Wardha Teacher Bharti -वर्धा जिह्यातील शाळेमध्ये सातशे शिक्षकांच्या जागा रिक्त
Wardha Teacher Recruitment 2023
Wardha Teacher Bharti 2023- Seven hundred teacher posts are vacant in schools in Wardha district as no teachers have been recruited for the last ten to twelve years. The time has come to rely on contract teachers for teaching in schools.
Wardha Teacher Bharti 2023: आर्वी : ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची गंगा घरोघर पोहोचविण्याचा ध्यास असल्याचा कांगावा होत आहे. आणि आधुनिकीकरण संगणकीकरणाचा वापर करुन शिक्षण प्रणाली बदलण्याचा बाता होत असून, नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणणार आहे. परंतु असे असताना शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने अध्ययन-अध्यापनाचे कार्य होणार तरी कसे? जिल्ह्यात सातशे शिक्षकांच्या जागा रिक्त असून, कंत्राटी शिक्षकांच्या भरवशावर शाळांमध्ये धडे देण्याची वेळ आली आहे. हीच परिस्थिती राज्यातील इतरही जिल्ह्यांत असून, मराठी शाळा बंद करण्याचे षडयंत्र तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या दहा ते बारा वर्षापासून शिक्षक भरती केली नसल्याने या मंदिरात ज्ञानदान करणारेच राहिलेले नाहीत. बरेच शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने शिक्षकांचा बॅकलॉग वाढतच चालला आहे. परिणामी, शाळा चालवावी कशी? असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला असून, कार्यरत शिक्षकांनी पदरमोड करून मानधन तत्वावर शिक्षकांची नियुक्ती केली आहे.
Vardha Marathi teacher plz send contact number ????