धाराशिव येथे “पोलिस पाटलांची भरती प्रक्रिया” सुरू करावी, अशी मागणी – Dharashiv Police Patil Bharti 2023
Dharashiv Police Patil Recruitment 2023
Dharashiv Police Patil Bharti 2023 – Many posts of Police Patil in Dharashiv district are vacant. Therefore, each police station has been given additional charge of two or three villages. Police Patil recruitment process has started in other districts. Accordingly, the reservation of the concerned village has been drawn. Police Patil recruitment should be implemented immediately in Dharashiv district as well. The district branch of the State Village Workers Police Patil Sangh has requested the District Collector to submit a proposal to the government for constructing a Police Patil Bhawan at the district location. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
धाराशिव ‘पोलिस पाटलांची भरती प्रक्रिया सुरू करा’
जिल्ह्यात पोलिस पाटील भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाच्या जिल्हा शाखेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत संघाच्या शिष्टमंडळाने बुधवारी (ता. १९) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यात पोलिस पाटील यांची अनेक गावातील पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका-एका पोलिस पाटलाकडे दोन-तीन गावचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यात पोलिस पाटील भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने संबंधित गावाचे आरक्षण सोडत काढण्यात आल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यातही तत्काळ पोलिस पाटील भरती राबवावी. जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिस पाटील भवन उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!
पोलिस पाटलांचे नूतनीकरण विनाविलंब करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. संघाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत देवकते, मीडिया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील, जिल्हा सरचिटणीस धनंजय गुंड, सचिन जाधव, चंद्रकांत मगर, परशुराम यादव, अजित मंडलिक, मोहन गुरव, श्याम पाटील आदी यावेळी उपस्थित होते.