AISSEE 2022-सैनिक शाळा प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
AISSEE 2022Admit Card
Big news for candidates preparing for All India Sainik School Entrance Exam (AISSEE 2022 admit card). The National Testing Agency (NTA) has released the admission cards of the candidates who have applied for the Sainik School entrance examination.
AISSEE admit card 2022: ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रन्स एक्झाम (All India Sainik School Entrance Examination, AISSEE 2022 admit card) ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत बसण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे जाहीर केली आहेत.
एआयएसएसईई प्रवेशपत्र २०२२ ( AISSEE Hall Ticket 2022) डाउनलोड करण्याची लिंक अधिकृत वेबसाइट aissee.nta.nic.in वर सक्रिय करण्यात आली. सैनिक शाळा प्रवेश परीक्षा २०२२ साठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पोर्टलवर दिलेल्या लिंकवरून AISSEE २०२२ प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.
इयत्ता सहावी आणि नववीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करणारे सैनिक शाळा प्रवेश परीक्षेला बसलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवरून प्रवेशपत्र तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
AISSEE २०२२ च्या वेळापत्रकानुसार, इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दुपारी २ ते ४.३० या वेळेत घेतली जाईल. इयत्ता नववीच्या प्रवेशाची परीक्षा दुपारी २ ते ५ या वेळेत घेतली जाणार आहे. एनटीएतर्फे AISSEE परीक्षा ओएमआर उत्तरपत्रिकेद्वारे आयोजित केली जाईल. ज्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) असतील. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर परीक्षेशी संबंधित अधिक माहिती मिळू शकणार आहे.