FSSAI Internship – FSSAI मध्ये इंटर्नशिपची मोठी सुवर्णसंधी-जाणून घ्या
FSSAI Internship Scheme 2022
Candidates will soon have the opportunity of internship (FSSAI Internship Scheme 2022) at Food Safety and Standards Authority of India Internship 2022. The FSSAI internship program will provide interns with opportunities to learn new things in various fields such as food regulation and food safety administration. Therefore, this will be a golden opportunity of internship in a government office for the candidates
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India Internship 2022) इथे लवकरच उमेदवारांना इंटर्नशिपची (FSSAI Internship Scheme 2022) संधी उपलब्ध होणार आहे. FSSAI इंटर्नशिप प्रोग्राम फूड रेग्युलेशनच्या आणि अन्न सुरक्षा प्रशासन अशा विविध क्षेत्रात इंटर्नला नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी ही सरकारी कार्यलयात इंटर्नशिपची सुवर्णसंधी असणार आहे. या इंटर्नशिपसाठी अप्लाय कसं करणार याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
FSSAI Internship Registration 2022- अशी असेल पात्रता (Eligibility Criteria)
- भारतातील/विदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पुढील शिक्षण घेत असलेले उमेदवार या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी पात्र असणार आहेत.
- रसायनशास्त्र किंवा जैवरसायनशास्त्र किंवा अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा अन्न आणि पोषण किंवा खाद्यतेल तंत्रज्ञान किंवा सूक्ष्मजीवशास्त्र किंवा डेअरी तंत्रज्ञान किंवा कृषी किंवा बागायती विज्ञान किंवा औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र किंवा विषशास्त्र किंवा सार्वजनिक आरोग्य किंवा जीवन विज्ञान किंवा जैवतंत्रज्ञान किंवा फळ आणि भाजी तंत्रज्ञान किंवा अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता हमी.यामध्ये पदव्युत्तर पदवी अथवा B.Tech/BE मध्ये शिक्षण घेत असलेले उमेदवार यासाठी पात्र असणार आहेत.
- PG डिप्लोमा/पत्रकारिता, जनसंपर्क आणि जनसंपर्क अधिकारी पदवी असलेल्या उमेदवारांनाही इंटर्नशिपची संधी मिळणार आहे.
- बी.ई. / बी. टेक संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान सॉफ्टवेअर अभियांत्रिकी किंवा संबंधितब्रांचमध्ये शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनाही इंटर्नशिपची संधी देण्यात येणार आहे.
- सार्वजनिक धोरण सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा बॅचलर/मास्टर ऑफ लॉमध्ये शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनाही इंटर्नशिपची संधी देण्यात येणार आहे.
- फूड टेक्नॉलॉजी किंवा संबंधित विषयातील बॅचलर प्रोग्रामच्या 3ऱ्या / 4थ्या वर्षातील विद्यार्थीही अप्लाय करू शकणार आहेत.
इंटर्नशिपचा कालावधी- Duration of FSSAI Internship 2022
- इंटर्नशिप संपूर्ण वर्षभर वेगवेगळ्या वेळी उपलब्ध असेल, इंटर्नशिप 03 महिन्यांपर्यंतच्या कालावधीसाठी ऑफर केली जाईल, जी जास्तीत जास्त 06 महिन्यांपर्यंत वाढविली जाऊ शकते. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीची इंटर्नशिप दिली जाणार नाही.
कुठे असणार इंटर्नशिप- Place of Internship
ही इंटर्नशिप संपूर्ण देशभरातील कार्यालयांमध्ये घेतली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईस्थित ऑफिसचाही समावेश आहे. FSSAI (पश्चिम क्षेत्र), हॉल मार्क बिझनेस प्लाझा, संत ज्ञानेश्वर मार्ग, समोर. गुरुनानक हॉस्पिटल रोड, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051 या पत्त्यावर ही इंटरशीप होणार आहे.
अशा पद्धतीनं करा अप्लाय- How to apply for FSSAI Internship 2022
- इच्छुक आणि पात्र विद्यार्थी निर्दिष्ट नमुन्यानुसार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://fssai.gov.in/internship/ या लिंकवर क्लिक करा
- अंतिम निवडीसाठी निवडलेल्या उमेदवारांना एक लहान लेखन / सादरीकरण सबमिट करणे आवश्यक असू शकते.
- निवडलेल्या उमेदवारांची अंतिम यादी त्यांच्या प्रवेशाच्या तारखेसह आणि इंटर्नशिप कार्यकाळ FSSAI वेबसाइटवर ऑनलाइन घोषित केला जाईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ डिसेंबर २०२१ आहे.
इतका मिळणार Stipend
या इंटर्नशिपसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 10,000/- रुपये प्रतिमहिना Stipend दिला जाणार आहे.
[email protected]