Medical Fire Department -महापालिकेतील अग्निशमन, आरोग्य विभागातील भरतीला हिरवा कंदील
Medical Fire Department Bharti 2022
Medical Fire Department 2022- The urban development department has cleared the way for the recruitment of 706 posts including 348 posts in fire department and 358 posts in health and medical department. The state government had not given instructions regarding the organization through which the recruitment of these posts should be done.
महापालिकेतील अग्निशमन विभागातील ३४८, तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदांसाठीच्या भरतीची प्रक्रियेला प्रशासनाने गती दिली आहे.
राज्य सरकारने नोकरभरतीसाठी ‘टीसीएस’ तसेच ‘आयबीपीपीएस’ या दोन कंपन्यांमार्फत नोकरभरतीला हिरवा कंदील दिल्यानंतर प्रशासनाने या दोन कंपन्यांकडून नोकरभरती संदर्भातील प्रस्ताव मागितला आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासनाकडून विभागाकडून दोन्ही कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. या कंपन्यांकडून प्रस्ताव आल्यानंतर एक कंपनी महापालिकेकडून अंतिम केली जाणार आहे.
असा आहे मंजुरीचा प्रवास
शासनाच्या ३५ टक्के आस्थापना खर्चाची मर्यादा नोकरभरतीला अडचणीची ठरत होती. परंतु, करोनाच्या काळात अत्यावश्यक गरज म्हणून नगरविकास विभागाने सुधारित आकृतीबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन आदी विभागातील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजुरी दिली. दुसरीकडे सन २०१७ पासून महापालिकेची सेवा प्रवेश नियमावलीची फाइल मंत्रालयात मंजुरीअभावी पडून असल्याने ही भरती अडकली होती.
अखेर नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांसाठीची सेवा प्रवेश नियमावली मंजूर केल्याने नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला. राज्य शासनाने या पदांची भरती कोणत्या संस्थेमार्फत करावी यासंदर्भातील निर्देश दिले नव्हते.
परंतु, टीसीएस (टाटा कन्सल्टिंग सर्विसेस), आयबीपीपीएस (इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत राबविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला गेला. यानंतर महापालिकेने या दोन्ही कंपन्यांना मंगळवारी (दि. २९ नोव्हेंबर) पत्र पाठवून त्यांच्याकडून भरती प्रक्रियेसंदर्भातील पदनिहाय सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे पत्र दिल्याने या भरती प्रक्रियेला चालना मिळाली.
राज्य सरकारच्या निर्देशानंतर महापालिकेकडून टीसीएस, आयबीपीपीएस या कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यांच्याकडून भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर प्रस्ताव मागवण्यात आले असून, त्यानंतर एक कंपनीची भरतीसाठी निश्चिती केली जाईल.
महापालिकेत पदांची आकडेवारी…
- ‘क’ वर्ग संवर्गातील मंजूर पदे : ७,०८२
- सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्तपदे : २,६०० च्या वर
- सद्य:स्थितीत कार्यरत अधिकारी, कर्मचारी : ४,५००
Medical Fire Department Recruitment 2022: As per the latest news Recruitment of 248 posts in fire and medical department will be done soon. This recruitment process will be implemented through TCS or IBPS and the recruitment will be done in the month of November. Read More details about Medical Fire Department Recruitment 2022 are given below.
अग्निशमन व वैद्यकीय विभागात नोव्हेंबर मध्ये भरती
राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या क्षेत्राबाहेरील पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याच अनुषंगाने महापालिकेनेदेखील अग्निशमन व वैद्यकीय विभागातील २४८ पदांच्या भरतीचा निर्णय घेतला असून, ‘टीसीएस’ किंवा ’आयबीपीएस’ मार्फत भरती केली जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यात भरती होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Fire Department – मुंबई अग्निशमन दलात 900 अग्निशामकांची भरती; नोव्हेंबरपासून मेगा भरती प्रक्रिया
- कोविड काळामध्ये वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडाल्याने राज्य शासनाने संपूर्ण राज्यात महापालिकांमध्ये महत्त्वाची पदे तातडीने भरण्याचा निर्णय दिला. तातडीची बाब म्हणून मानधनावर पदे भरण्यास मान्यता दिली.
- कोरोनानंतरदेखील राज्य शासनाने महत्त्वाचे म्हणजेच अग्निशमन व वैद्यकीय विभागात रिक्त असलेल्या पदांवर भरती करण्याचा निर्णय जाहीर केला. नाशिक महापालिकेत वैद्यकीय विभागात ८१ डॉक्टरांसह अग्निशमन विभागातील २४८ पदे रिक्त आहेत.
- परंतु, सेवा- शर्ती नियमामुळे ती पदे भरता येत नाही. शासनाने सेवा- शर्ती नियमावलीचा तांत्रिक मुद्दा निकाली काढताना महापालिकेकडून तातडीने प्रस्तावदेखील मागविला. त्यानंतर रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली.
- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या क्षेत्र बाहेरील राजपत्रित गट ‘ब’ तसेच गट ‘क’ संवर्गातील पदांकरिता टीसीएस किंवा आयबीपीएसमार्फत भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच अनुषंगाने नाशिक महापालिकेमार्फतदेखील नोव्हेंबर महिन्यात भरती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Comments are closed.