सिपेट प्रकल्प अंतर्गत तरुणांना मिळणार रोजगार आणि प्रशिक्षण
CIPET Nashik Bharti 2021
The CIPET (Central Institute of Petrochemical Engineering) project has recently been approved by the state government to provide education, training and employment to the youth of the district. The project will provide education, training and employment to 2,000 youth every year. Read More details as given below.
सिपेट प्रकल्प अंतर्गत तरुणांना मिळणार रोजगार आणि प्रशिक्षण
CIPET Nashik Recruitment 2021
जिल्ह्यातील तरुणांना शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार मिळावा सिपेट (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग) प्रकल्पाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. जागेअभावी रद्द झालेला पनवेल येथील प्रकल्प आता नाशिक येथे होणार आहे. प्रकल्पाविषयीची राज्य सरकारची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच प्रत्यक्ष प्रकल्प उभारण्याच्या कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. या प्रकल्पामुळे दरवर्षी दोन हजार तरुणांना शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध होणार आहे.
केंद्र सरकारने पनवेल येथे सिपेट प्रकल्प मंजूर केला होता. या प्रकल्पासाठी सुमारे पंधरा एकर जागेची गरज होती. दीड वर्षे उलटूनही सिपेट प्रकल्पाच्या उभारणीसाठी पनवेल येथे जागा उपलब्ध न झाल्याने प्रकल्प रद्द होण्याच्या मार्गावर होता. याची माहिती गोडसे यांना मिळताच त्यांनी पनवेल येथील प्रकल्प राज्याबाहेर न जाता नाशिकला आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
CIPET Nashik Bharti 2021
गोडसे यांनी सिपेटचे प्रमुख झा यांची दिल्लीत भेट घेत पनवेल येथील मंजूर प्रकल्प इतरत्र जाण्याऐवजी तो नाशिक येथेच व्हावा, प्रकल्पासाठी जागा तातडीने उपलब्ध करून देऊ, असे स्पष्ट करीत रोजगार उपलब्धतेसाठी सिपेट प्रकल्पाची नाशिकला किती गरज आहे, याची सविस्तर माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना दिली. सिपेट नाशिकलाच व्हावा, यासाठी गोडसे यांनी दिल्लीदरबारी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले होते. काही महिन्यांपूर्वी केंद्रानेही सिपेटच्या नाशिक येथील प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता दिली होती.
नाशिकमधील गोवर्धन शिवारात सिपेट प्रकल्प
केंद्राच्या पथकाला नाशिकला पाचारण करून गोवर्धन शिवारातील जागेची निश्चिती चार महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करून निधीचा विषय मार्गी लावण्यात आला. या प्रकल्पासाठी ४० ते ४५ कोटींचा निधी लागणार असून, राज्य आणि केंद्र सरकारने ५०-५० टक्के निधी देण्याचे तत्त्वतः मान्य केले होते. जागा, निधी आणि मान्यता हे तिन्ही मुद्दे एकत्रितपणे सोडविण्यासाठी गोडसे यांच्या मागणीनुसार नुकतीच राज्याचे सचिव सीताराम कुंटे यांच्या दालनात विशेष बैठक घेण्यात आली. यात नाशिकमधील गोवर्धन शिवारात सिपेट प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून, प्रकल्प उभारणीसाठी लागणाऱ्या निधीपैकी पन्नास टक्के निधी राज्य सरकारमार्फत उपलब्ध करून देण्याच्या निर्णयावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. पुढील आठवड्यात याविषयीचा सविस्तर अहवाल केंद्राकडे सादर करण्यात येणार आहे.
Hello sir my name is akhil kushan I am cipet chandrapur student currently pass out my interesting field is testing I would like to join our Institute