Chandrapur Jobs: चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात अधिकाऱ्यांची पदे रिक्त
Government Jobs in Chandrapur Korpana
Government Jobs in Chandrapur: There are vacancies Of chief executives in many government offices in Korpana taluka. The major posts of Panchayat Samiti, Secondary Registrar, Assistant Registrar, Land Records, Nagar Panchayat, Rural Hospital, Police Thane, Telephone Center, Veterinary Dispensary at Korpana have been vacant for the last several years. Read more details as given below.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात अधिकाऱ्यांची पदे रिक्त
कोरपना या तालुका पातळीवरील अनेक शासकीय कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रभारी अधिकाऱ्याच्या भरवशावर येथील कारभार सुरू आहे. ११३ गावांचा समावेश असलेल्या कोरपना येथील पंचायत समिती, दुयम निबंधक, सहायक निबंधक, भूमी अभिलेख, नगरपंचायत, ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे, दूरभाष केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना या कार्यालयातील प्रमुख पदच गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे.
परिणामी या कामाचा व्याप अन्य अधिकाऱ्यांना प्रभारी म्हणून सांभाळावा लागत आहे. यात प्रामुख्याने गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका पशुसंवर्धन अधिकारी (विस्तार), सहायक निबंधक, दुयम निबंधक, उपकोषागार अधिकारी, मुख्याधिकारी, उपाधीक्षक, भूमी अभिलेख, पशुवैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, पोलीस निरीक्षक आदी प्रमुख पदांचा समावेश आहे.