GTS Bharti- शासकीय परिवहन सेवा कार्यालयातील तब्बल ७५ टक्के पदे रिक्त
Government Transport Service Recruitment 2022
GTS Bharti 2022: The posts of Class A Controller and Accounts Officer in GTS office have been vacant for the last several years. About 75% of the posts in government transport services are vacant. A total of 188 posts of direct service recruitment and promotion have been sanctioned in various groups in the Government Transport Service (GTS) office; But in reality, about 75% of the posts, including GTS controllers, are vacant. A total of 125 posts including Office Superintendent, Assistant Superintendent Workshop, Chief Clerk, Cashier are vacant in GTS office.
MSRTC Bharti – MSRTC तर्फे या जिल्ह्यात होणार कंत्राटी चालकाची भरती
शासकीय परिवहन सेवा कार्यालयातील तब्बल ७५ टक्के पदे रिक्त
Government Transport Service Recruitment 2022 : शासकीय परिवहन सेवा (जीटीएस) कार्यालयातील विविध गटांतील सरळसेवा भरती आणि पदोन्नतीचे एकूण १८८ पदे मंजूर आहेत; मात्र प्रत्यक्षात जीटीएस नियंत्रकांसह तब्बल ७५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे राज्य अतिथींसाठी वाहने पुरवणाऱ्या जीटीएसचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे.
- जीटीएस कार्यालयातील अ वर्गातील नियंत्रक आणि लेखाधिकारी ही दोन्ही सरळसेवेतील पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. दोन्ही पदांचा प्रभार अनुभव नसलेल्या अधिकाऱ्यांकडे दिला जात आहे.
- ब वर्गातील मंजूर पाच पदांपैकी केवळ दोन पदे भरण्यात आली आहेत, तर क वर्गातील १५२ मंजूर पदांपैकी तब्बल १०९ पदे रिक्त आहेत. ड वर्गातील २९ पदांपैकी ११ पदे रिक्त आहेत. अशाप्रकारे जीटीएस कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक, सहायक अधीक्षक कार्यशाळा, प्रमुख लिपीक, रोखपाल यांच्यासह एकूण १२५ पदे रिक्त असल्याचे चित्र आहे.
- जीटीएस कार्यालयातील बहुतांश पदे तांत्रिक कामांशी संबंधित आहेत. तरीही अनेक पदांचा कारभार अतांत्रिक अधिकारी- कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना वाहन पुरवण्याचे तसेच वाहनांच्या देखभालीचे काम रामभरोसे सुरू आहे. यासंदर्भात राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना संपर्क केला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
Vacancy Details of GTS Recruitment 2022
रिक्त पदांची संख्या
संवर्ग – मंजूर पदे – भरलेली पदे – रिक्त पदे
अ – २ – ० – २
ब – ५ – २ – ३
क – १५२ – ४३ – १०९
ड – २९ – १८ – ११
एकूण – १८८- ६३ – १२५