Raigad Police Adhikari Bharti -रायगड पोलिस विभागात ४३ पोलिस अधिकाऱ्यांची पदे रिक्त
Raigad Police Officer Bharti 2023
Raigad Police Adhikari Bharti 2023: as per the news, As many as 43 police officer posts are vacant in Raigad Police Department. 2 thousand 411 posts of police personnel have been approved in Raigad District Police Force, out of which 1 thousand 954 posts have been filled. Vacant police personnel include Assistant Faujdar, Police Constable, Police Naik, Police Constable and other posts. More details about Raigad Police adhikari Recruitment 2023 are given below.
Police Bharti 2022-पोलिस भरतीची ‘लेखी परीक्षा’ एप्रिलमध्ये होणाची शक्यता..!
Raigad Police Adhikari Bharti 2023: अलिबाग : कोकण विभागात रायगड पोलिसांच्या कामगिरीला अव्वल स्थान मिळाले होते, मात्र याच रायगड पोलिस विभागात तब्बल ४३ पोलिस अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ नसल्याने उपलब्ध पोलिस यंत्रणेला अक्षरशः कसरतच करावी लागत आहे. जिल्ह्यात दिवसाला ७ ते १० गुन्ह्यांची नोंद होत आहे. मुंबईपासून जवळ असलेला रायगड जिल्हा झपाट्याने विकसित होत आहे. नवनवीन प्रकल्प येथे येत आहेत.
औद्योगिकीकरणातही जिल्हा अग्रेसर आहे. यामुळे नागरीकरणही वाढत आहे. याचबरोबर गुन्हेगारांचा शिरकावही मोठ्या प्रमाणात झाला आहे. रायगड पोलिस दूरक्षेत्र हद्दीतील २७ पोलिस ठाण्यांमध्ये दिवसाला ७ ते १० गुन्ह्यांची नोंद होत आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस दलाला तारेवरची कसरत करावी लागत आहे
Raigad Police Adhikari Recruitment 2023- Vacancy Details
पोलिस कर्मचाऱ्यांची पदे मंजूर
रायगड जिल्हा पोलिस दलात ४१ पोलिस अधिकाऱ्यांव्यतिरिक्त ४५७ पोलिस कर्मचाऱ्यांची पदेही रिक्त आहेत. २ हजार ४११ पोलिस कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असून, त्यामध्ये १ हजार ९५४ पदे भरण्यात आली आहेत. रिक्त पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये सहायक फौजदार, पोलिस हवालदार, पोलिस नाईक, पोलिस कॉन्स्टेबल यासह इतर पदांचा समावेश आहे.
Raigad Police Adhikari Bharti 2023