Amravati Jobs – तिवसा तालुक्यात विविध विभागात अनेक पदे रिक्त
Govt Jobs in Amravati
Government Jobs in Amravati Tiosa: There are many vacancies in various divisions in Tivasa taluka of Amravati district. Various posts are vacant in Tehsil Office, Land Records Office, Sub-District Hospital, Panchayat Samiti Office and MSEDCL. Lack of manpower and increased work stress. Read More details as given below.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात विविध विभागात अनेक पदे रिक्त
तालुक्याचे ठिकाण असलेल्या तिवसा शहरात ग्रामीण भागातील नागरिकांची दैनंदिन वर्दळ असते. तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती कार्यालय व महावितरण कंपनीच्या कार्यालयात नागरिकांची गर्दी दिसून येते. परंतु, मनुष्यबळाचा अभाव असल्याने अनेक वेळा नागरिकांना आल्यापावलीच परतावे लागते. कामानिमित्त येणाऱ्या किंवा अत्यावश्यक महत्त्वाची माहिती मागणाऱ्यांना प्रभारी पदांचे शस्त्र वापरून अधिकारी, कर्मचारी बाहेरचा रस्ता दाखवण्यात रस घेतात, असे चित्र आहे.
मनुष्यबळाचा अभाव असल्याने व कामाचा ताण वाढल्याने बऱ्याच कार्यालयांमध्ये मोजक्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडते. क्षुल्लक कामांसाठी सर्वसामान्यांना आपल्या मोलमजुरीवर पाणी फिरवून शासकीय उंबरठे झिजवावे लागते.
रिक्त पदे असलेली कार्यालये .तहसील कार्यालय –
- महसूल सहाय्यक ५, शिपाई५ –
- पंचायत समिती कार्यालय – गट शिक्षणाधिकारी१, बालविकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ)१ –
- तालुका कृषी विभाग – कृषी अधिकारी २ –
- उर्ध्व वर्धा कार्यालय – (उपविभाग) कनिष्ठ अभियंता-३
- स्थापत्य अभियांत्रिकी सहायक -३
- वनविभाग कार्यालय – वनअधिकारी (आरएफओ)१ –
- भूमिअभिलेख कार्यालय – उपअधीक्षक १, अभिलेखपाल १, भूमापक २, निमतानदार १, शिपाई
- – वीज वितरण कंपनी – प्रधान तंत्रज्ञ
- १, वरिष्ठ तंत्रज्ञ १, तंत्रज्ञ ४. .
- दुय्यम निबंधक कार्यालय – उप निबंधक-१, शिपाई-१
- सार्वजनिक बांधकाम विभाग – वरिष्ठ लिपिक-१
- शासकीय उपजिल्हा रुग्णालयवैद्यकीय अधिकारी १, औषधी निर्माण अधिकारी १, बधिरीकरण तज्ज्ञ १, कनिष्ठ लिपिक १, कक्षसेवक २ .सहाय्यक निबंधक
- सहकारी संस्था कार्यालय – सहाय्यक सहकारी अधिकारी १,शिपाई वर्ग ३-१, शिपाई वर्ग ४-१
- नगर पंचायत – स्वच्छता निरीक्षक २, प्रयोगशाळा सहाय्यक १, पंप ऑपरेटर/ वीजतंत्र जोडारी ३, वायरमन१
Vanrakshak vibhag madhe asel tr sanga job