेवराई तालुक्यात कृषी विभागाची ४६ पदे रिक्त Beed Krushi Vibhag Bharti
Beed Krushi Vibhag Bharti 2024
Beed Krushi Vibhag Bharti 2024 – The Agriculture Office is known as a link between agriculture and farmers with the government. However, out of the 87 sanctioned posts in the Gevarai taluka agriculture office, 46 posts of officers and staff are vacant. Under the Maharashtra Rural Employment Guarantee Scheme, the agriculture department is not able to do the work of planting orchards in the land of individual beneficiaries, mechanization, drip irrigation, sprinkler, free seed distribution, soil testing, excessive rainfall, drought panchnama, pm kisan samman and namo mahasanman yojana work and agricultural supplementary guidance to the farmer on time. The farmers have been demanding that the vacant posts of officers and employees of the Gevarai taluka agriculture office be filled up on time.
गेवराई तालुक्यात कृषी विभागाची ४६ पदे रिक्त
शेती आणि शेतकरी यांना शासनाबरोबर जोडण्यात आलेला दुवा म्हणून कृषी कार्यालयाची ओळख आहे. परंतु, गेवराई तालुका कृषी कार्यालयातील ८७ मंजूर पदांपैकी ४६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कृषी विभागाकडून वैयक्तिक लाभार्थ्यांच्या जमिनीत फळबाग लागवड योजना, यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, मोफत बियाणे वाटप, मातीपरिक्षण, अतिवृष्टी, अवकाळीचे पंचनामे, पंतप्रधान किसान सन्मान व नमो महासन्मान योजनेचे काम याशिवाय शेतकऱ्यास शेती पूरक मार्गदर्शन आदी कामे रिक्त पदांमुळे वेळेत होत नाहीत. वेळीच गेवराई तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
Beed Krushi Vibhag Bharti 2024 कृषी सहायकांची दमछाक – गेवराई, उमापूर, मादळमोही आणि जातेगाव या चार मंडळात प्रत्येकी १२ तर तालुका कृषी कार्यालय येथे एक असे एकूण ४९ कृषी सहायकांची पदे मंजूर असताना, तब्बल ३३ कृषी सहायक यांची पदे रिक्त असल्याने कार्यरत कृषी सहायक यांच्याकडे दहा-दहा गावांचा भार सोपविण्यात आल्याने कृषी सहायक यांची चांगलीच दमछाक होत आहे.
या पिकांना प्राधान्य – गेवराई तालुक्यात पेरणी योग्य जवळपास १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर, मूग, बाजरी तर रब्बी हंगामात गहू, हरभरा, कांदा तर उन्हाळ्यात भुईमूग, बाजरी, मका आदी पिके शेतकरी घेतात.
Beed Krushi Vibhag Bharti